
Pravin Darekar - प्रविण दरेकर
@mipravindarekar • 104,251 subscribers
MLC | Ex.Leader Of Opposition, Maharashtra Legislative Council | Chairman - Mumbai District Central Co-op. Bank Ltd.
Videos

मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या चरणी सहपरिवार नतमस्तक होऊन दर्शन घेतले, तसेच या शुभप्रसंगी कुटुंबासमवेत नवीन ईव्ही कारचे देखील शास्त्रोक्त पूजन केले. माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, निसर्गाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी एक लहानसे पाऊल म्हणून या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य दिले आहे. श्री सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद राज्यातल्या संपूर्ण जनतेवर सदैव वर्षत राहो, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया ! Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust #PravinDarekar #Siddhivinayak #BappaBlessings #GanpatiBappaMorya
Pravin Darekar - प्रविण दरेकर20,146 次观看 • 3 个月前

मराठा समाजाने जो विश्वास जरांगे पाटलांवर दाखवलाय त्यातून अहंकार येता कामा नये. ते आपल्या व समाजाच्या हिताचे नाही. कारण अहंकारातून ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणे पुढे आलीत. जरांगे यांचा द्वेष फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीसांची संयमी भुमिका म्हणजे त्यांची दुर्बलता समजू नये.
Pravin Darekar - प्रविण दरेकर64,613 次观看 • 2 年前

जरांगे यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते ते सरकारने दिले आहे. आता नेमकं जरांगेला काय हवे आहे? जरांगेंना Devendra Fadnavis जी यांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.तुमचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नीट माहित आहे. फ्रस्टेशनपोटी जरांगे टोकाची भाषा करत आहेत. सरकारने, गृहखात्याने याची दखल घ्यावी. नाहीतर आम्हालाही सागर बंगल्यावर जशास तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल.
Pravin Darekar - प्रविण दरेकर65,182 次观看 • 2 年前

जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करताहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत.
Pravin Darekar - प्रविण दरेकर53,395 次观看 • 2 年前
没有更多内容可加载