Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

जबाबदारीची जाणीव असणारी माणसं अगदी शेवटपर्यंत संघर्ष करतात

26,431 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Ravi Parab profil fotoğrafı
Ravi Parab1 yıl önce

परिस्थितीमुळे आलेली अपरिहार्यता माणसाला अधिक कणखर बनवते..!

दादा शिंदे profil fotoğrafı
दादा शिंदे1 yıl önce

Very true... माझी आजी आणि आजोबा पण अगदी शेवटपर्यंत घरात बसा सांगितलं तरी घरात बसले नाहीत... शेतावर खूपच प्रेम... ते routine च त्यांचं.... शेवटी covid ने संपवलं... पण असेच.... गावाला गेल्यावर त्यांच्या कडे बघूनच कामाची ऊर्जा मिळायची... गेले ते दिवस... 3 वर्ष गावाला नाही गेलो

Mukesh Duggar profil fotoğrafı
Mukesh Duggar1 yıl önce

जबाबदारीची जाणीव असणारी माणसं अगदी शेवटपर्यंत संघर्ष करतात आणि शेवटपर्यंत याच जबाबदारी ची जाणीव त्यांच्या जवळच्या लोकांना जाणवत नाही त्या गेल्यावर त्यांची उनिव भासते किती विचित्र ना🙏

Secular Burnol profil fotoğrafı
Secular Burnol1 yıl önce

लगेच ताई इमोशनल...द्या की गॅस घेऊन

DeeBee profil fotoğrafı
DeeBee1 yıl önce

आजी बाई

NP BOSS profil fotoğrafı
NP BOSS1 yıl önce

Hoy kharay 👍🥹

MAKRAND profil fotoğrafı
MAKRAND1 yıl önce

आजी ची आठवण आली 😢❤️

Vivek Gaikwad profil fotoğrafı
Vivek Gaikwad1 yıl önce

💯

PS profil fotoğrafı
PS1 yıl önce

खरय

Pradeep Mhatre profil fotoğrafı
Pradeep Mhatre1 yıl önce

बेजबाबदार मुलं , सुना असली की मरेपर्यंत संघर्ष करावा लागतो याच उदाहरण आहे..

Benzer Videolar

हाच आपला महाराष्ट्र आहे, जिथे अगदी लहान गोष्टीची सुद्धा जाण ठेवली जाते ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून या आजींनी दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर अगदी हक्काने 'मुख्यमंत्री भावाकडून लाडक्या बहिणीस सप्रेम भेट' असे नोंदवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नजरेस आला होता. तेव्हा या आजींशी बोलण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. "आजवर तर काही लाभ मिळाला नाही पण या योजनेतून पैसे मिळाले. तेव्हा भावाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून हंड्यांवर मुख्यमंत्री साहेबांचं नाव टाकलं. तुम्ही सुखी राहा, देव तुमची भरभराट करो" असा आशीर्वाद देखील या आजींनी दिला. आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी अशी माणसं आहेत, हे पाहून मन अगदी भरुन आलं होतं. #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde

187,037 görüntüleme • 1 yıl önce

अजित दादांच्या अंत्यसंस्काराला आलेली लोक ही बघ्यांची गर्दी नव्हती.ती आपल्या घरातला जबाबदार पुरुष गमावल्यावर जशी माणसं जमतात, तशी जमलेली माणसं होती. लोक तिथे चेहरा पाहायला आले नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या एका आधाराला निरोप द्यायला आले होते. कारण अजित दादा फक्त नेता नव्हते. गावगाड्यातला एक ओळखीचा चेहरा होते. अडचणीत नाव घ्यावं असं एक नाव होते. संकटात आपला माणूस म्हणून आठवणारा एक पत्ता होते. एखाद्या घरात कर्ता पुरुष जातो, तेव्हा रडणं कमी असतं, गोंधळ कमी असतो, पण माणसं जास्त असतात.कारण सगळ्यांना कळलेलं असतं.इथं माणूस नाही, एक आधार गेला आहे. अजित दादांच्या बाबतीत तेच झालं. लोक आपल्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून निघाले.ते औपचारिकतेसाठी नाही, तर आपल्या गावगाड्यातलं काहीतरी तुटलंय ही जाणीव त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली. त्या रांगेत उभा असलेला प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता.आपल्या मधला कुणीतरी गेला आहे. ती गर्दी गावगाड्याच्या एका आधारस्तंभासाठी होती.

Pratik S Patil

75,568 görüntüleme • 7 ay önce

आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही एका बापाचं मन केवळ आणि केवळ आपल्या कुटुंबातच गुंतलेलं असतं, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या एका पित्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या चिमुकल्या मुलाशी, 'मंत्र'शी साधलेला अंतिम संवाद सध्या सर्वांचेच मन हेलावून टाकत आहे. आपल्या निष्पाप मुलाच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवताना ते म्हणाले, "आईचं नेहमी ऐक, तिची काळजी घे अन् तुझ्या दोन्ही बहिणींचे रक्षण कर. मी कुठे गेलो, हे कोणाला विचारत बसू नकोस; जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल, तेव्हा मी तुझ्या आसपासच आहे, हे कायम लक्षात ठेव." स्वतः वेदनेत असतानाही मुलाला धीर देत कुटुंबाचे छत्र बनण्याची शिकवण देणारा हा बाप, निधनानंतरही एका मुलाच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणार आहे. अंतिम क्षणी व्यक्त केलेलं हे पितृप्रेम आणि दिलेली जबाबदारीची जाणीव… साभार - नवाकाळ

Shekhar

18,584 görüntüleme • 1 ay önce

हे प्रेम अन आपुलकी हीच कमाई आयुष्याची..! आज अचानक रस्त्याने जाताना 'महेशदादाss' अशी आपुलकीची हाक कानावर पडली गाडीतून पाहिलं.. तर हा दिव्यांग तरुण बांधव माझ्याकडे पहात हात करत होता.. मी गाडी थांबवली.. आणि उतरून या जिद्दी, मेहनती तरुणाशी संवाद साधला.. त्याला माझ्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती.. तो भरभरून मनातलं बोलत होता.. मलाही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनापासून समाधान वाटलं.. त्याच्या प्रेमळ संवादाने भारावलो.. आणि जाणीव झाली ती आपल्या कर्तव्याची.. माझ्या जनतेप्रति असलेल्या प्रत्येक बांधिलकीची.. खरंच मित्रांनो.. आयुष्यात काय कमावलं..? असं जर कुणी विचारलं तर कुठल्याही स्वार्थाशिवाय मनापासून प्रेम करणारी ही माणसं हेच त्यावरच उत्तर असेल.. या तरुणाच्या चेहऱ्यावरील आनंदापेक्षा मौल्यवान दुसरं काय असू शकतं..? #सेवाभाव #माणुसकी #जनतेशीनातं #प्रेमआणिआपुलकी #सामाजिकजबाबदारी #प्रेरणादायीक्षण #LeadershipWithHeart #PublicService #RespectForAll #InspirationDaily #DivyangSamman #समाजासाठी #लोकांशीजोडलेले #कर्तव्यभावना #PositiveIndia #RealHeroes #HumanityFirst #MaharashtraUpdates #SocialImpact #जनतेचा विश्वास #GoodDeeds

Mahesh Landge

14,553 görüntüleme • 6 ay önce

मराठी ग्राहकाला एक फेरीवाला तुसडेपणाने म्हणतो 'तुम मराठी लोग ऐसे हि हो...' त्यानंतर या वाक्यावर जाब विचारल्यावर त्या मराठी ग्राहकाला ४-५ परप्रांतातून आलेले फेरीवाले एकत्र येतात आणि मारझोड करतात. अन्याय झाला म्हणून तो मराठी ग्राहक शोधत शोधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत आला... झालेला प्रकार त्याने महाराष्ट्र सैनिकांना सांगितला. मग जे व्हायचं ते झालं... महाराष्ट्र सैनिकांनी त्या फेरीवाल्यांना #मनसेदणका देत पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केलं. परंतु पुन्हा चौकशीच्या, खटल्याच्या फेऱ्यात आमचेच महाराष्ट्र सैनिक. अर्थात आमदार व मनसे नेते श्री. राजू पाटील व श्री. अविनाश जाधव ह्या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. बाकी आमचा मराठी माणसासाठीचा संघर्ष सुरूच राहील. #महाराष्ट्रसैनिक

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

52,026 görüntüleme • 2 yıl önce

क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला… तो व्हिडिओ सुरू होताच आजूबाजूचं सगळं विसरून गेलो. आमचे नेतृत्व, आधारवड असलेल्या अजितदादांचा आवाज कानावर पडताच मन भरून आलं. शब्द ऐकताना डोळे पाणावले, गळा दाटून आला. जणू दादा पुन्हा एकदा समोर उभे आहेत, असं क्षणभर वाटलं. आज दादा देहाने आपल्यात नाहीत, ही जाणीव मनाला सतत टोचत राहते. तरीही असे क्षण त्यांच्या विचारांची, त्यांच्या आपुलकीची आणि मार्गदर्शनाची उपस्थिती ठळकपणे जाणवून देतात. पद असो वा नसो, लोकांशी नातं घट्ट ठेवून काम करणं दादांचा हा विचार आजही माझ्या प्रत्येक निर्णयामागे आहे. हा व्हिडिओ पाहताना केवळ आठवणीच नाही, तर जबाबदारीची जाणीवही अधिक ठळक झाली. लोकांसाठी ठामपणे उभं राहणं, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हेच दादांकडून शिकलेलं खरं भांडवल आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या त्या कार्यकर्त्याचे मनापासून आभार. दादांच्या आठवणी पुन्हा एकदा मनात जिवंत झाल्या. दादा देहाने नसले, तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या प्रत्येक लोकाभिमुख कामात कायम सोबत राहील. #AjitDada

Chetan Vitthal Tupe

15,197 görüntüleme • 7 ay önce

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले सिद्धार्थ महाविद्यालय RSS विचारांचे होण्यापासून वाचवा… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे पहिले कॉलेज हे मुंबईतील फोर्ट परिसरातील सिद्धार्थ कॉलेज आहे, अगदी जागा विकत घेण्यापासून कॉलेज बाबासाहेबांनी उभा केले. आज या कॉलेजमधे RSS आणि संघी विचारांचे प्राध्यापक भरपूर झाले आहेत. भाजपा खासदार उज्ज्वल निकम ट्रस्टी आहेत, आठवले नामधारी अध्यक्ष झालेत, ABVP सारख्या संघटनाना कॉलेजमधे मुक्त वावर दिला जातो, त्यांच्या विचारांचे कार्यक्रम करू दिले जातात. काही आंबेडकरी तरुण याला विरोध करतात तर ABVP संघटनेचे काही बाहेरील पदाधिकारी या मुलांना दम देत आहेत. मुंबई ABVP चे लोक कॉलेज मधील काही मुलांना हाताशी धरून त्यांचे अजेंडे राबवत आहेत. कॉलेज मधील विवेक जगदाळे या मुलाला हाताशी धरले आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर धमक्या देतात. कृपया बाबासाहेबांच्या कॉलेजचे संघीकरण थांबवा. मागे कॉलेजसमोर विना परवाना ABVP सदस्य नोंदणी तंबू आपल्या एका आंबेडकरी तरुणाने कायदेशीर रित्या काढला होता. त्याचा हा व्हिडिओ…. विवेक जगदाळे- 99303 4558

गजाभाऊ

34,722 görüntüleme • 11 ay önce

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

42,002 görüntüleme • 5 ay önce

साक्षात वाघिणींशी कुस्ती खेळणाऱ्या मुली आणि वाघिणीचं बाळंतपण पार पाडणारी सातारची बहाद्दर माणसं! अमीर खानच्या “दंगल” सिनेमाच्या आधीही 100 वर्षांपूर्वी भारतीय मातीतील बहाद्दर मुलींनी उडवलेली ‘अपूर्व दंगल’! — विश्वास पाटील “साहेब, बाळंतपणाच्या बाजल्यावर तडफडणाऱ्या लेकीची काळजी घेताना जसा तिच्या आईच्या पोटात गोळा उठतो, अगदी तसंच बघा लेकुरवाळ्या होणाऱ्या वाघिणींना जीव लावत आम्ही बाळ-बाळंतिणीचा जीव वाचवत होतो बघा,” असा विलक्षण थरारक जीवनानुभव घेणारी माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” सारख्या कलाकृतीचं आपोआप मोल वाढतं. म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या बहाद्दर स्त्री-पुरुषांचा साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजांच्या हस्ते मी सत्कार करायचा मुद्दाम घाट घातला होता. तो सुंदर सोहळा अनेकांच्या मनावर ठसून गेला आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला खडकलाटच्या गुलाब शिंदे या नावाच्या शेतकऱ्याची मुलगी तारा शिंदे ही चक्क वाघाशी कुस्ती खेळायची. शाहू महाराजांनी तिला हत्ती आणि घोडी देऊन तिचा सत्कार केला होता. तेव्हा तिची सर्कस सिंगापूर, जपान, जर्मनीपर्यंत खेळून आली होती. याशिवाय लाहोरची रेवा रखी, जी ए. सर्कस ऑफ बॉम्बेमध्ये काम करणारी जमेला, तासगावच्या जगप्रसिद्ध परशुराम लायन सर्कसमध्ये वाघिणीच्या जबड्यात डोकं देणारी छबुताई, कागवाडच्या ग्रेट कर्नाटक सर्कसमध्ये वाघिणींशी खेळणारी बिबा या साऱ्या सर्कसबालांनी इतिहास निर्माण केला आहे. नुकताच मी चाळीसगावला जाऊन सुमन या श्रेष्ठ सर्कसबालेला भेटून आलो. सुमनजींनी आपल्या आयुष्याची साठ वर्षं सर्कशीला वाहिली होती. मनुष्यप्राणी आणि जंगलातले प्राणी यांच्या गहिऱ्या नात्याचा वेध मी माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. भारतीय साहित्यात या आधी असा प्रयत्न “जंगल बुक” मध्ये झाला होता, पण “जंगल बुक”मधले प्राणी हे कल्पित होते. माझ्या सुदैवाने लेखक या नात्याने मला ही आगीशी आणि जीवनातील भयानक संकटांशी, जीवघेण्या खेळात रमलेली माणसं प्रत्यक्ष भेटली. गेली अनेक वर्षं ती भेटत होती. त्यांचं ते मुलखावेगळं आयुष्य मी माझ्या “कांचना”मध्ये मांडलेलं आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावं. श्रेष्ठ भारतीय कादंबरीकार मृदुला गर्ग यांनी “कांचना” ही भारतीय साहित्यातील अपूर्व कलाकृती असल्याचं या आधीच लिहिलं आहे. मराठीत येण्यापूर्वी “ग्रेट कांचना सर्कस” दिल्लीच्या वाणी प्रकाशनमार्फत दहा महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाली होती. वाचकांनी तिचा जरूर लाभ घ्यावा. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबद्दल नुकताच साताऱ्यात माझा जो सत्कार झाला, त्या परिसरातील 80 ते 90 च्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्व बहाद्दर सर्कसवीरांना मी माझ्यासोबतच सत्कारासाठी बोलावलं होतं. वाचकांना “ग्रेट कांचना सर्कस” ही मॅजेस्टिकच्या साइटवर तसेच अक्षरधारा बूक गॅलरीच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. ती वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. Akshardhara Vani Prakashan #Vishwaspatil #akshardharabookgallery #vaniprakashan #GreatKanchanaCircus #LegendaryPerformers #BraveWomen #CircusHistory #IndianCircus #FearlessGirls #TaraShinde #SumanCircus #SatyaraHeroes #MustReadBook #CircusLegends

Vishwas patil

13,974 görüntüleme • 10 ay önce

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,369 görüntüleme • 6 ay önce

मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो. बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे. तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही. आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते.

Sujat Ambedkar

71,482 görüntüleme • 1 ay önce

जनरल मोटर्सच्या कामगारांनी त्यांच्या काही मूलभूत मागण्यांसाठी साखळी उपोषण पुकारले आहे, त्यांची आज भेट घेतली. गेले काही वर्षे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली कामगारांवर बंधने घालणे, त्यांचे हक्क हिरावणे, त्यांना वेठीस धरण्याची यंत्रणा पुन्हा एकदा देशात डोके वर काढत आहे. देशात कामगारांची पिळवणूक केली जात आहे. जनरल मोटर्स कामगार याच व्यवस्थेचा शिकार झाले आहेत. या देशात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या येतात. ज्या भागात कंपनी येते त्या भागात रोजगार उपलब्ध होईल, दळणवळणाची साधने येतील या अपेक्षेने आपण सर्वच आनंदी असतो. मात्र जेव्हा कंपनी सर्व काही दुसर्‍या कंपनीला विकून जाते, त्यावेळी कंपनीच्या कामगारांच्या नोकरीवर गदा येते आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आज जनरल मोटर्सचे कामगार या दुर्दैवी परिस्थितीतून जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे कामगार विविध माध्यमातून लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहे. सरकार याकडे लक्ष देत नाही, कामगार मंत्री एककलमी निर्णय घेतात आणि या कामगारांना तोंड देता येत नाही म्हणून परस्पर निर्णय जाहीर करतात. हे अत्यंत अनाकलनीय आहे. मात्र या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत खंबीर उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला पूर्ण सहकार्य करतील. मला विश्वास आहे की आदरणीय पवार साहेब यात लक्ष घालतील आणि आपली बाजू मांडतील. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar

Jayant Patil- जयंत पाटील

23,841 görüntüleme • 2 yıl önce

हडपसर विधानसभेचे उमेदवार श्री. साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आज जाहीर सभा घेतली, त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) २००९ ला हडपसर मतदारसंघ तयार झाला. इथली गावं महापालिकेत आली. आज कित्येक लोकं म्हणतात की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण महापालिकेत आलो. या संपूर्ण भागाचा विचका ट्रॅफिकने झाला आहे. आज महाराष्ट्रात मी असे अनेक भाग बघतो, त्याची अवस्था अशी आहे की मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत. रोजच्या जगण्यातील स्वस्थता गेली आहे, लहान मुलांना बाहेर पाठवताना माता-भगिनींना धाकधूक होते. आणि या मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गुंतवलं जातं. २) महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातींनी झालेला विचका मोठा आहे. जातीपातीत तुम्ही गुंतून पडावं आणि तुमचं मतदान काढून घ्यायचं असं सुरु आहे. ३) मराठवाड्यातील दुर्दैवी घटना सांगतो. एका गावातील घरात निधन झालं, घरात तीन माणसं, मृत व्यक्तीला खांदा द्यायला माणूस नव्हता, नातेवाईक यायला सहा तास लागले, म्हणून अंत्यसंस्कार थांबले. दुसऱ्या जातीची माणसं बहुसंख्य माणसं शांतपणे बघत राहिली पण कोणी पुढे आलं नाही. याहून दुर्दवी घटना काय असू शकते ? हे सगळं विष पेरलं गेलं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. ४) आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की महापुरुषांना आपण जातीत विभागलं आहे. महाराष्ट्रात जातीबद्दलचं प्रेम होतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष कधीच नव्हता. आपल्याकडे आत्ता काय पसरतंय याचा विचार केलाय का ? इथल्या मोहल्ल्यांमध्ये सिमी, आयसिसचे अतिरेकी सापडलेत. बरं जे सापडले ते सापडले पण जे नाही सापडले ते काय करतील ? ५) शहरांचा सत्यानाश झाला आहे, इथे रोजगार मिळत नाहीयेत, इथे महिला सुरक्षित नाहीयेत, लोकांना घरं परवडत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि तरीही या सगळ्याची चिंता करायची सोडून सत्ताधारी आणि विरोधक तुम्हाला जातीत गुंतवतात... ६) इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवलेंना केली गेली, त्यावेळेला फक्त आमचा साईनाथ रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेला आमदार आणि इतर पक्षांचे नेते कुठे होते ? अशा माणसांच्या हातात सत्ता देणार का तुमच्यासाठी धावून येणारा साईनाथ सत्तेत हवा ? विचार करा साईनाथ आमदार झाले तर तुमच्यासाठी रात्रीअपरात्री धावून येतील. ७) तुम्ही कुठल्याही पुण्यातील असो की मुंबईतील किंवा ठाण्यातील किंवा अगदी कुठल्याही शहरातील जुन्या माणसाला विचारून बघा की तुम्हाला तुमचं जुनं शहर हवं का नवं तर लोकं उत्तर देतात जुनं शहर. पण दुबईत विचारून बघा तिथल्या लोकांना, कुठलं शहर आवडतं तर म्हणतील आत्ताची दुबई आवडते, का तर तिथल्या माणसांची गरज लक्षात ठेवून दुबई घडवली आहे. ८) ५ वर्षात मी तुम्हाला सगळं बदलून दाखवेन असं सांगणार नाही, पण या ५ वर्षात असं काम करून दाखवेन की ज्याने तुम्हाला पुढची ५ वर्ष आम्हाला सत्तेत परत आणावं असं वाटेल, इतकं सुंदर आणि मनापासून काम करून दाखवेन, ९) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील नाहीतर देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने राज्याचा विकास आराखडा मांडला. मला खुर्चीचा सोस नाही. मी शिवछ्त्रपतींच्या राज्यात जन्माला आलो आहे, त्या राज्याचं गतवैभव मला परत आणायचं आहे. १०) आज माझी मुलाखत घ्यायला येणारे पत्रकार मला फक्त यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं यावरच प्रश्न विचारतात. पण कोणी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विसरू नका हे महाराष्ट्र राजय आहे, कोणतं लेचापेचं राज्य नाही. या राज्याला इतिहासाला भूगोल पण आहे आणि इतिहास पण आहे. अशा राज्याच्या विकासाबद्दल तळमळीने बोलणाऱ्या माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवारांना निवडून द्या. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या राज्यात तमाशा करणाऱ्यांना एकदा धडा शिकवा, आणि तुम्ही जर धडा नाही शिकवलात तर या सगळ्यांची खात्री पटेल की तुम्ही काहीही केलंत तरी सगळं चालून जातं. ११) मला आणि माझ्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. माझा साईनाथ तर आहेच पण जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येकाला मतदान करा. मी सगळ्या मतदारसंघात पोहचूच शकत नाही, त्यामुळे मी इथून प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

56,039 görüntüleme • 1 yıl önce

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. १) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे. २) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे. ३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे. ४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे ५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही. ६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं. ७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

54,506 görüntüleme • 1 yıl önce

जर्मनीतील वीजनिर्मिती- अणुऊर्जा आणि जगाची भविष्यातील वाटचाल. जर्मनीत १९६२ ते २०२४ पर्यंत तीन अणुऊर्जा प्रकल्प जवळपास ६.३ % इतकी प्रचंड मोठी वीजनिर्मिती करायचे. ते सर्व अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यांनी बंद केलेत. त्यातलाच हा एक कुलिंग टॅावर नियंत्रित स्फोटात आता पाडला गेलाय. हा जो व्हिडीओ आहे त्याकडे आपण प्रतिकात्मक दृष्टीने पहायला हवे. एका बाजूला न्यूक्लियर एनर्जी चांगली तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विनाशकारी दिसते. जगभरात यावर सतत चर्चा होत असते. भारतात यावर आपल्या राज्याइतकी चर्चा इतर कुठेच झाली नसेल. महाराष्ट्र गेली दीड- दोन दशके याने ढवळून निघालेला. जगभरात आता न्यूक्लियर एनर्जी आधारित प्लांट कमीच होत आहेत. तरीही येणाऱ्या काळात हा निर्णय योग्य कि अयोग्य हे कळेल. जर्मनीत गेल्या वर्षभरापासूनच अणुऊर्जा आधारित उर्जा निर्मिती शून्यावरच होती. त्यांनी ही ६.३ % टक्क्यांची तूट नवे सोलार प्लांट टाकून सहज भरून काढलीये. त्याशिवाय त्यांनी बॅटरीज आणि उर्जा साठवणूक करण्याच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केलीये. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि नव्या पॅावर ग्रीड साठी खास तंत्रज्ञांची नेमणूक केलीये. सरकार आणि खाजगी कंपन्या यात चांगला सहभाग नोंदवितात. याकामात जर्मनीने जगात आघाडी घेतलीये हे मात्र नक्की. जर्मनी हा एक असा देश आहे जो अपारंपारिक उर्जा क्षेत्रात फार प्रचंड वेगाने पुढे गेलाय. सोलार आणि विंड एनर्जी सारख्या अपारंपारिक उर्जेतून देशाला लागणारी जवळपास ५७% उर्जा हे लोक तयार करतात. (जगाची सरासरी ४१ % आहे.) आणि उरलेली ४३% उर्जा ते कोळसा, नॅचरल गॅस, बायोमास व इतर जीवाश्म इंधनांपासून तयार करतात. २०३० म्हणजे पुढील फक्त ४ वर्षात ७५ % उर्जानिर्मिती ही सोलार आणि विंड आधारित घेऊन जायचे मोठे टार्गेट त्यांनी सेट केलेय आणि सरकार तसेच खाजगी क्षेत्रातील त्यांची एकंदर घोडदौड पाहता हे सहज शक्यही वाटतेय. ग्रीन हायड्रोजन/अमोनिया संदर्भात गेली तीन वर्षे मी जर्मनीत जात आहे आणि त्यांचे इलेक्ट्रोलायझर्स, इंडस्ट्रीयल बर्नर्स, ग्रीन हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठीचे प्रयत्न, त्यावरील प्रयोग हे नक्कीच वाखाणण्याजोगे, जगाला दिशादर्शक आहेत. एका तर घरात त्यांच्या रूम हिटिंग /स्पेस हिंटिंग साठी सोलार आधारित ग्रीन हायड्रोजन सिस्टिम तीन वर्षांपूर्वी बसवली आहे. रूफ टॅाप सोलार हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मोठ्या प्रमाणावर विंड एनर्जी हे ही त्यांचे वैशिष्ट्य आहे. अपारंपारिक उर्जा हे फक्त जर्मनीतच नाही तर संपुर्ण जगासाठीच भविष्य आहे हे मान्य केले तरी यात काही गंमतीजमतीही आहेत. सोलार आणि विंड एनर्जी ही खूप स्वस्त आहे, स्वच्छ आहे वगैरे वगैरे आपण नेहमीच म्हणतो परंतू सोलार पॅनल्स बनविणासाठी आणि विंड मिल तयार करून बसविण्यासाठी जेवढं जीवाश्म इंधनं लागतं आणि मोठ्या प्रमाणावर रेअर अर्थ मिनरल्स लागतात त्याचे गुणोत्तर काही आजही फारसा मेळ खात नाही. दुसरं ज्या जर्मनीत आज ही मोठ्या प्रमाणावर, स्वच्छ, पर्यावरणपुरक, अक्षय उर्जा तयार होतीये ते पाहता तिथे विजेचे दर जगात सर्वात स्वस्त असायला हवेत. परंतू वास्तव मात्र अगदी उलटे आहे. जर्मनी, असो की युरोप, अमेरिका किंवा इतर अनेक देश जिथे जिथे सोलार आणि विंड पॅावर आहे तिथे विजेचे दर प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ भारतात विजेचा दर प्रती किलोवॅट $ ०.०८ आहे तर जर्मनीत तोच $०.३७ आहे. नेदरलॅंड, सिंगापूर, बेल्जियम, स्वीडन, जपान यातही तो तुलनेने $०.२२ ते ०.३२ पर्यंतच आहे. येणाऱ्या दशकभरात सोलार आणि विंड प्लांटच्या किंमती कमी होणार आणि हे रेट कमी होणार असं म्हणणं म्हणजे सोन्याचे दर पुन्हा “दहा - वीस हजार तोळ्यावर” किंवा “डिझेल, पेट्रोल खरचं ५० - ६० रूपये लिटरने मिळेल” अशी अपेक्षा बाळगणं…. असो. सहसा एवढे मोठे करेक्शन्स होत नाहीत हे इथे सुचवायचेय, इतकेच. आपल्यालाही या उर्जेशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायलाच हवी पण त्यापूर्वी - आपल्या जुन्या ग्रीड सिस्टिम मधून जे ट्रांन्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनचे जे १८ ते २० % लॅासेस होताहेत ते कमी करावे लागतील. घरातही आपण किमान २० ते ३० % उगीचच उर्जेचा वापर, चूकीच्या विजेच्या वस्तू, चूकीच्या पद्धतीचे इंस्टॅालेशन्स करतो, ते कमी करावं लागेल. नवे, इफिशियंट पॅावर प्लांट नव्याने लावावे लागतील आणि सर्वात महत्वाचे - आपल्या इथल्या सरकारला, तंत्रज्ञांना, खाजगी कंपन्यांनाही रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी पैसे ओतावे लागतील. पॅरासाईट राहून फक्त दलाली आणि कमिशन खाऊन परदेशी वस्तू इकडे चिकटवायची पद्धत बंद व्हायला हवी. मोठमोठ्या कॅार्पोरेट्स वर जशी CSR फंड वापराची बंधने आहेत तशीच R&D निधी योग्य ठिकाणी वापरला जावा अशी नवी नियमावली यायला हवी. #उर्जासाक्षरता

Prafulla Wankhede 🇮🇳

35,015 görüntüleme • 10 ay önce