Dr Shrikant Lata Eknath Shinde's banner
Dr Shrikant Lata Eknath Shinde's profile picture

Dr Shrikant Lata Eknath Shinde

@DrSEShinde149,362 subscribers

Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India

Shorts

#धनुष्यबाण, २०१९ ला जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे गहाण ठेवला होता तो आम्ही आता सोडवलाय... Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#धनुष्यबाण, २०१९ ला जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे गहाण ठेवला होता तो आम्ही आता सोडवलाय... Eknath Shinde - एकनाथ शिंदे

141,237 views

Videos

DrSEShinde's profile picture

हाच आपला महाराष्ट्र आहे, जिथे अगदी लहान गोष्टीची सुद्धा जाण ठेवली जाते ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून या आजींनी दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर अगदी हक्काने 'मुख्यमंत्री भावाकडून लाडक्या बहिणीस सप्रेम भेट' असे नोंदवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नजरेस आला होता. तेव्हा या आजींशी बोलण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. "आजवर तर काही लाभ मिळाला नाही पण या योजनेतून पैसे मिळाले. तेव्हा भावाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून हंड्यांवर मुख्यमंत्री साहेबांचं नाव टाकलं. तुम्ही सुखी राहा, देव तुमची भरभराट करो" असा आशीर्वाद देखील या आजींनी दिला. आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी अशी माणसं आहेत, हे पाहून मन अगदी भरुन आलं होतं. #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde

187,037 views • 1 year ago

DrSEShinde's profile picture

भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आयोजित केलेल्या विशेष चर्चा सत्रामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अगदी मुद्देसूद आणि आक्रमक भाषण करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आजवर हा देश चालला, उभा राहिला आणि पुढेही चालत राहील. मात्र संविधान वाचण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनेच वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी निक्षून सांगितले. कधी उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून तर कधी आणीबाणी लादून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसनेच केला. लोकसभा निवडणुकीवेळी तर संविधान हातात घेऊन संविधान धोक्यात असल्याचा फेक नरेटिव्ह ही काँग्रेसने पसरवला. पण, ही संविधानाची ताकद आहे जिने काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले आणि एका गरीब घरातील व्यक्तीला देशाचा पंतप्रधान आणि एका रिक्षावाल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, असे ठाम मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना सुरवातीपासूनच विरोध होता. यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम ही काँग्रेसने केले. मात्र काँग्रेसचा हा फेक चेहरा लोकांनी आता ओळखला आहे. आणि त्याला चपराक लगावण्याचे काम मतपेटीतून केले आहे. त्यामुळे आता कितीही खोटा गाजावाजा केला तरी फरक पडणार नाही. कारण, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde Shivsena - शिवसेना

Dr Shrikant Lata Eknath Shinde

159,808 views • 1 year ago

DrSEShinde's profile picture

केंद्रीय स्थायी समितीने आपल्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की देशात बांधकाम कार्यांसाठी नियम अस्तित्वात असले, तरी इमारत पाडण्याच्या (डिमोलिशन) कामांसाठी कोणतीही ठोस नियामक व्यवस्था नाही. परिणामी, रस्त्यांवर टाकला जाणारा बांधकामाचा राडारोडा हा PM10 प्रकारच्या प्रदूषणाचा एक प्रमुख स्रोत आहे. याच पार्श्वभूमीवर आज संसदेत प्रश्न उपस्थित केला की '' सरकार अनिवार्य पाडकाम परवाना प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे का, ज्यामध्ये राडारोडा विल्हेवाट आणि पूर्वनियोजन करणे बंधनकारक असेल ? तसेच सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी, खासगी बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांमध्ये किमान ठरावीक टक्केवारीने रीसायकल केलेल्या साहित्याचा वापर करणे बंधनकारक करण्याबाबत सरकारची काही योजना आहे का ? The Central Standing Committee has clearly stated in its report that while regulations exist for construction activities in the country, there is no comprehensive regulatory framework for demolition work. As a result, construction debris dumped on roads has become a major source of PM10 pollution. In this context, I raised a question in Parliament today asking whether the Government is considering the implementation of a mandatory demolition permit system, under which advance planning and proper disposal of debris would be compulsory. I also asked whether the Government has any plans to promote the circular economy by making it mandatory for private builders to ensure the use of a minimum prescribed percentage of recycled materials in their construction projects. #Shivsena #DrShrikantEknathShinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde

63,641 views • 6 months ago