Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

उमर खालिद आणि शारजील इमाम यांचा बेल रिजेक्ट झाल्याचं खूप दुःख होतंय यांना .... Aaditya Thackeray

45,423 просмотров • 7 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

माननीय नामदेव शास्त्रींजी, आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांना भेटल्यावर खूप अवस्थ वटलं. काय दोष होता ह्या भाबड्या जिवांचा? का वडलांचे छत हिरावून घेतलं गेलं यांचं? आम्हीत् यांचे पुरावे पाहिले. नंतर आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांचे balance sheet पाहिले आणि केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले, वीडियो पाहिले. मी एसपी ना, ADG, DG, मुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हाई कोर्ट च्या चीफ जस्टिस यांना पुरावे सादर केले. दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत त्यांच्या बरोबर मी हे पाठवत आहे. कृपया ते पहावे ही विनंती आणि… वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख देखील आपण पाहावे ही नम्र विनंती

Mrs Anjali Damania

46,664 просмотров • 1 год назад

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

100,502 просмотров • 1 год назад

गद्दारांना, पळपुट्यांना आम्ही मत का द्यावे? : महाराष्ट्रातील तरुणांचा सवाल. कितीही म्हटले तरी स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी राजकारणाचा सबंध येतोच. आपले सर्व निर्णय राजकारणीच घेतात त्यामुळे सत्तेत योग्य व्यक्तींना बसविणे आपले कर्तव्य आहे. पण जेव्हा आम्ही भाजपच्या अन्यायकारक धोरणांना विरोध करून, विरोधी पक्षाकडे आशेने बघतो तेव्हा तेही फक्त घराणेशाही, सारंजामशाहीतील श्रीमंत व्यक्तींना उमेदवारी जाहीर करताना दिसत आहेत. मग समाजातील गरीब तडफदार होतकरू तरुण तसेच खंदे आणि एकनिष्ठ कार्यकर्ते यांना मुख्य राजकीय पक्षांकडून कधी तिकीट मिळणार? #इंदापूर मधील घटना आहेच पण #बुलडाणा येथील एका मंत्र्यांची मुलगी साहेबांकडे तिकीट मागायला गेली म्हणे...पण तिचे कर्तुत्व काय? राज्यात विविध जिल्ह्यात श्रीमंत राजकारण्यांना पायघड्या अंथरण्यात येत आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यापुरते मर्यादित ठेवले जात आहेत. हरियाणा मधील काँग्रेसच्या पराभवाच्या निमित्ताने का होईना #महाविकास_आघाडी मधील नेत्यांच्या डोळ्यात अंजन नक्कीच गेलं असेल. जर तुम्ही वंचितांच्या विकासाच्या गोष्टी करत आहात, तर राज्यातील वंचित घटकातील उमेदवारांना तिकिटे मिळालीच पाहिजेत. फक्त इलेक्टिव मेरिट बघून श्रीमंतांना किंव गद्दारांना तिकीट दिली जात असतील तर भाजपलाच आम्ही व्होट का करू नये? असा आमचा सवाल आहे. निखिल वागळे सरांचे या अप्रतिम विश्लेषणासाठी धन्यवाद. nikhil wagle Sharad Pawar Supriya Sule Aaditya Thackeray Devendra Fadnavis Rohit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Jayant Patil- जयंत पाटील Nana Patole Vijay Wadettiwar Balasaheb Thorat Dr.Jitendra Awhad ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Prakash Ambedkar Raj Thackeray .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

10,126 просмотров • 1 год назад

इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो 🔥 ~ मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. ज्याला शिव्या दिल्या, कपटी कारस्थानी म्हंटलं, अनाजी पंत म्हंटलं, जातीवरून, शरीरावरून हिणवलं त्याच बामनानी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठ्यांना समजून घेतलं.. इतके मराठा मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राच्या इतिहासात पण एकानेही नोंद घेतली नाही. शिंदेंनी दिलं कारण फडणवीस होते त्यांच्या पाठीशी. अभ्यास त्यांचा होता आणि पाहिलं दिलेलं आरक्षणही त्यांचंच होतं. सही मात्र शिंदे साहेबांची होती त्यावेळी मुख्यमंत्री असल्या कारणाने. इतकी षडयंत्र रचली गेली पण फडणवीस मात्र खचले नाहीत. आतल्यांनी रचलेल्या कटाचं दुःख आहे पण हेच तर खरं राजकारण आहे. इतकं घाण बोलल्यानंतरही एकदा सुद्धा Devendra Fadnavis यांनी आपला संयम सोडला नाही. शांतपणे सगळं सहन केलं.. यानंतरही घाण बोलले तर देव आहे आणि तुम्ही आहात. उत्तर तर देवाला द्यायचंय. आता तरी त्यांच्या आई, बायको आणि मुलीला घाण बोलू नका 🙏 श्रेयाची लढाई कालही नव्हती आजही नाही आणि पुढे कधी असणारही नाही.. कुठल्याही समाजाकरता केलेलं कार्य म्हणजे उपकार नसतात ती जवाबदारी असते. पण जेंव्हा समाजाला केलेल्या कार्याचा विसर पडतो तेंव्हा त्याची आवर्जून आठवण करून द्यावी लागते. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन.. त्यांनी विषय लावून धरला कसाही का असेना.. राज्यात कुणाचं कल्याण होतंय हे महत्वाचं 🚩 शिका, मोठे व्हा 🚩 Sharad Pawar Office of Uddhav Thackeray Prithviraj Chavan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar Supriya Sule

Sunaina Holey

26,790 просмотров • 1 год назад

#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघा : महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड केला होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांचा नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृहाला देत आहेत. तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत. आम्ही आधी आणि आताचे सरकार असताना दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की महाविकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही. पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करताना आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल.. दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!! "गिरे तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल. Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Dilip Walse Patil Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Vijay Wadettiwar Prakash Ambedkar Kailas Patil Kunal Raut Nana Patole Abhimanyu Pawar Shivaani Wadettiwar 🇮🇳 भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Maharashtra Youth Congress

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

38,167 просмотров • 2 лет назад

या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात Tata Consultancy Services चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी. 2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही. Tata Consultancy Services ला काळ्या यादीत टाका Devendra Fadnavis @OfficeOfDevendra CMO Maharashtra Vijay Wadettiwar Rohit Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police लातूर पोलीस-Latur police AAP महाराष्ट्र ABP माझा @Dhananjay_AAP Ambadas Danve Kunal Raut LoksattaLive Nana Patole Kailas Patil ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivaani Wadettiwar 🇮🇳 TV9 Marathi Aaditya Thackeray Conquer

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

26,833 просмотров • 2 лет назад

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना आज LAW ENFORCMENT AGENCY ने त्यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी नोटीस बजावली. ही आता एक नवीन संस्था जन्माला आलेय, 'कायदा अंमलबजावणी संस्था!' म्हणजे, भारतात अद्याप कायद्याची अंमलबजावणी होतच नव्हती, असे या संस्थेच्या नावावरून दिसतेय. आल्या - आल्या त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच हल्ला केला. सतीश आचार्य यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र हे खूप बोलके असायचे. जसे म्हणतात ना, "जे ना देखे रवी, वे देखे कवी" तसेच आहे. एखादी गोष्ट अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचे साधन म्हणजेच व्यंगचित्र! पण, घाबरवणारी परिस्थिती निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव दिसतोय. कालच मी पत्रकार परिषद घेत असताना, माझ्या घरातच माझ्या समोर एक माणूस शूटींग करीत होता. कालांतराने मला समजले की तो माणूस पोलीस होता. त्या पोलिसाला मी विचारले तर त्याने सांगितले, मला वरिष्ठांनी शुटींग करायला पाठविले होते. एकूणच व्यक्त होणारे जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते बंदच करून टाकायचे; हा प्रयत्न सरकारचा दिसतोय. त्यामध्ये, लेखक, कवी , पत्रकार या सर्वांचा समावेश केला आहे. आता तर पत्रकारांना मंत्रालयाच्या तळमजल्याच्या वर जाताच येणार नाही. किंबहुना, गेटमधूनच आत येणे मुश्कील होणार आहे. पत्रकारांपासून लपवण्यासारखे मंत्रालयात काय आहे? अशा कुठल्या गुप्त गोष्टी घडणार आहेत की त्या पत्रकारांपासून लपविल्या पाहिजेत. हे जरा अतीच होतंय, इतकी दहशतीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करू नका. महाराष्ट्राने कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत स्वातंत्र्याला महत्व दिले आहे. संविधानाचा इथे नेहमीच सन्मान केला गेला आहे. या संविधानात समावेश असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खातमा होईल , अशी कृती महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला घातक असेल. कारण, सर्वात विद्रोही माणसे महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेव्हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तेव्हा क्रांतीची आग भडकली आहे.

Dr.Jitendra Awhad

25,110 просмотров • 1 год назад