Loading video...

Video Failed to Load

Go Home

AISF चे माजी राज्यसचिव कॉम्रेड प्रशांत आंबी यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

17,721 views • 4 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar

Supriya Sule

30,568 views • 2 years ago

क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!

Supriya Sule

59,233 views • 9 months ago

23 जुलै महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला डावे पक्षांनीनी पाठिंबा जाहीर केला आहे. काही छोटे पक्ष, सामाजिक संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शिक्षण क्षेत्रातील काही संघटनांशी आमचं बोलणं झालं आहे, तेही यात सक्रिय भाग घेणार आहेत. काही ठिकाणी शिक्षक-पालक संघटनांना आम्ही विनंती केली आहे की, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. यात त्यांचे मोठे नुकसान आहे. ही आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. ट्रान्सपोर्ट, टॅक्सी युनियन, व्यापारी संघटनांशी बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमचे आवाहन आहे की, केंद्र सरकारने प्रादेशिक सेना स्टँड बाय ठेवली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व पोलिस फोर्स आहे, त्याला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला. त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला. या अत्याचाराचा निषेध आहे. सरकारच्या विरोधात उद्या जनतेने महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे. तसेच भाजप विरोधी राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन यात सहभागी व्हावे. #23_जुलै #महाराष्ट्र_बंद #DelhiProtest #JantarMantar

Prakash Ambedkar

11,702 views • 1 month ago