
ChaloPMC Puneसंवाद
@ChaloPmc • 1,295 subscribers
#ChaloPMC #Puneसंवाद | A people’s movement | For civic & environmental issues | A collective for different areas in Pune | Discuss & find solutions
Shorts
Videos

"४०००, ५००० करोड एवढे पैसे किती दिवस जगवतील? आपण काय पैसे खाऊन जगणार नाही, जगण्यासाठी जे लागतं, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ते आपल्याला ही झाडे देणार आहेत. ज्या गुजरातच्या कन्सल्टंटने बनवलेल्या डिझाइननुसार ही नदीकाठची झाडे तोडायला सांगितलं आहे, तो कन्सल्टंट कुठेय ?, आज इथे का नाही आला तो ? जास्त काही नाही साहेब, एकच वाळुंज झाड जगवून दाखवा तुम्हीं, नवीन झाडे लावू म्हणताय, आत्तापर्यंतच्या कामांसाठी भरपाई म्हणून नवीन लावलेली झाडे कुठेय ते दाखवा पहिला. अशाप्रकारे आम्हां जनतेचे पैसे खर्च करायला आम्हीं कोणीच नाही सांगितलं तुम्हांला. रात्रीतनं झाडे का तोडताय तुम्हीं." आपल्या एक वर्षाच्या लेकराला घरी ठेऊन, सुनावणीसाठी आलेल्या काजल डोंगरे हिने अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर घेतले. टाळ्यांच्या कडकटाने उपस्थित नागरिक तिच्या उमटलेल्या तीव्र भावनांना साद देत होते, आणि तेथे उपस्थित पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी मात्र फक्त शांतपणे बघत होते. जणू काही आमचा याच्याशी काहीही संबंध नाही अश्या आविर्भावाने. नदीकाठची झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्षेप प्राप्त झाल्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी, खरं तर सध्या प्रशासक म्हणून कार्यरत असणाऱ्या आयुक्तांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. जनतेप्रति आपण काही उत्तरदायी आहोत ही नाही, याचा विचार प्रशासक आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार ह्या सगळ्यांनी आता करण्याची गरज आहे. #पुणे #पिंपरी #चिंचवड #विघातक #नदीकाठ #सुधार #प्रकल्प #नको #राम #मुळा #मुठा #नदी #वाचवा PCMC Commissioner - Shekhar Singh, IAS Shekhar Singh PCMC Smart Sarathi MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MAHARASHTRA DGIPR Aaditya Thackeray म न सै नि क - पुणे 🖊 Anil Shidore अनिल शिदोरे Mahesh Landge Ajit Pawar Supriya Sule Pune River Revival prajakta mahajan Priyadarshini Karve AngadPatwardhan भिकु म्हात्रे 🔥 Bony Uppal ਬੋਨੀ ਉੱਪਲ Amit Paranjape Sayaji Shinde ameet singh राम सुत रुपेश Rohan Aaron #pollution killing the planet योगेश कातारे पाटील Rahul Kulkarni Prashant Kadam Sarang Yadwadkar Meghna Bhandari Pune Pulse Shrikishan Kale श्रीकिशन काळे Brijmohan Patil Eeshwari Amar Jedhe Vandana Chaudhary Hema Chari Madabhushi Chaitanya Ket Jaideep Baphna, CFA Raja Bhatia
ChaloPMC Puneसंवाद65,740 görüntüleme • 1 yıl önce

**पिंपरी चिंचवड येथील नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पातील वृक्षतोडीवरील नागरिकांच्या आक्षेपांवरील सुनावणीत नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न** दि. १९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यान येथे पिंपरी-चिंचवड नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पातील वाकड ते सांगवी या स्ट्रेचसाठी प्रस्तावित ११५०+ झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर नागरिकांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर वृक्ष अधिकारी श्री. उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून तब्बल ६०-७० नागरिक या सुनावणीसाठी हजर होते, नदीकाठच्या मुक्या झाडांचा आवाज बनून! ##नागरिकांच्या प्रश्नांना बगल वृक्ष अधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले की, "आम्ही आपल्या सर्व आक्षेपांची आज इथे नोंद घेऊन वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याकडे अहवालाद्वारे पाठवले जातील आणि अंतिम निर्णय ते घेतील". मात्र, संपूर्ण सुनावणी दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले नाही. "मी उत्तर द्यायला बांधील नाही" अशा त्यांच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष आणि प्रशासक पि.चि. मनपा आयुक्त श्री शेखर सिंह यांनी जनसुनावणी भरवावी अशी मागणी नागरिकांनी आक्षेप पत्रात केली होती पण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी न भरवता फक्त एक औपचारिकता म्हणून उद्यान विभागात वृक्ष अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी भरवण्यात आली. ## वृक्षतोडीतील अनियमितता आणि कायद्यांचे उल्लंघन: याबाबत नागरिकांनी वृक्ष कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रांच्या अभावाकडे वृक्ष अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जागा मालकाची परवानगी, झाडांचे अचूक स्थान दर्शवणारा नकाशा, मोठ्या संख्येने झाडे बाधित होत असतील तर त्यांना वाचवण्यासाठी पर्यायी संकल्पचित्र, वारसा वृक्षांना (Heritage Trees) विशेष संरक्षण, झाडांचे वय मोजण्याची वैज्ञानिक पद्धत, तसेच वन्यजीव संरक्षण कायदा आणि Wetlands Act च्या उल्लंघनाचे मुद्दे नागरिकांनी ठळकपणे मांडले. नदीकाठावर भराव टाकून नदीची रुंदी कमी केली जात आहे, ब्लू लाइनमध्ये बांधकाम सुरू आहे, त्यामुळे प्राणी व पक्षी जीवनाला धोका उद्भवला आहे तसेच भविष्यात पुराचा धोका निर्माण होणार आहे, आत्ताच मागील पावसाळ्यात काही भागांत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती —हे मुद्दे उपस्थित नागरिकांनी पुराव्यासह मांडले. SEAA ची परवानगी आहे का? SEAA ने घातलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत का? अशा अनेक गंभीर त्रुटींमुळे ही सुनावणीच बेकायदेशीर असल्याचे जाणकारांनी निदर्शनास आणून दिले. ## लोकशाहीचा अपमान आणि नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न पुणे संवाद या नागरी मंचाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रेखा जोशी यांनी "मांडलेल्या विविध कारणांमुळे ही सुनावणीच बेकायदेशीर आहे, त्रुटींची पूर्तता करून सर्व प्रक्रिया सुनावणीसह नव्याने राबवावी" अशी स्पष्ट मागणी केली आणि अधिकाऱ्यांना त्याची लेखी नोंद घेण्यास सांगितले. मात्र, वृक्ष अधिकारी उमेश ढाकणे यांनी केवळ माना डोलावल्या, पण ते असे लेखी नोंदवण्यास तयार नव्हते. रेखा जोशी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी पुढे आल्या, तेव्हा तिथे असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाने त्यांना हात लावला आणि हुज्जत घातली. यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा रक्षकांची सगळ्यांवर करडी नजर होती. ## सुनावणी म्हणजे केवळ एक औपचारिकता? ही एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी सुनावणी असल्याचा निषेध नागरिकांनी व्यक्त केला. "हे प्रशासन लोकांचे ऐकण्यासाठी आहे की त्यांना गप्प बसवण्यासाठी?" असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. तीन तास चाललेल्या या सुनावणीत नागरिकांचे म्हणणे फक्त ऐकून घेण्यात आले, मात्र एका प्रश्नालाही उत्तर देण्यात आले नाही. शेवटी, वृक्ष अधिकारी उमेश ढाकणे यांनी "सुनावणी संपली" असे जाहीर केले व ते निघून गेले. ## नागरिकांचा निर्धार – हा लढा सुरूच राहील! शहरभरातून वेळ काढून आलेल्या ६०-७० नागरिकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. पण "आम्ही येथे थांबणार नाही! एकही झाड तोडले गेले नाही पाहिजे, यासाठी जे काही करता येईल ते सर्व करू!" अशा निर्धाराने नागरिक एकमेकांना बळ देत घरी परतले. ही लढाई केवळ ११५० झाडांची नाही, ही नदीकाठ वाचवण्याची, पर्यावरण रक्षणाची आणि लोकशाही टिकवण्याची लढाई आहे! PCMC Commissioner Shekhar Singh PCMC Smart Sarathi MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MAHARASHTRA DGIPR Aaditya Thackeray म न सै नि क - पुणे 🖊 Anil Shidore अनिल शिदोरे Mahesh Landge Ajit Pawar Supriya Sule Pune River Revival prajakta mahajan Priyadarshini Karve AngadPatwardhan ameet singh राम सुत रुपेश Rohan Aaron #AirPollution #EnVironMent योगेश कातारे पाटील Rahul Kulkarni Prashant Kadam Sarang Yadwadkar Meghna Bhandari Pune Pulse Shrikishan Kale श्रीकिशन काळे Brijmohan Patil Eeshwari Amar Jedhe Vandana Chaudhary Hema Chari Madabhushi Jaideep Baphna, CFA #म #पुणे #मुळा #मुठा #राम #नदी #RFD
ChaloPMC Puneसंवाद50,637 görüntüleme • 1 yıl önce

"नदीला सुशोभीकरणाची गरज नाही. नदी मुळातच सुंदर असते. आपण नदीला गटार करतो आणि मग सुशोभीकरणाची नाटकं करतो. मुळात नदीचं गटारीकरण थांबवलं पाहिजे", असे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तसेच वृक्षप्रेमी आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांनी सांगितले. "A river does not need beautification; it is naturally beautiful." We turn rivers into drains and then put on a façade of beautification. Instead, the focus should be on stopping the pollution of rivers in the first place," said renowned film actor, tree lover, and environmentalist Sayaji Shinde. #Pune #SayNoTo #RFD #म sayaji shinde Ajit Pawar CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Sanjay Raut Vasant More | वसंत मोरे RTMV Pune River Revival #AirPollution #EnVironMent Shrikishan Kale श्रीकिशन काळे Priyadarshini Karve Punekar News MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र Ashwini Bhide Free Press Journal Kunal Kumar AngadPatwardhan prajakta mahajan JEEVITNADI Living River Foundation
ChaloPMC Puneसंवाद46,890 görüntüleme • 1 yıl önce

Thousands of Punekars have taken to the streets once again, uniting with Mr. Sonam Wangchuck and Mr. Sayaji Shinde in a resounding stand against the River Front Destruction (RFD) project. This isn't just any protest—it’s a fight for our very heritage. The RFD project plans to fell thousands of trees and dump debris into the river Mula at the Ram-Mula confluence, endangering the beautiful sacred groves! Today, we are not merely protesting; we are defending our environment, our history, and our future. Our sacred groves and our river are the lifeblood of Pune, and we mustl not let them be sacrificed for reckless development. Stand strong. Stand united. Say NO to destruction, and YES to preserving nature ! #SaveOurRivers #SaveTreesOfPune #savetrees #savemulamutha #Savegreenspaces
ChaloPMC Puneसंवाद42,456 görüntüleme • 1 yıl önce

🆘🚨🌲🌳🌴Save Ganeshkhind Road’s Heritage Trees — Stop the New Road Widening 🌲🌳🌴🆘🚨 For the second time in 2 years, Pune is watching the same shadow creep over #Ganeshkhind Road. Over 500 mature and heritage trees - banyans, tamarinds, peepals and old-growth giants are again under threat because of a fresh push to widen the road from 36 m to 45 m. These trees are not “obstacles.” They are living infrastructure. They cool our city, anchor its biodiversity, protect its micro-climate, and hold centuries of history in their roots. Mature trees cannot be “replaced” by saplings, and transplanting them has already proven to be fatal in earlier phases across Pune. The December 2023 court directions had clearly asked authorities to follow a sustainable mobility plan and avoid unnecessary tree felling. Yet the same project is being revived, risking another wave of irreversible ecological damage. Instead of widening roads for more private vehicles, Pune needs the opposite: • Better metro ridership, • Reliable bus frequency, • Safe footpaths and cycling tracks, • Efficient last-mile connectivity, • And maintainance of the existing road and flyover and Metro Line 3 infrastructure. We, the citizens, demand: 🍀Immediate cancellation of the proposed Phase-2 road widening on Ganeshkhind Road. Adding One more lane has never solved traffic issue anywhere in the world! 🍀NO FELLING AND TRANSPLANTING OF MATURE AND HERITAGE TREES UNDER ANY CIRCUMSTANCES 🍀A shift in priority toward public transport and people-friendly mobility, not private-vehicle expansion. 🍀Full transparency: publish tree surveys, traffic studies, EIAs, and alternative designs publicly. 🍀Adherence to court directives, the Maharashtra Tree Act, and scientific, climate-sensitive planning #SaveGKTreee #SaveTreesOfPune #NoMoreRoads #Pune #SaveHeritageTrees
ChaloPMC Puneसंवाद18,584 görüntüleme • 8 ay önce

### इंद्रायणी नदी का फेसाळतेय? पिंपरी चिंचवड आणि आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी इतकी फेसाळतेय, याचं उत्तर पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिक श्री प्रशांत राऊळ यांनी गुगल इमेजेसच्या साहाय्याने एकदम सरळ सोप्या भाषेत समोर आणलं आहे. देशातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला मैलापाणी शुद्ध करून नदीत सोडता येत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. एसटीपी (STP)चालू आहेत का बंद, त्यातून शुद्ध पाणी नदीत का जात नाही? आणखी एसटीपीची गरज असेल तर ती अद्याप का उभारलेली नाहीत? या सर्व प्रश्नांची ठोस उत्तरं पिंपरी चिंचवडचे आयुक्त व प्रशासक Shekhar Singh यांनी नागरिकांना आणि इंद्रायणी नदीशी श्रद्धेने जोडलेल्या भाविकांना द्यायला हवीत. नागरिक एकच मागणी करत आहेत – लोकांच्या भावना जपाव्यात, आणि तातडीने मैलापाणी शुद्ध करूनच नदीत सोडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. PCMC Commissioner Shekhar Singh PCMC Smart Sarathi MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MAHARASHTRA DGIPR Aaditya Thackeray म न सै नि क - पुणे 🖊 Anil Shidore अनिल शिदोरे Mahesh Landge Ajit Pawar Supriya Sule Pune River Revival AngadPatwardhan राम सुत रुपेश Rohan Aaron #pollution killing the planet योगेश कातारे पाटील Rahul Kulkarni Prashant Kadam Sarang Yadwadkar Meghna Bhandari Pune Pulse Shrikishan Kale श्रीकिशन काळे Brijmohan Patil Eeshwari Amar Jedhe Vandana Chaudhary Hema Chari Madabhushi Jaideep Baphna, CFA #पुणे #pune #river #Indrayani
ChaloPMC Puneसंवाद17,644 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.