Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

उद्योग धंदे म्हणजे गुजरात्यांचे मरवाड्यांचेच… पण आता हे समीकरण हळू हळू बदलताना दिसत आहे… हॉटेल व्यवसायात,कपड्याच्या,इतकच नाय तर चहाच्या व्यवसायात ही हळू हळू मराठी माणूस हे सगळे उद्योग धंदे काबीज करताना दिसत आहेत… अशीच मराठी माणसाची घोडदौड चालू राहूदेत….

19,334 просмотров • 4 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

गेल्या पंधरा दिवसांपासून रहेजा बिल्डर विरुद्ध राहुल जाधव असा संघर्ष सुरू आहे. जर मनसे पदाधिकारी आणि नेते 'मराठी माणूस, मराठी माणूस' म्हणतात त्यांना सांगायचे आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मराठी माणसासाठीच गेले होते. मनसेला बौद्ध राहुल जाधव हे मराठी आहेत हे दिसत नाही का? मनसेचे लोकं गरिब लोकांना मारत असतात ते श्रीमंत बिल्डरच्या विरोधात आवाज उठवणार का? याविरोधात आवाज उठवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिस रहेजा बिल्डरला अटक का करत नाही? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. यानंतर पोलिसांकडून स्नेहल सोहनी आणि सागर गवई यांना बेकायदेशीररित्या अटक केले तेव्हा कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मनसे मराठी माणूस म्हणते, तेव्हा त्यांना हे मराठी माणसाचे प्रश्न दिसत नाही का? बौद्ध समाजाचे राहुल जाधव हे मराठी व्यक्ती दिसत नाही का? मनसे फक्त गरीब अमराठींना विरोध करणार का? जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल. : चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Mumbai #मुंबई #VBAForMumbai

Vanchit Bahujan Aaghadi

16,090 просмотров • 8 месяцев назад

ही व्यक्ती शिक्षक आहे म्हणे..म्हणजे MPSC विद्यार्थ्यांना हे शिकवतात...हे कोणावर तरी चिडले आहेत..आणि त्यावर बोलताना त्यांनी वाक्य वापरले... आपल्या बापाचा पत्ता नाही, आपल्या बापाचा चेहरा जुळत नाही! हे वाक्य प्रचंड आक्षेपार्ह आहे..ही व्यक्ती ज्याला शिव्या देते त्याच्या आईच्या थेट चारित्र्यावर संशय घेत आहे! प्रश्न MPSC पेपर लीक आहे अशा वेळी टीका करताना थेट एका बाईच्या चारित्र्यावर घसरायचे? हा माणूस शिक्षक असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांचा खरे नाही! असा माणूस सरकार आणि मुख्यमंत्र्यां बरोबर चर्चा करतो ? सगळं घाण आहे... मला लज्जा वाटली आणि भावना ही दुखावल्या गेल्या आहेत.. पण उपयोग नाही! #घाण #शिक्षकम्हणे

Rashmi Puranik

30,219 просмотров • 1 месяц назад

मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातल्या मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला म्हणून मला पोलिसांनी गृहखात्याच्या दबावात अटक केली, इतकंच नाही जवळपास दीड हजार महाराष्ट्र सैनिकांना देखील अटक झाली. इतकं सगळं होऊन देखील मोर्चा झालाच. कारण हा मोर्चा मराठी माणसांनी हातात घेतला. त्यामुळे स्थानिक आमदार जो मराठी द्वेष्टा आहे त्याला चांगलाच धडा शिकवला गेला. पोलीस मराठी द्वेष्टया अमराठी व्यापाऱ्यांना मोर्च्याला परवानगी देतात पण मराठी माणसाला देत नाहीत याला काय अर्थ आहे ? त्यांचा जर १० माणसांचा मोर्चा निघाला तर मराठी माणसांचा १०० माणसांचा मोर्चा निघेल हे लक्षात घ्या. पोलिसांनी महाराष्ट्र सैनिकांना अटक करताना कोणतेही संकेत पाळले नाहीत. महिला महाराष्ट्र सैनिकांना शब्दशः रिक्षात कोंबून नेलं गेलं. कुठे गेला आता महिलांचा सन्मान? लाडकी बहीण म्हणवता आणि बहिणींना असं वागवता ? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काहीही सांगू देत, पण मोर्चा होऊ देऊ नका असा पोलिसांवर दबाव होता आणि हा दबाव होता हे मला अधिकाऱ्यांनीच सांगितलं. मीरा-भाईंदरमधल्या मराठी द्वेष्टया आमदाराने आणि एकूणच मराठी द्वेष्ट्या सरकारने लक्षात ठेवावं की आता मराठीच आंदोलन हे मराठी माणसांनी हातात घेतलं आहे आणि हे आंदोलन चिरडायचा प्रयत्न कराल तर राज्यभर मराठी माणूस पेटून उठेल... पक्षाचे नेते श्री. अविनाश जाधव यांची जवळपास ११ तासांनी सुटका केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी साधलेल्या संवादाचा सारांश... #मराठी #मीरा_भाईंदर #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

15,313 просмотров • 1 год назад