Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the 'Development Plan for Shree Kshetra Bhimashankar'. Minister Adv Ashish Shelar, MLA Dilip Walse Patil and other senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या'बाबत बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील...

33,067 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля CMO Maharashtra
CMO Maharashtra1 год назад

₹288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता; तातडीने अंमलबजावणीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या'बाबत बैठक संपन्न झाली. बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027 - गर्दी व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा) ₹288.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू ठेऊन येथे विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासाचे काम पूर्ण करावयाचे आहे, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, टाइमलाईन ठरवून काम सुरू करण्यात यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात 'इको टुरिझम' संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमण पथ तयार करावा. त्याचसोबत पर्यटक, भाविकांसाठी रोपवेची सुविधा विकसित करावी. निगडाळे येथे पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा — हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच येथे हेलीपॅड सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करावे. या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने द्यावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघर-भीमाशंकर महामार्ग हा सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलीस चौकी या परिसरात उभारावी. तसेच विनाखंड वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही या ठिकाणी द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकास कामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. भगवान शंकराचे हे सहावे ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे भीमा नदीचा उगमही आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच पर्यावरणीय व जैवविविधतेच्या दृष्टीनेही हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या बैठकीला मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @ShelarAshish @Dwalsepatil #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Фото профиля Nivedita purohit
Nivedita purohit1 год назад

@Dev_Fadnavis जय शंकर 🙏🏻

Фото профиля Nivedita purohit
Nivedita purohit1 год назад

@Dev_Fadnavis जय हरी विठ्ठल 🙏🏻

Фото профиля Suresh Kanwar
Suresh Kanwar1 год назад

मजबूत देवेंद्रजी, सुरक्षित महाराष्ट्र!

Фото профиля Krishna Barole
Krishna Barole1 год назад

देवेंद्रजी – शाश्वत सक्षमीकरणाचे पोशिंटर!

Фото профиля Harsha Patel 🇮🇳
Harsha Patel 🇮🇳1 год назад

@Dev_Fadnavis अतिशय छान निर्णय भीमाशंकरच्या विकासाला नवे बळ मिळेल.

Фото профиля Anand Patil
Anand Patil1 год назад

देवाभाऊ - नैतिक प्रशासन आणि प्रामाणिकतेचे champion

Фото профиля Aakash
Aakash1 год назад

! Devendra Ji - Guardian of safe travels for women

Фото профиля akash Tiwari
akash Tiwari1 год назад

Devendra Ji’s decision= A blessing for women

Фото профиля Manoj
Manoj1 год назад

Chutya vatlo kay amhi..adi english mg Marathi mg hindi tweet

Похожие видео

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting with representatives of drone manufacturing companies regarding the Maharashtra Unmanned Systems Policy. Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी महाराष्ट्र मानवरहित प्रणाली धोरण संदर्भात बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ड्रोन निर्माता कंपनियों के प्रतिनिधियों के साथ महाराष्ट्र मानवरहित प्रणालियां नीति के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕝2.30pm | 13-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.३० वा. | १३-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

31,699 просмотров • 6 дней назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding issues, development projects, and welfare schemes related to Navi Mumbai Municipal Corporation and Airoli Assembly Constituency Minister Ganesh Naik, Former MP Kapil Patil were present for the meeting 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील समस्या, विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांबाबत आढावा बैठक याप्रसंगी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार कपिल पाटील यांची उपस्थिती 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नवी मुंबई महानगरपालिका एवं ऐरोली विधानसभा क्षेत्र की समस्याओं, विकास परियोजनाओं और कल्याणकारी योजनाओं को लेकर समीक्षा बैठक इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, पूर्व सांसद कपिल पाटील इनकी उपस्थिति 🕝 2.30pm | 19-6-2025📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २.३० वा.| १९-६-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis Ganesh Naik Kapil Patil Navi Mumbai Municipal Corporation #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

19,331 просмотров • 1 год назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding preparations for BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar's MahaParinirvan Din. Mos Madhuri Misal and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य में पूर्व तैयारी के संबंध में समीक्षा बैठक। इस अवसर पर राज्य मंत्री माधुरी मिसाल एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕑 1.45pm | 2-12-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४५ वा. | २-१२-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Madhuri Misal #Maharashtra #DevendraFadnavis #MahaparinirvanDin

CMO Maharashtra

21,746 просмотров • 8 месяцев назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the '20-20 Investment Association'. Minister Uday Samant, MoS Indranil Naik, Chairman of 20-20 Investment Association Vera Trojan and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली '20-20 इन्व्हेस्टमेंट असोसिएशन' समवेत बैठक. मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, 20-20 इन्व्हेस्टमेंट असोसिएशनच्या अध्यक्षा वेरा ट्रोजन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में '20-20 इन्वेस्टमेंट असोसिएशन' के साथ बैठक। मंत्री उदय सामंत, राज्य मंत्री इंद्रनील नाइक, 20-20 इन्वेस्टमेंट असोसिएशन अध्यक्षा वेरा ट्रोजन एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕛 1.05pm | 6-10-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.०५ वा. | ६-१०-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Uday Samant Indranil Naik #Maharashtra #DevendraFadnavis #Investment

CMO Maharashtra

22,088 просмотров • 10 месяцев назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with Ajay Bhushan Pandey, Vice President, Investment Solutions, Asian Infrastructure Investment Bank (AIIB) regarding the infrastructure development and financial assistance. Concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक' (AIIB), च्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांच्यासमवेत पायाभूत सुविधा विकास आणि वित्तपुरवठा संदर्भात बैठक. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक' (AIIB), के इन्वेस्टमेंट सॉल्यूशंस के उपाध्यक्ष अजय भूषण पांडे के साथ बुनियादी ढांचे के विकास और वित्तपोषण के संदर्भ में बैठक। इस दौरान सबंधित अधिकारीगण उपस्थित थे। 🕧12.40pm | 31-7-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४० वा. | ३१ -७-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis AIIB #Maharashtra #DevendraFadnavis #AIIB

CMO Maharashtra

34,814 просмотров • 1 год назад