正在加载视频...

视频加载失败

आदल्या दिवसापर्यंत आळंदीचे 4ही पूल पाण्याखाली असताना पालखी कशी निघेल वाटले होते. आणि दुसऱ्या दिवशी पालखी त्याच पाण्याखाली गेलेल्या पुलावरून पंढरपूरला प्रस्थान... काही प्रश्नांना उत्तरे नसतात. ते घडतात...

21,239 次观看 • 1 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

📍संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरीक्षण दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी या उद्देशाने श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) कामाचे आज राज्याचे कृषीमंत्री श्री Dattatray Bharane जी, आमदार श्री Rahul Subhash Kool जी, माजी आमदार श्री Harshvarrdhan Patil जी यांच्यासह निरीक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) हा पाटस ते पंढरपूर असा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ४,४१६ रुपयांच्या तरतुदीतून उभारण्यात येत असलेला हा मार्ग वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात येत आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. २ व ३ वर सुमारे ४०० वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल. महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास २५ तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या २५ गावांना याचा फायदा झाला आहे. याठिकाणी आवर्जून स्व. अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास २ लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantTukaramMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

14,005 次观看 • 3 个月前

📍संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरिक्षण लाखो वारकऱ्यांची ‘वारी’ सुखकर व आल्हाददायक व्हावी, या उद्देशाने पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) कामाचे आज निरिक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी वाहन संस्था, अरूंद रस्ते, वाढती वाहतूक आणि विशेषत: दिवे घाटाचा अरूंद, कठीण व धोकादायक टप्पा यांसारख्या विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूर आणि पुढे मोहोळ ते वाखरी असा सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जो पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येत असलेल्या या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट आणि दिवे घाट ते हडपसर अशा ६ पॅकेज मध्ये करण्यात येत आहे. यापैकी ४ पॅकेजचे काम पूर्ण झाले असून धर्मपूरी ते लोणंद काम अंतिम टप्प्यात आहे, तर दिवे घाट ते हडपसर या पॅकेजचे ६५% काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या भागांना बायपास करत जलद आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतो. या मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदयात्रा मार्ग उभारण्यात आला असून, यामुळे वारकऱ्यांची वारी आता अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित झाली आहे. विशेषत: दिवे घाट विभाग-२ वरून ४-लेनमध्ये रूंद आणि मजबूत करण्यात येत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल. यासोबतच उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सक्षम करण्यात आला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर याठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या हेतूने माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक विहीर, वेळापूर येथील पुरातन लेणी व वाखरी जवळील बाजीराव विहीर या ऐतिहासिक स्थळांचे जतन करून प्रगती व संस्कृतीची सांगड घालण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम करताना सोलापूर व सातारा जिल्ह्यांत बुलढाणा पॅटर्नच्या धर्तीवर जवळपास ४३ तलावांचे खोलीकरण करून तेथील मुरुम, माती महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आली आहे. यामुळे अतिरिक्त जलसंचय झाला असून तेथील पाणी पातळीत वाढ झाली आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantDnyaneshwarMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

32,268 次观看 • 3 个月前