Loading video...

Video Failed to Load

Go Home

टीझर.. आपला दसरा, आपली परंपरा !! आपला #dasara आपली #parampara #AaplaDasara #AapliParampara #BhagwanBhaktigad #Sawargav

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

"इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!" तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास. पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे. पण आता… "विकास" या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे! इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार? 📌 विकास म्हणजे वारसा संपवणं नाही! 📌 छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे – ती संस्कृतीवरची तोडफोड आहे! 📌 आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो? उद्या कदाचित सांगावं लागेल – "इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!" --- आता आवाज उठवा! ही फक्त वास्तू नाही – हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे. मंदिर वाचवण्यासाठी, हा पोस्ट शेअर करा. #SaveTuljabhavaniTemple हा हॅशटॅग वापरून तुमचा आवाज पोहोचवा. #तुळजाभवानी #तुळजापूर #इतिहासाचेसंवर्धन #Heritage #SaveTuljabhavaniTemple #MarathaHistory #CultureUnderThreat #StopHeritageDestruction ---

Dr.Jitendra Awhad

60,037 views • 1 year ago

भारतातील सर्वात दिर्घकाळ लांबलेला महामार्ग #मुंबईगोवाहायवे कायद्यानुसार कंत्राटदाराने एक किमी मधे कमीत कमी ८३४ झाडे असे मानक असताना अक्षरशः तोंडाला पाने पुसली आहेत. जवळ जवळ तीन लाखाहून जास्त कोकणची प्राचीन वृक्ष परंपरा नष्ट झाली आहे . कोकण चे तापमान वाढत आहे ,फळधारणा कमी होत आहे.तरी आपला पाठींबा हवा आहे. १ मे रोजी कोकण च्या दृष्टीने महत्वाचे उपोषण ,हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण सुरू करत आहे , ठिकाण - प्रांताधिकारी कार्यालयासमोर. चिपळूण वाटेवरून जे प्रवासी जातील त्यांनी फक्त ५ मिनीटे का होईना जाताना भेट द्या व आपला पाठींबा द्या. हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण. (व्हीडीओ चंदगडचा आहे पण सध्या हीच परिस्थिती आहे सगळीकडे मार्केटिंगच्या जाहीरातीत झाडं दिसतात पण जनिनीवर नाही😃)

Vaibhav Shetkar

21,670 views • 3 months ago

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून दोषींवर कारवाई कधी पासून होऊ लागली आहे ??? सगळे भामटे तर मोकाट आहेत … त्या दिवशी तो अरिहंत बिल्डर महिलांच्या अंगावर गाडी टाकतो तरी गुन्हा दाखल नाही … खासदार संजय दिना पाटील उघडपणे ५ खून केले बोलतायत काय कारवाई झाली ??? राजकारण थोडं बाजूला ठेऊ … उबाठाचे लोक जे काही आता टिका करु लागले आहेत , त्यांच्याकडे दिना पाटील असते ते तर योद्धे झाले असते … पत्रकारांना बोलताना तुम्हाला खाऊ जेवू घालतो असं संजय दिना पाटील म्हणतायत, म्हणजे समोर जो पत्रकार होता तो लाचारासारखा त्यांच्यासमोर अनेकदा हात पसरत असेल … एखादा नेता एवढ्या टोकाचं बोलतो तेव्हा थेट जाब विचारता पत्रकाराला आला असता … अनेकदा पत्रकार देखील आपली मर्यादा सोडतात म्हणून हा अपमान त्यांना सहन करावा लागतो … बाकी खासदार संजय दिना पाटलांना कसलंच भय नाही .. कारण आपला कायदाच तेवढा तकलादू आहे … एवढचं काय तर इकडे दोषी बाहेर असतात आणि पीडितांना जेलमध्ये टाकलं जातं… त्यामुळे गृहमंत्र्यांबद्दल तर न बोललेलं बरं … !!! #संजयदिनापाटील #खासदार #शिवसेना

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)

37,045 views • 1 month ago

आज पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, माझ्या हस्ते अभिनेते आणि माझे मित्र, श्री. रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला मी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी मला गळ घातली. आणि त्याचा मान राखून, मी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी माझं मनोगत मी व्यक्त केलं. त्या मनोगतातील महत्वाचे मुद्दे... '... मी हल्ली अनेक ठिकाणी बघतो की २ मराठी माणसं भेटली की ती एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात, का असं ? आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी माणसांना जसा मानसन्मान मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यात आपली भूमी, इथली जमीन बाहेरचेच गिळंकृत करत आहेत. आपण इतिहास असं म्हणतो तो कुठल्यातरी प्रदेशाला पादाक्रांत करण्यासाठी झालेल्या लढाईचा इतिहास असतो. आज महाराष्ट्रातील जमीन गिळंकृत करण्याचा जो डाव सुरु आहे, त्यातून उद्या जर आपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्वच पुसलं गेलं, तर मराठी भाषेचं अस्तित्व तरी काय राहणार आहे? मग आपला इतिहास तरी काय असणार ? यामुळे सरकारने मराठी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसे प्रयत्न मराठी माणूस टिकावा म्हणून केले पाहिजेत. आम्ही आमच्या परीने मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी जे जे करणं शक्य आहे ते करत आहोत, करत राहू. सरकारने त्याला साथ द्यावी, काही वेळेला आमचे मार्ग वेगळे असतात, त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, कारण जे आम्ही करत आहोत ते मराठी माणसासाठी करत आहोंत. बाकी साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलंच पाहिजे पण भूमिका पण घेतली पाहिजे. आणि मराठी तरुण-तरुणींनी पण साहित्य वाचायला हवं, पुस्तक वाचलीच पाहिजेत. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही. आपला इतिहास, आपले महापुरुष हे जगापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत, पण हे करताना सध्या आपल्या महापुरुषांना जातीत विभागणं सुरु आहे, ते थांबलं पाहिजे... आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र आलो, आपल्या भाषेशी, संस्कृतीशी घट्ट राहिलो तर जगात आपलं कोणीच वाकडं करू शकणार नाही हे विसरू नका....' या भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहे. ती जरूर बघा..

Raj Thackeray

49,591 views • 1 year ago