Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस सरांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं. याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आज पुण्यात एक कार्यक्रम झाला तिकडे अनेक ज्येष्ठ व्यंगचित्रकार, चित्रकार हजर होते. मला देखील या सोहळ्याचं निमंत्रण होतं. फडणीस सर आणि मी, आम्ही दोघेही एकाच कला महाविद्यालयाचे, जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे विद्यार्थी,...

31,650 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Baba Books | बाबा बुक्स | 𑘤𑘰𑘤𑘰 𑘤𑘳𑘎𑘿𑘭
Baba Books | बाबा बुक्स | 𑘤𑘰𑘤𑘰 𑘤𑘳𑘎𑘿𑘭2 лет назад

लहानपणी दिवाळी अंक आणि फडणीस सरांची व्यंगचित्र हे अगदी ठरलेलं असायचं

Фото профиля American Stories Network
American Stories Network2 лет назад

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Фото профиля राजयुग
राजयुग2 лет назад

एवढ्या व्यस्त दौऱ्यात देखील कालच्या भाषणात उत्साह आणि उत्स्फूर्तता ओसंडून वाहात होती! (कृपया काही पत्रकारांकडून जाणीवपूर्वक घेतल्या जाणाऱ्या रटाळ आणि स्क्रिप्टेड मुलाखतींना हजेरी लावणं बंद करावे, त्यामुळे वक्तृत्व बोथट होते.) तुमचा उत्साह असाच खळाळता राहो!!!

Фото профиля Sanjay Sadadekar
Sanjay Sadadekar2 лет назад

आपण पुन्हा एकदा सिद्ध केल मराठी भाषण आणि भाषेवर प्रभुत्व. महारष्टातील सामान्य माझ्याकडून एक विनंती महाराष्ट्र पिंजुन काढा, अन राजकाराणतही आपली यशस्वी वाटचाल करून नविन महाराष्ट्र घडवा. संधी विधानसभेची.........

Фото профиля टायगर विंग
टायगर विंग2 лет назад

साहेब आज लवकर उठले १२ वाजेचा पहिले पोस्ट केली 👏

Фото профиля Sceptic & truth
Sceptic & truth2 лет назад

Culture and relationship is the first casualty of current political narrative. You are an exception. Not afraid also to call spade a spade. Please keep it up.

Фото профиля .उल्हास 61. मी २४ कॅरेट हिंदू च.
.उल्हास 61. मी २४ कॅरेट हिंदू च.2 лет назад

@MeGajananKale फार सुरेख भाषणं

Фото профиля shahnawaz شاہ نواز
shahnawaz شاہ نواز2 лет назад

सुपारीबाज

Фото профиля DrSudarshan mandlecha 🇮🇳
DrSudarshan mandlecha 🇮🇳2 лет назад

सरांना महाराष्ट्र भुषण दया

Похожие видео

भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलं. खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो. असो, आज आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला त्यावेळेस रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपस्थित होते. आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढयांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे. आपल्याकडे गुरूंचा उचित सन्मान करण्याची परंपरा कमी होत चालली आहे. मला बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दरवर्षी अनेक मुलं भेटायला येतात, मी त्या प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ? इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट अशी साच्यातील उत्तरं येतात, पण कोणीही मला शिक्षक व्हायचं आहे असं मला सांगितल्याचं आठवत नाही. चांगले शिक्षक नसतील तर चांगले विद्यार्थी कसे घडणार असा मला नेहमी प्रश्न पडतो. असो, पण हे स्मारक येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल अशी मला आशा आहे. या कार्यक्रमातल्या मी मांडलेल्या मनोगताची ही चित्रफीत...

Raj Thackeray

135,547 просмотров • 1 год назад

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,359 просмотров • 2 лет назад

खडकवासला विधानसभेचे उमेदवार श्री. मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे जाहीर सभा घेतली, त्यातील महत्वाचे मुद्दे १) माझा मित्र, सहकारी रमेश वांजळेंचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं ते कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल. २) खरंच मनापासून सांगतो की पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. ३) एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून जग कुठे गेलं आहे ते... आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही हे वाईट आहे. ४) शिवरायांचं निधन झाल्यावर रायगडावर समाधी बांधली गेली आहे. पुढे कोणीतरी समाधीच्या खाली काहीतरी मिळेल या आशेने तिथे उकरून ठेवलं. पुढे महात्मा ज्योतिबा फुले तिकडे गेले, त्यांनी समाधी पुन्हा उभारायचं ठरवलं, त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले आणि त्यांनी ही समाधी चांगली करण्यासाठी पैसे उभे केले. यासाठी अठरापगड जातीतील लोकांनी समाधी उभी करायला पैसे गोळा केले. असा महाराष्ट्र होता आमचा. ५) आम्ही कसं खितपत जगतोय याचं आम्हाला घेणंदेणं नाही, आम्हाला जातीपातीत जास्त स्वारस्य आहे. आज पुण्यात आयसिस, सिमीसारख्या संघटनांचे अतिरेकी सापडत आहेत. पण याकडे कोणाचंच लक्ष नाही. आमदार खासदारांना फक्त टेंडर काढायची आहेत, आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, त्यांना इतर गोष्टींशी घेणंदेणं नाही, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये म्हणून ते तुम्हाला जातीत गुंतवतात. ६) तुम्ही इतकी वर्ष ज्यांना मतदान केलं त्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मुलं हा देश सोडून निघालेत. शिक्षण, नोकऱ्या त्यांना इथे पण मिळू शकतात, पण ते का चाललेत, कारण आजूबाजूचं वातावरण घाणेरडं आहे. मला या सांगा या असल्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले ? ७) ज्या हिंद प्रांतावर महाराष्ट्राने राज्य केलं, त्या महाराष्ट्राला मला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. ८) इतर पक्षातील जी लोकं निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राबद्दलची कोणीतीही स्वप्न नाहीत. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा येत आहे. त्यात आपण महाराष्ट्रापुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत. ९) शरद पवारांनी बारामतीत अनेक उद्योग आणले पण त्याच पवार साहेबांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे का नाही आणले ? मग तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणायचं ? स्वतःच्या तालुक्याचा विकास करणाऱ्याला तालुक्याचा नेता का नाही म्हणायचं ? १०) मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मयुरेश वांजळे, आणि माझे पुरंदरचे उमेदवार उमेश जगताप आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

99,842 просмотров • 1 год назад

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,502 просмотров • 7 месяцев назад

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

42,002 просмотров • 6 месяцев назад

६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. १) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन. २) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही. ३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ? ४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं. ५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ? ६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ? ७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे. ८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता. ९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?

Raj Thackeray

65,871 просмотров • 1 месяц назад

SIT गठीत करण्याबाबत मा. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल ! (विधानसभा । दि. 27 फेब्रुवारी 2024) #Maharashtra #SIT #BudgetSession #BudgetSession2024 #MarathaReservation

Devendra Fadnavis

253,230 просмотров • 2 лет назад

नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात, आम्ही अनेक प्रकल्प सीएसआर निधीतून उभारले. आणि नाशिक सुंदर करावं म्हणून ज्या ज्या कल्पना मी देशातील नामवंत उद्योजकांसमोर मांडल्या, त्या प्रत्येकाने मला तात्काळ होकार दिला. नाशिकमध्ये एक बोटॅनिकल उद्यान सुरु करावं अशी माझी इच्छा होती, त्यासाठी मी रतन टाटांना सीएसआरमधून निधी द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी मला लगेच होकार दिला. इतकंच नाही सुरुवातीला जो निधी मंजूर केला त्यापेक्षा अधिक निधी काम वाढतंय म्हणून लागणार आहे हे पाहून, तो निधी पण मंजूर केला. बोटॅनिकल उद्यान पूर्ण झाल्यावर मी रतन टाटांना विनंती केली तुम्ही स्वतः या उद्यानाला भेट दिलीत तर उत्तम होईल. खरंतर जागतिक पातळीवर काम करणारे उद्योगपती असं सहजासहजी कुठे जात नाहीत, पण रतन टाटा नाशिकला आले. त्यांनी आम्ही उभारलेलं उद्यान पाहिलं. आणि नंतर माध्यमांशी बोलताना, माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये कौतुक होतं, पण मला तो त्यांनी दिलेला आशीर्वाद वाटला. मी भाग्यवान आहे रतन टाटांसारख्या अनेक दिग्गजांनी मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेची ही चित्रफीत, जरूर पहा

Raj Thackeray

116,280 просмотров • 2 лет назад