
Satyajeet Tambe
@satyajeettambe • 170,209 subscribers
Social - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद
Shorts
Videos

पेपर फुटीच्या विरोधात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व इत्र सरकारी भरतीतील अनियमित कामकाजाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात काढलेला मोर्चा ही केवळ एक घटना नाही. तर, महाराष्ट्रातील सर्वच भरती प्रक्रियांच्या पारदर्शकतेची ही चळवळ आहे. आजचा प्रतिसाद पाहता सरकारला ह्या प्रश्नावर तोडगा काढावा लागेल हे मात्र नक्कीच !
Satyajeet Tambe16,249 просмотров • 1 месяц назад

मी देशाच्या रक्षणासाठी माझं कुंकू पाठवतेय ! हे शब्द आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील यामिनी पाटील या नवविवाहित पत्नीचे, जिने आपल्या पतीला देशसेवेसाठी आनंदाने निरोप दिला. ५ मे रोजी मनोज आणि यामिनी यांचा विवाह पार पडला. अवघ्या काही तासांतच मनोज यांना सैन्य सेवेत रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर अंगावर ओली हळद, हातावर मेंदीचे रंग, आणि डोळ्यांत नवजीवनाची स्वप्ने असतानाही मनोज यांनी देशसेवेच्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. यामिनी यांनी पतीला ज्याप्रमाणे राष्ट्रसेवेच्या मार्गावर आनंदाने, अभिमानाने निरोप दिला. हे पाहून मला एकच भावना मनात जागी होते की आपण इथे सुरक्षित आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या सैनिकांमुळेच ! जय हिंद ! 🇮🇳 #JaiHind #India #Proud #IndianSolider #indianArmy #PrideOfIndia #Sacrifice
Satyajeet Tambe50,822 просмотров • 1 год назад

आज अहिल्या पहिल्यांदाच विधानभवनात आली. तिच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत विधीमंडळाच्या भेटीला ! विधानभवनात विद्यार्थ्यांना विशेष प्रवेश दिला जातो. त्यांच्यासाठी राखीव विशेष गॅलरीतून अहिल्या व तिच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी सभागृह पाहिले, पण आजचा क्षण माझ्यासाठी खास होता—अहिल्याला मी स्वतः विधानभवन फिरवून दाखवले. तिच्या व तिच्या मित्र-मैत्रिणींच्या डोळ्यातलं कुतूहल, लोकशाही प्रक्रियेविषयीची जिज्ञासा पाहून अभिमान वाटला. विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न ऐकले. मुलांच्या डोक्यात विचारांचे नवे अंकुर फुटताना पाहून आनंद झाला. कुतूहल हाच ज्ञानाचा पाया—हे आज पुन्हा मनोमन पटले. योगायोग असा की, 12th Fail चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे, ते पोलीस आयजी मनोज कुमार शर्मा आज विधानभवनात अहिल्याला भेटले. अहिल्याची त्यांना भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. त्यांनी तिच्याशी मनमोकळा संवाद साधला, दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या शब्दांनी तिचा आनंद द्विगुणित झाला. मोठ्या माणसांच्या अनुभवांतून शिकण्याची संधी मिळाली, हेच मोठे भाग्य ! #BudgetSession #Ahilya #VidhanBhavan #Daughter #12thFail #ManojSharma
Satyajeet Tambe54,273 просмотров • 1 год назад

म्हणूनच युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हायला हवं.! समाजात बदल घडवायचा असेल, तर प्रश्न विचारणारी आणि भूमिका मांडणारी तरुण पिढी पुढे येणं गरजेचं आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती सक्रिय राजकारणाचा भाग झाली पाहिजे. अलीनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी निर्भीडपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली पाहून समाधान वाटलं. धैर्य आणि ठाम भूमिका असेल, तर कोणताही मुद्दा स्पष्टपणे मांडता येतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. लोकप्रतिनिधी असणं म्हणजे केवळ पद मिळवणं नाही, तर समाजासाठी जबाबदारी स्वीकारणं आहे. चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्यावर आवाज उठवणं आणि लोकांचे प्रश्न विधिमंडळात मांडणं हीच लोकप्रतिनिधीची खरी भूमिका आहे. युवकांचा सहभाग वाढला, तर लोकशाही अधिक मजबूत होते. म्हणूनच युवकांनी राजकारणात पुढे यावं, हीच अपेक्षा. #Youth #Politics #Government #leaders #RaiseYourVoice Maithili Thakur
Satyajeet Tambe24,531 просмотров • 8 месяцев назад

माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांची भूमिका... Dr Sudhir Tambe
Satyajeet Tambe58,706 просмотров • 3 лет назад

शब्दांचा पक्का असलेला नेता देवाभाऊ ! संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे प्रस्तावित अवादा कंपनीचा 5 मेगावॅट क्षमतेचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांपासून विविध वादांमुळे रखडलेला होता. या प्रकल्पाबाबत गावकरी आणि कंपनीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून हे गाव दत्तक घेण्यात आलेले आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे ही झाडे तोडली जाणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला. तरीही कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. गावकऱ्यांच्या या संघर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी दि. 18 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिला. या गंभीर मुद्द्याची मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत, “गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या गरजेनुसारच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल,” अशी ग्वाही दिली होती. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही सुरु केली. त्यांच्या पुढाकाराने संगमनेर येथे बैठक पार पडली आणि ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. आज या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून, याचा विशेष आनंद आहे. 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने'अंतर्गत उभारला जाणारा हा ५ मेगावॅट प्रकल्प पारेगावसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सर्व प्रकरणात सकारात्मक भूमिका दाखवत यावर तात्काळ तोडगा काढल्याबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार. तसेच, हा लढा एकजुटीने आणि सक्षमपणे लढणाऱ्या समस्त पारेगाव ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन ! #Sangamner #SolarPowerPlant #SolarEnergy Devendra Fadnavis CMO Maharashtra
Satyajeet Tambe13,499 просмотров • 6 месяцев назад

उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा कनेक्टर का रद्द केला? हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं माझं ठाम मत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळंच दिसतं. समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळवण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास, खराब रस्ते आणि दुहेरी टोलचा भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात पुढील प्रश्न सभागृहासमोर मांडले: 📌 नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? 📌 धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भागांतील नागरिकही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत याबाबत शासन काय प्रयत्न करत आहे? 📌 नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही? तसेच नाशिककरांना टोल सवलत देणार का? वरील प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत समृद्धीवर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. खानदेशासाठी छत्रपती संभाजीनगर-जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असून लवकरच काम सुरू होईल, तसेच नाशिक-इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे उत्तर सत्य परिस्थितीपासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत, नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा कनेक्टर का रद्द केला? हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं माझं ठाम मत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळंच दिसतं. समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळवण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास, खराब रस्ते आणि दुहेरी टोलचा भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात पुढील प्रश्न सभागृहासमोर मांडले: 📌 नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? 📌 धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भागांतील नागरिकही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत याबाबत शासन काय प्रयत्न करत आहे? 📌 नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही? तसेच नाशिककरांना टोल सवलत देणार का? वरील प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत समृद्धीवर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. खानदेशासाठी छत्रपती संभाजीनगर-जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असून लवकरच काम सुरू होईल, तसेच नाशिक-इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे उत्तर सत्य परिस्थितीपासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत, नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. #BudgetSession #Maharashtra #Nashik #SamruddhiMahamarg #Benefit Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar CMO Maharashtra Meghna Sakore Bordikar
Satyajeet Tambe14,613 просмотров • 7 месяцев назад

सर्व मंत्री महोदयांनी एकदा सरकारी ताफा सोडून पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर सारख्या शहरांत खाजगी गाडीतून फिरावं, जेणेकरून रोजच्या वाहतूक कोंडीत सर्वसामान्य नागरिकांचा जीव कसा गुदमरत असेल, याची त्यांना कल्पना येईल. "ट्रॅफिक" च्या या गंभीर प्रश्नावर सभागृहात आवाज उठवला. 📷 वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे, रस्ते अरुंद होत चाललेत आणि नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. 📷 शहरांमध्ये जसं सार्वजनिक टॉयलेट्ससाठी App असावं अशी कल्पना मांडली गेली, तसंच Parking साठीही एक Smart Parking App असणं अत्यावश्यक आहे — जिथे नागरिकांना जवळची पार्किंग कुठे आहे हे सहज कळू शकेल. 📷 E-चलन यंत्रणेचं प्रचंड गैरव्यवस्थापन आहे. कॅमेरे चुकीचे नंबर ओळखतात, स्पीड नसेल तरीही दंड आकारला जातो. डबल चलन, चुकीचं चलन यामुळे सामान्य माणसाचं आर्थिक आणि मानसिक शोषण सुरूच आहे. 📷 जवळजवळ ₹1000 कोटींची वसुली प्रलंबित आहे, पण यंत्रणेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे. वाहतूक कोंडीमुळे रोज वेळ, पैसा आणि इंधन या तिन्ही गोष्टींचा ताण सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्य जनतेसाठी प्रवास म्हणजे एक युद्ध झालं आहे. पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर सारख्या शहरांमध्ये विविध वाहतूक सुधारणा प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ट्रॅफिक समस्येवर कायमचा तोडगा निघावा, हीच अपेक्षा! #MonsoonSession #Traffic #Pune #Mumbai #Nashik #Ahilyanagar #Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar @RamShindeMLA
Satyajeet Tambe23,086 просмотров • 1 год назад

जर नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आज पूर्ण झाला असता, तर हे हाल आपल्या लोकांना सोसावे लागले असते का? दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात पुणे–मुंबईत काम करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं आपले घर गाठण्यासाठी पुणे–नाशिक महामार्गावरून प्रवास करत आहेत. परंतु या महामार्गाची अवस्था अत्यंत खराब आहे; खड्डे आणि तासन्तास ट्रॅफिक जाममुळे लोक वैतागलेले, त्रस्त झालेले आहेत. तरीही घराकडे जाण्याची ओढ इतकी आहे की, लोक हे सगळे सहन करत आहेत. म्हणूनच माझी शासनाला ठाम मागणी आहे: 📌 जोपर्यंत पुणे - नाशिक महामार्गाचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल माफ करा. 📌 यासोबतच, नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामालाही तातडीने गती द्या. या दोन्ही प्रकल्पांना तातडीने गती द्या आणि लोकांवरचा हा अन्याय थांबवा. कारण या नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि पुणे–नाशिक महामार्गामध्ये इतकी मोठी ताकद आहे की, हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाले, तर पुणे–नाशिकसह आजूबाजूच्या भागाचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण बदलून जाईल. म्हणूनच हा मार्ग त्वरित पूर्ण करावा ही माझी ठाम मागणी आहे शासनाकडे आहे. #Pune #Nashik #SemiHighSpeedRailway #Highway #Toll Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar CMO Maharashtra Ashwini Vaishnaw
Satyajeet Tambe14,925 просмотров • 11 месяцев назад

75000 सरकारी भरतीची घोषणा होत असतांनाच प्रश्न निर्माण होतो की, ही भरती कधी होणार? कशी होणार? काही कालबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे का? ज्या युवक-युवतींनी परीक्षा दिल्या, पास झाले, पण अजूनही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे, याबाबत काय कार्यवाही करणार? असे अनेक प्रश्न निरुत्तरीत आहेत.
Satyajeet Tambe32,012 просмотров • 3 лет назад

गेल्या काही काळात इच्छा असूनही आपल्या प्रचंड मोठ्या अशा नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या भेटू शकलो नसलो, तरीही निवडणुकीनंतर नक्की भेटेन, हे आश्वासन देतो. 30 तारखेला होणाऱ्या मतदानदिनी मला प्रथम पसंतीचे मत देऊन माझ्या पाठीशी उभे रहा ही नम्र विनंती.
Satyajeet Tambe31,466 просмотров • 3 лет назад

अन्यायाच्या विरोधात संगमनेर मैदानात ! जात, धर्म, पंथ, प्रांत यापलीकडे जाऊन मानवतेच्या नात्याने प्रत्येकाचा सन्मान राखला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला संस्कार आहे. छत्रपतींचा संदेश शिरसावंद्य मानून वाटचाल करणारे मावळे म्हणून बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांच्या विरोधात,तसेच जगभरातील असंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास प्रभू यांच्या अटकेच्या विरोधात बांगलादेश हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून लढण्याचा संकल्प केला. #ChhatrapatiShivajiMaharaj #Bangladesh #Hindu PMO India Narendra Modi Dr. S. Jaishankar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
Satyajeet Tambe18,950 просмотров • 1 год назад

आज राज्यभरात अनेक ठिकाणी लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. राज्य शासनाने अनेक प्रयत्न करूनही यामधील घोटाळे बंद व्हायचे नाव घेत नाहीये. पेपरफुटी व हे घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी कठोर कायदा आता व्हायला हवा, अशी माझी ठाम मागणी आहे. #TalathiBharati #तलाठी_भरती CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Satyajeet Tambe23,393 просмотров • 2 лет назад

👉 #PSI झाले याची डोक्यात अजिबात हवा जाऊ देऊ नका. 👉 अजिबातही भ्रष्टाचार करू नका. 👉 आपल्या आई वडिलांचा फोटो कामाच्या ठिकाणी आवर्जून लावा, जेणेकरून पदोपदी तुम्हाला तुम्ही केलेल्या संघर्षाची जाणीव होत राहील. 👉 #PSI झाले म्हणून त्याच पदावर समाधान मानू नका. 👉 गरजेपेक्षा जास्त प्रतिष्ठा, पैसा व शाश्वतीच्या नादात चुकीचं पाऊल उचलू नका. 👉 विधीमंडळ, न्यायपालिका, पत्रकारिता आणि प्रशासन हे लोकशाहीचे 4 स्तंभ चांगले राहिले तरच हा देश पुढे जाणार आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे तुमच्या पदाला न्याय द्या. सामान्य घरातून येऊन काहीतरी असामान्य काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्नं असत आणि या स्वप्नांना, पंखांना बळ देण्याचं काम अश्वमेधच्या माध्यमातून आमचे मित्र मनीष प्रताप बोरस्ते व वहिनी करत आहेत. या दोघांनी नाशिक येथे #PSI झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास उपस्थित राहून या विद्यार्थ्यांसोबत वस्तुस्थितीवर बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या सर्वांचे व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. #Nashik #Youth #Career #MaharashtraPolice Ashwamedh Career Academy महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Satyajeet Tambe17,544 просмотров • 2 лет назад

पुणे-नाशिक रेल्वे हा देशातील पहिला सेमी हायस्पीड प्रकल्प असून अत्यंत कमी वेळात पुणे-नाशिक अंतर पार करणे ही या प्रकल्पाची युएसपी आहे. ही रेल्वे सरळ मार्गाने झाली तरच पुणे-नाशिक हा 4 तासांचा प्रवास 1.45 तासात होणार आहे, पण जर ही रेल्वे नाशिक- शिर्डी- नगर मार्गे पुण्याला आणली तर या प्रवासाला 3. 30 तास लागणार आहेत, जो की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नाही! म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही सिन्नर - संगमनेर - नारायणगाव - मंचर - चाकण अशी सरळ मार्गानेच झाली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. #Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Sinnar #Chakan Ministry of Railways Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis Rajabhau Waje Nilesh Lanke Dr.Amol Kolhe Dilip Walse Patil Manikrao Kokate Babaji kale
Satyajeet Tambe12,716 просмотров • 1 год назад

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा कॅशलेस नसल्याने बिलांची मंजुरी व पाठपुराव्यातच 30 ते 40 % रक्कम खर्च होते, वेळ व ऊर्जाही वाया जाते. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
Satyajeet Tambe19,804 просмотров • 3 лет назад