
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
@DrVrushaliRaut • 14,797 subscribers
औद्योगिक मानसशास्त्रज्ञ I समुपदेशक I लेखक: 'कामगारांचे मानसिक आरोग्य' व 'मानसिक आघात समजून घेताना' 20 years experience in IT sector & Academics
Shorts
Videos

सुपरस्टार आमिर खान चा एकंदरीत ट्रॅक रेकॉर्ड बघता तो सिनेमा करणे पूर्ण सोडून देईल याची शक्यता नाकारता येत नाही. परिपूर्णतेचा अट्टाहास करणारा म्हणून ख्याती असलेला हा गुणी अभिनेता गेल्या काही दिवसात मनमोकळेपणाने माध्यमांसमोर येऊन मानसिक आरोग्य या विषयावर बोलतोय याचे नक्कीच कौतुक आहे. स्वतःच्या करिअर मध्ये अति गुंतल्याने मुलांना, लग्नाला व आईला वेळ देऊ शकलो नाही याची खंत आमीर खानला जाणवत आहे व त्यामुळे आता तो सिनेमा करणार नाही असे त्याने बोलून दाखवले. त्याच्या मुलीसोबत असलेला नेटफ्लिक्स वरील मानसिक आरोग्या संबंधित व्हिडिओ उत्तम झालाय. जोपर्यंत इन्फ्लुएन्सर्स या विषयावर बोलत नाहीत तोपर्यंत हा विषय सर्वमान्य होणार नाही. सिनेमे चालत नाही म्हणून आमिर खान असे करतोय असेही काही लोक म्हणतील पण ३० वर्ष करिअर केल्यावर आमिर खान सिनेमा क्षेत्रात टिकून राहणे अवघड नाही पण जर त्याने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यात काहीतरी तथ्य असावे. आवडीचे काम किंवा रोजी रोटी कमविण्यासाठी केलेले काम हे कामच असते ज्याचा आपल्या मनावर व शरीरावर परिणाम होतो. आमिर खान सारखा अभिनेता असो किंवा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर, नात्यांना वेळ न देता कामात गुंतून राहणारे शेवटी जो पश्चाताप अनुभवतात तो भयंकर असतो. कामातून मिळणारा पैसा व कौतुक हे तात्पुरते असते याउलट नात्यातून मिळणार समाधान हे शेवटपर्यंत राहत, आयुष्याचा आनंद वाढवत. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगली नाती नाहीत त्याच्यासाठी काम हे व्यसन होऊ शकत, होत व एकटेपणा आणखी वाढवत. अति तेथे माती हे लक्षात ठेवले तर काम व वैयक्तिक आयुष्य यातील मेळ घालून आनंदी आयुष्य जगणे एवढे अवघड नाही. नात्यांना मुद्दाम वेळ द्या, त्यावर काम करा अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग नसतो. आमीर खान ची मुलाखत घेणार कोणीतरी दुसर हव होत. Looking at superstar Aamir Khan's overall track record, it cannot be ruled out that he might completely quit doing films. Known for his obsession with perfection, this talented actor has recently come forward openly to speak about mental health, which is indeed commendable. Aamir Khan has expressed regret over not being able to devote time to his children, marriage, and mother due to being excessively engrossed in his career. Consequently, he has hinted that he might stop doing films. The Netflix video featuring him with his daughter, which revolves around mental health, is excellent. Until influencers speak on such topics, they won't gain widespread acceptance. Some might argue that Aamir Khan is doing this because his films aren't performing well, but after a 30-year career, staying relevant in the film industry isn't difficult for him. If he has decided to quit films, there must be some substance to it. Whether it's work one enjoys or work done to earn a living, it inevitably affects one's mind and body. Whether it's an actor like Aamir Khan or a software engineer, those who immerse themselves in work at the cost of relationships often face deep regret later. The money and recognition earned through work are temporary, whereas the satisfaction derived from relationships lasts a lifetime and enhances the joy of living. For those who lack meaningful relationships in their lives, work can become an addiction, further deepening loneliness. Remembering the saying, "Excess leads to ruin," balancing work and personal life to lead a happy life isn't too difficult. Dedicate time to your relationships intentionally and nurture them; otherwise, once time slips away, nothing can be done. The interview of Aamir Khan should have been conducted by someone else. #mentalhealth #Bollywood #AamirKhan #मराठी #म #मानसिक
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत136,647 次观看 • 1 年前

सध्या मुलींना संसार रेडिमेड हवा आहे का ? लग्न हा केवळ इवेंट म्हणून राहिला आहे का? लग्नात व प्रेमाच्या नात्यात मुली केवळ ग्राहक म्हणून वावरतात का ? त्यामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत का? स्त्रीची सहचारिणी म्हणून भूमिका संपल्यागत जमा आहे का? पूर्ण व्हिडिओ #मराठी #म #मानसिक #महाराष्ट्र
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत32,097 次观看 • 1 年前

"मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या पुस्तकात PTSD आणि Grief म्हणजे मानसिक आघात व त्यानंतर होणारे बदल, तसेच जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर जाणवणारी शोकाची भावना यावर सविस्तर माहिती व उपाययोजना आहे. "मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती ऑर्डर करण्यासाठी +91 80803 14827 या क्रमांकावर संपर्क साधावा. संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी लिंक 👇🏼 पुस्तक : मानसिक आघात समजून घेताना लेखिका : डॉ. वृषाली राऊत प्रकाशन: न्यू इरा प्रकाशन किंमत : २५० रुपये पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. +91 80803 14827 #मन #भावना #मानसिक #महाराष्ट्र #आशा #आयुष्य #आयुष्याच्या_पुस्तकातून #मराठी #महाराष्ट्र #depression #म #anxiety #emotions #emotionalintelligence #भावनिक #भावुक #भीती #राग #लोभ #आनंद #marathi. #समुपदेशन #नाती #नातं
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत28,169 次观看 • 1 年前

सोशल मीडियावर विद्वान भासणारी अनेक लोक प्रत्यक्षात मात्र निष्प्रभ वाटतात कारण लोकांचे लिहिलेले कॉपी पेस्ट करता येते, प्रत्यक्ष बोलायला थोडी का होईना, हुशारी आवश्यक आहे😀 शब्दांना नाद जिवंत करतो, चॅटींगच्या जगात हा नाद नसल्याने ते शब्द अर्थहीन ठरतात. महत्वाचे संवाद जी व्यक्ती चॅटिंग वर करते त्याला संवाद व त्या अर्थाने नाती कळलीच नाही. ज्याला नातं टिकवायचे आहे, ज्या व्यक्तीला तुमच्या बद्दल आदर आहे ती व्यक्ती कॉल वर बोलेन किंवा तुम्हाला भेटेल. संवादाच्या युगात चॅटिंग वर नाते तयार करतात व नाते तोडतात देखील मग नात्यात विश्वास कसा राहणार ? नातीच नीट नाही तर मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होणारच.
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत25,181 次观看 • 1 年前

IT इंडस्ट्री मधील ताण हाताळण्याची पद्धत ही कर्मचार्यांना व्यसनाकडे नेते. IT इंडस्ट्री मध्ये दारू, सिगरेट, पब हे सर्व normalize झाले आहे. कामाचा ताण चुकीच्या पद्धतीने हाताळला गेल्याने IT मध्ये व्यसन व मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. पूर्ण व्हिडिओ 👇🏼 #मराठी #महाराष्ट्र #मानसिक #म #mentalhealth
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत22,353 次观看 • 1 年前

🔴प्रत्येक Celebration alcohol पिऊन करण्याची काहीच गरज नसते. 🔴३० व्या वर्षी alcoholic liver disease होत असेल तर त्या व्यक्तीने १२-१३व्या वर्षी दारू प्यायला सुरवात केली असेल. 🔴बायकांचे जेनेटिकस पुरुषांपेक्षा वेगळे असल्याने बायकांना लिवर चा त्रास पुरुषांच्या तुलनेत जास्त होतो.
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत24,181 次观看 • 1 年前

सोशल मीडिया चे खरे विद्रुप रूप दाखविणारी social dilemma नावाची documentary २०२० मध्ये येऊन गेली जी प्रचंड गाजली. एवढे होऊनही सोशल मीडिया चा वापर कमी झाला नसून वाढलाच आहे. सोशल मीडिया चे डिझाईन असे आहे की मानवी मेंदूला त्याचे व्यसन तर लागतेच, शरीर व मन यावर त्याचा दारू, कोकेन सारखा वाईट परिणाम होतो. तंत्रज्ञानाची ही काळी बाजू समजून घेतली तर सोशल मीडिया आपल्या मेंदूला नियंत्रित करू शकणार नाही. मोबाइल/सोशल मीडिया च्या अतिवापराने मेंदूत भ्रम निर्माण झाल्याच्या केसेस पुढे येत आहेत इतका याचा परिणाम भंयकर आहे. हे व्यसन सुटू शकत, समुपदेशन मदत करत. जितक्या लवकर मदत मागाल, यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल तितका फायदा होईल. #मराठी #म #मानसिक #महाराष्ट्र
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत10,583 次观看 • 1 年前
没有更多内容可加载