Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!

140,957 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

6 Kommentare

Profilbild von Mukesh Gupta
Mukesh Guptavor 2 Jahren

देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis नौटँकीबाज़ है यह इस्तीफ़ा नही देने वाले, जिसे इस्तीफ़ा देना होता है वह प्रचार नही करता बार बार , वह बस इस्तीफा देता हूँ देता हूँ कि जुमलेबाज़ी कर रहे हैं...!!🤔😀

Profilbild von Zeenat Shabrin
Zeenat Shabrinvor 2 Jahren

अहंकार तो नासा भेद | जगीं निंद्य ओवळा ||१|| नातळे तो धन्य यासी | जाला वंशीं दीपक ||२|| करवितो आत्महत्या | नेदी सत्या आतळो ||३|| तुका म्हणे गुरूगुरी | माथां थोरी धरोनि ||४||

Profilbild von Sunil _Jai Hind 🇮🇳
Sunil _Jai Hind 🇮🇳vor 2 Jahren

शिवसेना - पक्ष गेला आमदार - गेले खासदार - गेले संख्या - 19 वरून ९ मतदार - हिंदुत्ववादी होते M आले विचारधारा - सोडली बापाचे विचार - सोडले सद्या - 1760 पक्ष्यांच्या गाडीतला एक सामान्य पक्ष ...... कोणाला शिकावतोस रे माकडा ?

Profilbild von Rajan Shridhar Mhapsekar
Rajan Shridhar Mhapsekarvor 2 Jahren

🤣🤣🤣

Profilbild von Sandesh
Sandeshvor 2 Jahren

एडिटर चांगले घ्या. किती भारी बनलं असत हे.

Profilbild von 🌱Pradip G Gotarane🚩
🌱Pradip G Gotarane🚩vor 2 Jahren

पुढचा तो संसद वाला वीडियो राहिला 😃😅

Ähnliche Videos

जीवन अनमोल हिरा, ज्यास कर्माने पैलू पडतो । तो सत्कर्माने उजळतो, आणि दुष्कर्माने सडतो ।। जेवढं हे जीवन अनमोल, त्यापेक्षा कर्म अनमोल आहे. म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे. कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामच नव्हे, तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म... आपलं चालणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, विचार करणं वगैरे प्रत्येक हालचाल ही ह्या कर्मातच येते. कर्माविना मनुष्य थांबुच शकत नाही. इच्छा असो की नसो, आपल्याकडून कर्म घडतच राहतात.आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच. कर्म घडलं की कर्मफळ समोर पडलंच म्हणून समजा... एखाद वेळेस कर्मातून सुटका होईल, परंतु कर्मफळातून सुटका होणे अशक्य आहे. सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्मे करतो, नाना खटपटी करतो व ती जशी झाली, तशीच कर्मगती आपणास लाभते... पण कर्म व कर्मफळाची गंमत अशी आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ मात्र दुःखमय मिळतं. असं का होतं ? मर्म असे आहे की, आपले कर्म आपल्या पेक्षा इतरांनाही सुखकारक झाले, तर कर्मफळ शतपट चांगलं मिळतं. पण आपण फक्त आपल्याच पुरता विचार करून कर्म केलं, तर शुद्ध सुख मिळूच शकत नाही. उलट आपली कर्मे इतरांना त्रासदायक, दुःखदायक ठरली, तर त्याच्या शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्कीच येतं. वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो. म्हणून यत्किंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कर्मसिद्धांत इशारा देतो की,आपण दुसऱ्या बद्दल केवळ वाईट विचार जरी केला, तरी त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट फळं भोगायला भाग पाडतात. हे जसं दुष्कर्म फळाबद्दल आहे, तद्ववतच इतरांबद्दलचा एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगलं बनवितो. एक छोटं-इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला शतपट चांगलं फळ देते... महाभारतात, द्रौपदीचे दुर्योधनावर कुत्सितपणे क्षणिक हसण्याने किती भयंकर परिणामांचे कर्म झालं, पण त्याच द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना, त्यांचे वस्त्र हरवले, म्हणून स्वतःजवळचे एक वस्त्र दिले. द्रौपदीच्या संकट समयी त्या सत्कर्मामुळे अनंत वस्त्रे तिला मिळाली... म्हणून दक्षतेने सत्कर्म पाळावे, दक्षतेने दुष्कर्म टाळावे. यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवेत. आपण आज अविचाराने वागलो, तर उशिरा का होईना, त्याची कर्मफळे पुढे वाट्याला येणारच... उन्हाळ्यात रखरखीत जमिनीत पडलेली गवताची बीजं तेव्हां दिसत नाहीत, परंतु काही काळानंतर पाऊस पडला की सारं गवत उगवून येते व शतपटीने बीज प्रसार करतं... कर्म गती ही गहन आहे. ती कुणीही चुकवू शकत नाही. धनवंतातील धनवान, सर्व सत्ताधीश व प्रचंड बलवानही कर्म गती टाळू शकत नाहीत. नाना उपद्व्याप केले, अनंत खटपटी केल्या तरी कर्मफळ बदलू शकत नाही... जगाचा इतिहास हा कर्म फळाचा इतिहास आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्ती, त्याच्या कर्माचा परिपाक असते. सुखदुःख हे त्या कर्माचे प्रतिध्वनी आहेत. म्हणून स्वतःच्या भल्यासाठी तरी कर्म विचारपूर्वक करा... कर्मगतीतून भल्या भल्यांची सुटका होत नाही, मग आपल्यासारखे क्षुद्र जीव कसे सुटतील...??? कर्म जाणून-बुजून करा किंवा अजाणतेपणी करा, कर्म फळ भोगावंच लागतं... चुकून नकळत अजाणतेपणी विस्तवावर पाय पडला तर विस्तव पोळतोच ना? अजाणतेपणाने विष शरीरात गेलं, तर मरणारच ना? म्हणून असे घडत नाही की, अजाणतेपणी सत्कर्म वा दुष्कर्म केले, तर त्याचे कर्मफळ मिळत नाही. कळत नकळत कसेही कर्म घडो, त्याचे कर्म फळ मिळणारच... म्हणूनच एक विनंती आहे... कर्म से डरिये, ईश्वर से नही । ईश्वर तो माफ कर सकता है, कर्म कभी नही ।। लोक विनोदाने म्हणतात, की पूर्वी चित्रगुप्त मनुष्याची कर्मगती हाताने लिहून नोंदवित होता, म्हणून कर्मफळ पुढच्या जन्मी भोगावं लागत असे, परंतु आता चित्रगुप्त लॅपटॉप घेऊन कर्मगतीची नोंद करतो म्हणून कर्म फळे याच जन्मी भोगावी लागतात... संत कबीर म्हणतात--- " पहिले करणे करे, बाद मे क्यूँ पछताये । पेढ बोया बबुल का, आम कहांसे खाये ।। " खरंय ना? WAF

महाकाळ

13,946 Aufrufe • vor 1 Jahr