नेत्वा धुरी NETWA DHURI's banner
नेत्वा धुरी NETWA DHURI's profile picture

नेत्वा धुरी NETWA DHURI

@netwadhuri1,296 subscribers

Journalist|Content developer,Writer|Translator, (English-Marathi-Hindi-Gujarati)|Voice-over |[email protected]|Here - Analytical tweets,news update

Shorts

🚨 मोठी बातमी - कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर 'अन्न व औषध प्रशासनाचा' ऐतिहासिक आणि निर्णायक प्रहार! 🚨 सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संयुक्त धाडी टाकून पुरवठा साखळी उद्ध्वस्त! 👇 कारवाईतील ठळक बाबी: 🔹 पाच जिल्ह्यांमध्ये धाडी: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना व ठाणे येथे एकाच वेळी नियोजनबद्ध छापे. 🔹 मोठा मुद्देमाल जप्त: सुमारे ₹१.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त, तर ४९ संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना. 🔹 २० हजार लिटर दूध नष्ट: नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्यापूर्वीच २०,००० लिटर संशयित कृत्रिम दूध जागीच नष्ट. 🔹 २६ आरोपींवर गुन्हे: भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे (मंचर) याच्यासह आतापर्यंत १३ आरोपींना अटक करून ५ दिवसांची पोलिस कोठडी. 🔹 परवाने निलंबित: ५ अन्न परवाने तात्काळ निलंबित करून ४ डेअरी व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश. 🧪 टोळीची कार्यपद्धती: आरोपी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार करायचे. हे मिश्रण नैसर्गिक दूधात मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जायची. #FDAMaharashtra #MilkAdulteration #PublicHealthSafety #CrimeNews #FoodSafety 🎥📸अन्न व औषध प्रशासन

48,401 просмотров

🚨 ब्रेकिंग | मुंबईतील ३ हॉटेलांचे परवाने निलंबित; अमरावतीतील आस्थापनाला व्यवसाय बंदची नोटीस अन्न व औषध प्रशासन (एफडीए )ने १३ जुलै २०२६ रोजी केलेल्या तपासणीत गंभीर अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर मुंबईतील ३ हॉटेलांवर कठोर कारवाई करण्यात आली. 📍 भेंडीबाजार 🔹 शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. – पूर्वी सुधारणा नोटीस देऊनही २५ गंभीर त्रुटी कायम आढळल्याने १४ जुलै २०२६ रोजी परवाना निलंबित. 🔹 नूर मोहम्मदी हॉटेल – अस्वच्छ स्वयंपाकघर, काळ्या तेलाचे थर, माश्या-कीटकांचा मुक्त प्रवेश, पिण्याच्या पाण्याच्या चाचण्यांचा अभाव आदी गंभीर त्रुटींमुळे परवाना तात्काळ निलंबित. 📍 उमरखाडी 🔹 रहमानिया रेस्टॉरंट – निकृष्ट साठवणूक, गंजलेली उपकरणे, भिंती-छतांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या न केल्याने परवाना तात्काळ निलंबित. 📍 अमरावती 🔹 अमरावती दरबार हे आस्थापन वैध अन्न परवान्याविना व्यवसाय करताना आढळल्याने व्यवसाय तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. #MaharashtraFDA #TukaramMundhe #FoodSafety #Mumbai #Amravati 🎥 - अन्न व औषध प्रशासन

25,932 просмотров

Videos

netwadhuri's profile picture

🚨 चितळे, सागर, व्हाईटस्टारसह १० ब्रँड एफडीएच्या रडारवर! ₹१.४७ कोटींचा दूध, स्किम्ड मिल्क पावडर आणि स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमरचा साठा जप्त १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करत ९१,६९२ लिटर दूध आणि २६,४२५ किलो स्किम्ड मिल्क पावडर/स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमर जप्त केले. या जप्त साठ्याची एकूण किंमत ₹१,४७,७८,७४२ इतकी आहे. 🔹 कारवाई १ – सोलापूर अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्री, बुरुंगेवाडी, जावळा, ता. सांगोला विनापरवाना दूध संकलन व चिलिंग युनिट, दुधात पाण्याची भेसळ, एसएनएफ (SNF) प्रमाण कमी, अपूर्ण नोंदी आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने ३७,५३२ लिटर गायीचे दूध (₹१५.०१ लाख) जप्त करण्यात आले. 🔹 कारवाई २ – सोलापूर अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीचे वाहन (MH-12-VB-4700) २८,४९८ लिटर गायीचे दूध (₹११.३९ लाख) निकृष्ट व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. संबंधित आस्थापनेस व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही देण्यात आली. 🔹 कारवाई ३ – अहिल्यानगर प्रियदर्शनी दूध संकलन केंद्र, आंबीलवाडी २४,४९८ लिटर गायीचे दूध (₹९.७९ लाख) निकृष्ट व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. 🔹 कारवाई ४ – भिवंडी, ठाणे शाह एंटरप्रायझेस एफडीएच्या तपासात सागर, गुडडे, मधुसूदन, व्हाईटस्टार, मानसरोवर, कृष्णा, धोलपूर फ्रेश, चितळे, प्युराशुअर आणि लॉर्ड कृष्णा या ब्रँडच्या स्किम्ड मिल्क पावडर व स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमरमध्ये लेबलिंगमधील त्रुटी (Misbranding) तसेच निकृष्ट दर्जाचा संशय आढळला. २६,४२५ किलो साठा (₹१,११,११,५५०) जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. 🔹 कारवाई ५ – अहिल्यानगर सद्गुरू मिल्क कलेक्शन सेंटर, मेहेकरी निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ साठवणूक आढळल्याने २१६ लिटर गायीचे दूध (₹१०,०४८) जप्त करण्यात आले. 🔹 कारवाई ६ – अहिल्यानगर वीरभद्र डेअरी, सोनेवाडी, मेहेकरी निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ साठवणूक आढळल्याने ९४८ लिटर गायीचे दूध (₹३६,०२४) जप्त करण्यात आले. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. #TukaramMundhe #FDA #Maharashtra #Solapur #Sangola #Ahilyanagar #Thane #MilkAdulteration व्हिडिओ - अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीतील कारवाईदरम्यान एफडीएने जारी केलेला व्हिडिओ तसेच अधिकृत प्रेस नोट

नेत्वा धुरी NETWA DHURI

57,255 просмотров • 22 дней назад

netwadhuri's profile picture

धक्कादायक! मुंबई, नागपूरच्या नामांकित हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट, अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना रद्द! 🚨 कारवाईचा सविस्तर तपशील: 1️⃣मेसर्स के. रुस्तम अँड कंपनी, चर्चगेट (मुंबई): प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरमध्ये जिवंत उंदीर, माश्या, कोल्ड चेनमध्ये बिघाड आणि मुदत संपलेली उत्पादने आढळल्याने परवाना तत्काळ निलंबित. 2️⃣मे. श्री हिरा स्वीट्स, पांचपावली (नागपूर): तपासणीत मेलेला उंदीर आढळला. मृत उंदराच्या बाजूलाच अन्न पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याने परवाना निलंबित. 3️⃣ हॉटेल पाटीलवाडा (धुळे): विना परवाना बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यामुळे ७ जुलै रोजी परवाना निलंबित. इतर मोठ्या कारवाया (७ जुलै २०२६): राज्यभरात १६ हॉटेल्स/धाब्यांची तपासणी, १० आस्थापनांना सुधारणा नोटीस. नाशिक आणि नागपूर विभागात प्रत्येकी १ अन्न व्यवसायिकाचा परवाना निलंबित. ६ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ₹९,६०,४१६ किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व गुटखा जप्त. गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी १ एफआयआर (FIR) दाखल करून एका व्यक्तीला अटक. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा FDA प्रशासनाने दिला आहे. #FDAMaharashtra #FoodSafety #Mumbai #Nagpur #Dhule 📷 📹- अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

66,793 просмотров • 27 дней назад

netwadhuri's profile picture

🚨 ब्रेकिंग न्यूज: हॉटेलमध्ये जेवताना सावधान! राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई! 🍔❌ जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ६ प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, तब्बल २८ ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 📊 कारवाईचा मुख्य तपशील: 💰 २५,८४,४०२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त. 👮 २४ व्यक्तींना अटक, ११ आस्थापना सील आणि १ वाहन जप्त. 🚫 ६ अन्न व्यवसायिकांचे परवाने/नोंदणी थेट निलंबित. 📍 परवाने निलंबित झालेल्या हॉटेल्सची नावे: ठाणे / नवी मुंबई विभाग: १. हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंट (सीबीडी बेलापूर) २. हॉटेल साई सागर विस्तारित कक्ष-४९ (तुर्भे) ३. हॉटेल नाना नाणी (वाशी) ४. एस्प्रेसो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटी (वाशी) - येथे तपासणीदरम्यान अत्यंत अस्वच्छता आढळली. छत्रपती संभाजीनगर विभाग: ५. हॉटेल आईच्यागावात (कांचनवाडी) - येथे बुरशीयुक्त अन्नपदार्थ आणि व्हेजिटेबल फॅट वापरून नकली "बटर" विकून ग्राहकांची फसवणूक केली जात होती! 🧈⚠️ ६. हॉटेल यल्ला यल्ला (सिडको/जालना रोड) - जेवणात घातक सिंथेटिक फूड कलरचा अतिवापर, २५ रंगांचे डबे जप्त करून जागीच नष्ट! 🎨❌ 📹 अन्न व औषध प्रशासन #BreakingNews #FDAMaharashtra #FoodSafety #NaviMumbai #ChhatrapatiSambhajinagar

नेत्वा धुरी NETWA DHURI

59,289 просмотров • 1 месяц назад

netwadhuri's profile picture

🚨 मोठी बातमी - कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर 'अन्न व औषध प्रशासनाचा' ऐतिहासिक आणि निर्णायक प्रहार! 🚨 सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संयुक्त धाडी टाकून पुरवठा साखळी उद्ध्वस्त! 👇 कारवाईतील ठळक बाबी: 🔹 पाच जिल्ह्यांमध्ये धाडी: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना व ठाणे येथे एकाच वेळी नियोजनबद्ध छापे. 🔹 मोठा मुद्देमाल जप्त: सुमारे ₹१.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त, तर ४९ संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना. 🔹 २० हजार लिटर दूध नष्ट: नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्यापूर्वीच २०,००० लिटर संशयित कृत्रिम दूध जागीच नष्ट. 🔹 २६ आरोपींवर गुन्हे: भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे (मंचर) याच्यासह आतापर्यंत १३ आरोपींना अटक करून ५ दिवसांची पोलिस कोठडी. 🔹 परवाने निलंबित: ५ अन्न परवाने तात्काळ निलंबित करून ४ डेअरी व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश. 🧪 टोळीची कार्यपद्धती: आरोपी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार करायचे. हे मिश्रण नैसर्गिक दूधात मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जायची. #FDAMaharashtra #MilkAdulteration #PublicHealthSafety #CrimeNews #FoodSafety 🎥📸अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

48,401 просмотров • 29 дней назад

netwadhuri's profile picture

ब्रेकिंग - दूधभेसळीतील ताज्या कारवायांचे व्हिडिओ पाहून तुम्हांला चीड येईल घरातल्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ताज्या धाडींमधील हे भीषण वास्तव पाहून तुमचे डोळे उघडतील. कोणत्या दूधाच्या ब्रँण्डमध्ये भेसळ होतेय, ते ओळखा. १. मुंबईतील नामांकित कंपन्यांच्या दूधाची चोरी आणि भेसळ (दहिसर): मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक मोठे रॅकेट दहिसरमध्ये उघडकीस आले. आज ९ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजता अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. १२ यांच्या संयुक्त पथकाने दहिसर पूर्व येथील राजेश कंपाउंडजवळील दुबे चाळ क्रमांक २, खोली क्रमांक बी-३ येथे एका मोठ्या अड्ड्यावर धडक धाड टाकली. तेथे लिंगय्या भिक्षमया गणता (वय ४२ वर्षे) हा इसम नामांकित कंपन्यांच्या दूधाचे पाऊच फोडून त्यामध्ये पाणी व इतर पदार्थांचे 'मिल्क टेम्परिंग' (दूध चोरी व भेसळ) करताना रंगेहाथ पकडला गेला. या कारवाईत तब्बल ४७० लीटर टॅम्पर्ड दूध, ज्याची किंमत २९,७५० रुपये आहे, ते जनआरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी १ आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, दहिसर पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. क्र. १०१२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील विश्लेषणासाठी दूधाचे ३ नमुने घेण्यात आले आहेत. २. पावडरपासून बनवले जात होते बनावट दूध (छत्रपती संभाजीनगर): ८ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फुलंब्री येथील रेणुका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या 'सिद्धेश्वर दुध डेअरी'वर एफडीएच्या अधिका-यांनी फुलंब्री पोलीस स्टेशनच्या पथकासह संयुक्त छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान या डेअरीत गोवर्धन आणि म्लेकपोल ब्रँडच्या व्हे परमीएट पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा संशय आला. तिथून खालील साठा जप्त करण्यात आला: गोवर्धन व्हे परमीएट पावडर (Govardhan Whey Permeate Powder): १९८ कि.ग्रॅ. (किंमत ₹२७,३२४/-) म्लेकपोल व्हे परमीएट पावडर (Mlekpol Whey Permeate Powder): २९८ कि.ग्रॅ. (किंमत ₹३९,३३६/-) असा एकूण ४९६ कि.ग्रॅ. पावडरचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय, तिथल्या टँकमध्ये साठवलेले ३,४९८ लिटर मिश्र दूध (किंमत ₹१,३२,९२४/-) हे याच पावडरपासून बनवल्याच्या संशयावरून लोकांच्या आरोग्यासाठी जागेवरच नष्ट करण्यात आले. तपासामध्ये समोर आलेली धक्कादायक माहिती: तपासात निष्पन्न झाले की, हे दूध पुढे 'मे. शिवकृपा दुध डेअरी', पानवडी रोड, फुलंब्री येथे पुरवले जात होते. तिथे धाड टाकली असता अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे 'सिद्धेश्वर डेअरी' आणि 'शिवकृपा डेअरी' या दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तत्काळ (Forthwith) निलंबित करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे दूध पुढे 'मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी' (केअर ऑफ मे. सोनाई डेअरी, इंदापूर) तसेच 'पंचमहाल सहकारी दूध उत्पादक संघ', गोध्रा, गुजरात येथेही पुरवले जात होते. याप्रकरणी दुधात भेसळ केल्याबद्दल राजेंद्र जाधव (संकलन केंद्र मालक), योगेश लहाने (हजर व्यक्ती), बी.एम. इन्ग्रेडियंट्स, छत्रपती संभाजीनगर (पावडर पुरवठादार) आणि शिवकृपा दूध डेअरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलमे ३(५), ६१, १११, १२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा कायदा, २००६ च्या कलमांन्वये फुलंब्री पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल क्र. ०३५५/२०२६ नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. 🎥📸 - अन्न व औषध प्रशासन #SafeFoodSafeMaharashtra #FoodAdulteration #FDAMaharashtra #Mumbai #ChhatrapatiSambhajinagar #PublicHealth #ActionAgainstAdulteration

नेत्वा धुरी NETWA DHURI

36,294 просмотров • 26 дней назад

Больше нет контента для загрузки