Dr. Medha Kulkarni's banner
Dr. Medha Kulkarni's profile picture

Dr. Medha Kulkarni

@Medha_kulkarni49,759 subscribers

Member of Parliament, Rajyasabha | National Vice President -@BJPMahilaMorcha | Bharatiya 🇮🇳

Shorts

I am pleased that my daily commitment to electric mobility aligns so perfectly with the Hon’ble Prime Minister Narendra Modi ji’s vision for a stronger India. I aim to keep the #NationFirst, today and always !

I am pleased that my daily commitment to electric mobility aligns so perfectly with the Hon’ble Prime Minister Narendra Modi ji’s vision for a stronger India. I aim to keep the #NationFirst, today and always !

10,152 просмотров

Videos

Medha_kulkarni's profile picture

काही दिवसांपूर्वी शासकीय दौऱ्यानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याचा योग आला. निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या त्या भूमीत काही ठिकाणी दिसलेली अस्वच्छता आणि निष्काळजीपणा पाहून मन अत्यंत व्यथित झाले. इतक्या सुंदर निसर्गसंपन्न स्थळी आपणच असे वर्तन का करतो, हा प्रश्न सतत मनात येत राहिला. आपला देश, आपल्या मातृभूमीतील निसर्गरम्य स्थळे आणि ही पवित्र भूमी यांचा आदर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. चला, पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवूया, स्वच्छता राखूया आणि निसर्ग व पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपले योगदान देऊया. 🌿 🇮🇳 #saveearth #ecofriendly #environment #saynotoplastic

Dr. Medha Kulkarni

20,534 просмотров • 28 дней назад

Medha_kulkarni's profile picture

हल्ली प्रत्येक सणांना व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच डिजेंचे धुमाकूळ सुरू आहे. या डिजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे. यावर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने MIT कॉलेजच्या परिसरात डिजेच्या माध्यमातून लोकांना असह्य होईल अश्या प्रकारे गाणी वाजवली जात होती. यावर सामान्य नागरीकांच्या तक्रारी मिळताच मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिथली परिस्थिती पाहून पोलिसांना पाचारण केले. पण या घटनेचा विपर्यास करून मीडिया आणि सोशल मीडिया द्वारे चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, त्यामुळे आज मी या घटनेची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आहे. माझे सर्वांनाच आवाहन आहे की आपण सर्वांनी सणांचे पवित्र राखूया आणि पुण्याच्या नागरिकांचे हित ही पाहूया. ध्वनीप्रदूषण टाळूया!

Dr. Medha Kulkarni

200,477 просмотров • 2 лет назад

Medha_kulkarni's profile picture

हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी महत्वपूर्ण असलेल्या व्रतबंध सोहळ्याचे सामुदायिक आयोजन राष्ट्रीय सेवा संघ व अखिल ब्राह्मण संघ, पुणे यांच्यावतीने करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थित राहून बटूंना आशीर्वाद दिले. या सोहळ्यात 24 बटूंची सामुदायिक मुंज लावण्यात आली. आई वडील दोघेही हयात नाहीत अशाही बटूंना दत्तक घेऊन त्यांचा व्रतबंध विधी हा संस्थेमार्फत करण्यात आला. अशा मुलांचे पालकत्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले ही खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली. या प्रसंगी काळाराम मंदिर, नाशिक येथील महंत सुधीरदास जी यांनी सर्व बटूंना आशीर्वाद दिले व संध्येचे आणि गुरू उपासनेचे महत्त्व पटवून देत अमूल्य मार्गदर्शन केले. या सोहळ्याला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री निखिल लातूरकर, श्री. तेजस फाटक, श्री. सचिन टापरे, श्री. विजय शेखदार, सौ. वृषाली शेखदार , श्री. राजीव देशपांडे, श्री. मंदार जोशी व समाजबांधव उपस्थित होते. सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. #vratbandh #upnayansanskar #munj #munjceremony #brahman #Pune

Dr. Medha Kulkarni

74,004 просмотров • 1 год назад

Medha_kulkarni's profile picture

पुणे से दिल्ली तक तेज़ और प्रीमियम रेल कनेक्टिविटी की जरूरत शून्यकाल में प्रश्न उठाते हुए पुणे–दिल्ली के बीच प्रीमियम रेल सेवा प्रारंभ करने की माँग रखी। पुणे के नागरिकों को राजधानी दिल्ली से सीधे जोड़ते हुए आधुनिक, तेज़ और सुविधाजनक रेल सेवाओं का लाभ मिलना आवश्यक है। इसी उद्देश्य से राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत स्लीपर ट्रेन अथवा तेजस एक्सप्रेस जैसी किसी भी प्रीमियम श्रेणी की सीधी रेल सेवा को शीघ्र प्रारंभ किया जाए, जिससे यात्रा समय में उल्लेखनीय कमी आए और यात्रियों को विश्वस्तरीय आधुनिक सुविधाएँ उपलब्ध हो सकें। Narendra Modi Nitin Nabin Ashwini Vaishnaw Ministry of Railways BJP BJP Pune #BudgetSession2026 #Budget2026 #Maharashtra #Pune #MedhaKulkarni

Dr. Medha Kulkarni

23,199 просмотров • 4 месяцев назад

Medha_kulkarni's profile picture

पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे 🚩 अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्य वाढवण्यात अमूल्य असे योगदान दिले. बाजीरावांनी एकूण 42 मोठ्या लढाया लढल्या आणि त्या सर्व लढाया जिंकल्या. बाजीराव पेशवे यांचे युद्ध कौशल्य अद्वितीय असे होते. पुण्याची ओळख म्हणून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तसेच पुणे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था, संघटना यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव जी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मा. श्री. धर्मवीर मीना यांना केली आहे. Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Ashwini Vaishnaw Ministry of Railways Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र BJP #PuneRailwayStation #BajiraoPeshwe #ChhatrapatiShivajiMaharaj #PeshwaBajirao #pune

Dr. Medha Kulkarni

28,632 просмотров • 11 месяцев назад

Medha_kulkarni's profile picture

शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळवून देणार 🚩 एकेकाळी संपूर्ण देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आणि देशाच्या राजकारणावर जेथून प्रभाव टाकला जात होता, अशा शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून वाड्याची तत्कालीन पद्धतीशी जुळणारी डागडुजी, दुर्मिळ चित्रांचे जतन, इतिहासाची योग्य पद्धतीने मांडणी, होलोग्रामद्वारे दृकश्राव्य चित्री सादरीकरण यासारखी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि परवानगी यांची आवश्यकता आहे. यासाठी त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभागाकडे मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी या संदर्भातील जागा पाहणी मी काल आयोजित केली होती. यावेळी जेष्ठ इतिहास तज़्ज्ञ व भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव श्री. पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. उदय कुलकर्णी, श्री. लवाटे, श्री. मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज श्री. पुष्कर पेशवे, श्री. रश्मीन कुलकर्णी, श्री. निनाद पटवर्धन, भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक श्री. गजानन मंडावरे, श्री. ओमकार गरुड, वास्तुविशारद श्री. प्रचित कलमदाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व इतिहास इतिहास तज़्ज्ञांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांच्या अभ्यासाच्या जोरावरच केवळ आज मी हा प्रयत्न करू शकत आहे. #shaniwarwada #peshwai #chatrapatishivajimaharaj #hindaviswarajya #hindu #pune #punecity Narendra Modi

Dr. Medha Kulkarni

41,279 просмотров • 1 год назад

Medha_kulkarni's profile picture

पुण्यातील ओंकारेश्वर घाट येथील स्वच्छतेबाबत आणि दुरावस्थेबाबत अनेक वेळेला तक्रारी व बातम्या प्रसिद्ध झाल्या. याची दखल घेत या भागाची पुणे महानगरपालिका प्रशासनासह पाहणी केली. दशक्रिया विधीची जागा, कट्टे पाण्याची टाकी, घाट, नदीपात्रशेजारील स्व. गंगाधर केळकर यांची समाधी या सर्वच ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे. दुपारनंतर तर भिकारी व गर्दुल्यांचा हा अड्डा झाला आहे. या स्थळाचे गांभीर्य व पावित्र्य टिकून राहावे यासाठी येथे काही सुधारणा करण्याचे ठरवत असून त्यासाठी माझा खासदार निधी उपलब्ध करून देण्याचा ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी या जागा पाहणीसाठी कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय अधिकारी सुहास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता तेजश्री देशमुख, दशक्रिया घाटाचे विधीचे गुरुजी अथर्व मोघे व पिनात मोघे आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून चर्चा केली. #omkareshwar #omkareshwarpune #pune #punecity

Dr. Medha Kulkarni

22,419 просмотров • 1 год назад

Medha_kulkarni's profile picture

"हिंदूंनी जातीभेदाच्या भिंती तोडून देशासाठी आज एकत्र येण्याची आवश्यकता आहे.." अक्षय तृतीया हा दिवस भगवान परशुराम यांच्या जयंतीचा दिवस असतो. याचे औचित्य साधून भगवान परशुराम जन्मोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रेला उपस्थित राहिले. या शोभायात्रेची सुरुवात केसरीवाडा येथे गणेश वंदन, भगवान परशुराम वंदन व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी हिंदू एकतेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित हिंदू बांधवांना संबोधित केले. ढोल-ताशा व टाळ-मृदुंगाच्या गजरात भगवान परशुराम यांचा भव्य रथ, चौघडा रथ, जगदंब वाद्य पथक, बाल व युवा वारकऱ्यांचे पथक शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. पुणे शहरातील 30 पेक्षा अधिक हिंदू संघटना व संस्था तसेच पारंपरिक वेशातील हिंदू बांधव या शोभायात्रेत अगदी उत्साहात सहभागी झाले होते. हिंदू एकतेचा संदेश देणाऱ्या या भव्य शोभायात्रेचे सुंदर आयोजन केल्याबद्दल भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे हार्दिक अभिनंदन. #BhagwanParshuram #ParshuramJayanti #parshuram #parshuramjayanti2025 #ParshuramJanmotsav #pune

Dr. Medha Kulkarni

18,002 просмотров • 1 год назад

Medha_kulkarni's profile picture

पुणे से भारत के प्रमुख शहरों मे रेल कनेक्टिव्हिटी की समस्या के बारे मे आज संसद के 'शून्य काल' मे मुद्दा उपस्थित किया l पुणे से दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कलकत्ता जैसे प्रमुख शहरोंमे कोई हाय स्पीड ट्रेन नही चलती । इससे छात्र, व्यापारी, पर्यटक, यात्रीओं के यातायात में असुविधा होती है । इसलिये राजधानी, वंदे भारत, तेजस जैसी हाय स्पीड ट्रेनों की मांग रखी l इसीके साथ महाराष्ट्र के नासिक जैसे तीर्थक्षेत्र, औद्योगिक नगरी और पुणे में कोई डायरेक्ट ट्रेन न होने का मुद्दा उठाया l 'भारत गौरव यात्रा' ट्रेन के माध्यम से पुणे नगरी को भारत के अन्य तीर्थक्षेत्रों से जोडने के लिये सुविधा निर्माण करने की मांग की l -- पुणे ते भारतातील प्रमुख शहरांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटीचा असलेला अभाव या संदर्भात आज संसदेच्या शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित केला. पुण्याहून दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता यासारख्या प्रमुख शहरांसाठी हायस्पीड ट्रेन नाहीत. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, पर्यटक आणि प्रवाशांना ये-जा करताना गैरसोय होते. म्हणूनच राजधानी, वंदे भारत, तेजस सारख्या हाय स्पीड ट्रेनची मागणी केली. या सोबतच महाराष्ट्रातील तीर्थस्थळ व औद्योगिक नगरी नाशिक आणि पुणे दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. 'भारत गौरव यात्रा' ट्रेनद्वारे पुणे शहराला भारतातील इतर तीर्थस्थळांशी जोडण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची मागणी यावेळी केली. Narendra Modi Ashwini Vaishnaw Ministry of Railways #RailwayConnectivity #VandeBharat #PuneRailwayStation

Dr. Medha Kulkarni

11,108 просмотров • 1 год назад

Больше нет контента для загрузки