
Kiran Mane
@kiranmane7777 • 11,293 subscribers
Either I will find a way, or I will make one
Shorts
Videos

खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे !
Kiran Mane121,824 просмотров • 2 лет назад

दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश येरूणकर... हे जिथे रहातात त्या भागात त्यांना फक्त २ मतं मिळाली ! पत्नी, मुलगी, आई आणि ते स्वत: असे चार मतदार तर घरचेच होते. त्यांनीही मतदान केले नाही का? इव्हीएमबद्दल इतरही अनेक शंका त्यांनी उपस्थित केल्यात. बघा. तमाम महाराष्ट्र जो संशय व्यक्त करतोय की, हे जनमतानं नाही तर 'धन'मताने निवडून आलेले असावेत... ही शंका खरी आहे की काय???
Kiran Mane78,916 просмотров • 1 год назад

...सातार्याजवळच्या कोंडवे गांवातल्या एका शेतकर्याची ही पोरगी. कल्याणी बाबूराव गायकवाड. ज्या अफलातून पद्धतीनं तिनं हे गाणं गायलंय, ते ऐकून अंगावर काटा आला ! कल्याणी, तू जे गातेस ते भल्याभल्यांना जमणार नाही. लै लै लै नांव कमावणार आहेस तू बाळा. सातारचा अभिमान आहेस तू. ❤️
Kiran Mane76,424 просмотров • 1 год назад

आजकालची तरुण पोरं रील्स बनवताना सुद्धा सामाजिक भान ठेवतात… वैचारिक जाण दाखवतात… तेव्हा लै लै लै भारी वाटतं ! विवेकी विचारांची अशी दहा पोरं एकत्र आली तरी द्वेष पसरवणार्या हजारोंच्या झुंडीला पुरून उरतील… शिवफुलेशाहूआंबेडकरांची ही भुमी गुलामगिरीच्या विळख्यातून सोडवू शकतील. जय शिवराय… जय भीम.
Kiran Mane58,767 просмотров • 1 год назад

जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय ! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी... एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय.... अनुभवलाय... त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हाॅटस् ॲपवर फाॅर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही ! हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं. सलाम जान्हवी... खुप खुप प्रेम ❤️
Kiran Mane76,834 просмотров • 2 лет назад

...व्हिडीओज असा धक्कादायक बघून उठलोय की काय बोलावं काही कळतच नाही यावर 😜😂😂
Kiran Mane72,949 просмотров • 2 лет назад

"राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीत, चमकोगिरीत आणि न्यूज मोठी करण्यात वेळ घालवू नका. आम्ही संकटात आहोत. इथं आम्हाला कुणी वाली नाहीये." ...डोळ्यांसमोर आपले वडील आणि काकांना गोळ्या घातलेलं दृश्य पाहिलेली आसावरी जगदाळे ही भगिनी काय बोललीय हे नीट ऐका... नाक्यानाक्यावर चेकपोस्टस् असताना या घटनास्थळी मात्र कुणीही नव्हते हे खुप संशयास्पद आहे. पुलवामासारखे हे ही प्रकरण प्रसिद्धीसाठी वापरून दडपून टाकले जाईल का??? अंधभक्त पिलावळीच्या बिनडोक पोस्टस्मुळे तरी असेच वाटतेय की याचा फायदा धर्मद्वेष पसरवून समाजात फूट पाडण्यासाठी आणि निष्क्रीय निर्लज्जांना 'हिरो' बनवण्यासाठी होऊ लागला आहे. स्वत: संकटात असताना, 'आम्ही हिंदू मुस्लीम भावाबहिणींसारखे रहातो. आम्हाला तुमच्या वादात का ओढता?' अशी आर्त हाक देणार्या आपल्या या बहिणीला, आसावरीला मनापासून सलाम. आसावरी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. भावाबहिणींनो, न्युज चॅनल्स बघणे टाळा. खलनायकांना नायक बनवण्याच्या कटाला साथ देऊ नका. पुलवामा घातपात विसरू नका. याचा छडा लागून खरे आरोपी कोण होते? हे समोर आल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नका. आत्ता मी जी क्लीप टाकलीय ती न्यूज चॅनलवरचीच आहे. पण खरी क्लीप सात मिनिटांची आहे, ज्यात खुप असे मुद्दे हायलाईट केलेत जे द्वेष पसरवतील आणि नालायकांना क्लीन चीट देतील. त्यातला हा जो दीड मिनिटांचा आशय आहे तो मात्र हायलाईट केला जात नाही. आपल्याला सगळ्यांना, सर्वधर्मीय नागरीकांना एक 'देश' म्हणून, एकजुटीनं भक्कमपणे उभं रहाणं गरजेचं आहे ! जय शिवराय... जय भीम... जय हिंद ! - किरण माने.
Kiran Mane50,611 просмотров • 1 год назад

लै व्हायरल झालाय भावांनो ह्यो फोन... कुठलं गांव हाय ह्ये??? 🤔 शेवटचं वाक्य बाकी लैच भन्नाट😜😂😂😂
Kiran Mane49,351 просмотров • 1 год назад

...महात्मा फुलेंनी या मातीत पाया घातलेले 'मराठी नाटक' बहुजनांपासुन कुणी हिरावून घेतले? “नाटक हे मराठी माणसाच्या संस्कृतीचा वगैरे भाग आहे“ ही निव्वळ थाप आहे ! महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात लोक नाटक बघत नाहीत. आजही तिथल्या लोकांना विचारा की “आत्ता व्यावसायिक रंगभूमीवर कुठली नाटकं सुरू आहेत?” त्यांना सांगता येणार नाही… फक्त २% लोक मराठी व्यावसायिक नाटक पाहतात. गीतांजली कुलकर्णी अगदी परखड सत्य बोलली आहे ! खुप जणांना हे टोचेल, पण कटू असले तरी वास्तव नाकारून कसे चालेल? मराठीमधले पहिले नाटक १८५० साली महात्मा फुले यांनी लिहिले होते… ते नाकारून विष्णुदास भावेंना उगाचच ‘नाटकाचे उद्गाते’ वगैरे ठरवले ! पायाच खोटा घातल्यामुळं बहुजन वर्ग नाटकापासून दूर गेला. आमच्या क्षेत्रात क्वचित असं कुणी निर्भीड सत्य मांडतं तेव्हा ‘माझिया जातीचे’ भेटल्याचा आनंद होतो… लब्यू गीतांजली ❤️ - किरण माने.
Kiran Mane38,384 просмотров • 1 год назад