Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

अन् आज पण लालबागचा राजा हिंदुस्थानी मशिदीसमोर थांबला......आणि आपली वर्ष्यानुवर्षे चालत आलेली परंपरा कायम राखाली.

42,047 Aufrufe • vor 2 Tagen •via X (Twitter)

4 Kommentare

Profilbild von swapnil zambare
swapnil zambarevor 2 Tagen

मग फुले टाकली की Continental Heights मधून जे फेकले ते?

Profilbild von Dharma bhosale
Dharma bhosalevor 2 Tagen

भावनिक बंध आहे….

Profilbild von Aftab Mokashi
Aftab Mokashivor 2 Tagen

🫡🌹❤️❤️❤️

Profilbild von Nilesh Pawar ⚡
Nilesh Pawar ⚡vor 2 Tagen

फूलं टाकली का

Ähnliche Videos

तुळजापूरच्या देवीला मटणाचा नैवैद्य असतो हे आजवर फक्त ऐकून होतो, काल रात्री पाहण्याचा योग आला. नऊ दिवसाच्या आराधनेनंतर देवीला पहिला नैवैद्य हा मटणाचा असतो. तुळजापूर गावातील मानाच्या परड्या असतात त्यांच्या उपस्थितीत हा नैवेद्य ठेवला जातो. त्या नंतर मंदिर परिसरात प्रसाद म्हणून मटणाच्या पंगती बसतात अन् याने उपवास सुटला असं समजलं जात. आज संपूर्ण तुळजापूर शहरात घरोघरी बोकड असते अन् ही आजवर चालत आलेली परंपरा आहे. हे बोकड कालच रात्री मंदिरात आणून देवीला दाखवले जातात. जेवणाला पाहुणे-राहुळे बोलावले जातात. हे सगळं मला स्वतःला काल अनुभवता आले, सोबत फोटो-व्हिडीओ जोडतोय. कोणा शाकाहार प्रेमींना अजून शंका असेल तर त्यांनी पुढील वर्षी दसऱ्याला स्वतः येऊन पाहावे.

Vaibhav Kokat

88,300 Aufrufe • vor 1 Jahr

नाद निराळा ३२ शिराळा…🐍 सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा येथील नागपंचमी उत्सव जगप्रसिद्ध आहे. येथील जिवंत नागांच्या पूजेची परंपरा सुमारे १२०० वर्षांपासून चालत आलेली आहे. नागपंचमी हा सण शिराळा मध्ये नागाची पूजा यासाठी जगप्रसिद्ध होता पण हे सर्व अपेक्षित नव्हते. याच नाही तर कोणत्याच हिंदू संस्कृती सणाला हे असले अश्लील वर्तन करणाऱ्या बारबाला नाचवलं नाही पाहिजे.. यांना पैसे देऊन नाचवून आपली संस्कृती गहाण ठेवण्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी मदत करून चांगले कार्य केले पाहिजे. लाज वाटली सगळे व्हिडिओ बघून खरच हिंदू धर्म आपण जपतोय का ? महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का ? हेच कळत नाही 💔🥲 (1/6) #32shirala #nagpanchami #MaharashtraPolitics

Sachin More

15,856 Aufrufe • vor 1 Monat

🚨 नागरिकांचा संयम आता संपला आहे! प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, तर रस्त्यावर गाड्यांच्या काचा फुटणार… आणि त्याचे जवाबदार ट्राफिक पोलीस, Lward, आणि चांदीवली निवडून आलेले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी असणार. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर रोज ट्रॅफिकची समस्या! ट्रान्सपोर्टवाले रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करतात. “आमचा माल खाली झाला पाहिजे, आम्हाला दुसऱ्यांशी काही घेणं-देणं नाही” अशा पद्धतीने रस्त्याचा वापर सुरू आहे. याच रस्त्यावरून ट्रॅफिक पोलीस, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार सगळे जातात. पण या गंभीर समस्येवर बोलायला कुणीही तयार नाही! रस्त्यावरच गॅरेज, सर्व्हिस सेंटर आणि अवैधपणे गाड्या उभ्या करण्याचा प्रकार सुरू आहे. हे सगळं प्रशासन आणि ट्रॅफिक पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू असूनही कारवाई का होत नाही? हा प्रकार आता कुठेतरी थांबला पाहिजे! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police Ashwini Bhide Ritu Tawde Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardL

Mahendra Bhanushali

68,630 Aufrufe • vor 19 Tagen

सामनाचे कार्यकारी संपादक असताना प्रदीप भिडेंनी राऊतांची मुलाखत घेतली होती. यात राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राऊतांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. राऊतांची भाषा याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो पण ते राजकारणात आले नसते तर राजकीय भाषा आणि भाष्याची मात्र एक पोकळी आज दिसली असती. - राऊतांची एक स्टाईल आहे. पत्रकार म्हणून अफलातून लेखणी आहेच पण राऊतांच वक्तृत्व पण सडेतोड आहे. -हल्ली काही आक्षेपार्ह शब्द सोडले तर रौतांच्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर मार्मिक भाष्य असतं. टोमणे, टीका, शालजोडे, शेलक्या शब्दांची एक स्टाइल असते. ठाकरेंच्या शैलीनंतर आज कोणाच्या वक्तव्याची चर्चा होत असेल तर ती राऊतांच्या. - बाकी मतभेद मतमतांतरे चालत राहतील. आपण गुणदोषांसकट राजकीय व्यक्तीबद्दल बोलतो. तीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे/होती. चांगलं स्वीकारावं-पटत नाही ते सोडून द्यावं.. Sanjay Raut हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील आणि पत्रकारितेतलील एक प्रगल्भ /बहुआयामी बहारदार पान आहे. राजकीय सोडून द्या पण पत्रकारांनी त्यांची वृत्तपत्रातली भाषा, शब्दभांडार अभ्यासाव अस आहे.

Saurabh Koratkar

37,787 Aufrufe • vor 3 Monaten

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करण्यासाठी, देशभरातून आलेली अनेक बोधचिन्ह माझ्याकडे पाठवण्यात आली होती. त्यातील राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह मला आवडलं आणि ते निवडावं असं सुचवलं. साहित्य संमेलन समितीने देखील ते स्वीकारलं. आज पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बोधचिन्हाचे अनावरण झाले, या अनावरणाच्या प्रसंगी मी माझं छोटंसं मनोगत मांडलं, त्यातील काही महत्वाचे मुद्दे. १) महाराष्ट्राची साहित्याची परंपरा उज्वल आहे, साहित्य संमेलन भरवणारे देखील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावं. खरंतर अशा कार्यक्रमात काय किंवा साहित्य संमेलनात काय राजकारण्यांना बोलवायची गरज नाही. साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं असंच असलं पाहिजे. २) सध्या महाराष्ट्राची एकूणच परिस्थिती प्रचंड खालावली आहे, राजकारण्यांची भाषा तर प्रचंड खालच्या पातळीवर गेली आहे, अशा राजकारण्यांना साहित्यिकांनी चांगलच ठणकावलं पाहिजे. ३) महाराष्ट्रात सध्या वाट्टेल ते सुरु आहे. नेते जाळ्यांवर उड्या काय मारत आहेत, खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत. ४) देशाला विचार देणारा, दिशा देणारा आपला महाराष्ट्र होता, पण तो आज कुठल्या खालच्या थराला येऊन थांबला आहे? रोज सकाळी उठून वाट्टेल ते बोलणारे, वाट्टेल त्या भाषेत बोलणारे, राजकीय नेते दिसत आहेत. आणि महाराष्ट्राच्या या अधःपतनाला दूरचित्रवाणीच्या वाहिन्या पण तितक्याच जबाबदार आहेत. आपण काहीही बोललो तरी ते दाखवलं जातं हे माहित असल्यामुळे हे नेते वाट्टेल ते बोलत सुटलेत. आज जी मुलं लहान आहेत, ज्यांना राजकारणात यायचं आहे अशा मुलांना वाटत राहणार, असं अद्वातद्वा, अर्वाच्य बोलणं म्हणजेच राजकारण. म्हणूनच साहित्यिकांनी राजकारण्यांचे कान धरले पाहिजेत आणि साहित्यिकांनी आपण ट्रोल होऊ याची भिती अजिबात बाळगू नये. तुम्ही बोललंच पाहिजे. साहित्य संमेलनं होतील, पुस्तकं येतील, आम्ही ती वाचत राहू, पण अशा प्रकारची साहित्यिक चळवळ उभी करावी लागेल की, ज्यातून राजकारणातील घसरणारी भाषा ही सुधारली पाहिजे. ५) साहित्यिकांनी राजकारण्यांना सांगायचं की, त्यांनी काय करावं आणि राजकारण्यांनी ते ऐकावं अशीच परिस्थिती असली पाहिजे.

Raj Thackeray

47,815 Aufrufe • vor 2 Jahren

2023 मध्ये चित्रा वाघ यांनीच व्हिडिओमध्ये भाजप आणि प्रधानमंत्री मोदीमूळ महिला आरक्षण बिल पास झाल्याचं सांगितलं होतं… आणि आज 2026 मध्ये त्याच विषयावर काँग्रेसमूळ “महिला आरक्षण मिळालं नाही” म्हणून गळा काडत आहेत…! मग खरं काय? तेव्हाचं विधान की आत्ताचं आसू आंदोलन? जनतेने आता फक्त टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर प्रश्न विचारायचे आहेत. कारण राजकारणात भूमिका बदलणं वेगळं… आणि लोकांना चुत्या समजणं वेगळं. अशा दुहेरी भूमिकांवर प्रतिक्रिया देताना, आपली पातळी सोडून उत्तर द्यावं वाटत पण मंग अश्या डब्बल स्टॅंडर्ड लोकांन मध्ये आणि आपल्यात काय फरक उरणार म्हणून...आवरत घेतो! बाकी दोन्ही विडिओ खाली जोडलेत पाहून घ्या 👇

Anilkumar Gitte-INC

10,829 Aufrufe • vor 5 Monaten

पंढरपूरच्या विठ्ठल- रखुमाई मंदिरात फक्त विठ्ठलाची मूर्ती नसून त्याच्या बाजूला रखुमाईचीही मूर्ती आहे. अन् वारीमध्ये वारकरी विठोबा-रखुमाईचा जप करीत जातो. वारकऱ्यांना 20 हजार रूपये अनुदान देणाऱ्या सरकारला हे माहितदेखील नाही. विठोबाच्या बाजूला रखुमाई नसेल तर ती मूर्ती अर्धीच राहते. आज मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आलेली गाडी अन् त्यात एकटा असलेला विठोबा, हे चित्र बघून मी अस्वस्थ झालो. या सरकारला साधी ऐतिहासिक परंपराही माहित नसावी, हे दुर्दैवी आहे. अयोध्येत राम एकटा... श्री रामासोबत सीताराम आणि लक्ष्मण असे चित्र सर्व मंदिरांमध्ये पहावयास मिळते. पण, राममंदिरात फक्त विठ्ठल पहायला मिळतो, यांच्या आधुनिक विठ्ठल मंदिरात एकट्याच विठ्ठलाला उभे करतील. "युगे अठ्ठावीस विटेवर उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा" ही पंक्ती सगळेच जण म्हणतात. त्यातील रखुमाईच त्यांनी गायब करून टाकली आहे. केंद्रात असो अगर राज्यात यांच्या मनात पुरूषप्रधान संस्कृती यांच्या मनामध्ये कशी भरली आहे, हेच दाखवून देताहेत. या पुरूषप्रधान संस्कृतीचा जन्मच मनुस्मृतीतून झाला आहे. त्यामुळे मनुस्मृतीची पकड यांच्या डोक्यावर अन् ज्ञानावर किती आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे. हा खरंतर सर्व वारकऱ्यांचा अपमान आहे. विठोबा - रखुमाईला एकत्र पुजणार्‍या अन् त्यांच्या दर्शनासाठी भक्तिरसात तल्लीन होऊन जाणाऱ्या वारकऱ्यांना पैशापेक्षा श्रद्धा महत्वाची आहे. आज तुम्ही त्यांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. वारी फक्त विठ्ठलासाठी नसते तर ती विठोबा - रखुमाईसाठी असते.

Dr.Jitendra Awhad

62,510 Aufrufe • vor 2 Jahren

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

100,502 Aufrufe • vor 1 Jahr

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. १) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे. २) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे. ३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे. ४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे ५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही. ६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं. ७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

54,506 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 Aufrufe • vor 5 Monaten

"इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!" तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास. पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे. पण आता… "विकास" या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे! इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार? 📌 विकास म्हणजे वारसा संपवणं नाही! 📌 छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे – ती संस्कृतीवरची तोडफोड आहे! 📌 आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो? उद्या कदाचित सांगावं लागेल – "इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!" --- आता आवाज उठवा! ही फक्त वास्तू नाही – हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे. मंदिर वाचवण्यासाठी, हा पोस्ट शेअर करा. #SaveTuljabhavaniTemple हा हॅशटॅग वापरून तुमचा आवाज पोहोचवा. #तुळजाभवानी #तुळजापूर #इतिहासाचेसंवर्धन #Heritage #SaveTuljabhavaniTemple #MarathaHistory #CultureUnderThreat #StopHeritageDestruction ---

Dr.Jitendra Awhad

60,060 Aufrufe • vor 1 Jahr