
Amit V. Deshmukh
@AmitV_Deshmukh • 201,026 subscribers
Former Minister for Medical Education & Cultural Affairs,Govt of Maharashtra
Shorts
Videos

महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुका लढवून विजयी झालेले शिवसेनेच्या काही खासदारांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांचा हा अवमान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचंड बहुमत असलेला सत्ताधारी पक्ष हे सर्व कशासाठी घडवून आणतो आहे हे समजत नाही. विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही असा त्यांचा उद्देश असेल तर देशातील लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने ती मनोवृत्ती धोकादायक असल्याचे काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. #मुंबई #विधान_भवन #महाराष्ट्र_विधिमंडळ #पावसाळी_अधिवेशन2026 #महाविकास_आघाडी #काँग्रेस #राष्ट्रवादी_काँग्रेस #शिवसेना #Maharashtra #MonsoonSession2026
Amit V. Deshmukh10,894 просмотров • 18 дней назад

स्वर्गीय विलासराव देशमुख साहब, चांद तारे बुझ गये, सूरज सवाली हो गया, इक तेरे जाने से सारा शहर खाली हो गया - खासदार इम्रान प्रतापगढी आदरणीय विलासराव देशमुखजींच्या उल्लेखाने भावूक झाले! #AmitDeshmukh4Latur #Congress #MVA #latur #MaharashtraAssemblyElections2024 #Maharashtra
Amit V. Deshmukh59,150 просмотров • 1 год назад

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, अशी भावना आता राज्यातील सामान्य जनतेची झाली असल्याचे काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना नमूद केले. राज्याचा गृह विभाग किंवा राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही या संदर्भाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे, मात्र राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत बारामती विमानतळाचे संचालन होते त्या #MIDC आणि #MADC हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे अशी मागणी यावेळी केली. #मुंबई #महाराष्ट्रविधिमंडळ #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession #MahaBudgetSession2026 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Rohit Pawar Congress Maharashtra Congress Harshwardhan Sapkal Mumbai Congress Indian Youth Congress Indian Youth CongressMaha TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi
Amit V. Deshmukh12,796 просмотров • 4 месяцев назад
Больше нет контента для загрузки