
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
@DrVrushaliRaut • 14,797 subscribers
औद्योगिक मानसशास्त्रज्ञ I समुपदेशक I लेखक: 'कामगारांचे मानसिक आरोग्य' व 'मानसिक आघात समजून घेताना' 20 years experience in IT sector & Academics
Shorts
Videos

सुपरस्टार आमिर खान चा एकंदरीत ट्रॅक रेकॉर्ड बघता तो सिनेमा करणे पूर्ण सोडून देईल याची शक्यता नाकारता येत नाही. परिपूर्णतेचा अट्टाहास करणारा म्हणून ख्याती असलेला हा गुणी अभिनेता गेल्या काही दिवसात मनमोकळेपणाने माध्यमांसमोर येऊन मानसिक आरोग्य या विषयावर बोलतोय याचे नक्कीच कौतुक आहे. स्वतःच्या करिअर मध्ये अति गुंतल्याने मुलांना, लग्नाला व आईला वेळ देऊ शकलो नाही याची खंत आमीर खानला जाणवत आहे व त्यामुळे आता तो सिनेमा करणार नाही असे त्याने बोलून दाखवले. त्याच्या मुलीसोबत असलेला नेटफ्लिक्स वरील मानसिक आरोग्या संबंधित व्हिडिओ उत्तम झालाय. जोपर्यंत इन्फ्लुएन्सर्स या विषयावर बोलत नाहीत तोपर्यंत हा विषय सर्वमान्य होणार नाही. सिनेमे चालत नाही म्हणून आमिर खान असे करतोय असेही काही लोक म्हणतील पण ३० वर्ष करिअर केल्यावर आमिर खान सिनेमा क्षेत्रात टिकून राहणे अवघड नाही पण जर त्याने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यात काहीतरी तथ्य असावे. आवडीचे काम किंवा रोजी रोटी कमविण्यासाठी केलेले काम हे कामच असते ज्याचा आपल्या मनावर व शरीरावर परिणाम होतो. आमिर खान सारखा अभिनेता असो किंवा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर, नात्यांना वेळ न देता कामात गुंतून राहणारे शेवटी जो पश्चाताप अनुभवतात तो भयंकर असतो. कामातून मिळणारा पैसा व कौतुक हे तात्पुरते असते याउलट नात्यातून मिळणार समाधान हे शेवटपर्यंत राहत, आयुष्याचा आनंद वाढवत. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगली नाती नाहीत त्याच्यासाठी काम हे व्यसन होऊ शकत, होत व एकटेपणा आणखी वाढवत. अति तेथे माती हे लक्षात ठेवले तर काम व वैयक्तिक आयुष्य यातील मेळ घालून आनंदी आयुष्य जगणे एवढे अवघड नाही. नात्यांना मुद्दाम वेळ द्या, त्यावर काम करा अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग नसतो. आमीर खान ची मुलाखत घेणार कोणीतरी दुसर हव होत. Looking at superstar Aamir Khan's overall track record, it cannot be ruled out that he might completely quit doing films. Known for his obsession with perfection, this talented actor has recently come forward openly to speak about mental health, which is indeed commendable. Aamir Khan has expressed regret over not being able to devote time to his children, marriage, and mother due to being excessively engrossed in his career. Consequently, he has hinted that he might stop doing films. The Netflix video featuring him with his daughter, which revolves around mental health, is excellent. Until influencers speak on such topics, they won't gain widespread acceptance. Some might argue that Aamir Khan is doing this because his films aren't performing well, but after a 30-year career, staying relevant in the film industry isn't difficult for him. If he has decided to quit films, there must be some substance to it. Whether it's work one enjoys or work done to earn a living, it inevitably affects one's mind and body. Whether it's an actor like Aamir Khan or a software engineer, those who immerse themselves in work at the cost of relationships often face deep regret later. The money and recognition earned through work are temporary, whereas the satisfaction derived from relationships lasts a lifetime and enhances the joy of living. For those who lack meaningful relationships in their lives, work can become an addiction, further deepening loneliness. Remembering the saying, "Excess leads to ruin," balancing work and personal life to lead a happy life isn't too difficult. Dedicate time to your relationships intentionally and nurture them; otherwise, once time slips away, nothing can be done. The interview of Aamir Khan should have been conducted by someone else. #mentalhealth #Bollywood #AamirKhan #मराठी #म #मानसिक
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत136,647 views • 1 year ago

या व्हिडिओ मध्ये जे वर्णन आहे त्यात केवळ एक किंवा दोन नाही तर विविध वयोगटातील अनेक स्त्रिया या वर्णनात फिट बसतात. महागडे कपडे व भडक मेकअप (शक्यतो लग्न, सणवार यावेळी करतात तसा), श्रीमंती थाट, आकर्षक लोकेशन (अनेकवेळा परदेशात), थोडक्यात तुम्हाला यांची समृद्धी बघून जळजळ होईल असाच तोरा ठेवत ही पात्र आपल्या नजरेसमोर सोशल मीडिया च्या माध्यमातून नाचत असतात. महत्वाच्या पदावर असलेल्या विवाहित स्त्रीला मूल, नवरा व घरच्या इतर जबाबदार्या सांभाळत रोज मॉडेल प्रमाणे वावरण कस जमत? कारण कौटुंबिक जबाबदारी शिवाय ज्या पदावर या महिला काम करतात त्यांचे वर्क लोड प्रचंड असत, त्यामुळे नक्कीच ताण येतो. महिला म्हणून वावरताना जी आव्हान असतात ती आणखी वेगळी. हे सर्व करत असताना सतत आनंदी आणि फ्रेश राहणे कसे शक्य आहे? फेमस रीलस्टार सरपंच आठवतात का ज्या सरपंच कमी मॉडेल जास्त वाटायच्या. रीलस्टार होणे हे सरपंच किंवा कोणत्याही संवैधानिक पदाची गरज असावी इतके ही लोक इंस्टाग्रामवर आपली प्रतिमा जपतात. यांच्या नावावर कोणतेही ठोस काम नसत व भ्रष्टाचार करण्यात नंबर पुढे.. माझा मेकअप आणि ड्रेसिंगवर अजिबात आक्षेप नाही, रोजच्या कामाला अनुकूल राहायला हव. गबाळ राहणं योग्य नाही पण स्त्रीचे मूल्य हे केवळ कॉस्मेटिक आहे का? सोशल मीडियाच्या जगात जिथे कॅमेरा तुमच्यावर रोखलेला असतो तिथे दिसण्यात थोड सावध राहावे लागत पण काहीही काम न करता केवळ दिसण्यावर भर दिल्या जात आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. सातत्याने आकर्षक दिसत, अनेक फिल्टर वापरुन पुरूषांना आकर्षित करेल अशीच प्रतिमा तयार करणे यावर भर दिसतो. स्त्रियांनी प्रश्न विचारू नये व स्वत:ची बुद्धी चालवू नये या मताच्या पुरूषांनी तयार केलेली ही व्यवस्था सध्या चलनात आहे. अश्या सतत आनंदी राहणार्या स्त्रिया त्यांची भावनिक आंदोलन कशी हाताळतात हे मोठे गूढ आहे. मध्यंतरी एका पॉडकास्ट पुरुष सूत्रसंचालकाने मला विचारले की आजकाल सगळ्याच स्त्रिया कायम नटून थटून असतात, कसे काय शक्य आहे? अश्या नटलेल्या स्त्रियांना बघून साधारण राहणार्या स्त्रियांना नक्कीच कमीपणाची भावना येते, अनेक महिला-तरुणी तसे बोलून दाखवितात. या ट्रेंड मुळे कॉस्मेटिक प्रसाधने व ब्युटिपार्लर चा धंदा तेजीत आहेच पण "सुंदर" दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेणे हे सर्रास चालत. यात मानसिक व शारीरिक आरोग्याला कुठेही स्थान नाही. इंस्टाग्राम व व्हाट्स अप वर स्वत:च्या शरीराचे प्रदर्शन मांडणार्या फिज़िक्स मध्ये नोबल मिळावे यासाठी हे नक्कीच करत नाहीत. या सर्व लिपस्टिक गॅंगच्या चुकीच्या प्रभावामुळे विविध क्षेत्रात करियर करू पाहणार्या तरुणींची संख्या कमी होत आहे. OnlyFan सारख्या साइट्स तर तरुणींना प्रॉडक्ट म्हणून पेश करतात व यावरील तरुणी त्याच्यातून पैसे कमवितात. इंटरनेटवर नग्नता सगळ्यात जास्त विकल्या जाते. अर्थात हे सर्व नट्टा पट्टा करणे यांची आवड नसते तर एक तो एक डावपेचाचा भाग असतो. पुरूषांना आकर्षित करून हव काम करवून घेणे व फिमेल कार्ड व्यवस्थित वापरत आपली पावर वाढविणे, चैन व मौज मजा करत आयुष्य घालविणे हे यांचे ध्येय असते. इतर लोकांची पर्वा कशाला करायची ? काम झाली काय किंवा नाही, कोणाला काय फरक पडतोय? यातील अनेक स्त्रिया अतिशय क्रूर आणि कपटी असतात ( ऐपस्टीन कांडातील घिसलेन मॅक्सवेल आठवा, अतिशय आकर्षक रित्या स्वत:ला प्रेझेंट करायची) थोडक्यात विषकन्या, ज्यांना लहानपणापासून "स्त्री हे पुरुषाचे मनोरंजन करणारे खेळणे आहे" छान पद्धतीने शिकविले असते. ही मोहिनीविद्या वापरुन पुरूषांना वश करायचे व आयुष्य आरामात काढायचे. यांचा एकंदरीत वावर हा मोहीत करणारा असतो. अश्या स्त्रिया भावनिक नसून अतिशय कॅलकुलटेड व आत्ममुग्ध असतात. या स्त्रियांना हे कळत नाही की त्यांची किंमत ही त्यांच्या शरीरपूर्ती केली जाते. एकदा शरीर थकल की बाजूला फेकल्या जाऊन नवीन मनोरंजनाचे खेळणे आणले जाते. अश्या स्त्रियांना अनेक मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात. शारीरिक आरोग्याचे हाल तर विचारू नका. पण एवढा विचार करण्याइतपत यांची बुद्धी असती तर त्यांनी हा मार्ग पत्करला नसता किंवा लज्जा,अपराधीपणा जाणविल्यानंतर वेगळी वाट धरली असती. पूर्वी सती जाणे, केशवपन, स्त्रियांना अशिक्षित ठेवणे या स्त्रीविरोधी परंपरेचे मॉडर्न रूप स्त्रिचे अस्तित्व तिच्या शरीरापुरते मर्यादित ठेवणे हा ट्रेंड आहे. दुर्दैवाने स्त्रियांना हे शोषण आहे हेच उमजत नाही. #मराठी #महाराष्ट्र #मानसिक #खरात_फाईल्स #अशोकखरात #Marathi #Maharashtara
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत16,428 views • 6 months ago

सध्या मुलींना संसार रेडिमेड हवा आहे का ? लग्न हा केवळ इवेंट म्हणून राहिला आहे का? लग्नात व प्रेमाच्या नात्यात मुली केवळ ग्राहक म्हणून वावरतात का ? त्यामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत का? स्त्रीची सहचारिणी म्हणून भूमिका संपल्यागत जमा आहे का? पूर्ण व्हिडिओ #मराठी #म #मानसिक #महाराष्ट्र
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत32,097 views • 1 year ago

🔴प्रत्येक Celebration alcohol पिऊन करण्याची काहीच गरज नसते. 🔴३० व्या वर्षी alcoholic liver disease होत असेल तर त्या व्यक्तीने १२-१३व्या वर्षी दारू प्यायला सुरवात केली असेल. 🔴बायकांचे जेनेटिकस पुरुषांपेक्षा वेगळे असल्याने बायकांना लिवर चा त्रास पुरुषांच्या तुलनेत जास्त होतो.
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत24,181 views • 1 year ago

लोकांची मानसिकता किती अचूकतेने सांगितली आहे. 👇🏼
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत14,969 views • 1 year ago

'अप्सरा आली' गाण्याचे कर्नाटकी फ्युजन अप्रतिम जमलय.
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत12,619 views • 1 year ago
No more content to load