VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत's banner
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत's profile picture

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

@DrVrushaliRaut14,797 subscribers

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ I समुपदेशक I लेखक: 'कामगारांचे मानसिक आरोग्य' व 'मानसिक आघात समजून घेताना' 20 years experience in IT sector & Academics

Shorts

Instagram लूक मिळविण्यासाठी मेकअप, फॅशन, दागिने, चप्पल, बॅग्स यावर बराचसा पैसे व वेळ खर्च भारतीय स्त्री जर तिला मिळणार्‍या सोयी सुविधा, तिचे हक्क यावर दोन शब्द नियमितपणे बोलायला लागली तर किती बदल घडेल, नाही? 🤷🏽‍♀️

14,141 görüntüleme

आमचा हीरो शाहरुख खान सीनियर सिटीझन झालाय आज 😃😀 साठ वर्षाचा शाहरुख खान #ShahRukhKhan𓀠 हे आमच्या सारख्या फॅन्सला जरा चमत्कारिक वाटत ऐकायला पण काळ कोणासाठी थांबत नाही. 2013 ते 2023 या काळात सिनेमा बघणार्‍या प्रेक्षकाला शाहरुखची जादू समजणार नाही कारण 2013 मध्ये चेन्नई एक्सप्रेस नंतर तो जणू पडद्यावरून गायब झाला आणि 2023 मध्ये थेट पठाण म्हणून आला, जवान म्हणून गाजला. डंकी सारख्या सिनेमात नेहमीसारखा शाहरुख परत दिसला. दूरदर्शन व मेट्रो चॅनेल बघत मोठ्या झालेल्या माझ्या पिढीला फौजी आणि सर्कस मधील शाहरुख मोठ्या पडद्यावर बघताना स्वप्नं पूर्ण होऊ शकतात याची जाणीव झाली. 1995 साली आलेल्या DDLJ ने भारताच्या उदारमतवादी आर्थिक धोरणाच्या सर्वात जास्त फायदा मिळवलेल्या आमच्या पिढीला तिचा हीरो दिला. हा आमचा हीरो शिकलेला, उत्तम इंग्रजी बोलणारा, प्रवाहाविरुद्ध जाऊन व्यावसायिक चौकटीत नवीन प्रयोग करणारा होता. 90 च्या दशकाच्या शेवटी आयटी च्या क्षेत्रातील भारताचा दबदबा निर्माण होत असताना सिनेमात स्वित्झर्लंड बघणारे भारतीय नागरिक थेट स्वित्झर्लंडलाच जाऊ लागले. अमेरिकन ड्रीम मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्यात आले. भारतीय NRI लोकांची संख्या वाढू लागली. याच काळात शाहरुख खान देखील किंग खान म्हणून मोठा होत गेला. हिंदी सिनेमात घराणेशाही असताना देखील शाहरुख खानने ज्या पद्धतीने स्वतः ला घडवले तो एक चमत्कार आहे. आई वडील लहान वयात गमावून, मोठ्या बहिणीला मानसिक धक्क्यातून आधार देणारा, परधर्मीय स्त्री सोबत विवाह, सोबतच्या स्त्री कलाकारांना मानाची वागणूक देणारा, सिनेमाच्या titles मध्ये त्यांचे नाव आपल्या आधी लिहिणारा व हिंदी सिनेमा ग्लोबल स्तरावर लोकप्रिय करणारा हा कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीतील एकदम वेगळा ठरतो. हे सर्व करताना शाहरुख खान हिंदी चित्रपट सृष्टीतील चुकीच्या गोष्टींवर विशेषत घराणेशाहीवर त्याच्या खास शैलीत टीका करायला घाबरला नाही. माध्यम व संवाद यांची उत्कृष्ट जाण असलेला शाहरुख विविध सामाजिक मुद्यांवर बोलायला कधीही कचरत नाही. मधल्या काळात त्याचे वागण जरा विचित्र झाले हे माझ्यासारख्या फॅन्स ला आवडले नाही मात्र त्याच्या मुलाला झालेल्या त्रासातून तो बदलला, परिपक्व झाला. हा त्याच्यातील बदल त्याला बघत मोठ्या झालेल्या फॅन्सला नक्कीच जाणवला. 90 च्या दशकात कभी हा कभी ना, माया मेमसाब, डर, यासारखे प्रयोग करणारा शाहरुख काळाशी व सिनेमातील बदलां सोबत जुळवत 2023 मध्ये जवान सारखा सिनेमा करतो तेव्हा survival of the fittest या डार्विनच्या वाक्याचे महत्व लक्षात येते. आज शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे, अर्थात याला कारणीभूत त्याची व्यावसायिक वृत्ती, कला व व्यवसाय यांचा योग्य मेळ, अहंकार बाजूला ठेवून सतत शिकत राहणे हे आहे. सिनेमा सारख्या बेभरवशाचा क्षेत्रात जिथे दर शुक्रवारी कलाकारांच नशीब ठरत तिथे आपल्यातील कलेची भूक जिवंत ठेवत कुबेराची मर्जी संपादन करणे हे दुर्मिळ काम शाहरुख खान ने मोठ्या खुबीने साध्य केले आहे. एक फॅन म्हणून त्याचे बहुतेक सिनेमे बघितलेत पण लक्षात राहील असे सिनेमे DDLJ, दिल से, कल हो ना हो, स्वदेस, चक दे, डॉन, डिअर जिंदगी, जवान. शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील शेवटचा सुपर स्टार आहे. एक कलाकार, व्यावसायिक आणि माणूस म्हणून आवडणार्‍या या कलाकारास "दिल से" साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🥳🤗🥰🎊💐🎂 तुम जियो हज़ारों साल साल के दिन हों पचास हज़ार!! ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ Shah Rukh Khan 😍 #SRK #ShahRukhKhan #HappyBirthdaySRK

22,199 görüntüleme

डिप्रेशन या अवस्थेत व्यक्ति जुन्या आठवणी व वागण्याच्या सवयी ज्या अहितकारक आहेत त्या बदलून नवीन गोष्टी आत्मसात करतो, काहींना या गोष्टी बदलायला जड जाते, डिप्रेशन ही अवस्था त्यांना सोयीची वाटू लागते. डिप्रेशन हा सर्वात महत्वाचा turning point असून त्या व्यक्तीचे आयुष्य चांगल्यासाठी बदलते. #depression #डिप्रेशन #म #महाराष्ट्र

24,796 görüntüleme

Videos

DrVrushaliRaut's profile picture

सुपरस्टार आमिर खान चा एकंदरीत ट्रॅक रेकॉर्ड बघता तो सिनेमा करणे पूर्ण सोडून देईल याची शक्यता नाकारता येत नाही. परिपूर्णतेचा अट्टाहास करणारा म्हणून ख्याती असलेला हा गुणी अभिनेता गेल्या काही दिवसात मनमोकळेपणाने माध्यमांसमोर येऊन मानसिक आरोग्य या विषयावर बोलतोय याचे नक्कीच कौतुक आहे. स्वतःच्या करिअर मध्ये अति गुंतल्याने मुलांना, लग्नाला व आईला वेळ देऊ शकलो नाही याची खंत आमीर खानला जाणवत आहे व त्यामुळे आता तो सिनेमा करणार नाही असे त्याने बोलून दाखवले. त्याच्या मुलीसोबत असलेला नेटफ्लिक्स वरील मानसिक आरोग्या संबंधित व्हिडिओ उत्तम झालाय. जोपर्यंत इन्फ्लुएन्सर्स या विषयावर बोलत नाहीत तोपर्यंत हा विषय सर्वमान्य होणार नाही. सिनेमे चालत नाही म्हणून आमिर खान असे करतोय असेही काही लोक म्हणतील पण ३० वर्ष करिअर केल्यावर आमिर खान सिनेमा क्षेत्रात टिकून राहणे अवघड नाही पण जर त्याने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यात काहीतरी तथ्य असावे. आवडीचे काम किंवा रोजी रोटी कमविण्यासाठी केलेले काम हे कामच असते ज्याचा आपल्या मनावर व शरीरावर परिणाम होतो. आमिर खान सारखा अभिनेता असो किंवा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर, नात्यांना वेळ न देता कामात गुंतून राहणारे शेवटी जो पश्चाताप अनुभवतात तो भयंकर असतो. कामातून मिळणारा पैसा व कौतुक हे तात्पुरते असते याउलट नात्यातून मिळणार समाधान हे शेवटपर्यंत राहत, आयुष्याचा आनंद वाढवत. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगली नाती नाहीत त्याच्यासाठी काम हे व्यसन होऊ शकत, होत व एकटेपणा आणखी वाढवत. अति तेथे माती हे लक्षात ठेवले तर काम व वैयक्तिक आयुष्य यातील मेळ घालून आनंदी आयुष्य जगणे एवढे अवघड नाही. नात्यांना मुद्दाम वेळ द्या, त्यावर काम करा अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग नसतो. आमीर खान ची मुलाखत घेणार कोणीतरी दुसर हव होत. Looking at superstar Aamir Khan's overall track record, it cannot be ruled out that he might completely quit doing films. Known for his obsession with perfection, this talented actor has recently come forward openly to speak about mental health, which is indeed commendable. Aamir Khan has expressed regret over not being able to devote time to his children, marriage, and mother due to being excessively engrossed in his career. Consequently, he has hinted that he might stop doing films. The Netflix video featuring him with his daughter, which revolves around mental health, is excellent. Until influencers speak on such topics, they won't gain widespread acceptance. Some might argue that Aamir Khan is doing this because his films aren't performing well, but after a 30-year career, staying relevant in the film industry isn't difficult for him. If he has decided to quit films, there must be some substance to it. Whether it's work one enjoys or work done to earn a living, it inevitably affects one's mind and body. Whether it's an actor like Aamir Khan or a software engineer, those who immerse themselves in work at the cost of relationships often face deep regret later. The money and recognition earned through work are temporary, whereas the satisfaction derived from relationships lasts a lifetime and enhances the joy of living. For those who lack meaningful relationships in their lives, work can become an addiction, further deepening loneliness. Remembering the saying, "Excess leads to ruin," balancing work and personal life to lead a happy life isn't too difficult. Dedicate time to your relationships intentionally and nurture them; otherwise, once time slips away, nothing can be done. The interview of Aamir Khan should have been conducted by someone else. #mentalhealth #Bollywood #AamirKhan #मराठी #म #मानसिक

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

136,647 görüntüleme • 1 yıl önce

DrVrushaliRaut's profile picture

"मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या पुस्तकात PTSD आणि Grief म्हणजे मानसिक आघात व त्यानंतर होणारे बदल, तसेच जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर जाणवणारी शोकाची भावना यावर सविस्तर माहिती व उपाययोजना आहे. "मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती ऑर्डर करण्यासाठी +91 80803 14827 या क्रमांकावर संपर्क साधावा. संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी लिंक 👇🏼 पुस्तक : मानसिक आघात समजून घेताना लेखिका : डॉ. वृषाली राऊत प्रकाशन: न्यू इरा प्रकाशन किंमत : २५० रुपये पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. +91 80803 14827 #मन #भावना #मानसिक #महाराष्ट्र #आशा #आयुष्य #आयुष्याच्या_पुस्तकातून #मराठी #महाराष्ट्र #depression #म #anxiety #emotions #emotionalintelligence #भावनिक #भावुक #भीती #राग #लोभ #आनंद #marathi. #समुपदेशन #नाती #नातं

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

28,169 görüntüleme • 1 yıl önce

DrVrushaliRaut's profile picture

सोशल मीडियावर विद्वान भासणारी अनेक लोक प्रत्यक्षात मात्र निष्प्रभ वाटतात कारण लोकांचे लिहिलेले कॉपी पेस्ट करता येते, प्रत्यक्ष बोलायला थोडी का होईना, हुशारी आवश्यक आहे😀 शब्दांना नाद जिवंत करतो, चॅटींगच्या जगात हा नाद नसल्याने ते शब्द अर्थहीन ठरतात. महत्वाचे संवाद जी व्यक्ती चॅटिंग वर करते त्याला संवाद व त्या अर्थाने नाती कळलीच नाही. ज्याला नातं टिकवायचे आहे, ज्या व्यक्तीला तुमच्या बद्दल आदर आहे ती व्यक्ती कॉल वर बोलेन किंवा तुम्हाला भेटेल. संवादाच्या युगात चॅटिंग वर नाते तयार करतात व नाते तोडतात देखील मग नात्यात विश्वास कसा राहणार ? नातीच नीट नाही तर मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होणारच.

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

25,181 görüntüleme • 1 yıl önce

DrVrushaliRaut's profile picture

सोशल मीडिया चे खरे विद्रुप रूप दाखविणारी social dilemma नावाची documentary २०२० मध्ये येऊन गेली जी प्रचंड गाजली. एवढे होऊनही सोशल मीडिया चा वापर कमी झाला नसून वाढलाच आहे. सोशल मीडिया चे डिझाईन असे आहे की मानवी मेंदूला त्याचे व्यसन तर लागतेच, शरीर व मन यावर त्याचा दारू, कोकेन सारखा वाईट परिणाम होतो. तंत्रज्ञानाची ही काळी बाजू समजून घेतली तर सोशल मीडिया आपल्या मेंदूला नियंत्रित करू शकणार नाही. मोबाइल/सोशल मीडिया च्या अतिवापराने मेंदूत भ्रम निर्माण झाल्याच्या केसेस पुढे येत आहेत इतका याचा परिणाम भंयकर आहे. हे व्यसन सुटू शकत, समुपदेशन मदत करत. जितक्या लवकर मदत मागाल, यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल तितका फायदा होईल. #मराठी #म #मानसिक #महाराष्ट्र

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

10,583 görüntüleme • 1 yıl önce

Daha fazla içerik yok.