Aditi S Tatkare's banner
Aditi S Tatkare's profile picture

Aditi S Tatkare

@iAditiTatkare101,497 subscribers

Minister for Women and child development GOM,Member of Legislative Assembly Shrivardhan constituency Raigad Maharashtra

Shorts

"आदिती बेटा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा"…..असं दरवर्षी तुम्ही सकाळी सकाळी फोन करुन बोलायचा आणि धन्यवाद म्हणुन त्याच दिवशी तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला भेटुन आर्शिवाद घ्यायचे पण आज तुमची लेक आदिती तुमच्या फोनची वाट पाहत आहे दादा….💔💔💔

"आदिती बेटा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा"…..असं दरवर्षी तुम्ही सकाळी सकाळी फोन करुन बोलायचा आणि धन्यवाद म्हणुन त्याच दिवशी तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला भेटुन आर्शिवाद घ्यायचे पण आज तुमची लेक आदिती तुमच्या फोनची वाट पाहत आहे दादा….💔💔💔

12,725 Aufrufe

Videos

iAditiTatkare's profile picture

पनवेलमधील व्हायरल व्हिडिओमधील महिला अंगणवाडी सेविका नाही, ती त्या मुलीची स्वतःची आई आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ "अंगणवाडी सेविकेने मारहाण केली" असा खोटा दावा करत वेगाने पसरत आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने दखल घेत संबंधित CDPO यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली. चौकशीत सत्य समोर आले, ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच आहे. संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यांना लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. तसेच त्या महिलेचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे. अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील लाखो बालकांसाठी निःस्वार्थपणे झटतात. त्यांच्यावर खोट्या आरोपांचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे. #पनवेल #FactCheck #Maharashtra #अंगणवाडी #WCD

Aditi S Tatkare

67,514 Aufrufe • vor 5 Tagen

iAditiTatkare's profile picture

आदरणीय अजितदादा पवार आम्हा राष्ट्रवादी परिवाराचे कुटुंबप्रमुख होते. दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्राकाकी आज पहिल्यांदाच कोकणात आल्या. अशा प्रसंगी अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. मुळात ते सरकारी नव्हे तर एक खासगी वाहन होते आणि याबाबत अनिकेतभाईंनी उपमुख्यमंत्री कार्यालयासोबत यापूर्वीच संपर्क साधून माहिती दिली होती. आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनेत्राकाकी यांनी आम्हाला लहानाचे मोठे होताना पाहिलं आहे.. पार्थदादा, जयदादा यांच्याप्रमाणे अनिकेतभाई आणि आम्ही काकींची लेकरेच आहोत. याच भावनेतून कुटुंबाचे सदस्य म्हणून अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. ज्यांच्या मनातील वात्सल्याची भावना मेली आहे, ज्यांच्या डोक्यात सतत राजकारण आहे अशा माणसांनी यातही राजकारण शोधलं यात काही नवल नाही. Sunetra Ajit Pawar Aniket Tatkare

Aditi S Tatkare

68,649 Aufrufe • vor 4 Monaten

iAditiTatkare's profile picture

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत e-KYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे. ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #ladkibhainyojna #mukhyamantrimajiladkibhainyojna #adititatkare #maharashtra #wcd #ekyc

Aditi S Tatkare

10,404 Aufrufe • vor 1 Monat

iAditiTatkare's profile picture

नेहमी पाठीशी राहीन म्हणालात... आणि एका क्षणात आम्हाला पोरके करून गेलात दादा..! आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी कधीच आपल्यावर रुसले नाही... पण आज मी आपल्यावर रुसले दादा...! ही जाण्याची वेळ नव्हती.. सदैव महाराष्ट्राच्या पाठीशी आपण आधार बनून उभे राहिलात, हा आधार यापुढे महाराष्ट्राच्या पाठीशी नसणार, आपल्या नावापुढे "स्वर्गीय" शब्द लिहावा लागणार हा विचारच अंगावर काटा आणणारा, वेदनादायक आहे. आपण आम्हाला सोडून गेलात ही बाब अजूनही महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपल्या आठवणींनी अश्रू वाहत आहेत. आपण महाराष्ट्राला जे प्रेम दिलं ते प्रत्येकाच्या डोळ्यात आज दिसतंय. आपलं केवळ असणं हे माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारं होतं. कठोर शासक, कार्यतत्पर प्रशासक, झुंजार नेतृत्व हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सबंध महाराष्ट्राने अनुभवले. पण, आपल्या या कठोर व्यक्तिमत्वाचा हळवा कोपरा अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं. अगदी पोटच्या मुलीप्रमाणे आपण मला भरभरुन प्रेम दिलं. आपण आमच्यातून गेलात हे मानण्यास मी तयार नाही, आपल्या उत्तुंग कार्यातून, असंख्य आठवणींतून आपण आमच्या मनात चिरायू आहात ! #दादा #AjitPawar 💔💔

Aditi S Tatkare

19,421 Aufrufe • vor 5 Monaten

iAditiTatkare's profile picture

धन्यवाद लोकमत परिवार ! लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर अवॉर्ड्स" सोहळ्यात "प्रॉमिसींग फेस" श्रेणीत मला पुरस्कार मिळाला याचा खरोखर आनंद वाटतो. महामहीम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन ( VP Office ) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde - एकनाथ शिंदे ), लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री. विजय दर्डा ( Vijay Darda ) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. मला सेवेची संधी देणाऱ्या तमाम लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील जनतेला, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मी हा पुरस्कार समर्पित करते. तसेच, मला जनसेवेची संधी देणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. Governor of Maharashtra Lokmat MahaNCPspeaks #Maharashtra #LOMTY2025 #Lokmat

Aditi S Tatkare

36,855 Aufrufe • vor 1 Jahr

Keine weiteren Inhalte verfügbar