
Maharashtra Congress
@INCMaharashtra • 296,644 subscribers
The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
Shorts
Videos

जे मुख्यमंत्री आपल्या सुरक्षेतील कर्मचाऱ्याची साधी काळजी घेत नाहीत, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने काय अपेक्षा ठेवावी? धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेतील एक कर्मचारी गाडीत चढताना पडल्याचे दृश्य समोर आले. त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी थांबण्याऐवजी पुढे जाण्याचीच घाई दिसली; आणि आता आपल्या सुरक्षारक्षकासाठीही थांबले नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना असोत किंवा स्वतःच्या सुरक्षेतील कर्मचाऱ्याची अडचण…मुख्यमंत्र्यांची हीच असंवेदनशीलता महाराष्ट्राने किती काळ सहन करायची? मुख्यमंत्री साहेब, दौरे आणि फोटोसेशनपेक्षा माणुसकी मोठी असते!
Maharashtra Congress136,782 次观看 • 16 天前

फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे? आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मध्यरात्री ३ वाजता, मुंबई पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना मध्येच अडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांची धरपकड करण्यात आलीय. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना धमकावले जात असून, “केसेस करू” अशी धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली एक बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू होण्याआधीच अशा प्रकारे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध! सुलतान फडणवीस, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना धमकावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे. विद्यार्थ्यांना धमकावून त्यांचा आवाज दाबता येणार नाही! आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे! Maharashtra Police Devendra Fadnavis Dr.Ashok Uike
Maharashtra Congress61,008 次观看 • 8 天前

घाईघाईत उद्घाटनं करण्यापेक्षा सुरक्षेला प्राधान्य देणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण! २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसने घेतलेले निर्णय हेच भारताच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा भक्कम पाया होते. सुरक्षित, सक्षम आणि दीर्घकाळ टिकणारे इन्फ्रास्ट्रक्चर हीच देशाची खरी प्रगती आहे.
Maharashtra Congress154,577 次观看 • 3 个月前

संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
Maharashtra Congress82,135 次观看 • 3 个月前

वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.
Maharashtra Congress48,088 次观看 • 2 个月前

पैसे द्या, ॲडमिशन घ्या! फडणवीसांच्या महायुती सरकारमध्ये शिक्षण व्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळं झालं आहे. शिक्षण व्यवस्था म्हणजे पैसे छापण्याचं मशीन, अशीच भावना फडणवीसांच्या मंत्र्यांची झाली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाट लावणाऱ्या भाजप-महायुती सरकारला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे.
Maharashtra Congress37,295 次观看 • 2 个月前