正在加载视频...

视频加载失败

आशा विषयासाठी खासदार दिल्लीला पाठवला जातो. अतिशय महत्त्वाचा विषय संसदेत मांडला या खासदाराने. 🙏 धन्यवाद या खासदाराला🙏

16,027 次观看 • 6 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांति 🙏🏽 #GirishBapat

Devendra Fadnavis

238,634 次观看 • 3 年前

|| देवा माझा पाठीराखा 🙏❤️|| उद्याची आषाढी, माझा विठुराया मला आजचं पावला.... डोळ्यात आनंदाश्रु आहेत. ट्विटरच्या या अथांग आभासी विश्वात आज जेव्हा ‘Follows You’ ही चिमुकली अक्षरे तुमच्या नावापुढे झळकली, तेव्हा मन अगदी भरून आले! तो केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा ‘फॉलोबॅक’ नाही, तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुम्ही दिलेली ती एक अनमोल पावती आहे. आपल्यासारख्या उत्तुंग आणि अष्टपैलू नेतृत्वाने, ज्यांच्या खांद्यावर अखंड महाराष्ट्राच्या ध्येय-धोरणांची धुरा आहे, त्यांनी माझ्यासारख्या लहानाकडे लक्ष देऊन जोडलेला हा स्नेहाचा धागा अत्यंत भावूक करणारा आहे. शब्दांच्या पलीकडचा हा आनंद आणि ही दातृत्वाची भावना खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे हे आपुलकीचे पाऊल मला सदैव प्रेरीत करत राहील. धन्यवाद देवाभाऊ 🙏

शुभम कराड

103,781 次观看 • 1 个月前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील आयोवा राज्याच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे झालेला सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी आणि आयोवा राज्यासाठीही महत्त्वाचा टप्पा आहे. आयोवा हे अमेरिकेत "कॉर्न स्टेट" म्हणून ओळखले जाते, तर महाराष्ट्र हे भारतातील एक महत्त्वाचे कृषीप्रधान राज्य आहे.या करारातून आधुनिक शेतीतंत्रज्ञान, सिंचन पद्धती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी मार्केट लिंकेज यामध्ये सहकार्य होणार आहे.ड्रोनद्वारे पिकांचे निरीक्षण, प्रिसिजन फार्मिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. आयोवा मध्ये बायोटेक रिसर्च आणि उत्पादन यामध्ये खूप काम आहे.महाराष्ट्रातील पुणे, मुंबई सारख्या शहरांतील बायोटेक कंपन्यांसोबत संयुक्त संशोधन प्रकल्प राबवले जातील.कृषी क्षेत्रासोबतच आरोग्य आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांनाही गती मिळेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान मिळेल.संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात आदान-प्रदान होऊन विद्यार्थ्यांना व संशोधकांना नवी संधी मिळेल.परकीय गुंतवणूक वाढेल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा करार म्हणजे महाराष्ट्र आणि आयोवा यांच्यातील केवळ आर्थिक देवाण-घेवाण नाही, तर ज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती आणि विकासदृष्टी यांचा संगम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राला जागतिक भागीदारीचे दार उघडले गेले आहे. भविष्यात या करारातून महाराष्ट्र "ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन" म्हणून अधिकच सक्षम होईल, यात शंका नाही. Devendra Fadnavis साहेब खूप खूप धन्यवाद ❤️🙏

शुभम कराड

25,131 次观看 • 11 个月前

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता अजून पूर्ण झाला नाही, पण पुलाचा काँक्रीट मात्र आधीच हार मानताना दिसतो आहे. | 3 ऑगस्ट 2026 | मी बोललो म्हणून राग येत असेल, तर एकदा या पुलाकडेही बघा. प्रश्न माझ्या शब्दांचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलाची ही अवस्था पाहून अनेक प्रश्न निर्माण होतात. पुलाच्या खालच्या बाजूचा काँक्रीटचा काही भाग निखळलेला दिसत आहे. सुदैवाने तो कोणाच्या अंगावर पडला नाही; पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईल, याची कोण हमी देणार? NHAI NHAI RO MUMBAI MORTHRoadSafety Nitin Gadkari President of India Shivendrasinh A Bhonsle कोट्यवधी रुपयांची कामे जर काही वर्षांतच अशी दिसू लागली, तर जबाबदारी कोणाची? नागरिकांनी टोल भरायचा, पण बदल्यात सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार की नाही ? Raigad District Collector रायगड पोलीस-Raigad Police ही बाब केवळ डागडुजी करून संपवण्याची नाही. स्वतंत्र तांत्रिक तपासणी, दोषींची जबाबदारी निश्चित करणे आणि संपूर्ण पुलाची सुरक्षा तपासणी होणे गरजेचे आहे. अपघात झाल्यावर चौकशी करण्यापेक्षा, अपघात होण्यापूर्वी कारवाई करणे हेच खरे प्रशासनाचे कर्तव्य आहे. हा काही साधा सर्व्हिस रोड नाही. मुंबई ते अलिबाग या पर्यटन मार्गाचा हा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. अशा ठिकाणी पुलाचा स्लॅब निखळलेला दिसत असेल, तर हा फक्त बांधकामाचा दोष नाही; हा नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. Vc - स्थानिक जागरूक नागरिक धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoahighway #wadkhal #alibag #todays #August2026 #preventionisbetterthancure

Er. Chaitanya Usha Laxman Patil

33,101 次观看 • 26 天前

महामार्गाचे यश उद्घाटनाने ठरत नाही; ते गुणवत्तेने, सुरक्षिततेने आणि नागरिकांच्या विश्वासाने ठरते. MORTHINDIA NHAI “मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ३१ जून,३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,” असे वारंवार सांगितले जाते. पण एक प्रश्न आहे—नेमके कोणत्या वर्षी? Nitin Gadkari MORTHRoadSafety Indian Road Safety Council NHRC India सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- झाराप झिरो पॉईंट, सावंतवाडी येथे नव्याने बांधलेल्या पुलावरील Reinforced Earth (RE) Wall च्या पॅनेलची डागडुजी सुरुवातीलाच करावी लागत आहे. काही ठिकाणी सिमेंट लावून दुरुस्ती सुरू असल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर पुढील भागात भिंतीमध्येही विकृती दिसत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. प्रश्न असा आहे की, नव्याने उभारलेल्या संरचनांवर इतक्या लवकर दुरुस्तीची वेळ का यावी? कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची? सर्वसामान्य नागरिकांना या त्रुटी सहज दिसतात; मग संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयाच्या नजरेत या बाबी का येत नाहीत? Shivendrasinh A Bhonsle CMO Maharashtra Pratap Baburao Sarnaik मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही; तो कोकणच्या विकासाचा, पर्यटनाचा, व्यापाराचा आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा जीवनदुवा आहे. त्यामुळे या महामार्गावरील प्रत्येक पूल, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक किलोमीटरची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे महामार्गावरील अनेक कामे अद्याप सुरू आहेत, तर दुसरीकडे टोल वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात स्वाभाविकच प्रश्न निर्माण होतो—पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार महामार्ग मिळण्यापूर्वी टोल आकारणी कितपत योग्य आहे? आश्वासने नव्हे, दर्जेदार आणि सुरक्षित मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हवा! व्हिडिओ चित्रीकरण : सर्वेश पेडणेकर धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक

Er. Chaitanya Usha Laxman Patil

11,755 次观看 • 1 个月前