Chhagan Bhujbal's banner
Chhagan Bhujbal's profile picture

Chhagan Bhujbal

@ChhaganCBhujbal243,130 subscribers

Minister for Food, Civil Supplies & Consumer Protection | MLA-Yeola | Founder President of A.B.M.P.S.P.

Videos

ChhaganCBhujbal's profile picture

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि माझे मित्र कृष्णाजी ऊर्फ दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिन. दादांसोबतच्या माझ्या अनेक आठवणी आजही काळजात घर करून आहेत. शिवसेनेच्या प्रचाराच्या सभांमध्ये दादांची तोफ धडाडायची आणि त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने जनसागर लोटायचा. कलेच्या क्षेत्रात सलग ९ चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी यशाचा 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित करणारा हा अवलिया माणूस, मैदानात उतरला की मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी तितक्याच ताकदीने लढायचा. दादा कोंडके यांचा बेधडक स्वभाव आणि सामान्यांशी जोडलेली नाळ हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या स्मृती आजही महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात जिवंत आहेत. अशा या माझ्या दिलदार मित्राला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #dadakondke #marathifilms

Chhagan Bhujbal

17,860 views • 5 months ago

ChhaganCBhujbal's profile picture

आता माघार नाही!! मराठा आरक्षणाला आमचा विरोध कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल! पण हे आरक्षण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र द्यावे, ही आमची भूमिका आहे आणि हीच भूमिका सर्वपक्षीय नेत्यांची आहे! आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा अत्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडली. अठरापगड समाजातील सर्वपक्षीय ओबीसी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आणि लाखो ओबीसी बांधवांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या सभेतून आज पुन्हा एकदा ओबीसींची खरी ताकद जगाला दिसली. ओबीसी बांधवांनो, हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही! प्रत्येक जिल्ह्या-जिल्ह्यात, तालुक्यात असे मेळावे झाले पाहिजेत! आता ही ज्योत तालुक्या-तालुक्यात पेटली पाहिजे! #OBCElgarParishad #ओबीसी_एल्गार_परिषद

Chhagan Bhujbal

45,183 views • 2 years ago

ChhaganCBhujbal's profile picture

ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या १० दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती, तसेच काल सरकार व ओबीसी शिष्टमंडळ यांची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळासह वडीगोद्री येथील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी हाके व वाघमारे या ओबीसींच्या दोन वाघांचे या संघर्षाबद्दल कौतुक केले. तसेच ओबीसी आंदोलकांच्या मागण्यांना अनुसरून ओबीसी आरक्षणास धक्का न लावण्यासंदर्भात सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांचे पत्रक त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज १० व्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. ओबीसींच्या हक्काचा लढा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांना दिला. #OBCReservation #OBC #ओबीसी_आरक्षण #reservation

Chhagan Bhujbal

36,139 views • 2 years ago

ChhaganCBhujbal's profile picture

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारांना जागत, येवला-लासलगावच्या जनतेच्या आणि समस्त ओबीसींच्या विश्वासाच्या, आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची शपथ घेतली. महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप दाखवणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा व सर्वसमावेशक कामाचा आणि माझे बंधू लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षमय व झुंजार वाटचालीचा आदर्श सदैव माझ्यासमोर राहील. तसेच भारतीय संविधानाची तत्वे, विचार व आदर्शांवर चालत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व झोकून देऊन काम करण्याचा निश्चय मी पुन्हा एकदा या निमित्ताने केला आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेतच, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे मी मनापासून आभार मानतो. #maharashtracabinet #cabinetoath #publicservicecommitment #jaimaharashtra

Chhagan Bhujbal

22,304 views • 1 year ago

ChhaganCBhujbal's profile picture

राजकीय जीवनात मी अनेक चढ-उतार आणि स्थित्यंतरे पाहिली, पण आजचा क्षण माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला स्पर्श करणारा आहे..! आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय स्व. अजितदादांच्या अचानक जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला, अशा काळात स्वतःचे दुःख बाजूला सारून सुनेत्रावहिनी पवार यांनी महाराष्ट्राला आज आधार दिला, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतली. हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे असे मी मानतो. स्व. अजितदादांच्या जीवनात सुनेत्रावहिनींचे योगदान आम्ही पहिले आहे. शांत स्वभाव पण तितकाच कणखर व निश्चयी बाणा ही त्यांची खरी ओळख. ज्या पवार कुटुंबाने राज्याला प्रदीर्घ काळ नेतृत्व दिले, त्याच घरातील कर्तृत्ववान स्त्री आज राज्याची सूत्रे हाती घेत आहे, ही खरोखर अभिमानाची बाब आहे. एक ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासाचा साक्षीदार होताना आज माझा ऊर भरून येतोय. सुनेत्रा वहिनी, स्व. अजितदादांची ही धुरा तुम्ही सार्थपणे निभावणार, असा मला ठाम विश्वास आहे. जे प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राने दादांना दिला, तोच आशीर्वाद राज्याची जनता तुम्हालाही देईल याची मला खात्री आहे. #sunetraajitpawar

Chhagan Bhujbal

12,010 views • 6 months ago

No more content to load