
SakalMedia
@SakalMediaNews • 288,666 subscribers
Since 1932. महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र News from Maharashtra & around the world 🌏 Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6
Shorts
Videos

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह दुर्दैवी निधन झाले आहे. बारामतीत दाखल होताच सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना भावना आवरता आल्या नाहीत. डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर दुःख- या क्षणांनी संपूर्ण परिसर हळहळून गेला. #Baramati #AjitPawar #Sunetra
SakalMedia88,716 görüntüleme • 6 ay önce

बोरवेलला पाणी लागल्यानंतर शेतकऱ्याने पाण्यात आपल्या गायीच्या पायांना लोटांगण घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या वेळी गायीने शेतकऱ्याच्या पाठीवर पाय ठेवून जणू आशिर्वादच दिला. हा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. #Borewell #FarmerNews #ViralVideo #AgricultureNews
SakalMedia53,482 görüntüleme • 6 ay önce

खाकी वर्दीमागे हळवं मनही असतं, जे आता एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. मुंबई पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस सुशील शिखरे यांनी फुटपाथवर राहणाऱ्या बाळासाठी पाळणा देऊन कोट्यवधी मने जिंकली आहेत. #sushilshikhare #mumbaipolice #humanity #viralvideo
SakalMedia32,634 görüntüleme • 6 ay önce

कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानकावर महिलांच्या डब्यात बसणाऱ्या तरुणीचे केस ओढत तिला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 3-4 महिला प्रवाशांची दादागिरी करत असल्याचे प्रकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. #Kalyan #WomensCoach #MumbaiLocal #ViralVideo
SakalMedia28,466 görüntüleme • 5 ay önce

Video : तलाठ्याने घेतली पाच हजारांची लाच; समोर पोलिस दिसताच रक्कम गिळून टाकली #Bribery #talathi #sakal
SakalMedia104,275 görüntüleme • 3 yıl önce
0:51
Sensitive content
This media may contain sensitive content.

पुण्यातील तरुणांनी सोसायटीमध्येच थार आणि स्कॉर्पिओची रेस लावल्याचा प्रकार घडला आहे. थार आणि स्कॉर्पिओ वाहनांच्या मालकांनी सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर रेस केली. या रेसचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #PuneRacing #TharVsScorpio #DangerousRacing
SakalMedia43,632 görüntüleme • 1 yıl önce

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळीमधील शेटकर वाडीच्या गोपाळ सावंत यांची CRPF मध्ये देशसेवेसाठी निवड झाली. याची बातमी गोपाळ यांनीकुडाळ नगरपंचायतीच्या फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आपल्या आईला दिली. आता हा हृदयाला स्पर्श करून जाणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. #crpf #viralvideo #GopalSawant
SakalMedia22,251 görüntüleme • 6 ay önce

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ( दि. 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दुखाची लाट पसरली आहे. अशातच आता दादांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. #AjitPawar #BaramatiPlaneCrash #AjitPawarViralVideo
SakalMedia20,651 görüntüleme • 6 ay önce

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या दरम्यान अजित पवारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात अजित पवार सकाळी लवकर कामाला सुरुवात का करायचा याचा खुलासा त्यांनी केल्याचे दिसते. #AjitPawar #Video
SakalMedia18,217 görüntüleme • 6 ay önce

प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांना त्यांना हव्या त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याचे स्वप्न असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका मराठी मुलाने आपल्या आईवडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची सफर घडवली आहे. #rambodke #newyork #timessquare #usa #viral
SakalMedia57,196 görüntüleme • 3 yıl önce

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘हेल्मेट का घातलं नाही?’ असा सवाल विचारणाऱ्या तरुणाला पोलिसाने मारहाण केली आहे. दात दुखत असल्यामुळे हेल्मेट घातले नसल्याचं कारण सांगत त्याने तरुणाला दमदाटी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #NagpurPolice #HelmetIssue
SakalMedia26,539 görüntüleme • 1 yıl önce

जिल्हा परिषद शाळेमधील चिमुकल्याच्या या बँड स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. वाद्य उपलब्ध नसतानाही रिकाम्या तेलाच्या डब्ब्याच्या सहाय्याने या लहानग्यांनी तालबद्ध सादरीकरण केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. #viralvideo #zpstudent #talent
SakalMedia24,698 görüntüleme • 1 yıl önce

93 वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसाठी सोन्याचा दागिना घेण्यासाठी शहरात आले आणि त्यांच्या त्या निस्वार्थ प्रेमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वृद्ध असूनही पत्नीवरचं प्रेम जपणाऱ्या आजोबांनी दागिन्याचं दुकान गाठलं. त्यांचं प्रेम पाहून दुकानदारही भारावून गेला. #ViralVideo #TrueLove
SakalMedia20,953 görüntüleme • 1 yıl önce

'कोणे हा माठ' या अभियानांतर्गत आम्ही पुणेकरांशी संवाद साधला. या अभियानाबद्दलचे मत पुणेकरांनी या व्हिडिओमध्ये मांडले आहे. तुम्हीदेखील आपले मत कमेंट्समध्ये नक्की सांगा! . #konehamaath #कोणेहामाठ #punecity #punenews #punetraffic #punepolice #sakalnews #sakalmedia पुणे शहर वाहतूक पोलीस
SakalMedia18,704 görüntüleme • 3 yıl önce