
Vishwas patil
@AuthorVishwas • 6,746 subscribers
Indian writer
Videos

स्मशानातले जोगी तारांकित हॉटेलात आले! उद्योगपतीच्या वाढदिवसाचे सोने झाले!! -विश्वास पाटील संभाजीनगरच्या मेलोर नावाच्या थ्री स्टार हॉटेलमध्ये डॉ. डी. एस. काटे या उद्योगपतींच्या एकसष्टीच्या सोहळ्याला स्मशानातील 49 पाहुणे हजर होते. त्या तारांकित हॉटेलमध्ये 500 प्रतिष्ठित पाहुण्यांच्या गर्दीत स्मशानातील आपले पारंपारिक पेहराव परिधान करून आलेली ही मसणजोगी मंडळी उठून दिसत होती. त्यांची उपस्थिती ही श्री. काटे यांच्या 21 जून रोजी झालेल्या वाढदिवस सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली होती. स्मशानातील मसणजोगी मसणवाट सोडून कधीही फारसे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांना नागरी जीवनातील किमान आनंद मिळणे जिथे दुरापास्त असते, तिथे तारांकित हॉटेलातील सत्कार आणि प्रतिष्ठा या गोष्टी स्वप्नातसुद्धा शक्य नसतात. पण काटे साहेबांनी संभाजीनगर आणि आजूबाजूच्या अनेक खेड्यातील स्मशानभूमींमध्ये चक्क आपले प्रतिनिधी व मित्र पाठवले. अहोरात्र प्रेताला अग्नी देणे, त्याच दुर्गंधीत राहणे हा स्मशानजोगी मंडळींचा दिनक्रम असतो. तेथील महिला तर त्या तिथल्या धुरकट व अंधाऱ्या वातावरणातून कधीही बाहेर पडत नाहीत. उपस्थितांपैकी सहा महिलांचे कुंकू कोरोनामध्ये हरवले होते. त्यांच्या रूढीपरंपरेप्रमाणे स्मशानाची हद्द त्यांना सोडताच येत नाही. पण काटे साहेबांच्या प्रचंड आग्रहामुळे त्यांना या सोहळ्यास यावेच लागले. या भगिनींच्या डोळ्यांतून आपला सत्कार होताना अश्रू वाहत होते. मग त्यांनी स्पष्टपणे सर्वांना सांगितले की, “आम्हाला आमचं कुंकू पुसलं गेल्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच या काटे नावाच्या बांधवामुळे बाहेरची हवा म्हणजे काय आणि ऊन, सूर्य अशा गोष्टी पाहायला मिळाल्या.” या सर्व मंडळींना साडी-चोळी, पॅन्ट-शर्ट असा संपूर्ण पोशाख करून श्री. काटे यांनी त्यांचा सन्मान केला. आपल्या देशात अनंत उद्योग करणारे आणि डोंगरासारखा पैसा मिळवणारे उद्योगपती थोडे आहेत का? पण आपल्या 61 व्या समारंभामध्ये समाजाच्या एकदम खालच्या थरातील, स्मशानातील गरीब बांधवांची आठवण काढणारे देशातील डॉक्टर काटे हे पहिले उद्योगपती असावेत. आमचे मित्र श्री. डॉक्टर डी. एस. काटे हे संभाजीनगरातील एक अभ्यासू आणि प्रतिष्ठित असे उद्योगपती आहेत. अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये लिहिलेले अर्थदिशा, अर्थसंपदा, अर्थनीती असे अनेक ग्रंथ लोकप्रिय आहेत. विविध वृत्तपत्रांतून काटे यांचा परिचय वाचकांना आहे. त्यांनी “संत तुकोबा ते संत चोखोबा—एक वारी समतेची” या नावाचा उपक्रम राबवून मंगळवेढा ते देहू असे नेटके संयोजन केल्याचे अनेकांना माहिती आहे. नानाविध सामाजिक उपक्रम व चळवळींमध्ये श्री. काटे भाग घेत असतात. त्यांना किंगडम ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून सन्मानाची पीएच.डी.सुद्धा प्राप्त झालेली आहे. या रसिक व समाजप्रेमी मित्राचे मी जाहीर अभिनंदन करतो. यानिमित्ताने आम्ही इतकेच म्हणू, “काटे साहेब, तुम्ही जगा हजारो साल, तुमच्या करणीने गरिबांचे कमी व्हावेत हाल! जनसामान्यांचे आशीर्वाद हीच तुमच्या जीवनसंघर्षाची ढाल!” – विश्वास पाटील #VishwasPatil #DrDSKate #Masanjogi #NomadicTribes #SocialJustice #ChhatrapatiSambhajinagar #Leadership #author
Vishwas patil16,450 görüntüleme • 1 ay önce

शिवरायांच्या आरत्या कसल्या रे पोवाडा म्हणा ! तो कोणी नव्हता मंदिरातला देव भोळा हिंदवी स्वराज्याच्या भाळीचा टिळा आगीचा तो कडाडता गोळा ! -विश्वास पाटील शोधा त्या सह्याद्रीच्या पाषाणावरच्या खुणा बघा ते किल्लेदुर्ग पुन्हा पुन्हा ठेवून पाठीचा ताठ कणा नेटाने फक्त शिवरायांचा पोवाडा म्हणा ! आरती चांगली गणेशाची गाभाऱ्यात मांगल्य नांदते शिवरायांच्या महतीसाठी नकोत नाजूक टाळ चिपळ्या हवेत कडाडते ढोल, राजांची कीर्ती अस्मानापरी अनमोल, मर्दाचा गावा पोवाडा मर्दाने सांगती इतिहासाची पाने जोतिबानिही गाजवली राने केवळ पोवाड्याने, विसरलात मूळ आबासाहेबांच्या आणि मूळ मासाहेबांच्या खुणा, अन आता विसराल जर पाळणा आणि आरतीतील अंतर कसा जागवाल इतिहास तो निरंतर ! शिवजयंती हा सण मर्दानगीचा सांगतो ,इतिहासाची साक्ष ठेवुनी पुन्ह: पुन्हा ठेवुनी ताठ कणा आरत्या नकोत रे पोवाडा म्हणा ! - विश्वास पाटील Mehta Publishing House Westland Books Amazon Books ZEE २४ तास ABP माझा Lokmat @News18lokmat News18 India SaamTV News Vani Prakashan #vishwaspatil #MarathiCulture #Maharashtra #ShivajiLegacy #MaharashtraHistory #MarathiLiterature #HinduSamrajya #Shivray #ShivJayanthi #shivajimaharaj #ChhatrapatiShivaji #MarathaEmpire #Shivajian #MarathaPride #HindaviSwrajya #author #writer
Vishwas patil42,899 görüntüleme • 1 yıl önce

शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या महापित्याची आणि जिजाऊ मातेच्या कुंकवाच्या धन्याची समाधी अत्यंत विपन्न अवस्थेत ! The Tomb of Great Shivaji’s father and Rajmata Jijau’s husband valiant Shahajiraje is in the wilderness ! – विश्वास पाटील दूर कर्नाटकामध्ये दावणगिरी जिल्ह्यात होदीगीरे नावाच्या गावात एखाद्या सामान्य, अनामिक शिपायाच्या समाधी सारखं महाराष्ट्राचे ते महातीर्थ ऊन्हापावसात करपते आहे. भिजते आहे. 360 वर्षांपूर्वी याच ठिकाणी शिवरायांचे महापिता शहाजीबाबांचे घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले होते. एखाद्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, तेही शिवरायांसारख्या महापुरुषाच्या जन्मदात्याच्या समाधीकडे महाराष्ट्राने जे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तसे बेच्छूट उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच पाहायला मिळणार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या वडिलांची कोटी कोटी रुपयांची स्मारके सरकारी खर्चाने या महाराष्ट्रभूमीत बांधली गेली. मात्र आमच्या शहाजीराजांच्या नशिबी हे असे काय यावे. कोण होते शहाजीराजे? 1 . ज्यांनी शिवरायांना जन्म दिला.“गनिमी काव्या” ची दीक्षा दिली. बेंगलोरच्या किल्ल्यात शिवरायाना लष्करी शिक्षण दिले.. स्वतः ज्यानी ती शिवरायांची सुप्रसिद्ध “राजमुद्रा” लिहिली. 2 . औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या फौजांच्या विरोधात 1624 ची भातवडीची लढाई जिंकली. 3. औरंगजेबाच्या बापाच्या शहाजानच्या फौजांना इतके सळो की पळो करून सोडले की, त्याला ताजमहालचे बांधकाम बाजूला ठेवून 1634 मध्ये शहाजीबाबांच्या विरोधात स्वतः लढाईसाठी महाराष्ट्रात यायला भाग पाड पाडले. 4. “ज्या भूमीत शहाजी राहतो तिथल्या पहाडाना आपोआप पाय फुटतात”असे अनुमान काढून दिल्लीचा बादशहा शहाजहानने 31 मे 1635 च्या माहुलीच्या कराराच्या तिसऱ्या कलमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्रातून हद्दपार केले होते. म्हणून त्यांना दीर्घकाळ कर्नाटकात राहावे लागले. असा तो स्फूर्तीचा झरा, पेटता वारा, मराठ्यांच्या महापराक्रमाचा तुरा, जिजाऊंच्या कपाळीचा कुंकुमहिरा आज दूर कर्नाटकात गेली 360 वर्ष तसाच वैराण माळावर पहुडलेला आहे. “फक्त निवडणुका लढवण्याची आणि जिंकण्याची चटक हेच जीवनध्येय” मानलेला आजचा महाराष्ट्र दुर्दैवाने आपला खरा इतिहास, संस्कृती आणि माणुसकीही विसरून चालला आहे. “दुश्मनांच्याही स्मृतीस्थळांकडं आदराने पहा” असं सांगणाऱ्या शिवरायांच्या जन्मदात्याच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्दैवी अवस्था पाहून काळजाला चटके बसतात. तीन वर्षामागे मी हा विषय महाराष्ट्र समोर मांडला होता. पण प्रश्न आमच्या शिवरायांच्या पित्याचा असतानाही मेलेल्या महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र खऱ्या अर्थी घडवला, त्या जिजाऊ साहेबांना स्वर्गात काय वाटत असेल ? “खूप इज्जत आणि इभ्रत ठेवलीत हो तुम्ही आमच्या कुंकवाच्या धन्याची आणि आमच्या शिवबाच्या परमपूज्य पित्याची”. काळाच्या पाठीवर असामान्य कर्तुत्वाचे ठसे उमटवणाऱ्या या महापुरुषाकडे हा ‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? कर्नाटकातली सामान्य माणसे कशीबशी या समाधीची देखरेख करत आहेत. ज्याना कोणाला शिवरायांच्या पित्याच्या समाधीवरच्या छपराचे एखादे कौल आपल्या देणगीतून पांघरले जावे असे वाटत असेल. त्यांनी पुढील क्रमांकावर जरूर संपर्क साधा. Mallesh Rao Shinde 9632065915 President Dawangiri Shahajiraje Trust. अभ्यासक्रम ठरवणाऱ्या विद्वानांनी, लबाड इतिहासकारांनी आणि शासकानीही ज्या स्वराज्य संकल्पक महापुरुषाकडे दुर्लक्ष केले. त्याच्या समाधीवर किमान एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या समाधीला जेवढी सावली मिळते तेवढी तरी देण्याचा प्रयत्न करूया. इलेक्शनबाज स्वार्थी महाराष्ट्रा जागा हो , निदान आपल्या पित्याच्या महापित्यासाठी तरी ! .…विश्वास पाटील Narendra Modi Devendra Fadnavis Ajit Pawar Sharad Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr.Amol Kolhe Supriya Sule SaamTV News Pudhari News 24 ZEE २४ तास TV9 Marathi ABP माझा #ShahajiRajeSamadhi #ShahajirajeBhosale #jijaumata #shivajimaharaj #maharashtrahistory #indianhistory #heritagepreservation #maharaja #maharashtra #shivajimaharaj #author #authorvishwaspatil #vishwaspatil #literature
Vishwas patil34,394 görüntüleme • 2 yıl önce

हैदराबाद निजाम सरकारने तत्कालीन मुंबई प्रांतिक सरकारला नोव्हेंबर 1956 मध्येच सर्व रेकॉर्ड ऑफिशिअली दिल्याच्या नोंदी आहेत. काखेत कळसा आणि गावाला वळसा ! पाच निवृत्त न्यायाधीशांची कमिटी पाठवली तरी हैदराबादमध्ये काय मिळणार ? इथे रेकॉर्ड पोचल्याच्या दोन्ही सरकारने नोटिफिकेशन सुद्धा काढल्या होत्या. मग गरीब शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गेले कुठे ? आज रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर त्या परिस्थितीला किती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री जबाबदार ? विश्वास पाटील . याबाबतीतले माझे नम्र निवेदन माझ्या यूट्यूब चैनल वर या संकेतस्थळावर आपण मुद्दाम ऐका. तत्कालीन हैदराबादच्या चीफ सेक्रेटरीनी आपल्या अखत्यारीतील सर्व District Collectors ना निजामाच्या हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड तात्काळ मुंबई सरकारकडे व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सर्क्युलर ऑक्टोबर 1956 मध्ये काढले होते. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यानच सर्व रिव्ह्यून्यू, ट्रेझरी, पोलीस आणि त्यानंतर काही महिन्यात न्यायालयीन रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. तशी नोटिफिकेशन्स हैदराबाद आणि मुंबई सरकार या दोघांनीही काढली होती. तर ते रेकॉर्ड गेले कुठे ? गेली दोन वर्ष आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. भारत सरकारच्या स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 च्या सेक्शन 76 तसेच 77 व इतर संबंधित कलमानुसार नवीन राज्य किंवा त्याची पुनर्रचना झाली झाल्यावर तात्काळ संबंधित रेकॉर्ड ज्या त्या सरकारकडे देण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानुसार किती तारखेपर्यंत कुठले रेकॉर्ड हस्तांतर झालेच पाहिजे अशा “डेडलाईन” सुद्धा ठरवणारे आदेश काढले गेले होते. त्यानुसार महसूल व जमाबंदी दप्तर हे डिसेंबर 1956, ट्रेझरी लेजर्स 31 डिसेंबर 1956 आणि हैदराबादच्या सचिवालयातील संबंधित सर्व सेक्रेटरीएट फाईल ह्या फेब्रुवारी 1957 पर्यंत द्यावयाच्या डेडलाईन्स ठरवून गेल्या दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार संबंधित हस्तांतरण त्यावेळीच्या उत्तम प्रशासकीय यंत्रणेने विनाविलंब पार पाडले होते. मग मग ते दिलेले सर्व रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी कोणाची ? कायद्याच्या भाषेत हू इज कस्टस्टोडीयन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स ? 18 91 मध्ये “इम्पेरियल रेकॉर्डस कीपर” नावाची पोस्ट निर्माण झाली होती. आता भारत सरकारने 1993 मध्ये पब्लिक रेकॉर्डस Act निर्माण केला आहे. कायद्यानुसार महसुली रेकॉर्डसाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि त्या विभागाचे जे प्रमुख असतात ते कस्टोडियन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड असतात. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यान औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर लातूर, नळदुर्ग ह्या सीमेवरील जिल्ह्यांचे हस्तांतरण तीन राज्यांमध्ये विधिवतरीत्या पार पाडले गेले आहे. जेव्हा एखादे नवीन राज्य किंवा देश निर्माण होतो. तेव्हा सैन्य किंवा सुरक्षा घुसवण्याच्या आधीही त्या प्रांतातले जमिनींचे नकाशे आणि मालकी हक्कपत्रक ही सर्व रेकॉर्ड्स महत्वाची असतात. हा बाळबोध नियम आमच्या प्रशासकांना माहित नाही का ? तसेच मौर्य काळापासून संबंधित कास्तकार किंवा शेतकरी याच्या मालकीचे कोणते क्षेत्र आहे अशा कागदपत्रांच्या दुय्यम सत्यप्रती राजाने आपल्या दप्तरांमध्ये सांभाळून ठेवायच्या असतात. तशीच कागदपत्रे ब्रिटिश आणि निजामाच्या किंवा तेव्हाच्या मुंबई राज्यांमध्ये सुद्धा सांभाळली गेली होती. समजा गाव पातळीवरचे तलाठ्याचे दप्तर हरवले, शेतकऱ्याकडचे जरी हरवले तरी राजाकडे म्हणजे सरकारकडे त्याच्या दुहेरी प्रती ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार व्हिलेज रेकॉर्डच्या नोंदी, त्यामध्ये काही जिल्हा पत्रके तसेच मुख्य तहशील पत्रके ही सांभाळली जात. त्यानुसार निजाम सरकारने तत्कालीन मुंबई सरकारला प्रत्येक जिल्ह्यातील कोणती पत्रके हस्तांतरित केली होती ? 1 खसरा पत्रक __ज्यामध्ये त्या तालुक्यातील प्रत्येक सर्वे नंबर, खातेदाराचे नाव, फसल अशी पूर्ण माहिती असायची 2 खतौनि पत्रक. ज्याची आजच्या सात बाऱ्याशी तुलना करता येईल. हू इज ओनर अँड हू इस कल्टीवेटर ? 3. जमाबंदी तथा सालाना पत्रक. ज्यामध्ये लगान , मागणी आणि बकाया म्हणजे राहिलेली बाकी याच्या नोंदी असतात. 4. लाल किताब. दिल्लीच्या मुघल प्रशासनापासून ते हैदराबादच्या निजामापर्यंत सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. ते तांबड्या वेस्टर्नमध्ये बांधले जायचे. एक प्रकारे हे गाव पातळीवरचे गॅझेट होते. त्याच्यामध्ये गाव, गावातील माणसे, तळी, पाण्याची साधने, वसूल, जहागिरीचे क्षेत्र सर्व काही असायचे. हे दरवर्षी तलाठ्याकडून प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्याचे अवलोकन होऊन पुन्हा गावात परत यायचे. प्रत्येक गावात हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. 5 शजरा ( खेतो का नक्शा) प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती क्षेत्राचा सरकारमार्फत नकाशा काढला असायचा. त्यासाठी नक्शाणवीस नावाचे खास अधिकारी नेमलेले असायचे. हे पत्रक सुद्धा प्रत्येक गावात होते. 6 माल वसुली रजिस्टर, डिमांड अँड कलेक्शन 7 तहसील दप्तरी रजिस्टर 8 इक्रारनामा आणि सनद रजिस्टर. ज्यामध्ये गावातील इनामे जहागीर तसेच व पुढच्या वफ जमिनीच्या नोंदी असत. अशी सर्व रजिस्टर्स ही जा त्या िल्हाधिकार्याकडे निजाम सरकारने सुपूर्त केली होती. ती सुपूर्त करताना स्पष्टपणे “हँड ओव्हर लिस्ट” म्हणजे हस्तांतरणाची यादी सुद्धा तयार केली गेली होती. हे सर्व रजिस्टर्स आज तालुका दप्तर मध्ये किंवा डिस्टिक कलेक्टर दप्तरमध्ये मिळत नसतील तर त्याबाबत गरीब शेतकऱ्यांचा काय दोष ? लोकांकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते तपासण्यासाठी जर कायदेशीररित्या पर्यायी दप्तर जे पर्मनंट रेकॉर्ड म्हणून कस्टोस्डियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्डने मेंटेन करायला हवे, ते नसेल तर त्यात लोकांचा काय दोष. ? मी चांद्यापासून ते बांधापर्यंतच्या सर्व ब्रिटिश गॅजेटीयारअसचा अभ्यास गेली दोन वर्ष करतो आहे. दिल्लीचे पार्लमेंट लायब्ररी रेकॉर्ड, जनगणना कार्यालय, हैदराबादचे तीन नाक्यावरचे कार्यालय व इतर कार्यालय सारी धुंडाळून झाली आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठा हे कुणबी होते असे ब्रिटिशांची गॅझेट सुद्धा सांगत नाहीत. मात्र शेती करणारा बहुतांशी 85% मराठा वर्ग हा कुणबी होता हे या रेकॉर्डवरून आढळून येते. तशा अनेक ठिकाणी नोंदी आहेत. निजामाच्या पिरेड मध्ये सुद्धा कोर्टात, हायकोर्टात केसेस जाऊन तसे डिसिजनही झालेले आहेत. आता तत्कालीन जिल्ह्यांचा वानगी दाखल विचार करायचा तर तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडी संस्थान यांची 1881 ची जनगणना लक्षात घेता एकूण संख्या 9 लाख 41 हजार 49 होती. पैकी दोन लाख तीन हजार चारशे सहा हे मराठा होते. तर दोन लाख 84 हजार 267 हे कुणबी होते. जिल्ह्यात धनगर अठरा हजार पाचशे पाच, ब्राह्मण 66 हजार ०४६ महार समाज 85 हजार 513 तर भटक्यांची संख्या 6553 होती. ठाणे आणि मुंबई मध्ये कुणब्यांची संख्या अधिक आहे. तर सोलापूर मध्ये मराठा एक लाख ऐंशी हजार आणि मराठा कुणबी एक लाख 78 हजार 938, माळी 23898 वंजारी 3508 धनगर 57 04 ब्राह्मण 26979 महार समाज 44001 तर मातंग 1923 अशी संख्या आहे. साधारणता माझ्या माहितीप्रमाणे 1985/ 86 पर्यंत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध होती. त्याचे महत्व न जाणता रेकॉर्डरुम कोणाच्या आदेशाने आणि कुणी खाली केल्या ? हे अविवेकी आदेश कोणी दिले. गेल्या पंचवीस तीस वर्षात ज्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कामे केली त्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील. तरच मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य वगैरे मैदानातली भाषा शोभून दिसेल. सद्यस्थितीत आता जे रेकॉर्ड आहे त्यातून संबंधित शेतकरी वर्गाला कसा फायदा देता येईल, याचाही विचार व्हावा. माझ्या आजोबांचे आणि पंजोबांच्या नावे मोडीमध्ये कुणबी नावाची नोंद आहे. पण मला इथल्या जटील प्रशासकीय व्यवस्थेने तेव्हा तो दाखला मिळू दिला नाही. आज खानदानाच्या नावाने जे मोठ्या मोठ्या थापा मारतात त्यांचेही रेकॉर्ड माझ्याकडे आहे. संपूर्ण मराठा समाज जरी कुणबी ठरत नसला तरी ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याकडे तरी संशयाने पाहू नका. ब्रिटिशांनी दिलेल्या वर्गवारीनुसार साधारण प्रत्येक तालुक्यात कुठल्या समाजाचे किती लोक होते याची आकडेवारी आहे. त्या सरासरीचा विचार करून लोकांना काही फायदे देता येतील. जे ब्रिटिश रिकॉर्ड पहिले प्लॅनिंग कमिशन आणि शेड्युल्ड कास्ट कमिशन वगैरे रचताना आधारभूत ठरवले गेले होते. ते रेकॉर्ड पूर्णता या प्रश्नावर नाकारण्यात काय अर्थ आहे ? या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा आणि उनापावसामध्ये, शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना न्याय मिळावा आणि तो सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळावं. आपली लोकशाही, प्रत्येक राजकीय पक्षाची लोकशाही ही आज “स्वकुटुंबकल्याणशाही” झालेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळेच सार्वजनिक हिताच्या गोष्टींकडे सर्वांनीच ध्यान द्यायला हवे. नेत्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अविवेकामुळे लोकांचे हाल होऊ नयेत असेच मला वाटते. विश्वास पाटील #vishwaspatil #author #HistoricalTruth #MissingRecords #FarmersRights #LandOwnership #RevenueRecords #HyderabadNizam #hyderabad #StateReorganization1956 #PublicRecords #CustodianOfRecords #Maratha #AccountabilityInGovernance #LostDocuments
Vishwas patil16,535 görüntüleme • 11 ay önce

साक्षात वाघिणींशी कुस्ती खेळणाऱ्या मुली आणि वाघिणीचं बाळंतपण पार पाडणारी सातारची बहाद्दर माणसं! अमीर खानच्या “दंगल” सिनेमाच्या आधीही 100 वर्षांपूर्वी भारतीय मातीतील बहाद्दर मुलींनी उडवलेली ‘अपूर्व दंगल’! — विश्वास पाटील “साहेब, बाळंतपणाच्या बाजल्यावर तडफडणाऱ्या लेकीची काळजी घेताना जसा तिच्या आईच्या पोटात गोळा उठतो, अगदी तसंच बघा लेकुरवाळ्या होणाऱ्या वाघिणींना जीव लावत आम्ही बाळ-बाळंतिणीचा जीव वाचवत होतो बघा,” असा विलक्षण थरारक जीवनानुभव घेणारी माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” सारख्या कलाकृतीचं आपोआप मोल वाढतं. म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या बहाद्दर स्त्री-पुरुषांचा साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजांच्या हस्ते मी सत्कार करायचा मुद्दाम घाट घातला होता. तो सुंदर सोहळा अनेकांच्या मनावर ठसून गेला आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला खडकलाटच्या गुलाब शिंदे या नावाच्या शेतकऱ्याची मुलगी तारा शिंदे ही चक्क वाघाशी कुस्ती खेळायची. शाहू महाराजांनी तिला हत्ती आणि घोडी देऊन तिचा सत्कार केला होता. तेव्हा तिची सर्कस सिंगापूर, जपान, जर्मनीपर्यंत खेळून आली होती. याशिवाय लाहोरची रेवा रखी, जी ए. सर्कस ऑफ बॉम्बेमध्ये काम करणारी जमेला, तासगावच्या जगप्रसिद्ध परशुराम लायन सर्कसमध्ये वाघिणीच्या जबड्यात डोकं देणारी छबुताई, कागवाडच्या ग्रेट कर्नाटक सर्कसमध्ये वाघिणींशी खेळणारी बिबा या साऱ्या सर्कसबालांनी इतिहास निर्माण केला आहे. नुकताच मी चाळीसगावला जाऊन सुमन या श्रेष्ठ सर्कसबालेला भेटून आलो. सुमनजींनी आपल्या आयुष्याची साठ वर्षं सर्कशीला वाहिली होती. मनुष्यप्राणी आणि जंगलातले प्राणी यांच्या गहिऱ्या नात्याचा वेध मी माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. भारतीय साहित्यात या आधी असा प्रयत्न “जंगल बुक” मध्ये झाला होता, पण “जंगल बुक”मधले प्राणी हे कल्पित होते. माझ्या सुदैवाने लेखक या नात्याने मला ही आगीशी आणि जीवनातील भयानक संकटांशी, जीवघेण्या खेळात रमलेली माणसं प्रत्यक्ष भेटली. गेली अनेक वर्षं ती भेटत होती. त्यांचं ते मुलखावेगळं आयुष्य मी माझ्या “कांचना”मध्ये मांडलेलं आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावं. श्रेष्ठ भारतीय कादंबरीकार मृदुला गर्ग यांनी “कांचना” ही भारतीय साहित्यातील अपूर्व कलाकृती असल्याचं या आधीच लिहिलं आहे. मराठीत येण्यापूर्वी “ग्रेट कांचना सर्कस” दिल्लीच्या वाणी प्रकाशनमार्फत दहा महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाली होती. वाचकांनी तिचा जरूर लाभ घ्यावा. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबद्दल नुकताच साताऱ्यात माझा जो सत्कार झाला, त्या परिसरातील 80 ते 90 च्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्व बहाद्दर सर्कसवीरांना मी माझ्यासोबतच सत्कारासाठी बोलावलं होतं. वाचकांना “ग्रेट कांचना सर्कस” ही मॅजेस्टिकच्या साइटवर तसेच अक्षरधारा बूक गॅलरीच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. ती वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. Akshardhara Vani Prakashan #Vishwaspatil #akshardharabookgallery #vaniprakashan #GreatKanchanaCircus #LegendaryPerformers #BraveWomen #CircusHistory #IndianCircus #FearlessGirls #TaraShinde #SumanCircus #SatyaraHeroes #MustReadBook #CircusLegends
Vishwas patil13,974 görüntüleme • 10 ay önce

विदर्भाचा कुणबी न्याय मराठवाड्याला द्या —-विश्वास पाटील भारताचे पहिले कृषिमंत्री आणि विदर्भाचे भाग्यविधाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन वऱ्हाडातील सर्व मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून करून घेतल्या. त्यांच्या या आग्रहासाठी त्यानी मुख्यत: ब्रिटिश इंडियामध्ये झालेल्या 1881, 1891, 1901, 1922 पर्यंतच्या सलग नोंदींचा व महसुली पत्रकातील काही पुराव्यांचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात सातबारा सदरी नोंदी करून घेतल्या. 1901 ची ब्रिटिशांनी जी जनगणना केली. त्यानुसार विदर्भामध्ये एकूण कुणब्यांची संख्या आठ लाख 28 000 होती. मराठ्यांची वेगळी संख्या चांदा म्हणजे आजच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधराशे आणि नागपूर जिल्ह्यात 11000 अशी एकूण साडे पंधरा हजार होती. तर तेव्हाच्या सीपी बेरर भागातील जिल्ह्यातील कुणब्यांची 1901 च्या जनगणनेनुसार व ब्रिटिश इंडिया गव्हर्मेंटने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या अनेक गॅजेटिअरयांचा आढावा घेता व पडताळणी करता ती कुणब्यांची संख्या खालील प्रमाणे येते. बुलढाणा जिल्हा एक लाख 62 हजार, नागपूर एक लाख 52 हजार, वर्धा 76000, चांदा 95 हजार, अमरावती एक लाख 59 हजार , भंडारा 79 हजार, यवतमाळ एक लाख पाच हजार. म्हणजेच तेव्हाच्या विदर्भातील 39 लाखापैकी आठ लाख कुणबी होते. ज्यांचे वंशज आज आरक्षणाचा फायदा घेत आहेत. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख हे राज्यघटनेच्या घटना समितीचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी22 नोव्हेंबर 1949 या दिवशी #पंडित_जवाहरलाल_नेहरू आणि डॉक्टर #बाबासाहेब_आंबेडकर यांच्या साक्षीने त्या कॉन्स्टिट्यूट असेंबली मध्ये असे म्हटले होते की, “ I would say that it would be very desirable that the sympathy which we show towards the scheduled castes and scheduled Tribes should also in a measure be extended to these people who have yet to see any benefits accruing from the freedom that we have achieved.” हाच समाज उपयोगी दृष्टिकोन पंजाबरावांनी पुढे जन्मभर सांभाळला. 19 57 मध्ये आमच्या कोल्हापूरच्या जुना राजवाडा पाठीमागच्या भवानी मंडपच्या पटांगणावर अखिल भारतीय मराठा परिषद भरली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव होते. तेव्हा पंजाबरावांनी अलीकडे मराठ्यांनी लग्नाच्या बाजारात उठाठेव करण्यासाठी आपल्या कागदपत्रातील #कुणबी या नोंदी ज्या कमी करण्याचा उद्योग चालवलेला आहे तो तात्काळ बंद करावा असा मुद्दा मांडला. त्या महासभेचे आयोजन कोल्हापुरात तेव्हा राजश्री शाहूंचे वंशज शहाजी महाराज यांनी केले होते. या सभेमध्ये तेलंगणाकडील सोनडूरचे संस्थानिक व जतचे महाराज या दोघांनी या कल्पनेला विरोध केला. तेव्हा भाऊसाहेबांनी मराठा समाजाला कळकळीने जाणीव करून दिलेली होती की, “वेळेत जर तुम्ही तुमच्या नोंदी जपल्या नाहीत तर एक दिवस कुणबी मराठ्यांना भिकेचे दिवस लागतील.” पण दुर्दैव आमचे #मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे, इथे सहकाराचा गजर करत साखरेचे आणि दारूचे मोठमोठे कारखाने उभे करणारे हरिहर जन्माला आले. परंतु पंजाबरावांसारखा दृष्टा नेता व विचारी कल्पवृक्ष आम्हाला मिळाला नाही, हे आमचे दुःख आहे. आमच्या राजकारण्यांच्या सोबतीला पुरोगामी महाराष्ट्राचा डफ वाजवणारे अनेक साहित्यिक व विचारवंत राजकारभारात पुढे पुढे करत. पण याच विचारवंतांनी व साहित्यिकांनी गरीब कुणबी मराठ्यांचे जे अतोनात नुकसान केले आहे, तो संशोधनाचा वेगळा भाग जितका मनोरंजक तितकाच गरिबांच्या काळजाला डागण्या देणारा भयंकर प्रकार होता , हे मी पुरेशा जबाबदारीने सांगतो आहे. —#विश्वास_पाटील. The Times Of India Pudhari News SaamTV News TV9 Marathi @News18lokmat ABP Majha Live #vishwaspatil #PanjabraoDeshmukh #KumbhiMarathas #VidarbhaHistory #MarathaRights #AgriculturalJustice #MarathaCommunity #SocialJustice #HistoricalInjustice #MarathaUnity #RuralDevelopment #VidarbhaVoices #MarathaStruggles #IndianAgriculture
Vishwas patil13,771 görüntüleme • 1 yıl önce

काय तो पुतळा, काय तो सागर आणि ते आमुचे शिवाजीराजे ! — विश्वास पाटील @News18Lokmat ZEE २४ तास Pudhari News SaamTV News TV9 Marathi ABP माझा CMO Maharashtra Raj Thackeray Ajit Pawar Sharad Pawar Devendra Fadnavis #JaiMaharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #VishwasPatil #स्वराज्य #विश्वासपाटील #ShivajiStatueCollapse #MaharashtraMajha #ShivajiMaharajKiJai
Vishwas patil12,253 görüntüleme • 2 yıl önce
Daha fazla içerik yok.