Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

आशिष शेलारांनी मान्य केली वोटचोरी, आणि फडणवीसांना ठरवलं ‘पप्पू’!

14,199 Aufrufe • vor 8 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

मुंबईतील प्रभाग १८० मध्ये झालेल्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन केल्याने लाठीचार्ज! प्रभाग १८० च्या मतमोजणी केंद्रावर काँग्रेसचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या निदर्शनास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार आला. दोन ईव्हीएम मशीनचे सील तोडलेले होते आणि त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अनिवार्य स्वाक्षरी देखील नव्हती. आम आदमी पार्टी आणि एमआयएमच्या उमेदवारांनीही यावर तीव्र आक्षेप घेत आंदोलनात भाग घेतला. याबाबत प्रश्न विचारले असता, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली, पण जबाबदारी मात्र झटकली.. इतकंच नाही तर मतमोजणी थांबवली नाही.यातून मतचोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत केली! काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ईव्हीएमचे सील तुटल्याचे मान्य करून मतमोजणी थांबवावी ही मागणी केली. ही बेकायदेशीर कृती सुधारण्याऐवजी, निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी बळाचा वापर केला,कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या लोकशाहीविरोधी सरकारच्या दबावाखाली काम करत, पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला, जे केवळ निवडणूक गैरप्रकारांविरुद्ध निषेध करत होते. निवडणूक अधिकाऱ्यांचे पक्षपाती वर्तन आता सर्वांसमोर आले आहे. ही उघडपणे केलेली मतचोरी आहे. प्रभाग १८० चा निकाल आम्हाला मान्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन का झाले आणि कोणतीही कारवाई का केली गेली नाही, याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले पाहिजे.

Prof. Varsha Eknath Gaikwad

38,931 Aufrufe • vor 6 Monaten

दि. १८ मे २०२६ सुधा पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंगची आज स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काही सामाजिक तत्त्व, दिव्यांगांसाठी असलेल्या स्टॉल्समध्ये अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री केली जात असल्याचे आढळताच, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ड्रग्सच्या अड्ड्याचे निष्कासन केले. या दौऱ्याची काही क्षणचित्रे… #SudhaPark #ActionMode #OnField #DrugFreeMumbai #SayNoToDrugs #StrictAction #BMCAction #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ameet Satam माझी Mumbai, आपली BMC

Ritu Tawde

11,612 Aufrufe • vor 2 Monaten

आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली परभणीच्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत ही किरकोळ असून, त्यांना एक कोटींची भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी. परभणी प्रकरणात चौकशी करून ज्यांनी निरपराध नागरिकांना क्रूरपणे मारहाण केली आहे. अशा पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदवली गेली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली ती मागणी त्यांनी मान्य केली आहे. आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थांच्या DBT संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

Prakash Ambedkar

12,113 Aufrufe • vor 1 Jahr