
SakalMedia
@SakalMediaNews • 288,718 subscribers
Since 1932. महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र News from Maharashtra & around the world 🌏 Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6
Shorts
Videos

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह दुर्दैवी निधन झाले आहे. बारामतीत दाखल होताच सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना भावना आवरता आल्या नाहीत. डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर दुःख- या क्षणांनी संपूर्ण परिसर हळहळून गेला. #Baramati #AjitPawar #Sunetra
SakalMedia88,716 Aufrufe • vor 8 Monaten

राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, काही चालकांकडून या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी कॅब चालकाला OTP मराठीत सांगताना दिसत आहे.
SakalMedia16,105 Aufrufe • vor 1 Monat

बोरवेलला पाणी लागल्यानंतर शेतकऱ्याने पाण्यात आपल्या गायीच्या पायांना लोटांगण घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या वेळी गायीने शेतकऱ्याच्या पाठीवर पाय ठेवून जणू आशिर्वादच दिला. हा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. #Borewell #FarmerNews #ViralVideo #AgricultureNews
SakalMedia53,511 Aufrufe • vor 7 Monaten

खाकी वर्दीमागे हळवं मनही असतं, जे आता एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. मुंबई पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस सुशील शिखरे यांनी फुटपाथवर राहणाऱ्या बाळासाठी पाळणा देऊन कोट्यवधी मने जिंकली आहेत. #sushilshikhare #mumbaipolice #humanity #viralvideo
SakalMedia32,794 Aufrufe • vor 7 Monaten

आफ्रिकेतील एका शाळेत चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमावर दमदार भाषण केले. परदेशातील विद्यार्थ्यांसमोर शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे विचार मांडणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj
SakalMedia10,335 Aufrufe • vor 1 Monat

Video : तलाठ्याने घेतली पाच हजारांची लाच; समोर पोलिस दिसताच रक्कम गिळून टाकली #Bribery #talathi #sakal
SakalMedia104,305 Aufrufe • vor 3 Jahren

कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानकावर महिलांच्या डब्यात बसणाऱ्या तरुणीचे केस ओढत तिला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 3-4 महिला प्रवाशांची दादागिरी करत असल्याचे प्रकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. #Kalyan #WomensCoach #MumbaiLocal #ViralVideo
SakalMedia28,466 Aufrufe • vor 7 Monaten
0:51
Sensitive content
This media may contain sensitive content.

पुण्यातील तरुणांनी सोसायटीमध्येच थार आणि स्कॉर्पिओची रेस लावल्याचा प्रकार घडला आहे. थार आणि स्कॉर्पिओ वाहनांच्या मालकांनी सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर रेस केली. या रेसचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #PuneRacing #TharVsScorpio #DangerousRacing
SakalMedia43,632 Aufrufe • vor 1 Jahr

46 हजारांची TVS XL100 खरेदी करताना या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अनेकांना भावूक करून गेला. वर्षानुवर्षांची बचत, त्याग आणि मेहनतीनंतर स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. काहींसाठी ही फक्त गाडी नसते, तर आयुष्यभराच्या संघर्षाचे आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक असते.
SakalMedia14,017 Aufrufe • vor 4 Monaten

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळीमधील शेटकर वाडीच्या गोपाळ सावंत यांची CRPF मध्ये देशसेवेसाठी निवड झाली. याची बातमी गोपाळ यांनीकुडाळ नगरपंचायतीच्या फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आपल्या आईला दिली. आता हा हृदयाला स्पर्श करून जाणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. #crpf #viralvideo #GopalSawant
SakalMedia22,251 Aufrufe • vor 8 Monaten

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ( दि. 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दुखाची लाट पसरली आहे. अशातच आता दादांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. #AjitPawar #BaramatiPlaneCrash #AjitPawarViralVideo
SakalMedia20,668 Aufrufe • vor 8 Monaten

प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांना त्यांना हव्या त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याचे स्वप्न असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका मराठी मुलाने आपल्या आईवडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची सफर घडवली आहे. #rambodke #newyork #timessquare #usa #viral
SakalMedia57,203 Aufrufe • vor 3 Jahren

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या दरम्यान अजित पवारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात अजित पवार सकाळी लवकर कामाला सुरुवात का करायचा याचा खुलासा त्यांनी केल्याचे दिसते. #AjitPawar #Video
SakalMedia18,217 Aufrufe • vor 8 Monaten

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘हेल्मेट का घातलं नाही?’ असा सवाल विचारणाऱ्या तरुणाला पोलिसाने मारहाण केली आहे. दात दुखत असल्यामुळे हेल्मेट घातले नसल्याचं कारण सांगत त्याने तरुणाला दमदाटी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #NagpurPolice #HelmetIssue
SakalMedia26,539 Aufrufe • vor 1 Jahr

जिल्हा परिषद शाळेमधील चिमुकल्याच्या या बँड स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. वाद्य उपलब्ध नसतानाही रिकाम्या तेलाच्या डब्ब्याच्या सहाय्याने या लहानग्यांनी तालबद्ध सादरीकरण केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. #viralvideo #zpstudent #talent
SakalMedia24,709 Aufrufe • vor 1 Jahr