Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

Akola च्या 48°C तापमानात ऑमलेट बनवण्यात आली आहे 🤩

82,370 просмотров • 5 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

‘चांद्रयान-३’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. ‘चांद्रयान-३’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासियांच्या एकजुटीतून मिळालेलं हे यश आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे मनापासून अभिनंदन करतो. प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करेल, असा विश्वास आहे. ‘चांद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाली, याचा फार आनंद आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्रमोहिमेच्या यशानं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहीम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानंही आपलं योगदान दिलं. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल. #Chandrayaan3 #VikramLander #MoonLanding

Ajit Pawar

33,644 просмотров • 3 лет назад

महाराष्ट्र सरकारचा ‘#उद्योगरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल आदरणीय श्री. रतन टाटा यांचे त्रिवार अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. भारतीयांसाठी टाटा म्हणजे अढळ विश्वास! टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे गुणवत्तेची खात्री. टाटांची नाममुद्रा ही भारतीयांच्या भावविश्वाचा एक भाग आहे. हा विश्वास टाटांनी अथक प्रयत्नातून मिळवलेला आहे आणि अविरत सांभाळलेलाही आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या प्रांतातही टाटा यांचे काम अतिशय मोलाचे आहे. त्यांनी टाटा औद्योगिक समुहाचा विस्तार करण्यासोबतच समाजाला मानवतेचेही दर्शन घडवले. संशोधनापासून ते विविध कलांचे जतन करण्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. मिठाच्या उत्पादनापासून ते चांद्रयान-३ ला अवकाशात पोहोचवणाऱ्या रॉकेट लॉन्चसाठी ज्या क्रेनचा वापर करण्यात आला होता, ती क्रेन टाटा स्टीलच्या फॅक्ट्रीत बनवण्यात आली होती, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. श्री रतन टाटा यांना पुरस्कार प्रदान करण्यातून एक प्रकारे महाराष्ट्र सरकारचाच गौरव झाला आहे. #Maharashtra #Udyogratna #RatanTata Conquer

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

149,895 просмотров • 3 лет назад

कधी कधी मोठ्या बदलाची सुरुवात मोठ्या यंत्रणेतून नाही, तर एका छोट्याशा कल्पनेतून होते… कोपरगाव येथील संजिवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२वीत शिकणाऱ्या साईश्रद्धा अरविंद साळमुठे हिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी प्रवाशांना बसच्या वेळा व रिअल-टाइम बस अपडेट्स सहज उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संपूर्ण प्रणालीचा वापर QR Code च्या माध्यमातून करता येतो. प्रवाशांनी QR Code स्कॅन केल्यानंतर कोणतेही साइन-अप किंवा लॉगिन न करता थेट वेबसाइटवर जाऊन आपल्या बसच्या वेळा व उपलब्ध माहिती पाहता येते. या प्रकल्पासाठी तिला भारत सरकारकडून Utility Patent देखील प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रवासी या सुविधेचा उपयोग करत आहेत. सध्या हे सॉफ्टवेअर अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. विशेष म्हणजे, एवढे उपयुक्त सॉफ्टवेअर विकसित करूनही तिने त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची मागणी केली नाही. तिच्या या कार्याची दखल घेत, तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. एका १२वीच्या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी केला, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. एका बाजूला स्वतःच्या ज्ञानातून समाजाला काहीतरी देण्याची तिची भावना आणि दुसऱ्या बाजूला तिच्या शिक्षणाला आधार देण्याची ही संधी… हा क्षण निश्चितच मनाला भावणारा आहे. आज तिच्या हातातील कौशल्याला प्रोत्साहन मिळाले आहे, उद्या हेच कौशल्य समाजाच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास आहे. #PratapSarnaik #TransportMinister #MaharashtraST #YouthPower #Innovation Maharashtra State Road Transport Corporation

Pratap Baburao Sarnaik

51,723 просмотров • 1 месяц назад

⚒️कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्गावरील टिळक नगर नाला येथे असलेल्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आज सकाळी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. 🔨रस्त्याच्या पृष्ठभागापासून सुमारे ५ मीटर खोलीवर असलेली जलवाहिनी पूर्णपणे उघडून तिच्या सुमारे १.५ मीटर लांबीच्या क्षतिग्रस्त भागाची बदली करण्यात आली. या कामामुळे जलवाहिनीची कार्यक्षमता पूर्ववत करण्यात यश आले आहे. 🔧या कामादरम्यान एका बाजूस ३०० मिलिमीटर व्यासाची महानगर गॅस लिमिटेड (MGL) ची गॅसवाहिनी तर दुसऱ्या बाजूस पुलाची पाइल फाउंडेशन असल्यामुळे खोदकामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीही अभियंते व कर्मचारी अत्यंत दक्षतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. 🚰बाधित होणाऱ्या प्रभाग क्रमांक १५६, १५८, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८ आणि १७१ च्या परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तथापि, आजचा पाणीपुरवठा उशिराने आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. 💧 #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

16,580 просмотров • 4 месяцев назад

महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळ्याचे सत्र सुरूच. आज #जलसंपदा विभागाच्या नोकर भरती परीक्षेत आंबेजोगाई येथील परीक्षा केंद्रावर अत्याधुनिक साहित्याद्वारे पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला परीक्षेदरम्यान अटक करण्यात आली. #Seriousness च्या नावाखाली १,००० परीक्षा घेऊन पण फडणवीस सरकारला पेपरफोडी रोकता आलेली नाही. राज्याचे गृहमंत्री फडणवीस नोकर भरती घोटाळे रोकण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत. पेपरफुटी कायदा करण्यासाठी नेमलेली समिती तीन महिन्यानंतर अहवाल देणार आहे म्हणजे तोवर सर्व परीक्षा संपलेल्या असतील. यासाठी सर्वात आधी फडणवीसांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी आणि TCS कडून परीक्षेचे काम काढून MPSC आयोगाकडे देण्यात यावे. Devendra Fadnavis Rohit Pawar Dr.Jitendra Awhad भाजपा महाराष्ट्र Tata Consultancy Services Vijay Wadettiwar Nana Patole Supriya Sule .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

21,784 просмотров • 2 лет назад

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील जमीन आणि महसूलविषयक सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी 'महाभूमी स्टॅक'च्या माध्यमातून डिजिटल व्यवस्थेला बळकटी देण्यात येत आहे. जमिनीचे अभिलेख, फेरफार प्रक्रिया तसेच विविध महसूल सेवा एका डिजिटल परिसंस्थेत आणून नागरिकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाभूमी स्टॅक प्रणाली अभिलेखांचे डिजिटल भांडार ✅ 3.5 कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (7/12 व 8-अ) ✅ 1.5 कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका ✅ 40 कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख ✅ नोंदणी विभागाचे दस्त क्र. 2 (Index-II) च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Ganesh Naik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

17,824 просмотров • 1 месяц назад

'9 किलोमीटर उंच ढग' तसे '4 किलोमीटर वर मंदिर'! जन्मतःच ढिल्लाच असलेला 'स्क्रू' आर्थर रोड वारीत पडल्यानंतर ठार वेडे झालेले Sanjay Raut म्हणत आहेत की अयोध्येतील राम मंदिर हे बाबरी जमीनदोस्त केली गेली त्या रामजन्मभूमी पासून 4 किलोमीटर लांब बनवलं जात आहे..🤣 यावर एवढंच म्हणेन : संजय राऊत सर्व हिंदूंना प्रबोधनजीवी शिउबाठा सैनिकांसारखे मूर्ख समजून धडधडीत खोटं बोलत आहेत. आणि, लाचार मराठी मीडिया त्यांचं खोटं शंभर वेळा दाखवून संभ्रम पसरवण्याची सुपारी बजावत आहेत. दोघांनाही माझा सविनय आक थु! आता फॅक्ट काय आहे बघा : भाजपकडून बाबरी जमीनदोस्त केली गेली, बरोबर 'त्याच' ठिकाणी राम मंदिर उभारले जात आहे! 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' म्हणजे काय हे तरी माहीत आहे का यांना? 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' म्हणजे तीच 2.77 एकर जमीन ज्यावरून सुप्रीम कोर्टात लढा सुरू होता आणि जी जमीन सुप्रीम कोर्टाने 5-0 निकाल देत हिंदूंना परत द्यायचा ऐतिहासिक निकाल दिला होता. आता 67 एकर : काँग्रेस ने बाबरीचे रक्षण करण्यासाठी या 2.77 एकर जमिनीसहित (मशिदीसहित) एकूण 67 एकर जमीन अधिग्रहण केली होती, त्यातील ही 2.77 एकर ज्याला 'रामजन्मभूमी' मानले जाते. निकालानंतर : सुप्रीम कोर्टाने या 2.77 एकर जमिनीचा निकाल दिल्यानंतर काँग्रेसने अधिग्रहण केल्यामुळे केंद्राच्या मालकीची असलेली एकूण 67 एकर जमीन मोदी सरकारने राम मंदिर ट्रस्ट ला दिली. गेल्या 2 वर्षात राम मंदिर ट्रस्ट ने अजून साधारण 150 एकर जमीन विकत घेतली आहे. भाजपने बाबरी पाडली तेंव्हा : सोपं करून सांगतो. भाजपने बाबरी पाडली त्यावेळी त्याठिकाणी तात्काळ, त्याच 2.27 एकर मधील बाबरी 'समतल' करण्यात आलेल्या जागेवर, अर्थात रामजन्मभूमीवर एक रामाची मूर्ती स्थापन करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर 'त्याच' ठिकाणी गर्भगृह आलं पाहिजे म्हणून ती मूर्ती योगी आदित्यनाथ यांनी स्वतः हातात घेऊन ती मूर्ती केवळ 100-125 मीटर अंतरावर पुनर्स्थापना केली व मूळ ठिकाणी मंदिराचे काम सुरू झाले (विडिओ जोडला आहे). आजही अयोध्येत गेलेले भाविक 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' जागेवर अर्थात रामजन्मभूमी वर निर्माणाधिन असलेल्या मंदिराच्या फक्त 100-125 मीटर अंतरावर योगींनी मूर्ती ठेवली, त्या रामाच्या मूर्तीचे दर्शन घेत आहेत. मस्जिद कुठं बनत आहे? : त्याकाळी फैजाबाद जिल्हा होता आणि अयोध्या त्यातील एक गाव. सुप्रीम कोर्ट अयोध्येतच मशिदीसाठी जागा द्यायला भाग पाडू शकते याचा अंदाज आल्याने मोदी-योगी जोडगोळीने फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण करून अयोध्या जिल्हा बनवला (नोव्हेंबर 2018). 'मशिदी साठी अयोध्येतच वेगळी जागा द्या' आदेश आल्यावर राममंदिराच्या बाजूला जागा द्यावी लागली असती कारण अयोध्या नगरी फार मोठी नव्हती. मोदी-योगी जोडगोळी यांच्याकडील दूरदृष्टी चा परिणाम असा झाला की आता SC च्या आदेशानुसार 'अयोध्या जिल्ह्यात' जागा देण्यात आली आहे. ही जागा दिली आहे त्या जागेचे नाव आहे धन्नीपूर! धन्नीपूर हे गाव अयोध्या जिल्ह्यातच आहे पण ते रामजन्मभूमी पासून 24.6 किलोमीटर दूर आहे. अयोध्येत मंदिर-मशीद वादाला स्कोपच नाही ठेवलाय आता.. तात्पर्य.. 'आम्ही बाबरी पाडली' म्हणणाऱ्या लोकांना अयोध्येचा 'अ' पण नाही माहीत. मला तर वाटतंय की यांचे गुडघ्यात मेंदू असलेले यांचे फट्टू शिलेदार तेंव्हा अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी पासून 4 किलोमीटर लांब कुठं तरी काही तरी भलतंच बाबरी समजून पाडून, तसेच कलकत्त्याला पिकनिकला निघून गेले असावे. म्हणून संजय राऊत यांना वाटतंय की मंदिर त्या ठिकाणाहून चार किलोमीटर लांब बांधलं जात आहे. असो! यांची चुतीयागिरी हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. त्यावर पुन्हा कधी तरी.. जय श्रीराम!🚩

राईट विंग ऑफ महाराष्ट्र

27,707 просмотров • 2 лет назад

कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय... * वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे. * २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. * प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार? आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!

Dr.Jitendra Awhad

101,429 просмотров • 1 год назад

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

32,795 просмотров • 1 год назад

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 просмотров • 1 год назад

आमचा रॉकी... भलताच अतरंगी, घरातल्यांसाठी प्रचंड लाडका आणि प्रेमाचा सागर, पण शत्रू किंवा संकटासाठी साक्षात काळ ! हा पठ्ठा स्वभावानं जितका इमानदार, तितकाच भयंकर धाडसी आहे. यापूर्वी त्याने अनेकदा विषारी साप गरागरा फिरवून मारले आहेत. एकदा तर एका विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, तो मरणाच्या दारापर्यंत पोहोचला होता. पण त्याही संकटावर मात करून तो चमत्कारिक रित्या सुखरूप बाहेर पडला !🧿 अशा या आमच्या 'रॉक स्टार' रॉकीने काल संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास मुरबाड येथील आमच्या फार्म हाऊसवर स्वतःचाच एक नवा रेकॉर्ड केला. बेसावध असताना कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारून काल एका बिबट्याने रॉकीवर पाठीमागून हल्ला केला ! पण समोर बिबट्या असला तरी त्याची गाठ आमच्या पठ्ठ्यासोबत होती. रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचा डावा गाल आणि हनुवटीवर असा काही मजबूत चावा घेतला की बिबट्या स्वतःची सुटका करण्यासाठी धडपडू लागला. अखेर रॉकीने पकड सैल करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या थरारक झटापटीत रॉकीला बिबट्याची नखे लागून जखमा झाल्या, पण तरीही हा पठ्ठा त्याचा शत्रू कुठे गेला हेच छाती ठोकून पाहत उभा होता. त्याने दाखवून दिले की लढायला वाघाचं कातडं नाही तर वाघाच काळीज हवं ! नंतर आम्ही CCTV फुटेज पाहिले तेव्हा अंगावर काटाच आला. रात्रीच तिथे जाऊन डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार केले आणि आता तो सुरक्षित आहे. मुरबाड वनविभागालाही तातडीने याची माहिती देण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यात दोष नक्की कोणाचा ? मुरबाड आणि आसपासच्या परिसरात तसेच राज्यात इतरत्रही मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने समोर येत आहे. हा प्रश्न केवळ आमच्या रॉकीच्या कौतुकाचा नाही, तर एका गंभीर समस्येचा आहे. विकासाच्या नावाखाली आपण माणसांनी जंगले नष्ट केली, प्राण्यांचे हक्काचे घर हिरावून घेतले. जेव्हा त्यांचा अधिवास संपतो, तेव्हा अन्नाच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळणारच ! काल आमचा रॉकी होता ज्याने शौर्याने बिबट्याला पळवून लावले, पण उद्या तिथे एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूलही असू शकते, याला जबाबदार कोण ? वन्यजीवांवर रागवण्यापेक्षा आपण निसर्गाचा समतोल राखायला हवा, अन्यथा हे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही ! हा धोका मानव व अर्थातच सरकारच्या विकासाच्या नावावर उद्योगपती धार्जिण्या चुकीच्या योजनांना पाठबळ देण्यामुळे निर्माण झाला आहे हे मान्य करावेच लागेल. #RockyTheHero #SaveForests #RealHero #NatureBalance #Wildlife

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

72,779 просмотров • 1 месяц назад

📍नागपूर नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती देत आणि शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत असताना आज राष्ट्रीय महामार्ग ३५३डी वरील नागपूर-उमरेड विभागाच्या अंतर्गत नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक दरम्यान बांधण्यात आलेल्या ९९८ कोटी रुपये किंमतीच्या व ८.९० किमी लांबीच्या डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी, राज्याचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी, महापौर श्रीमती Nita Thakre जी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले. मला अतिशय आनंद होत आहे, की या उड्डाणपुलाला डॉ केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले. माझ्या सामाजिक जीवनातील कार्याची सुरुवात मी संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून केली. आजवर जे संस्कार मिळाले, आयुष्यात आज जे काही प्राप्त करू शकलो आहे, ते सर्व संघ आणि विद्यार्थी परिषदेने दिलेल्या संस्कारांमुळेच आहे. परमपूज्य डॉ. हेडगेवारजी आपल्या सर्वांचेच प्रेरणास्रोत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष पूर्ण करत आहे, या औचित्याने या उड्डाणपुलाचे नाव डॉ. केशव बळीराम हेडगेवार देण्याचे निश्चित करण्यात आले. नागपूरसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. नागपूरच्या विकासपर्वात एक अतिशय महत्त्वाचा अध्याय जोडला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी च्या नागपूर-उमरेड विभागात बांधण्यात आलेल्या या कॉरिडॉरचा प्रमुख उद्देश नागपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. प्रकल्पामध्ये दोन प्रमुख उड्डाणपूल, विद्यमान सक्करदरा उड्डाणपुलाचे एकत्रीकरण, आवश्यक भूतल मार्ग आणि प्रवेश/निर्गमनासाठी रॅम्पचा समावेश आहे. कमाल चौकापासून रेशीमबाग चौकापर्यंतच्या पहिल्या उड्डाणपुलामुळे आणि सक्करदरा ते दिघोरी चौक या दुसऱ्या उड्डाणपुलामुळे शहरातील प्रमुख ठिकाणची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. विद्यमान सक्करदरा उड्डाणपुलाला नवीन कॉरिडॉरशी जोडून, त्याची कनेक्टिव्हिटी सुधारण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण मार्गावर अधिक कार्यक्षम आणि सिग्नल-मुक्त वाहतूक प्रवाह शक्य होईल. या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये केवळ उड्डाणपुलांपुरती मर्यादित नसून पाचपावली येथे बांधलेले दोन रेल्वे ओव्हरब्रिज रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. याव्यतिरिक्त, कॉरिडॉरच्या बाजूने दोन रेल्वे अंडरब्रिज देखील विकसित केले जात आहेत, ज्यामुळे रेल्वे क्रॉसिंग आणि स्थानिक वाहतुकीमधील अडथळे कमी होतील. या प्रकल्पाचा सर्वात थेट परिणाम नागपूरच्या दैनंदिन वाहतुकीवर दिसून येईल. इंदोरा चौक ते दिघोरी चौक हा सुमारे ८.९ किलोमीटरचा प्रवास, ज्याला पूर्वी वाहतूक आणि सिग्नलमधील विलंबामुळे अंदाजे ४० ते ५० मिनिटे लागत होती, तो आता या सिग्नल-मुक्त उड्डाणपूल कॉरिडॉरमुळे अंदाजे १५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, अनावश्यक अडथळे दूर होतील आणि वाहनचालकांना वेळ व इंधन वाचविण्यात मदत होईल. प्रवाशांची सोय आणि स्थानिक कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन, या कॉरिडॉरवर दोन रॅम्प बांधण्यात आले आहेत. पहिला रॅम्प डागा हॉस्पिटलजवळ आणि दुसरा ताजबाग परिसरात आहे. हे रॅम्प उड्डाणपुलावरील वाहतूक आणि खालील विद्यमान रस्ते जाळ्यांमध्ये अखंडित वाहतूक सुनिश्चित करतील, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचणे सोपे होईल. या प्रकल्पाचे एक प्रमुख अभियांत्रिकी वैशिष्ट्य म्हणजे सम्राट अशोक चौकातील एकल-पायलट रचना. पाच प्रमुख रस्त्यांच्या महत्त्वाच्या जंक्शनवर विकसित केलेली ही रचना केवळ वाहतूक प्रवाह सुधारणार नाही, तर संपूर्ण कॉरिडॉरला एक विशिष्ट वास्तुशिल्पीय ओळख देखील प्रदान करेल. हा परिसर भंडारा रोड, ग्रेट नाग रोड, मेडिकल एरिया, रेशीमबाग आणि नागपूर बस स्थानकाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांना जोडलेला आहे, त्यामुळे सुधारित वाहतूक प्रवाहाचा शहराच्या दैनंदिन वाहतुकीला थेट फायदा होईल. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये एकूण २०७ स्पॅन असून त्यापैकी ४० स्पॅन अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्स्ड काँक्रीट (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आले आहेत. हा उड्डाणपूल आधुनिक बांधकाम तंत्र आणि प्रगत अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शहरी परिस्थितीत एक मजबूत, सुरक्षित आणि शाश्वत वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करणे शक्य झाले आहे. पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या सर्वांगीन विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PragatiKaHighway #GatiShakti #Nagpur #IndoraDighoriFlyover Krishna Khopde Mohan Mate Pravin Datke

Nitin Gadkari

47,871 просмотров • 20 дней назад

प्रसिद्धीपत्रक मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीचा ठाम प्रतिवाद; मोहमद कासीम अहमद आणि इतर तीन यांच्यामार्फत विवेक शुक्ला यांची महाराष्ट्र परिवहन विभाग व मराठी विरोधातली याचीका उच्चन्यायालयाने फेटाळली. मुंबई | २९ ऑगस्ट २०२६ रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. या प्रकरणात मोहमद कासीम अहमद यांच्या बाजूने रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी भाषा शिकण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद विवेक शुक्ला यांच्याकडून करण्यात आला. मराठी भाषेची सक्ती करू नये, अशी भूमिका त्यांच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्याला मराठी एकीकरण समितीच्या वतीने ठामपणे प्रतिवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर महत्त्व, १९६४ च्या महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियमाची पार्श्वभूमी, तसेच महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांचा मुद्दा समितीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला. मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना शासनाने यापूर्वीच कालावधी दिलेला असून, सध्या त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोहमद कासीम अहमद (अधिवक्ता शुक्ला ) यांची याचिका फेटाळून लावली. मराठी एकीकरण समितीच्या वतीने या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर स्थान आणि मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांची ठामपणे बाजू मांडण्यात आली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रमोद सुधाकर पार्टे, समन्वयक सुरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेचा सन्मान, कायद्याची अंमलबजावणी आणि महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांसाठी मराठी एकीकरण समितीची भूमिका यापुढेही ठाम राहील. १ वर्षाची मुदत आम्हाला मान्य नसून शासनाच्या १ वर्ष मुदतवाढीच्या मुद्द्यावर समिती उचित युक्तिवादासह लवकरच आपला पक्ष न्यायालयासमोर सादर करेल. परिवहन विभागाचा निर्णय परस्पर मुख्यमंत्री बदलत असून राज्यविरोधी कृती करून स्थगिती दिलीं आहे ती रद्द करून तात्काळ अंमलबजावणी सूचना सरकारला देण्यात याव्यात यासाठी पुढील आठवड्यात मा न्यायालयात समिती दाद मागेल. – मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

18,119 просмотров • 1 месяц назад