
Adv. Yashomati Thakur
@AdvYashomatiINC • 107,302 subscribers
Congress Worker. Special Invitee Congress Working Committee ( CWC ), Ex Minister & Ex. MLA ( Maharashtra Lagislative Assembly )
Shorts
Videos

काकांनी डायरेक्ट नंबर ची चिठीचं आणली..मग काय काम कराच लागते म्हणे 😊आपुलकी आहे आणखी काय..
Adv. Yashomati Thakur16,500 просмотров • 2 месяцев назад

सोलापूरच्या करमाळा येथे महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता गुंडांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून कायद्याने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिली की कारवाई थांबवा, अन्यथा तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. Ajit Pawar #अवैधउत्खनन #अजितपवार #महिला_अधिकारी #Maharashtra
Adv. Yashomati Thakur45,686 просмотров • 11 месяцев назад

हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन??? धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकरी शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला गवारला अवघा १ रुपया किलो भाव मिळत असल्याच्या संतापातून दीड क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून दिली. शेतमालाला हमीभाव देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी जुमलेबाजी करून सत्तेचा मलिदा १२ वर्ष मोदी सरकार खात आहे. पण शेतकऱ्यांचा कष्टाला घामाला कवडीचे मोल नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाची माती करणारे मोदी आणि महायुतीचे सरकार आहे. Congress Maharashtra Congress #Congress #धुळे #साक्री #शेतकरी #महायुती #BJP4IND
Adv. Yashomati Thakur15,336 просмотров • 2 месяцев назад

अमरावती जिल्ह्यातील MPSC क्लर्क भरती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन या भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांच्या व्यथा मांडल्या. MPSC क्लर्क या पदासाठी जानेवारी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती,पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये पार पडली तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये झाली. या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी जुलै 2024 मध्ये पूर्ण झाली आहे परंतु कौशल्य चाचणी दरम्यान किबोर्ड खराब आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे व याच कारणामुळे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयात (MAT) दाद मागितली आहे परंतु MAT ने भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही. सदर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत 20 महिन्यांचा कालावधी लोटला आहे तरीही अद्याप ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय न होऊ देता लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक अडचणींचा सामना करत गोरगरिबांची मुलं आपल्याला नोकरी मिळेल या आशेने परीक्षा देत असतात परंतु भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागणं ही खेदजनक बाब आहे. माझी मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे तसेच मा. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis व Ajit Pawar यांना विनंती आहे की आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.
Adv. Yashomati Thakur12,676 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки