
CMO Maharashtra
@CMOMaharashtra • 4,124,075 subscribers
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
Shorts
Videos

A glimpse of CM Devendra Fadnavis with fellow CMs and Union Ministers on the way from Parliament to Bharat Mandapam for the #BRICS Summit 2026. The dignitaries travelled jointly to minimise inconvenience to Delhi residents and facilitate smooth traffic movement. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इतर राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्यासमवेत नवी दिल्ली येथील संसद परिसरातून 'ब्रिक्स शिखर परिषद 2026' साठी भारत मंडपमकडे केलेल्या प्रवासादरम्यानचे काही क्षण... दिल्लीतील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कमीतकमी गैरसोय व्हावी, यासाठी मान्यवरांचा हा सामूहिक प्रवास. Devendra Fadnavis #NewDelhi #DevendraFadnavis #BRICS2026
CMO Maharashtra109,440 次观看 • 2 天前

🔸 Distribution of the ‘52nd India Gems & Jewellery Awards’ at the hands of Union Home and Cooperation Minister Amit Shah in the presence of CM Devendra Fadnavis. DCM Eknath Shinde, Gujarat DCM Harsh Sanghavi, Minister Adv. Ashish Shelar, Chairman of the Gem & Jewellery Export Promotion Council (GJEPC) Kirit Bhansali and other dignitaries were present. 🔸 केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘52 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स'चे वितरण. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, मंत्री ॲड. आशिष शेलार, जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) चे अध्यक्ष किरीट भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में ‘52वें इंडिया जेम्स एंड ज्वेलरी अवॉर्ड्स’ का वितरण। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरात के उप मुख्यमंत्री हर्ष संघवी, मंत्री एड. आशिष शेलार, जेम एंड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल (GJEPC) के अध्यक्ष किरीट भंसाली एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕝2.30pm | 13-9-2026📍BKC, Mumbai | दु. २.३० वा. | १३-९-२०२६📍बीकेसी, मुंबई. Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Harsh Sanghavi Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार GJEPC India Govind Dholakia #Maharashtra #DevendraFadnavis #52ndIGJA
CMO Maharashtra35,514 次观看 • 1 天前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे असे: ▪️औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल. ▪️ एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा. ▪️ गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करणार ▪️ विद्यार्थ्यांच्या इतरही ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार. एसआयटी त्याचा तपास करेल. ▪️ माहिती अधिकारात उत्तरपत्रिका द्यावी, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येईल. ▪️ इतरही परीक्षा, ज्यात तक्रारी त्याची फेरतपासणी आणि तोवर मुलाखती थांबवण्यात येईल. कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहून दीर्घकालीन उपाययोजना आपण करु शकणार नाही. ▪️ गुन्हे शाखेचा तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यात येईल. ▪️ लेंडवे, मराठे, नखाते यांच्या काळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी एसआयटीमार्फत करणार ▪️ राजूरकर कमिटी शिफारसींची पडताळणी करू, योग्य शिफारसींची अंमलबजावणी करणार ▪️ पोलिस भरती: दोन्ही पायाला चीप किंवा आणखी काही पर्याय देणार, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न करणार ▪️सारथी, बार्टी, महाज्योती याबाबतच्या प्रश्नांचे समाधान करणार ▪️मुलाखती संदर्भात गाईडलाईन ठरवणार, तसे समितीला सूचित करणार ▪️ पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करणार ▪️ एमपीएससी अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर स्वतंत्र चौकशी करायला तयार, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. ▪️ कालबद्ध कारवाई करणार, पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ करणार ▪️ पुढच्या परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात, म्हणून लांबणीवर. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरतीप्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच ती घेणार. पारदर्शिता हाच मुख्य निकष असणार. ▪️ एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष, सेवानिवृत्त न्यायाधीश त्यासाठी नियुक्त करण्यात येईल. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MPSC
CMO Maharashtra68,805 次观看 • 4 天前

परब्रह्म कलियुग अवतारी, श्री चक्रधर नमो नमः। 🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to Bhagwan Sarvagya Shri Chakradhar Swami on the occasion of his Avatar Din at his official residence in Mumbai today. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इनके अवतार दिन के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕙 9.55am |13-9-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ९.५५ वा. | १३-९-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #ShriChakradharSwami
CMO Maharashtra18,255 次观看 • 1 天前

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर; लॉजिस्टिक क्षेत्राला नवी गती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे देशाच्या मालवाहतुकीला नवी गती मिळणार आहे. देशाच्या आयात-निर्यात व्यापाराला चालना देणाऱ्या तसेच व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाची सविस्तर माहिती... Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Namo4ViksitBharat #FreightCorridor
CMO Maharashtra68,413 次观看 • 6 天前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज नागपूर येथे 'जिल्हा वकील संघटना, नागपूर 2026 च्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ' येथे कार्यकारिणीतील नवनिर्वाचित सदस्यांना बॅच प्रदान करण्यात आले. नवनिर्वाचित कार्यकारिणी:- ✅ ॲड. प्रकाश जायसवाल (संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष) ✅ ॲड. अनिल गुल्हाने (सरचिटणीस) ✅ ॲड. विकास कऱ्हाडे (उपाध्यक्ष) ✅ ॲड. वैशाली बगाडे (उपाध्यक्ष) ✅ ॲड. पंकज राजवाडे (सहसचिव) ✅ ॲड. रुबी सिंग (सहसचिव) ✅ ॲड. प्रिती पिंपळकर (कोषाध्यक्ष) ✅ ॲड. सौरभ राऊत (वाचनालयाचे प्रभारी) Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CMO Maharashtra30,390 次观看 • 2 天前

🔸Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis at the dedication of the Western Dedicated Freight Corridor and flagging off 4 freight trains at the hands of PM Narendra Modi (Online). New Freight Train Services on Western Dedicated Freight Corridor: 🚆New JNPT, Mumbai 🚆New Sanand 🚆New Makarpura 🚆New Umbergaon Union Minister Ashwini Vaishnaw, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Bharat Gogawale, Minister Aditi Tatkare, Consul General of Japan Sato Hitomi and other dignitaries were present. 🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) व राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण आणि 4 फ्रेट ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर नवीन मालवाहतूक रेल्वे सेवा: 🚆न्यू जेएनपीटी, मुंबई 🚆 न्यू साणंद 🚆न्यू मकरपुरा 🚆न्यू उंबरगाव यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, जपानच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से (ऑनलाइन) एवं राज्यपाल जिष्णू देव वर्मा और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर का लोकार्पण एवं 4 फ्रेट ट्रेनों को हरी झंडी दिखाकर शुभारंभ। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पर नयी मालवाहक रेल सेवाएँ: 🚆न्यू जेएनपीटी, मुंबई 🚆 न्यू सानंद 🚆न्यू मकरपुरा 🚆न्यू उंबरगांव इस अवसर पर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, जापान की महावाणिज्यदूत सातो हितोमी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.35am | 8-9-2026📍Uran, Raigad | स. ११.३५ वा. | ८-९-२०२६📍उरण, रायगड. Narendra Modi Governor of Maharashtra Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Bharatsheth Gogawale Aditi S Tatkare Mahesh Baldi Prashant Thakur Dilip Walse Patil Consulate-General of Japan in Mumbai Ministry of Railways जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (JNPA) #Maharashtra #DevendraFadnavis #Namo4ViksitBharat #FreightCorridor
CMO Maharashtra55,917 次观看 • 6 天前

🛣️ Maharashtra’s Prosperity Lifeline: Samruddhi Mahamarg! A historic moment highlighting Maharashtra’s growth and progress through essential infrastructural development... Grand inauguration of the 'Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg...' 🛣️ महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा : समृद्धी महामार्ग! पायाभूत सुविधांच्या विकासातून राज्याची होणारी समृद्धी अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण... Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SamruddhiMahamarg
CMO Maharashtra3,131,134 次观看 • 1 年前

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा! 🚇 ठाणे ते बोरिवली या २३ किलोमीटर मार्गाची लांबी दुहेरी बोगद्यामुळे ११ किलोमीटरवर येणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार असून अवघ्या १२ ते १५ मिनिटांमध्ये ठाणे ते बोरिवली गाठता येणार आहे. हा दुहेरी बोगदा भारतातील सर्वाधिक लांबीचा शहरी बोगदा ठरणार आहे. या प्रकल्पाची ही विस्तृत माहिती... Devendra Fadnavis MMRDA #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra113,612 次观看 • 1 个月前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे '62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा' या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन निर्मित 'खंजिरीचे बोल - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा' या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraStateFilmAwards
CMO Maharashtra17,283 次观看 • 4 天前

The Maharashtra citizens who were stranded in the flood-affected areas of Nepal have safely returned to India and are now on their way back to Maharashtra. During a video call with CM Devendra Fadnavis, they expressed their gratitude to the Government of Maharashtra and the CM's Office for their swift response and prompt intervention in ensuring their safe return to India. Speaking to the citizens, CM Devendra Fadnavis acknowledged that their timely rescue and return to India were made possible through the efforts of PM Narendra Modi and External Affairs Minister Dr. S. Jaishankar, who ensured that immediate assistance reached them. नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेले महाराष्ट्राचे नागरिक भारतात परतले असून उद्या ते महाराष्ट्रात येतील. या नागरिकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेऊन नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी दाखवलेली तत्परता याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवून भारतात आणणे शक्य झाले असल्याचे नमूद केले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
CMO Maharashtra55,151 次观看 • 16 天前

नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी मुख्यमंत्री यांचा संवाद नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांची परिस्थिती जाणून घेत, “घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे,” असा धीर दिला. पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले तसेच परराष्ट्र मंत्रालयाशीही संवाद साधून त्यांच्या सुरक्षित परतीला प्राधान्य देण्याबाबत पाठपुरावा केला. नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशीही मुख्यमंत्री यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी पर्यटकांना सांगितले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
CMO Maharashtra47,764 次观看 • 18 天前

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या ‘महा पल्स एआय’ या महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी उपक्रमाची विस्तृत माहिती... Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #HealthServices
CMO Maharashtra31,125 次观看 • 12 天前

CM Devendra Fadnavis addresses the 'Global Fintech Fest 2026' on 'Potential to Impact', highlighting the transformative role of Agentic AI, Tokenisation and Quantum technologies in shaping the future of finance. ( Mumbai | 9-9-2026) Devendra Fadnavis #Maharashtra #Mumbai #GlobalFintechFest2026
CMO Maharashtra13,542 次观看 • 5 天前

दुर्गगाथा शिवरायांची ! UNESCO ने महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा बहाल केला आहे. या गौरवशाली वारशाचा इतिहास, वैभव आणि वैशिष्ट्ये जगापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून UNESCO च्या 12 आणि महाराष्ट्रातील अन्य 3 अशा एकूण 15 गडकिल्ल्यांवर आधारित ‘दुर्गगाथा शिवरायांची’ हा विशेष माहितीपट महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित यांच्या निर्मितीतून साकारण्यात येत आहे. Devendra Fadnavis #Maharashtra #UNESCO #WorldHeritage
CMO Maharashtra12,872 次观看 • 4 天前

A Firm Resolve And Strong Unity for a Drug-Free Maharashtra 🔸CM Devendra Fadnavis chairs high powered meeting regarding the Drug-Free Maharashtra policy. MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Yogesh Kadam and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र धोरणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नशा मुक्त महाराष्ट्र नीति के संदर्भ में उच्चस्तरीय बैठक। इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐 1.15pm | 19-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.१५ वा. | १९-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis Pankaj Rajesh Bhoyar Yogesh Ramdas Kadam #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMaharashtra
CMO Maharashtra58,573 次观看 • 26 天前

Under the initiative of CM Devendra Fadnavis, the safe journey home of the 100 pilgrims stranded in Nepal has begun. The Government ensured the necessary coordination and assistance for their safe travel from Nepal to Patna. Arrangements were also made for their onward train journey to Maharashtra. At 7:36 a.m. today, all 100 pilgrims safely departed from Patna for Nagpur on Train No. 17609. The Government of Maharashtra and the CM Office continue to closely coordinate their safe return, and the pilgrims will soon reach their homes in Maharashtra. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 100 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नेपाळपासून पाटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि सर्वतोपरी मदत करण्यात आली. महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी त्यांच्या रेल्वे प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी 07:36 वाजता रेल्वे क्रमांक 17609 द्वारे सर्व 100 भाविक पाटणाहून नागपूरकडे सुखरूप रवाना झाले. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या सुरक्षित परतीसाठी सातत्याने समन्वय साधत असून, सर्व भाविक लवकरच महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचतील. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
CMO Maharashtra33,170 次观看 • 16 天前

🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of agreements and a Non-Binding Term Sheet / Letter of Intent (LoI) for strategic urban development projects in Maharashtra at Sahyadri Guest House, Mumbai today. Details of the agreements and LoI: 🔸Contract Agreement exchanged between, Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) and Surbana Jurong Infrastructure Pte. Ltd., Singapore, for consultancy services for the preparation of the Master Plan, Vision Document and other documents for KSC New Town. 🔸Agreement for the appointment of a Project Management Consultant for the Raigad Pen Growth Centre, between Raigad Pen Growth Centre Limited (RPGCL) and Surbana Jurong, Government of Singapore. 🔸A Non-Binding Term Sheet / Letter of Intent (LoI) exchanged between Raigad Pen Growth Centre - Orange Smart City and Mapletree Real Estate Advisors Pte. Ltd. for a proposed 100-acre mixed-use development. Senior Vice President of Mapletree Real Estate Advisors Pte. Ltd., Ajay Kumar Singh, Head of South Asia Operations, Surbana Jurong, Government of Singapore, Avinash Misra and other officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण नागरी विकास प्रकल्पांसंदर्भात करार आणि 1 नॉन-बाइंडिंग टर्म शीट / लेटर ऑफ इंटेंटची (LoI) देवाणघेवाण करण्यात आली. करार आणि लेटर ऑफ इंटेटचा तपशील : 🔸मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि सुरबना जुरांग, इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. सिंगापूर यांच्यात KSC न्यू टाउनसाठी मास्टर प्लॅन, व्हिजन डॉक्युमेंट आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी सल्लागार सेवा देण्याबाबत करार करण्यात आला. 🔸रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड (RPGCL) आणि सुरबना जुरांग, सिंगापूर गव्हर्मेंट यांच्यात रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याबाबत करार करण्यात आला. 🔸रायगड पेण ग्रोथ सेंटर - ऑरेंज स्मार्ट सिटी आणि मॅपलट्री रिअल इस्टेट ॲडव्हायझर्स पीटीई लि. यांच्यात प्रस्तावित 100 एकर क्षेत्रावरील एकात्मिक विकास प्रकल्पासाठी नॉन-बाइंडिंग टर्म शीट / लेटर ऑफ इंटेंटची (LoI) देवाणघेवाण करण्यात आली. यावेळी मॅपलट्री रिअल इस्टेट ॲडव्हायझर्स. पीटीई. लि. चे उपाध्यक्ष अजय कुमार सिंह, सिंगापूर सरकारच्या सुरबना जुरांगचे दक्षिण आशिया ऑपरेशन्स हेड अविनाश मिश्रा, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra70,245 次观看 • 1 个月前

A groundbreaking moment for Maharashtra as the GoM and RIL signed a historic MoU worth ₹3,05,000 crore, with over 3,00,000 employment opportunities across diverse sectors, including new energy, retail, hospitality, and high-tech manufacturing, under the leadership of Shri Anant Ambani. Shri Anant Ambani lauds PM Shri Narendra Modi for his transformative efforts in building a Viksit Bharat, with RIL committed to contributing to a New India. He also thanks CM Shri Devendra Fadnavis for his leadership in positioning Maharashtra as the gateway to India’s $5 trillion economy and, soon to be first trillion-dollar economy. CM Shri Devendra Fadnavis thanks Shri Anant Ambani for this historic investment, boosting Maharashtra's growth. Narendra Modi Devendra Fadnavis Reliance Industries Limited #WEF25 #DevendraFadnavis #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra
CMO Maharashtra801,143 次观看 • 1 年前

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे आधुनिक सुविधांनी सुसज्ज! 🚔 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना तत्पर आणि सुलभ पोलीस सेवा मिळावी, या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याची नूतन इमारत उभारण्यात आली आहे. सिडको आणि अदानी समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही इमारत आधुनिक पायाभूत सुविधा आणि आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असून, पोलीस अधिकारी व अंमलदारांना अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे, यासाठी यात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोलीस ठाण्याची ही सविस्तर माहिती... Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai
CMO Maharashtra37,671 次观看 • 23 天前