Kailas Patil's banner
Kailas Patil's profile picture

Kailas Patil

@PatilKailasB15,593 subscribers

Shivsainik / #Shivsena MLA Dharashiv-Kalamb / Jilhapramukh Shivsena-Dharashiv.

Videos

PatilKailasB's profile picture

दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत समोर येणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावर दिसणारी त्यांची चिंताजनक अवस्था प्रत्येक संवेदनशील भारतीयाला अस्वस्थ करणारी आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल न घेणे हे केवळ असंवेदनशीलतेचे नव्हे, तर लोकशाहीविरोधी अहंकाराचे दर्शन घडवणारे आहे.. एखादा नागरिक स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, पेपरफुटीला आळा, शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि उत्तरदायी शासनव्यवस्था यासाठी सलग १९ दिवस उपोषण करत असेल, तर लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही सरकारने त्याच्याशी तातडीने संवाद साधला पाहिजे. परंतु केंद्र सरकारचे मौन पाहता, त्यांनी जणू सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आणि पर्यायाने देशातील लोकशाही आंदोलन संस्कृतीचाच बळी घेण्याचा निर्धार केला आहे, असे वाटू लागले आहे.. देशात आंदोलने ही लोकशाहीची ताकद मानली जात होती. आज मात्र आंदोलन करणाऱ्यांना दुर्लक्षित करणे, प्रश्नांकडे पाठ फिरवणे आणि संवाद टाळणे, हीच केंद्र सरकारची कार्यपद्धती झाली आहे. जनतेचा आवाज ऐकण्याऐवजी तो थकून जाईपर्यंत शांत बसण्याची ही भूमिका लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.. अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप समोर येत असतानाही केंद्र सरकारकडून अपेक्षित तत्परता दिसली नाही. अशा परिस्थितीत, देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न घेऊन उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाची त्यांना काय किंमत असेल, असा सवाल आज मनात निर्माण होतो आहे.. सरकारने हे लक्षात ठेवावे की, लोकशाहीत सत्ता ही जनतेमुळे असते; जनतेच्या आवाजापेक्षा मोठी नसते. आंदोलन दाबून प्रश्न संपत नाहीत, उलट जनतेच्या मनातील असंतोष अधिक तीव्र होतो. म्हणूनच केंद्र सरकारने अहंकाराचा त्याग करून तातडीने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि त्यांनी मांडलेल्या शिक्षणव्यवस्थेतील सुधारणा व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मागण्यांवर ठोस निर्णय जाहीर करावा.. सोनम वांगचुक यांचे उपोषण हा एका व्यक्तीचा लढा नाही; तो देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याचा, प्रामाणिक शिक्षण व्यवस्थेचा आणि लोकशाहीतील संवादाच्या अधिकाराचा लढा आहे. या आवाजाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाच्या भवितव्याकडे दुर्लक्ष करणे होय.. #SonamWangchuk #JantarMantar

Kailas Patil

10,363 просмотров • 2 месяцев назад

PatilKailasB's profile picture

मुख्यमंत्री ना. Devendra Fadnavis साहेब, शेतकरी त्यांचा हक्क मागतोय, भीक नव्हे! या पावसाने त्यांचं होत्याचं नव्हतं झालंय, लेकरांच्या भविष्यापासून संसाराच्या आधारापर्यंत सगळं वाहून गेलंय.. अशा वेळेला त्यांची वेदना, त्यांची मागणी जर तुम्हाला राजकारण वाटत असेल, तर मग शेतकऱ्यांच्या अश्रूंनाही राजकारण म्हणा, त्याच्या उद्ध्वस्त संसारालाही राजकारण म्हणा, पाण्यात वाहून गेलेल्या पिकांना आणि लेकरांच्या दप्तरांनाही राजकारण म्हणा.. शेतकरी ओरडून सांगतोय ओला दुष्काळ जाहीर करा, ठोस मदत द्या.. पण तुम्ही काय करताय? नेहमीप्रमाणे शब्दांचा खेळ, दिखाऊ सहानुभूती आणि फसगत.. आज तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत.. मग ओला दुष्काळ आणि ठोस मदतीची घोषणा करण्यापासून तुम्हाला नेमकं कोण अडवतंय? शेतकरी काळ्या मातीत जगतो, मातीसाठी मरतो, पण आज तो न्याय मागतोय, आधार मागतोय.. त्याचा आवाज ऐकून ही घ्यायचा नसेल तर इतिहास तुमची मोजदाद करेलच.. मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांचा प्रश्न राजकारणाचा नसून अस्तित्वाचा आहे.. CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Omprakash Rajenimbalkar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication #अतिवृष्टी #ढगफुटी #heavyrain #rainfall #शेतकरी #farmers #नुकसान #धाराशिव #DharashivFloods

Kailas Patil

14,651 просмотров • 1 год назад

PatilKailasB's profile picture

मायबाप सरकार, किमान थट्टा तरी करू नका... तलाठी, वन रक्षक सारख्या परीक्षेसाठी आकारले जाणारे शुल्क हजार रुपयांवर आणले गेले आहे. आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण - तरुणींनी इतकी रक्कम आणायची कोठून? इथं शेतकरी वर्षभर रक्ताचे पाणी करूनही त्याच्या पदरी कुटुंबाचा गाडा चालेल इतकाही दमडा पडत नाही. त्या शेतकऱ्यांच्या लेकरानी बापाकडे कोणत्या तोंडाने एखाद्या परीक्षेसाठी इतकी रक्कम मागायची? ५० हजारांची फिस क्लासला भरतात, असे तुम्ही म्हणता. त्याचे रिपोर्ट तुमच्याकडे आहेत म्हणता. तसे रिपोर्ट आमच्या ग्रामीण भागाचेही करा महोदय. इथलेही वास्तव येवू द्या समोर. किती तरुण इतके पैसे भरून क्लास करीत आहेत, हेही महाराष्ट्राला कळू द्या. शेतकऱ्यांचे सरकार म्हणवून घेताना नापिकी, दर शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्याकडे सोयीस्कर डोळेझाक करता. अगदी तसेच निव्वळ परीक्षा शुल्क नसल्याने स्पर्धेबाहेर फेकली जात असलेल्या शेतकऱ्यांच्या लेकराकडेही असे थातुर मातुर उत्तरं देऊन दुर्लक्ष करणे किती योग्य वाटते? आज हिशोब सांगताय, उद्या तरुण हिशोब करतील.... Devendra Fadnavis Aaditya Thackeray Ambadas Danve Omprakash Rajenimbalkar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Kailas Patil

28,261 просмотров • 3 лет назад

PatilKailasB's profile picture

सन्माननीय देवेंद्रजी, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते. आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला.. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती.. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Kailas Patil

17,930 просмотров • 1 год назад

Больше нет контента для загрузки