正在加载视频...

视频加载失败

ज्यांच्या मूळ आपण आज मोठं झालो, अशा गुरूला कधीच विसरायच नसतं...🙌

57,536 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

3 条评论

Makrand 的头像
Makrand1 年前

Respect ✊

Travala.com 🏨 ✈️ 的头像
Travala.com 🏨 ✈️4 年前

This one's for the Crypto Whales ⬇️ NEW exclusive & luxurious experiences have been added to Apply today & #TravelUnlikeAnyOther with your favorite cryptocurrency.

Tarachand.meher 的头像
Tarachand.meher1 年前

बर चला,,, शुभरात्री सर्वांना,, 🌹☺️🙏 ♥༺T༻༺G༻༺M༻♥

相关视频

नेहमी पाठीशी राहीन म्हणालात... आणि एका क्षणात आम्हाला पोरके करून गेलात दादा..! आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी कधीच आपल्यावर रुसले नाही... पण आज मी आपल्यावर रुसले दादा...! ही जाण्याची वेळ नव्हती.. सदैव महाराष्ट्राच्या पाठीशी आपण आधार बनून उभे राहिलात, हा आधार यापुढे महाराष्ट्राच्या पाठीशी नसणार, आपल्या नावापुढे "स्वर्गीय" शब्द लिहावा लागणार हा विचारच अंगावर काटा आणणारा, वेदनादायक आहे. आपण आम्हाला सोडून गेलात ही बाब अजूनही महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपल्या आठवणींनी अश्रू वाहत आहेत. आपण महाराष्ट्राला जे प्रेम दिलं ते प्रत्येकाच्या डोळ्यात आज दिसतंय. आपलं केवळ असणं हे माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारं होतं. कठोर शासक, कार्यतत्पर प्रशासक, झुंजार नेतृत्व हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सबंध महाराष्ट्राने अनुभवले. पण, आपल्या या कठोर व्यक्तिमत्वाचा हळवा कोपरा अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं. अगदी पोटच्या मुलीप्रमाणे आपण मला भरभरुन प्रेम दिलं. आपण आमच्यातून गेलात हे मानण्यास मी तयार नाही, आपल्या उत्तुंग कार्यातून, असंख्य आठवणींतून आपण आमच्या मनात चिरायू आहात ! #दादा #AjitPawar 💔💔

Aditi S Tatkare

19,526 次观看 • 7 个月前

आदरणीय अजितदादा पवार आम्हा राष्ट्रवादी परिवाराचे कुटुंबप्रमुख होते. दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्राकाकी आज पहिल्यांदाच कोकणात आल्या. अशा प्रसंगी अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. मुळात ते सरकारी नव्हे तर एक खासगी वाहन होते आणि याबाबत अनिकेतभाईंनी उपमुख्यमंत्री कार्यालयासोबत यापूर्वीच संपर्क साधून माहिती दिली होती. आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनेत्राकाकी यांनी आम्हाला लहानाचे मोठे होताना पाहिलं आहे.. पार्थदादा, जयदादा यांच्याप्रमाणे अनिकेतभाई आणि आम्ही काकींची लेकरेच आहोत. याच भावनेतून कुटुंबाचे सदस्य म्हणून अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. ज्यांच्या मनातील वात्सल्याची भावना मेली आहे, ज्यांच्या डोक्यात सतत राजकारण आहे अशा माणसांनी यातही राजकारण शोधलं यात काही नवल नाही. Sunetra Ajit Pawar Aniket Tatkare

Aditi S Tatkare

68,685 次观看 • 6 个月前

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगेसोयरे बाबत काढलेल्या जीआरचं मनापासून स्वागत आहे. आमचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! समस्त मराठा समाजाच्या एकीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला.. एवढ्यात बातमी पाहिली की 'मराठ्यांना ओबीसी मध्ये मागच्या दाराने घुसवलं जात आहे,' असं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं आणि त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. त्या विरोधात न्यायालयीन लढाई ते लढणार आहेत. माझा भुजबळ साहेबांना सवाल आहे की, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ साहेब आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला देखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात. मराठ्यांना ओबीसीत सामील करून घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही. तुमचे सदरील स्टेटमेंट बिनबुडाचे आहे! आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, अशा सर्वांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच येईल, हा मला ठाम विश्वास आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्वांसाठी माझी लढाई सुरू राहील. आई जगदंबा माझ्या लढाईला निश्चितपणे यश देईल. येणारी शिवजयंती आपण मराठा आरक्षणाची शिवजयंती म्हणून साजरी करू, असा शब्द मी तमाम समाज बांधवांना देतो! विनोद पाटिल

Viinod Patiil

26,910 次观看 • 2 年前

आम्हा मुळीक कुटुंबियांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात माझे मार्गदर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीने आनंदित झालो. वास्तू ही केवळ निवासाचे स्थान नव्हे तर नात्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक पवित्र जागा असते. मा. देवेंद्रजी आपण माझ्या सारख्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन आलात, हे मी माझे भाग्य समजतो. संपूर्ण मुळीक कुटुंबियांच्या आनंदात आपण सहभागी झालात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो! मा. देवेंद्रजींचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे असून माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये असणारी त्यांची उपस्थिती मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या उपस्थितीमुळे हा दिवस आणि संपूर्ण कार्यक्रम अधिक खास झाला. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #pune

Jagdish Mulik

71,000 次观看 • 1 年前

भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख गणेश बिडकर यांच्यामुळे पोलीस दलातील पाच लोक निलंबित झाली होती ,आज त्या पाच पोलिसांचे संसार रस्त्यावर आले केवळ गणेश बिडकर यांना वाचविण्याच्या नादात. विनयभंग, महिलांना मारहाण, शिवीगाळ, बारबालांसोबतचे चाळे या सगळ्या गोष्टींमुळे गणेश बिडकर यांची कारकीर्द अतिशय नालायक राजकीय पुढारी असे झाली आहे. आता आपलं दुर्दैव असा आहे की अशा व्यक्तीला पुणे भाजप प्रचार प्रमुख बनवले आहे.हे सर्व आज सांगण्याचे कारण एकच की, अशा चारित्र्यहीन माणसाला पवित्र पुणे महानगरपालिकेपासून लांब ठेवले पाहिजे. कारण पैशांच्या जीवावर आपण लोकांना विकत घेऊ शकतो हा माज या निवडणुकीत मोडीत काढायला हवा. #savepune

Ravindra Dhangekar Official

22,306 次观看 • 8 个月前

अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे तर आपण वारंवार पाहतोच. पण जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले रूपाली चाकणकरांसारखे लोकच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर आलेल्या सेक्स स्कँडलच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. तथाकथित “बुवा” संस्कृती, श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि त्यात अडकणाऱ्या महिलांची वेदना – हे वास्तव नाकारता येत नाही. अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. परंतु ज्या वेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात आणि कुणाच्या तरी “बुवाचे” पाय धुतात, तेव्हा हा विरोधाभास अधिक ठळकपणे समोर येतो. आज गरज आहे ती अंधश्रद्धेच्या मुळावर प्रहार करण्याची. समाज जागृत झाला, तरच अशा घटनांना आळा बसेल. #अंधश्रद्धा #महिलासुरक्षा #सामाजिकजागरूकता #महाराष्ट्रएपस्टीनफाइल्स #SexScandal #अशोकखरात #रुपालीपाटीलचाकणकर #सत्ताआणिअत्याचार

Vijay Kumbhar

11,041 次观看 • 6 个月前

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 次观看 • 6 个月前

मुंबईत अशा अजीज शेख सारखे किंवा ज्यांचं नाव घेतोत कोण तरी मुन्ना आहे असे भाई खूप वाढलेत का मुंबईत? मुंबई पोलीस Mumbai Police आपले लक्ष हवे.. रस्त्यावर व्यवसाय आहे म्हणतोय आणि पालिका गप्प आहे ? माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardN कुठं याचे अनधिकृत धंदे आहेत तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..#घाटकोपर #स्थानक आपण मोकळीक दिली शहर गहाण ठेवले आहे म्हणून हे माजले आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकच्या गेटवर फळाचे धंदे लावणारा हा परप्रांतीय अजीज शेख मराठी माणसावर इतकी दादागिरी करतोय. इतका माज आलाय कुठून... आज पळून गेलाय, परत भेटला की जय महाराष्ट्र..!!! #प्रशांतबढे #मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्र #परप्रांतीयफेरीवालामुक्त_मुंबई

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

89,279 次观看 • 21 天前

📍बालगंधर्व रंगमंदिर, पुणे पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे आयोजित पुण्यभूषण पुरस्कार सोहळा तसेच जायबंदी सैनिक गौरव कार्यक्रमाला आज उपस्थित राहून संबोधित केले. केंद्रीय मंत्री श्री Jyotiraditya M. Scindia जी, पुरस्कारार्थी डॉ. श्री अभय फिरोदिया जी, वीरमाता श्रीमती लता भागवत जी व वैभव भागवत जी, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. श्री Raghunath Mashelkar जी, पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री डॉ. सतीश देसाई जी व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुण्यभूषण पुरस्काराचे यंदाचे मानकरी फोर्स मोटर्सचे चेअरमन श्री डॉ. अभय फिरोदिया जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि एका अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्त्वाची निवड या पुरस्कारासाठी केल्याबद्दल पुण्यभूषण फाऊंडेशनचे कौतुक. पुणे शहर ही विचार, संस्कृती आणि प्रगतीची प्रयोगशाळा आहे. ज्ञानाची, समाजकारणाची आणि योग्य व्यक्तीला योग्य वेळी सन्मान देण्याची या शहराची परंपरा आहे. त्यामुळेच पुण्यभूषण हा केवळ एक पुरस्कार ठरत नाही, तर ते पुण्याच्या मुल्यांचे अधोरेखन ठरते. अशा पुरस्कारांमुळे समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळते. आजचे पुरस्काराचे मानकरी डॉ. फिरोदिया यांचे नाव उद्योगविश्वात प्रामाणिकपणा, सातत्य आणि दूरदृष्टी यासाठी परिचित आहे. त्यांनी भारतीय उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले. उद्योग करताना त्यांनी 'आपण समाजाचे देणे लागतो', ही जाणीव कधीच सोडली नाही. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा गौरव पुण्यभूषण पुरस्काराने होतो, तेव्हा समाजाला नवी दिशा मिळते आणि कोणत्या मुल्यांना मानले पाहिजे, हे समाजाच्या मनावर बिंबवले जाते. #PunyaBhushanPuraskar Chandrakant Patil

Nitin Gadkari

11,118 次观看 • 4 个月前