
Nana Patole
@NANA_PATOLE • 379,790 subscribers
Former President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Former Speaker- MaharashtraAssembly, Former MP - Bhandara-Gondia
Shorts
Videos

इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे सुमारे ४,००० शेतीमालाचे कंटेनर जेएनपीए बंदरावर अडकून पडले आहेत. मी आज स्वतः जेएनपीए बंदरावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र आतापर्यंत केंद्र किंवा राज्य सरकारचा कोणताही जबाबदार मंत्री येथे पाहणीसाठी आलेला नाही. यावरून सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसून येते. हा गंभीर विषय मी उद्या विधानसभेत मांडणार आहे.
Nana Patole36,674 görüntüleme • 5 ay önce

जून महिना संपत आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एलनिनो मुळे दुष्काळाची तीव्रता जाणवू शकते असे नमूद केले होते. दुर्दैवाने आज तीच परिस्थिती राज्यभर निर्माण झाली आहे. आपण पाणी अडवले नाही, पाणी जिरवले नाही, नद्यांचे संवर्धन केले नाही. परिणामी अनेक धरणे तलाव आणि जलस्रोत कोरडे पडत आहेत. राज्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे अधिवेशन केवळ १४ दिवसांचे अल्पकालीन अधिवेशन आहे. त्यामुळे शोक प्रस्तावानंतर राज्यातील उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर चर्चा घेण्यात यावी अशी माझी मागणी आहे.
Nana Patole12,892 görüntüleme • 2 ay önce

मुंबई येथे संजय दीना पाटील यांनी एका पत्रकाराला मारण्याची धमकी दिली. आज पत्रकारसुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. माहिती जनतेसमोर मांडण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना केवळ बातमी दिल्याच्या कारणावरून धमक्या दिल्या जात असतील किंवा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होत असेल, तर ही घटना अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन संबंधित प्रकरणाबाबत तातडीने निवेदन करावे अशा सूचना द्याव्यात, ही मागणी सभागृहात केली.
Nana Patole10,651 görüntüleme • 2 ay önce

भेकड भाजप व्हायरल करत असलेली माझ्या आवाजातील तथाकथित ऑडियो क्लिप मी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर ऐकवली. कॅमेरासमोर प्रतिक्रिया देतानाचा माझा आवाज आणि बदनामीसाठी डब करून घेतलेल्या आवाजाची लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकत्रितपणे शहनिशा करता येईल. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.
Nana Patole48,725 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा यांचा डाव जुना आहे... तुम्हाला काय वाटतं हा महाराष्ट्र उद्योगधंदा करू शकत नाही ? Devendra Fadnavis लक्षात ठेवा.. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्रात आहे ! हा महाराष्ट्र सरस्वतीलाही पुजतो ... आणि लक्ष्मीलाही ! आणि राहिला प्रश्न तुमच्या या जुन्या डावाचा... तर तो आम्ही कधीच होऊ देणार नाही... यापुढे महाराष्ट्राकडे अशा नजरेने बघण्याची हिंमत करायची नाही ! #Maharashtra #Gujarat #ModiLies #CronyCapitalism
Nana Patole47,197 görüntüleme • 1 yıl önce

काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बूथ कार्यकर्त्यांना माझे आवाहन! २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी जोपर्यंत फॉर्म 17C हातात पडत नाही, तोपर्यंत मतदान केंद्र सोडू नका. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्याचे भ्रष्टयुतीचे मनसुबे हाणून पाडा. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. चला लढूया महाराष्ट्र घडवूया! #यंदा_पंजा #Congress #MahaVikasAghadi #Maharashtra #MaharashtraElection2024
Nana Patole44,731 görüntüleme • 1 yıl önce

नागपुरात हिट अँड रन प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रताप समोर आला आहे. पठ्ठ्यानं एका गाडीला, दोन दुचाकींना धडक दिली. पण आता ना त्या बारचा सीसीटीव्ही ताब्यात ना अटकेची कारवाई. कारण, या युवराजांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था पुन्हा भाजपच्या दावणीला बांधलेली आहे, हे दिसून आलं. श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या या सरकारला गरिबाच्या जीवाची किंमत नाही. गरिबाचा जीव गेला तरी यांना काय? गृहमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याचा धाक त्यांच्याच पक्षातल्यांना नाही... #shame #BJPHitAndRun
Nana Patole43,496 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्र माझा आवाज ओळखतो. अशा क्लिपमुळे लोकं भाजपवरच हसत आहेत. भाजपने उभा केलेला तोतया आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील याला मी ओळखतही नाही. सर्व आरोपांचे मी खंडन करतो. आम्ही त्यांच्याविरोदात एफआयआर दाखल केली असून मानहानीचा दावादेखील ठोकला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीच्या बाजूने उभी असून 'मविआ'चेच सरकार स्थापन होणार याविषयी मला पूर्ण खात्री आहे! #MaharashtraElection2024 #Congress #MahaVikasAghadi
Nana Patole33,234 görüntüleme • 1 yıl önce

देश में आयी नई आँधी राहुल गांधी राहुल गांधी #JanNayakRahulGandhi.
Nana Patole43,112 görüntüleme • 3 yıl önce

मा.Governor of Maharashtra CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Public Service Commission 👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा) 👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत. राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच. यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला. 👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा? अजून कोणते पुरावे हवे आहेत? 👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी सज्ज.... 👉 आपलेच सरकार असलेल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही? 👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात? एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का???? महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी. त्यातून करोड़ोंची लुट केली. निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
Nana Patole29,485 görüntüleme • 2 yıl önce

मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar CMO Maharashtra Dr Suvarna S Kharat Maharashtra Public Service Commission पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला. महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते. 1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली. राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली. सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी. 2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी? 3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का? 4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी. 5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही. 6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.
Nana Patole29,988 görüntüleme • 2 yıl önce

MPSC च्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याऐवजी आंदोलन करावं लागतं, हे कुठे तरी थांबलं पाहिजे.
Nana Patole30,938 görüntüleme • 3 yıl önce

बहुत छाले हैं उसके पैरों में कमबख्त उसूलों पर चला होगा #यंदा_पंजा #Congress #MaharashtraElection2024
Nana Patole19,657 görüntüleme • 1 yıl önce