
Sharad Pawar
@PawarSpeaks • 2,904,022 subscribers
President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Shorts
Videos

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
Sharad Pawar760,365 Aufrufe • vor 7 Monaten

नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतरमंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी.
Sharad Pawar103,336 Aufrufe • vor 1 Monat

बारामतीला जात असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविधांगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेतृत्व उल्लेखनीय आहे. बदलत्या जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, सृजनशीलता आणि आत्मविश्वास यांची जडणघडण विद्या प्रतिष्ठानमध्ये होताना दिसते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
Sharad Pawar52,100 Aufrufe • vor 1 Monat

Meeting of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar was held at the Delhi residence of National President Hon'ble Sharad Pawar Saheb. Party Working committee members, Mp's, leaders and office bearers attended this meeting to discuss important strategies and chart the course for future endeavors. Supriya Sule Fauzia Khan Vandana Chavan Shriniwas Patil PP.Mohammed Faizal Dr.Jitendra Awhad Dheeraj Sharma Sonia Doohan
Sharad Pawar253,558 Aufrufe • vor 3 Jahren

आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबाबत पत्रकारांशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत - नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी...संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी... कुठे चूक झालेली आहे... कशामुळे चूक झाली आहे...ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे.आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत.
Sharad Pawar245,836 Aufrufe • vor 3 Jahren

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference
Sharad Pawar80,246 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar