
Adv Rohini Eknathrao Khadse
@Rohini_khadse • 32,981 subscribers
प्रदेशाध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्य
Shorts
Videos

देवेंद्र फडणवीस साहेब, जरा सावध व्हा, जागे व्हा ! मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यास कुणीतरी फार उत्सूक आहे ! आधी 'ऑपरेशन टायगर' करून उद्धवजी ठाकरे यांचे सहा खासदार फोडले आणि खासदारांच्या संख्येत वाढ करून स्वतःच्या पक्षाला महायुतीतील एक नंबरचा पक्ष केले. इतकं करूनही मुख्यमंत्री पद मिळत नाहीये म्हणून तर तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी तर टीईटीचे पेपर फोडले गेले नाही ना ? कारण टीईटी पेपरफुटीचा उगम हा ठाण्यात आढळलाय विचार करा... जागे व्हा देवेंद्र फडणवीस साहेब जागे व्हा... CMO Maharashtra
Adv Rohini Eknathrao Khadse70,386 Aufrufe • vor 2 Monaten

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही... लातूर येथील विश्रामगृहात खा. Sunil Tatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. असे प्रकार महाराष्ट्रात कधीच पहायला मिळायचे नाहीत.. Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको ! MahaNCPspeaks #गुंडाराज #गायपट्टा #महाराष्ट्र #जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज #JungleeRummy
Adv Rohini Eknathrao Khadse63,918 Aufrufe • vor 1 Jahr

आता पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे... त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत... महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही ? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #VaishnaviHagawane #PuneNews #MaharashtraCM #वैष्णवी_हगवणे #हुंडाबळी
Adv Rohini Eknathrao Khadse66,437 Aufrufe • vor 1 Jahr

आपलं महिला आयोग किती थोर आहे बघा ! एका महिलेचा जीव गेला आहे, तो हुंडाबळी आहे आणि आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आरोपींवर कारवाई करण्याऐवजी मानपानावरून रुसवे फुगवे करत आहेत. थोडा तरी संवेदनशीलपणा तुमच्यात शिल्लक राहिलाय का ? मला तर प्रश्न हा आहे की यांना खरंच राग आला की यांनी पळ काढला ? ABP माझा Maharashtra State Commission for Women Ajit Pawar Prasanna Joshi
Adv Rohini Eknathrao Khadse66,211 Aufrufe • vor 1 Jahr

मंत्री Dr. Parinay Fuke यांच्या भावाची पत्नी प्रिया फुके आज विधानभवनात न्याय मागण्यासाठी आली होती. तर तिला तिच्या मुलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरे, जरा तरी लाज वाटू द्या रे गिधाडांनो ! एक निराधार महिला आपल्याला न्याय मिळावा या अपेक्षेने आपल्या चिमुकल्या मुलांसह सरकारच्या दारात येते तर तिला अशाप्रकारे डांबण्यात येते ? कुठे हे फेडाल ही पापं ? एका निराधार महिलेशी असे वर्तन झाले, कुठे आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा? कुठंय ती प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारी चित्रविचित्र बाई ? आता समोर नाही येणार का ? का, आरोपी भाजपचे आहेत म्हणून ? भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra MahaNCPspeaks #BJP #BJPFailsIndia
Adv Rohini Eknathrao Khadse55,413 Aufrufe • vor 1 Jahr

यांची चिड चिड काही थांबे ना ! Maharashtra State Commission for Women च्या अध्यक्षा वैष्णवी यांच्या घरी गेल्या असता सामान्य माणसांनी त्यांना जाब विचारला तर पुन्हा अध्यक्षांची चिड चिड सुरू झाली... कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले असते तर कदाचित आज चिड चिड करण्याची वेळ आली नसती #वैष्णवी_हगवणे #महिला_आयोग
Adv Rohini Eknathrao Khadse55,028 Aufrufe • vor 1 Jahr

देशभरात विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपचा बुरखा उरणमध्ये कसा फाटलाय बघा ! ह्या आमच्या Bhavana Ghaanekar , उरण नगरपरिषदेच्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या नगरपरिषदेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने हा प्रस्ताव हाणून पाडला जात आहे. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये ४ महिला नगरसेविका आहेत. एकीकडे भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती स्वच्छतागृह बांधले, महिलांचा सन्मान कसा राखला याच्यावर मोठमोठे व्हिडिओ बनवत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांना विरोध करत आहेत. हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. हा दुटप्पीपणा बरा नाही! #स्वच्छ_भारत_अभियान #SwachhagrahiSammanDiwas #modifails BJP भाजपा महाराष्ट्र
Adv Rohini Eknathrao Khadse13,923 Aufrufe • vor 2 Monaten

बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही ? राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे, महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? मागच्या आठवड्यात एका सर्व्हेनुसार २०२४-२०२५ या कालावधीत १८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची संख्या ४०९६ आहे आणि १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३३५९९ इतकी आहे. तुमचं महिला आयोग यावर काय पावलं उचलत आहे ? तुम्ही याबाबत काही धोरण तयार केले आहे का ? की सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाल ? Maharashtra State Commission for Women Rupali Chakankar #महिला_आयोग #भ्रष्ट_कारभार #भोंगळ_कारभार
Adv Rohini Eknathrao Khadse29,505 Aufrufe • vor 1 Jahr

काल छत्रपती संभाजी नगरात पोलीस भरती दरम्यान माणसातील देव अनुभवायला मिळाला ! अकोला जिल्ह्यातील एका गरीब घरचा मुलगा नितीन चौरे हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आला होता. हलाखीची परिस्थिती असल्याने त्याच्याकडे धावण्याचे शूज नव्हते. तरी तो सँडलवरच धावला आणि चांगले प्रदर्शनही केले. तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तरुणाची जिद्द दिसली म्हणून त्यांनी तरुणाला शूज गिफ्ट केले. कधी कधी जिवनात असे छोटे प्रसंग प्रचंड बदल घडवतात. आपण सर्वांनी '#12thFail' हा चित्रपट पहिलाच असेल. हाही प्रसंग नितीनच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणो आणि त्याला त्याचं यश गाठता यावं या सदिच्छा.. बाकी डीसीपी साळी साहेबांना जय हिंद! Maharashtra Times #motitvation #Sportscoin
Adv Rohini Eknathrao Khadse10,751 Aufrufe • vor 4 Monaten

पुण्यातील मंचरमध्ये वार्तांकन करताना एका पत्रकार महिलेवर भ्याड हल्ला झाला आहे. SakalMedia ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात सामान्य महिला तर सोडाच आता पत्रकारही सुरक्षित नाहीत. राज्यकर्ते म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि महायुतीवाले महाराष्ट्राचा बिहार केल्याशिवाय राहणार नाही.. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #महाराष्ट्र #महिलासशक्तिकरण #महिला #WomenEmpowerment
Adv Rohini Eknathrao Khadse16,664 Aufrufe • vor 1 Jahr

अरे सत्ताधाऱ्यांनो ! विधानभवनाचा 'कचरा' करू नका काल विधानभवनात उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा साचला असल्याचे निदर्शनास आले होते. आज दुसरा दिवस उजाडला तरी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. उलट माध्यम प्रतिनिधी याबाबत वृत्तांकन करत असताना त्यांना ताब्यात घेतले जात आहे. साधा कचरा उचलला जात नसेल तर अधिवेशनासाठी केला जाणारा करोडोंचा खर्च जातो कुठे ? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #Monsoon2025 #पावसाळी_अधिवेशन #Maharashtra #MaharashtraPolitics
Adv Rohini Eknathrao Khadse14,285 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar