Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

345 रु टोल घेते हे सरकार... पुणे कोल्हापूर महामार्गाची अवस्था बघा..

66,966 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』vor 2 Jahren

पुणे कोल्हापूर मार्ग सांगून चंद्रावरील फोटो टाकतो 😠

Profilbild von N i k h i l___S a n k p a l
N i k h i l___S a n k p a lvor 2 Jahren

😂👍🏻

Profilbild von Rohitman
Rohitmanvor 2 Jahren

345 रु. टोल घेऊनही पुणे-कोल्हापूर महामार्गाची अवस्था चिंताजनक आहे. टोलचा उपयोग रस्त्यांच्या देखभालीसाठी योग्यरित्या करणे आवश्यक आहे. सरकारकडून तातडीने उपाययोजना अपेक्षित आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या पैशाचा योग्य मोबदला मिळू शकेल. #Infrastructure #Accountability

Profilbild von Sid the Birder
Sid the Birdervor 2 Jahren

@nitin_gadkari you are the biggest fraud floating around as an efficient minister

Profilbild von Me Mumbaikar
Me Mumbaikarvor 2 Jahren

Dear @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra dada pls take up wirh @nitin_gadkari @NHAI_Official they are taking #Maharashtra for granted... this will reflect on upcoming election... we contribute highest tax to India... there is a limit to everything cc @BJP4Maharashtra

Profilbild von Shashikant
Shashikantvor 2 Jahren

काल मला toll देऊन ही 10 हजार चा फटका बसला कारण खड्ड्यांमुळे गाडी चा tyre फुटला....

Profilbild von ashok ahire
ashok ahirevor 2 Jahren

Stop giving tolls if there even single pothole on highway- this shld b law

Profilbild von Milind Sankeshware
Milind Sankeshwarevor 2 Jahren

@nitin_gadkari why we are paying tax and toll? To make our journey horrible 😀

Profilbild von RoBo
RoBovor 2 Jahren

सर्व नेत्यांना बसमध्ये भरा आणि ह्या रस्त्याने न्या. मग कळेल

Profilbild von rahul
rahulvor 2 Jahren

राष्ट्रीय महामार्ग पण सरकार बांधू शकत नाही ते ही वाहनधारकांकडून सर्व टॅक्स घेऊन? टोल हा फक्त special रस्त्यालाच ठेवा, सामान्य नागरिकांकडून फक्त घ्या, पण ह्या लोकांकडून जनतेला खर्च केलेल्या पैशाचे काय रिटर्न मिळतात हा एक मोठा प्रश्न आहे

Ähnliche Videos

जर नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आज पूर्ण झाला असता, तर हे हाल आपल्या लोकांना सोसावे लागले असते का? दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात पुणे–मुंबईत काम करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं आपले घर गाठण्यासाठी पुणे–नाशिक महामार्गावरून प्रवास करत आहेत. परंतु या महामार्गाची अवस्था अत्यंत खराब आहे; खड्डे आणि तासन्‌तास ट्रॅफिक जाममुळे लोक वैतागलेले, त्रस्त झालेले आहेत. तरीही घराकडे जाण्याची ओढ इतकी आहे की, लोक हे सगळे सहन करत आहेत. म्हणूनच माझी शासनाला ठाम मागणी आहे: 📌 जोपर्यंत पुणे - नाशिक महामार्गाचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल माफ करा. 📌 यासोबतच, नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामालाही तातडीने गती द्या. या दोन्ही प्रकल्पांना तातडीने गती द्या आणि लोकांवरचा हा अन्याय थांबवा. कारण या नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि पुणे–नाशिक महामार्गामध्ये इतकी मोठी ताकद आहे की, हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाले, तर पुणे–नाशिकसह आजूबाजूच्या भागाचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण बदलून जाईल. म्हणूनच हा मार्ग त्वरित पूर्ण करावा ही माझी ठाम मागणी आहे शासनाकडे आहे. #Pune #Nashik #SemiHighSpeedRailway #Highway #Toll Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar CMO Maharashtra Ashwini Vaishnaw

Satyajeet Tambe

14,925 Aufrufe • vor 1 Jahr

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

16,709 Aufrufe • vor 4 Monaten

एकेकाळी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर गेल्याचं राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून सिद्ध होतं. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर ऐन दिवाळीत कसा जीवघेणा हल्ला करण्यात आला याचं हे फुटेज बघा... या गाडीतील महिला जिवाच्या आकांताने ओरडत असताना गुंड मात्र जीवघेणा हल्ला करत होते आणि याला पूर्णतः हे अकार्यक्षम सरकार आणि गृहमंत्रालय जबाबदार आहे. राज्यातील जनतेने आणखी किती दिवस जीव मुठीत धरून जगायचं? Devendra Fadnavis #MaharashtraPolice #LawAndOrder

Rohit Pawar

44,771 Aufrufe • vor 11 Monaten

रिपोर्टर : लातूरमध्ये तुम्ही काय करत आहात? कॉक्रोच : सरकारी शाळांची अवस्था उघड करण्यासाठी मी इथे आलो आहे!! रिपोर्टर : तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 30 वर्षांपासून लातूरचे आमदार कोण आहेत? कॉक्रोच : नाही,नक्कीच कोणीतरी भाजपचे असतील. रिपोर्टर : नाही! लातूरवर काँग्रेसच्या देशमुख कुटुंबाची सत्ता आहे. कॉक्रोच : पण खासदारही हे काम करू शकतो. रिपोर्टर : लातूरचे खासदारही काँग्रेसचेच आहेत. कॉक्रोच : मग काय झालं?या गावातील शाळा आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शाळांच्या पायाभूत सुविधांवर काम करायला हवे होते. रिपोर्टर : ते पण काँग्रेसचेच आहेत. कॉक्रोच : हे बघा,मी इथे भाजप किंवा काँग्रेस करण्यासाठी आलेलो नाही. मी सरकारी शाळा सुधारण्यासाठी आलो आहे.कृपया माझा वेळ वाया घालवू नका. रिपोर्टर : पण तुम्ही भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी इथे आला होतात? तुम्ही देशमुख कुटुंबाविरोधातही बोलणार का? कॉक्रोच : माझा वेळ वाया घालवू नका. तुम्ही गोदी मीडिया आहात!! Abhijeet Dipke Amit V. Deshmukh Dhiraj V Deshmukh Devendra Fadnavis

शुभम कराड

13,276 Aufrufe • vor 1 Monat

#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आयोगाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे? सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी. Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ

Rohit Pawar

12,823 Aufrufe • vor 1 Jahr

पैश्याची मस्ती. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील हत्तिन महादेवी ही जवळपास 36 वर्षे ज्या लोकांबरोबर परिवाराचा सदस्य बनून राहिली तिला असे अचानक वनतारा ला रवाना व्हावे लागले. यावेळी गावकऱ्यांच्या भावना या शब्दात व्यक्त होणार नाही. महादेवी ची काळजी सर्वांनाच आहे पण वनतारा च का हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. मागे एकदा मला ही महादेवी ची भेट घेता आली होती. या भेटीत मुक्या प्राण्यांना ही भावना असतात हे प्रकर्षाने जाणवले. सरकार ला माझे सांगणे आहे की सब कुछ अदानी ,अंबानी असे करू नका रे. लोक सगळे बघत असतात आणि योग्यवेळी हिशोब करतात. #JusticeForMahadevi #SaveMahadevi #VoiceForVoiceless #KolhapurToVantara #ElephantRights #वनतारा_च_का #StopAnimalPolitics #महादेवी_आमची_गर्वाची #पैशाची_मस्ती #KolhapurStandsWithMahadevi #omrajenimbalkar

Omprakash Rajenimbalkar

35,479 Aufrufe • vor 1 Jahr

नीट बघा... हा आहे भाजपाचा रडीचा डाव, ही आहे घाबरलेली भाजपा ! जननायक आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शक्ती पुण्यात एकत्र आली आहे. "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाच्या प्रचंड यशाने भाजपाच्या सत्तेची खुर्ची हादरली आहे. यामुळे बहुदा सत्ताधाऱ्यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. म्हणूनच ज्या मेट्रोचा भाजपकडून प्रचंड गाजावाजा केला जातो, ज्याच्या प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनासाठी स्वतः नरेंद्र मोदींना यावे लागते, ती पुणे मेट्रो गेल्या १ तासापासून बरोबर सभास्थळाच्या समोर, एकाच ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहे. ही मेट्रो बंद ठेवल्याने कित्येक मेट्रो स्टेशन्समध्ये नागरिक ताटकळत उभे असतील याची कल्पनाही न केलेली बरी. "छात्रों की गुंज" कार्यक्रमाला येण्यासाठी या मेट्रोचा वापर नागरिकांनी करू नये, सभेला पोहोचण्यासाठी नागरिकांना त्रास व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपाने केलेले हे कृत्य हास्यस्पद आहे.

Prashant Sudamrao Jagtap

49,254 Aufrufe • vor 1 Monat

ज्ञानोबा-तुकोबांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्राला आज भोंदू बाबांनी अक्षरशः विळखा घातलाय…. हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो पण त्याचे हे व्हिडिओ बारकाईने बघा… थेट श्री. प्रभू हनुमानजींशी कनेक्ट असल्याचं आणि कोणताही प्रश्न सोडवत असल्याचं कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हा महाशय धडधडीतपणे सांगतोय… मग असं असेल तर राज्यात आ वासून उभे असलेले बेरोजगारी, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, कंत्राटदारांची एक लाख कोटींहून अधिकची थकीत बिलं, असे ढीगभर प्रश्न सोडवण्यासाठी या भोंदूच्या आवडीचं सरकार बरखास्त करुन यालाच सरकारच्या जागी का नेमू नये? आधीच अशोक खरात या भोंदूने राज्यात कहर केला असताना तो कमी म्हणून की काय दुसरा भोंदू आणून राज्याच्या डोक्यावर बसवलाय..!

Rohit Pawar

12,001 Aufrufe • vor 5 Monaten

कालपर्यंत चर्चेला तयार असलेल सरकार आज प्रतिसाद देताना दिसत नाही त्यात मुख्यमंत्री गणेशोत्सव महत्वाचा म्हणून आडमुठेपणा करताना दिसत आहे…..! तेव्हा हे आंदोलन जास्त काळ चालेल आसे वाटायला लागलंय तसे झालेच तर मुंबईत गेलेल्या आपल्या मराठा बांधवांची मुख्य जबाबदारी हि पुणे जिल्हा व नाशिक जिल्ह्यावर असणार आहे…! तेव्हा दोन्ही जिल्ह्यातील मराठा बांधवांनी आतापासुनच नियोजन करत तयारी ठेवा मराठा आरक्षण आंदोलन लांबलेच तर मुंबईतील आपल्या बांधवांच्या फक्त जेवनाची रसद मुंबईत पुरवण्याची महत्वाची जबाबदारी ही दोन्ही जिल्ह्यातील सर्व लोकांनी पार पाडायची आहे ती जबाबदारी स्वतः जरांगे पाटलांनी तुमच्याकडे दिलेली आहे तेव्हा तयारीत रहा ..!🙏🙏 #चलो_मुंबई #मराठा_आरक्षण #चला_मुंबई

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

16,162 Aufrufe • vor 1 Jahr