
Ravindra Dhangekar Official
@DhangekarRavii • 23,403 subscribers
Shivsena Mahanagar Pramukh Pune. Official Twitter handle of Mr. Ravindra Dhangekar Ex.MLA kasba constituency.
Shorts
Videos

काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का...? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. २) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी - मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा... Devendra Fadnavis CP Pune City Police पुणे शहर पोलीस #kalyaninagar_accident #justicefor_avnishashvini #banpubsinpune
Ravindra Dhangekar Official352,319 次观看 • 2 年前

दिवसा महिला सुरक्षेचे जाहीरनामे द्यायचे आणि रात्री डान्स बार मध्ये कारनामे करायचे...! हे अपेक्षित आहे का सुसंस्कृत पुण्यनगरीमध्ये..? अशा लोकांच्या हाती पुण्यनगरीचे नेतृत्व सोपवणार का...? विचार करा..! आपले पुणे वाचविण्याची हीच ती वेळ..!! #savepune #Ravindradhangekarofficial
Ravindra Dhangekar Official48,859 次观看 • 7 个月前

कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे... कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का...? काय वाटतं...? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय 😃 #saveHND #punelandscam
Ravindra Dhangekar Official51,077 次观看 • 10 个月前

" एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा" अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल १८ दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा...? हा प्रश्न आहे. स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्याने आता कुठल्या तोंडाने मी व्यवहार रद्द करतो, असं सांगू अशी अवस्था त्यांची झालेली आहे. परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देवो.... जैन मंदिराची बळकवलेली जागा ते लवकरात लवकर परत करो....! #SaveHND #Punelandscam #STAY_TUNED.....!
Ravindra Dhangekar Official42,716 次观看 • 9 个月前

पाऊस झाला मोठा.... नालेसफाई घोटाळा झाला खोटा.... आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा... काळजी घ्या... PMC Care #pune #punerains #punetrafficjam #pune
Ravindra Dhangekar Official68,392 次观看 • 2 年前

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात एका महिलेसोबत अत्यंत घृणास्पद असे कृत्य केले आहे.विशेष म्हणजे पोलीस देखील या कृत्यात सहभागी आहेत. एका महिलेस समर्थ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी बेल्टने मारहाण करत तिच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार घडला आहे. गृहमंत्री Devendra Fadnavis हे काय चालले आहे..? सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत आपल्या कार्यकर्त्यांचा प्रताप कमी होता की काय म्हणून आता आपल्या गृह विभागाचे पोलिस देखील आपले कार्यकर्ते म्हणून काम करताय का.? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Video- Lokshahi Marathi
Ravindra Dhangekar Official60,298 次观看 • 2 年前

भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख गणेश बिडकर यांच्यामुळे पोलीस दलातील पाच लोक निलंबित झाली होती ,आज त्या पाच पोलिसांचे संसार रस्त्यावर आले केवळ गणेश बिडकर यांना वाचविण्याच्या नादात. विनयभंग, महिलांना मारहाण, शिवीगाळ, बारबालांसोबतचे चाळे या सगळ्या गोष्टींमुळे गणेश बिडकर यांची कारकीर्द अतिशय नालायक राजकीय पुढारी असे झाली आहे. आता आपलं दुर्दैव असा आहे की अशा व्यक्तीला पुणे भाजप प्रचार प्रमुख बनवले आहे.हे सर्व आज सांगण्याचे कारण एकच की, अशा चारित्र्यहीन माणसाला पवित्र पुणे महानगरपालिकेपासून लांब ठेवले पाहिजे. कारण पैशांच्या जीवावर आपण लोकांना विकत घेऊ शकतो हा माज या निवडणुकीत मोडीत काढायला हवा. #savepune
Ravindra Dhangekar Official22,306 次观看 • 7 个月前

#धंगेकर इम्पॅक्ट! पुण्याच्या संस्कृतीची हेळसांड करू पाहणाऱ्या पब संस्कृतीला हद्दपार केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज या अवैध पबवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मी कालही पब संस्कृतीच्या विरोधात होतो, आजही आणि उद्याही राहणार! मला माझे पुणे स्वच्छ पाहिजे. #Nopubsinpune
Ravindra Dhangekar Official59,039 次观看 • 2 年前

पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाच्या पोलिसांचा कर्तव्य बजावताना सुरू असलेला उन्माद वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने थांबवावा. आपणास दिलेली वर्दी ही लोकांना शिस्त लावण्यासाठी,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेली आहे. मात्र या वाहतूक पोलीसांची थेट नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात आहे.खरंच आपल्या मध्ये हिम्मत असेल तर आपली मर्दांगी राजरोसपणे जे डंपर,सिमेंट मिक्सर बंद असताना देखील आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत असतात त्यांच्यावर दाखवा.तिथे मात्र पैशांची लाचारी स्वीकारून तुम्ही दुर्लक्ष करतात. माझ्या सर्वसामान्य पुणेकरांवर जर बाळाचा वापर कराल तर लक्षात ठेवा, आपल्या निलंबनासाठी मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच असे प्रकार वारंवार घडत आहेत. #punecity
Ravindra Dhangekar Official39,228 次观看 • 1 年前

पुणे वाचवा....पब बंद करा.... पुणे शहरातील कल्याणी नगर भागात झालेल्या अपघातानंतर संबंधित गुन्हेगाराला मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या विरोधात तसेच या पब मालकांवर मेहेरबान असलेल्या पोलीस प्रशासनाचे विरोधात येरवडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. #nopubsinpune #nodrugsinpune #RavindraDhangekar #savepune #justicefor_anishashwini
Ravindra Dhangekar Official43,386 次观看 • 2 年前

प्रश्न न्यायाचा आहे… गरीब असो वा श्रीमंत, दोघांना ‘न्याय’ मिळाला पाहिजे. न्याय सर्वांसाठी सारखाच पाहिजे म्हणूनच आम्ही लढतोय. अन्यायाच्या विरोधात लढतोय! काल पुण्यातील व्यावसायिकाच्या मुलाने एका युवक युवतीला गाडीखाली चिरडून पैश्याचे जीवावर मिळवलेल्या जामीनानंतर आपण केलेल्या आंदोलनाची संपूर्ण व्यवस्थेला दखल घ्यावी लागली. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी देखील या प्रकरणात सर्वसामान्य कुटुंबातील त्या मुलांची बाजू घेत सर्वांना समान न्याय द्यायला दिला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. Rahul Gandhi #Pune #India #justicefor_avnishashvini
Ravindra Dhangekar Official32,198 次观看 • 2 年前
没有更多内容可加载