Shalini Thackeray's banner
Shalini Thackeray's profile picture

Shalini Thackeray

@ThakareShalini74,454 subscribers

सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन

Videos

ThakareShalini's profile picture

मुंबई तक वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांचे कौतूक करणं गरजेचं आहे. जनेतच्या कामाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणं सध्याच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्वाचं आहे. ज्या जनतेच्या कामासाठी निधी मिळत नाही अशी आरोळी देत, खासदारांनी पक्ष बदलला त्यांना मिळालेला निधी आणि त्यांनी केलेली कामं, यांचं हे रिपोर्ट कार्ड सर्व सत्य आपल्या समोर आणण्यासाठी पुरेसे आहे. जनतेला हे लोक 'मूर्ख' समजत असतील, तर त्यांची ही घोडचूक आहे...जनता लवकरच उठाव करेल, जो ह्यांना ह्यांची जागा दाखवेल! #MumbaiTak #MPReportCard #ShameOnMPs #Liers #mnsadhikrut Mumbai Tak Sahil Joshi

Shalini Thackeray

15,984 views • 1 month ago

ThakareShalini's profile picture

मुंबईतल्या भटक्या आणि पाळीव पण सोडून दिलेल्या प्राण्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी Adopt A friend forever अशा पद्धतीची चळवळ सुरु झाली आहे. हा उपक्रम Teatro Bar & Grill, YODA आणि GoPaws यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातोय. या उपक्रमांतर्गत एका मुक्या प्राण्याला त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी प्राण्यांना दत्तक घेण्याची ही चळवळ सुरु झाली आहे. मुंबईत आज अशाच एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात सौ. शर्मिला ठाकरे या सहभागी झाल्या होत्या. शर्मिला वहिनी ज्या स्वतः एक प्राणीप्रेमी आहेत आणि मुक्या प्राण्यांसाठी त्या कायम आवाज उठवत असतात, त्यांच्यासाठी उपक्रम राबवत असतात. या उपक्रमाला सौ. शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून प्राण्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आणला. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना “महानगरपालिकेचा मोकाट कुत्र्यांसाठी असलेला निधी नेमका जातो कुठे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. #MNSAdhikrut

Shalini Thackeray

12,807 views • 2 months ago

No more content to load