Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

एवढंच शिल्लक राहील होत... तरीपण जबरदस्त एडिटिंग...

101,505 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाणी देण्याची विनंती केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उन्हाळ्यात नेहमी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. आपल्याकडून पाणी गेल्याशिवाय कर्नाटकमधील सुरुवातीच्या लोकसंख्येला पाणी मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत दोन-अडीच महिने जिकीरीचे जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारकडून तिथल्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी नकार कोणीही देत नाही. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली असेल तर राज्यातील पाण्याची शिल्लक पाहून, महाराष्ट्रातील लोकसंख्येची पाण्याची आवश्यकता पाहून राज्य सरकार निर्णय घेईल, असे ते म्हणाले. Jayant Patil- जयंत पाटील

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

11,797 Aufrufe • vor 3 Jahren

माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या मनात एक प्रश्न कायम पडतो की, गुटखा कायमस्वरूपी बंद का होत नाही? छोट्या-छोट्या टपऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा थेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई का होत नाही? या प्रश्नाचं सविस्तर आणि विचार करायला लावणारं स्पष्टीकरण तुकाराम मुंडे सरांनी दिलं आहे. हा विषय प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. एकदा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमचं मतही नक्कीच मांडा..! Tukaram Mundhe धन्यवाद सर एक वाक्य खूप महत्वाचे आहे, मला स्वतः साठी करायचे यावर आपण ठाम राहिलो तर आपलं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहील. Abhijit Karande धन्यवाद अभिजीत सर या मुलाखती साठी. या मुलाखती मधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..! Mumbai Tak

Shubham Jatal

81,124 Aufrufe • vor 2 Monaten

जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वल! मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते महाराष्ट्राला 'राष्ट्रीय जल पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे आभार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था म्हणून नवी मुंबईला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आयुक्त डॉ. कैलाश बाबुराव शिंदे यांचे व द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल कानिफनाथ पाणी वापर सहकारी संस्था, नाशिक यांचे देखील खूप खूप अभिनंदन! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जलसंवर्धनासाठी आणि शहरी विकासासाठी महाराष्ट्र नेहमीच सर्वोत्तम कार्य करत राहील. महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहो. President of India Narendra Modi Radhakrishna Vikhe Patil #Maharashtra #WaterConservation

Devendra Fadnavis

11,461 Aufrufe • vor 10 Monaten

मा. सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचे कुठल्याही प्रकारे पालन न करता रेल्वे पोलिसांनी अतिशय सौम्य कलम लावली आणि गुन्हेगारांना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा इतका गंभीर असून देखील त्याच्या गांभीर्याकडे आणि त्याच्या उमटलेल्या पडसादाची जाणीव ठेवली नाही. त्या वृद्ध इसमाची दृष्टी कमी झाली. त्याला लघवीला होत नाही त्याच्या खिशातील २ हजार ८०० रुपये लुटले गेले. त्याला खुनाची धमकी देण्यात आली, हे सगळं होत असताना त्याची नोंद न करिता कोणती तरी सौम्य कलमे लावून आता त्या गुंडांचा जामीनही झाला आहे. पोलिसांवर लोकांचा विश्वास कसा राहील आणि यामुळेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळते, कारण पोलिसांचा धाकच उरलेला नाही. असं जर होत असेल तर जनता रस्त्यावर उतरली तर लोकांची चूक काय ? जर रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गुन्हा नोंदवणार लोकांवर! आजची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेली घटना आहे इतकी विकृत घटना असतानादेखील जर पोलीस त्याचे गांभीर्य ओळखत नसतील तर हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. दिवसें दिवस कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळवण्यास पोलीस कारणीभूत ठरत आहेत 126 (1), 127 (1), 118(1), 309(6), 189 (4), 189(3), 191(1), 191(2),191(3) BNS पोलिसांनी ही कलम लावायला हवी होती

Dr.Jitendra Awhad

77,848 Aufrufe • vor 2 Jahren

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 Aufrufe • vor 5 Monaten

👉 #PSI झाले याची डोक्यात अजिबात हवा जाऊ देऊ नका. 👉 अजिबातही भ्रष्टाचार करू नका. 👉 आपल्या आई वडिलांचा फोटो कामाच्या ठिकाणी आवर्जून लावा, जेणेकरून पदोपदी तुम्हाला तुम्ही केलेल्या संघर्षाची जाणीव होत राहील. 👉 #PSI झाले म्हणून त्याच पदावर समाधान मानू नका. 👉 गरजेपेक्षा जास्त प्रतिष्ठा, पैसा व शाश्वतीच्या नादात चुकीचं पाऊल उचलू नका. 👉 विधीमंडळ, न्यायपालिका, पत्रकारिता आणि प्रशासन हे लोकशाहीचे 4 स्तंभ चांगले राहिले तरच हा देश पुढे जाणार आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे तुमच्या पदाला न्याय द्या. सामान्य घरातून येऊन काहीतरी असामान्य काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्नं असत आणि या स्वप्नांना, पंखांना बळ देण्याचं काम अश्वमेधच्या माध्यमातून आमचे मित्र मनीष प्रताप बोरस्ते व वहिनी करत आहेत. या दोघांनी नाशिक येथे #PSI झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास उपस्थित राहून या विद्यार्थ्यांसोबत वस्तुस्थितीवर बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या सर्वांचे व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. #Nashik #Youth #Career #MaharashtraPolice Ashwamedh Career Academy महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Satyajeet Tambe

17,544 Aufrufe • vor 2 Jahren

रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही... चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्को च्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन च्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती मला मिळाली. तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून ४ तास ठिय्या दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले १ लाख २० हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो. - आमदार मंगेश रमेश चव्हाण #Chalisgaon

Mangesh Chavan

48,083 Aufrufe • vor 1 Jahr

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

42,002 Aufrufe • vor 6 Monaten

सध्या देशात देशभक्त व देशद्रोही,हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत , परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे याची पुर्णतः जाणीव या अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला सामाजिक सौहार्द संपवून अजून एक पाकिस्तानी विचार या देशात आपण निर्माण करत आहोत का ? यावरही आपण विचार करणे आवश्यक आहे.ज्याअर्थी ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात, कारण सध्याच्या राजकारणाने धर्माच्या नावाची अफूची गोळी ‘सर्वांनाच’ दिली आहे. व यामुळेच जातीय दंगे भडकतील व हजारो निष्पाप जीव जातील अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे हे शत्रू जाणून आहे, आणि म्हणूनच ते हरामखोर हे सर्व करत आहेत. आता आपण विचार करायचे आहे की ही परिस्थिती का आली ? आता आपण ठरवायचे आहे की जे त्या नराधमांना पाहिजे ते करायचे की आपापल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून या फुटीरतावाद्यांचे मनसुबे मोडून काढायचे ? येणारा काळ कठीण असेल व अशावेळी देशात सर्व समाजात देशभक्तीची भावना व सलोखा कसा राहील हे पाहणे सरकारचे व सर्वच राजकीय पक्षांचे काम आहे. जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

13,155 Aufrufe • vor 1 Jahr

आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी 'नवनिर्माण यात्रेच्या' सुरुवातीला मी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे... १) महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या हव्यात यात जातीचा मुद्दा कुठे येतो. आज खाजगीकरण मोठं आहे, आणि खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आरक्षणाने खरंच शिक्षणातील असो की नोकऱ्यातील असो किती लोकांना फायदा होणार आहे याचा विचार आपण करणार आहोत का ? इथं फक्त माथी भडकवण्याचं काम सुरु आहे, इथे फक्त मतांचं राजकारण सुरु आहे हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे आपल्याला यांच्या मतांच्या राजकारणासाठी मूर्ख बनवलं जात आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुलामुलींना आपल्याकडच्या शिक्षणसंस्थांमध्ये ऍडमिशन्स मिळतात, पुढे त्यांना नोकऱ्या मिळतात. पण आपल्या मुलांना मिळत नाहीत, यावर कोणी बोल्ट नाहीत. जातपात शाळा-कॉलेजच्या पातळीवर पोहचलं. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीपातीत अडकला आहे. २) माध्यमांवर आणि सोशल मीडियावर कशालाही प्रसिद्धी मिळते हे कळलं की वाट्टेल बोललं जातं हे थांबलं पाहिजे... आणि माध्यमांनी सुजाण भूमिका घेऊन ही असली चिखलफेक दाखवणं थांबवलं पाहिजे. ३) महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये असं जर पवारसाहेबांना वाटत असेल तर त्यांनी पण स्वतः त्याला हातभार लावू नये. ४) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माझा नरेंद्र मोदींना पाठींबा आहे हे मी स्पष्ट केलं होतं, तेंव्हा मी कधीच विधानसभेचंबोललो नाही. ५) एका पत्रकाराने मला विचारलं होतं की तुम्ही जी ब्ल्यूफिल्म आणली होती.... त्यावर मी त्याला गमतीत म्हणालो की ती आणली असती तर बरं झालं असतं, कारण तुम्ही पाहिली तरी असतीत. पण महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी आणली, ती राज्याला अर्पण केली पण दुर्दैवाने ती एकाही पत्रकाराने माझी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट वाचली नाही, त्याबद्दल माझ्याशी कधीही चर्चा केली नाही. ६) कोण कुठल्या मतदारसंघात उभं आहे याच्याशी मला देणंघेणं नाही. वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल. ७) या महाराष्ट्रात इतक्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, त्या काय होत आहेत तर बाहेरून येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून... सरकारला अफाट पैसे पायाभूत सुविधांवर खर्च करावे लागतात ते सुद्धा का? तर लोंढ्यांनी शहरांची पार वाट लावून टाकली आहे, मग त्यावर उपाय म्हणून एका मागोमाग एक प्रकल्प उभे करावे लागतात, आणि यांत मग ग्रामीण भागाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. ८) देशातील सगळ्यात मोठं स्टेडियम उभं करायचं गुजरातमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धा भरवायच्या आहेत गुजरातमध्ये ... असं कसं चालेल? अर्थसंकल्पात खेळांसाठी तरतूद करताना सगळ्यात जास्त तरतूद गुजरात आणि उत्तरप्रदेशसाठी... असं का ? या देशाच्या पंतप्रधानांना सगळी राज्य समान हवीत ना... उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि समजा त्यांनी सगळं महाराष्ट्रात सुरु केलं तर मी त्यांना हीच आठवण करून देईन की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात म्हणून ९) माझ्या पक्षाला या विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल. माझा पक्ष जन्माला येऊन १८ वर्ष झाली. आणि चढउतार कोणालाच चुकले नाहीत... काँग्रेस पक्ष ४४ खासदारांवर आलाच होता ना... १०) अजून बोलायला मी सुरुवात नाही केली, मी जेंव्हा बोलायला सुरु करेन तेंव्हा बघू कोण कोण बोलतंय. आणि मी सध्या बोलत नाहीये कारण अजून तशी वेळ आलेली नाही, पण जेंव्हा मी बोलेन तेंव्हा ते त्यांच्या लक्षात राहील असं बोलेन. ११) लाडकी बहीण, लाडका भाऊ, करण्यापेक्षा लाडका मतदार योजना सुरु करा... १२) संविधान बदलणार हे भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला, म्हणजे त्यांनीच विरोधकांना नरेटीव्ह दिलं ना? तोपर्यत चर्चाच नव्हती. म्हणजे भाजपनेच नरेटिव्ह दिलं ना १३) मी निवडणुकासांठी सर्व्हे करण्यासाठी एजन्सी घेतली नाही. माझ्या पक्षाचे लोकं दोनदा महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये जाऊन आले, तिथे लोकांना भेटून आलेत. त्यांनी त्यांचं म्हणणं माझ्याकडे मांडलं... १४) धारावीतील स्क्वेअर फुटाचा दर काय आहे हे जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला कळेल की धारावी पुनर्विकासा भोवती काय राजकारण सुरु आहे.

Raj Thackeray

31,457 Aufrufe • vor 2 Jahren