Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

पनवेल ते खोपोली लालपरीने प्रवास... #PratapSarnaik #TransportMinister #STBus #PanvelToKhopoli #Maharashtra

10 Yorum

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) profil fotoğrafı
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )1 yıl önce

नुसत्या रिला बनवू नका त्या लालपरीची अवस्था काय झालीये ते बघा

Girish Doad profil fotoğrafı
Girish Doad1 yıl önce

दहा वर्ष झालेत खाते सेने कडे आहे,पनवेल बस स्थानक चे टिनाचे शेड बघा 😡😡

S.Rohit🚩 profil fotoğrafı
S.Rohit🚩1 yıl önce

अनेक डेपो च्या जागा खुप मोठया आहेत. तेथे तीन चार मजल्यांच्या ईमारती बांधुन त्यातील गाळे भाडे तत्वावर दिल्या पाहिजेत. लॉज, कपड्यांची दुकाने, कॉम्प्युटर क्लास, कुरिअर गोडाऊन, अश्या अनेक प्रकारची सोय होईल. मेंटेनन्स डिपार्टमेंटला लाल परीच्या खिडक्यांचे आवाज बंद करायचा टास्क दया.

VR122 profil fotoğrafı
VR1221 yıl önce

रोजच करा मग दशा आणि दिशा सुधारेल हे काय एक दिवस फोटो सेशन करण्यासाठी चमको गीरी करून ST चमकणार नाही

।। काल्केया।। profil fotoğrafı
।। काल्केया।।1 yıl önce

झरा लक्ष्य द्यावे, ही बघा आपल्या लाल परी ची अवस्था. ती पण मुंबई - रत्नागिरी मार्गे प्रवास करणारी

महाराष्ट्रातमराठीचहवी(हिंदी लादणे बंद करा🚫) profil fotoğrafı
महाराष्ट्रातमराठीचहवी(हिंदी लादणे बंद करा🚫)1 yıl önce

मोठी समाजसेवा केलीत

M K 🇮🇳 profil fotoğrafı
M K 🇮🇳1 yıl önce

Dear Sir, Most of the bus depots are in poor condition. There is an urgent need to develop these. Specifically, the public toilets at all ST depots/stands are in the worst condition. Kindly ask the concerned team to maintain the public toilets and rebuild them with modern infrastructure wherever possible. Also, please make the ST Grievance Redressal system available online.

Makarand Bal profil fotoğrafı
Makarand Bal1 yıl önce

साहेब..पनवेल डेपो आज ज्या अवस्थेत आहे तो गेली 10 वर्षापासून आहे..तुमच्या कार्यकाळात तो अत्याधुनिक स्वरुपात बांधुन होईल ही अपेक्षा आहे.कारण तुमचं व्हिजन व तुमची क्षमता यावर विश्वास आहे.

Prakaash Paatil profil fotoğrafı
Prakaash Paatil1 yıl önce

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.... तळागाळातून आलेला नेताच आपल्या मंत्रिपदाची सुरुवात करु शकतो. बिघडलेल्या राजकारणातील हे अतिशय दुर्मिळ उदाहरण. एसटी महामंडळ कधीच तोट्यात जाऊ शकत नाही, जर मंत्री महोदयांनी लक्ष घातले तर चोऱ्या थांबतील आणि सेवाही सुरळीत होईल. छान👍

Prakash Belwade प्रकाश बेलवाडे profil fotoğrafı
Prakash Belwade प्रकाश बेलवाडे1 yıl önce

साहेब, यांच्या मुख्यालयातील हिशीब तपासा म्हणजे खर्च का वाढत चालला आहे ते कळेल आणि अजिबात भाववाढ होऊ देऊ नका.

Benzer Videolar

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी महा मुंबई मेट्रोने प्रवास केला. गुंदवली ते दहिसर असा त्यांचा हा मेट्रो प्रवास होता. यावेळी त्यांनी स्थानकांवरील प्रवासी सुविधांची पाहणी केली तसेच एस्केलेटरवरून खाली उतरताना प्रवाशांशीही संवाद साधला. त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत,जलद प्रवासाचे कौतुक केले. काटकसरीच्या आणि लोकहिताच्या उपाययोजनांचा स्वीकार करत त्यांनी सार्वजनिक वाहतुकीलाही प्राधान्य दिले आणि कृतीतून संदेश दिला. त्यांनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आणि वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी मुंबई मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मेट्रोचा प्रत्येक प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यापासून एक पाऊल दूर जाणं. आज मेट्रोचा पर्याय निवडणारा प्रत्येक प्रवासी फक्त स्वतःचा प्रवास सोपा करत नाही, तर देशासाठीही मोठं योगदान देत आहे.त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत, कार्यक्षम प्रवासाचे कौतुक केले. ✅ देशाला आवश्यक असलेलं इंधन तुम्ही वाचवत आहात. ✅ भारताच्या हरित वाहतूक क्रांतीचा भाग बनत आहात. ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला पर्यावरणपूरक मेट्रो प्रवासाने प्रतिसाद देत आहात. वेगवान प्रवास. सुरक्षित आणि आरामदायी सेवा. महा मुंबई मेट्रोसोबत स्मार्ट प्रवास करा. वेळ वाचवा. इंधन वाचवा. भारत घडवा. #MMRDA #MumbaiInMinutes #MahaMumbaiMetro #RamdasAthawale #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes PMO India Narendra Modi CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ramdas Athawale Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,228 görüntüleme • 4 ay önce

मुंबईकरांसाठी मेट्रो कनेक्टिव्हिटीला आणखी वेग! एमएमआरडीए द्वारे संचालित मेट्रो २ब च्या चेंबूर स्थानकाचे काम पूर्ण झाल्याने मुंबईकरांना आणखी चांगली आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असून, याच वर्षी आणखी ६० ते ७० किमी. मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व मेट्रो मार्गिकांचे इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #MumbaiInMinutes #MumbaiMovesForward #MMRDAMovesMumbai #MumbaiMetro #ReimaginingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd PIB India PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

65,387 görüntüleme • 2 ay önce

भारतातील सर्वात मोठा शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टनलिंगचे काम सुरू होणार असून मुंबईच्या भूमिगत मोबिलिटीच्या क्रांतीचे नवे, धाडसी पर्व सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यातील घोडबंदर ते बोरीवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दरम्यानचा एक ते दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत पूर्ण होईल. वेगवान प्रवास. शुद्ध हवा. अधिक जोडले गेलेले एमएमआर. हे आहे एमएमआरडीएचे वचन.. हे वचन म्हणजे #MumbaiInMinutes सदर प्रकल्पाच्या टनल बोरिंग मशीनच्या लॉन्चिंगपूर्वी डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से, महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. आम्ही सज्ज आहोत. अपडेट्ससाठी पाहत राहा. Get. Set. Go. India's longest urban road tunnel, the Thane–Borivali Twin Tunnel, is ready to roll, with the tunneling phase about to commence. The project will revolutionise mobility in the Mumbai Metropolitan Region, slashing the travel time between Ghodbunder in Thane to Western Express Highway, Borivali from 60-90 minutes to just 15. Faster journeys. Cleaner air. A more connected MMR. This is MMRDA's promise. This is Mumbai in Minutes. Ahead of the launch, Dr Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, conducted a site inspection. We are all set. Watch this space. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #ThaneBorivaliTwinTunnel #TransformingMMR #InfrastructureMatters #UndergroundMobility #TunnellingProjects CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳 Infra News India (INI)

MMRDA

55,145 görüntüleme • 6 ay önce

कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण! भाजपा-महायुती सरकारने नेहमीच कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल ४५ वर्षांनंतर कोकणवासीयांची एक जुनी स्वप्नपूर्ती होत आहे – मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग रो-रो बोटसेवा दिनांक १ मार्च २०२६ पासून सेवेत दाखल होत आहे. जलवाहतूकीद्वारे मुंबई ते कोकण प्रवास सुखकर व सुसाट होणार असून यामुळे कोकणवासीयांना केवळ सागरी प्रवासाचा आनंदच नाही तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे. ही सेवा म्हणजे केवळ वाहतूक व्यवस्था नसून, कोकणातील लोकांच्या भावनांशी जोडलेलं स्वप्न आहे, जे अखेर प्रत्यक्षात उतरत आहे! CMO Maharashtra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #KonkanVikas #ROROService #Mumbai #Konkan #NiteshRane

Nitesh Rane

29,535 görüntüleme • 7 ay önce

आता, शीळफाट्यावरून मुंबई फक्त १० ते १२ मिनिटांत ❤️ आपल्या सेवेत लवकरच खुला होईल.. कटाई - ऐरोली (नाहूर, मुलुंड ) नवीन मार्ग (ऐरोली-काटई नाका एलिव्हेटेड फ्रीवे) हा कल्याण - डोंबिवली - शिळफाटा - मुंब्रा आणि नवी मुंबई/मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी MMRDA कडून तयार करण्यात आलेला १२.३ किमी लांबीचा महत्वाचा मार्ग आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी ह्या स्वतंत्र एलिव्हिटेड मार्गाला २०१५ ला मंजुरी दिली होती. २०१६ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी कामात आडकाठी आणली होती. पण, सर्व संकटावर मात करीत या महामार्गाचा एक फेज पुर्ण झाला आहे. एरोली - कटाई नाका उन्नत मार्ग हा नवी मुंबईतील ऐरोली पुलाच्या पूर्वेकडील टोकापासून (ठाणे-बेलापूर रोडवरून) सुरू होतो, जिथून हा रस्ता ठाणे-बेलापूर रोडला वरच्या वर (उन्नत मार्गाने) ओलांडून पुढे पारसिक डोंगराच्या दिशेने जातो. ​त्यानंतर हा मार्ग पारसिक डोंगरामधून काढण्यात आलेल्या १.६९ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यातून पुढे जातो आणि मुंब्रा बायपास / राष्ट्रीय महामार्ग ४८ जवळ बाहेर पडतो; तिथून पुढे हा रस्ता दिवा - पनवेल रेल्वे मार्गाच्या समांतर असलेल्या उन्नत पुलावरून जात थेट कल्याण - डोंबिवलीच्या कटाई नाका येथे संपतो. ​हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर शीलफाटा भागातील वाहतूक कोंडी टाळून ऐरोली ते कटाई नाका / डोंबिवली प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल. दुसरा टप्पा कटाई ते मुंब्रा काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झाला आहे, याला तीन वर्षे जातील.

Prakash Gade

112,151 görüntüleme • 2 ay önce

🌉राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान स्‍वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्‍यात आला आहे. या विस्‍तारीत कामाचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्‍या शुभहस्‍ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्‍यात आले. 🔹हा विस्तारित पूल आज सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 🔹या विस्‍तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. . 🔹उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्‍त्‍याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. 🔹या प्रकल्पामुळे ३० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ मिनिटांपर्यत येणार आहे. तसेच, स्‍वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

89,232 görüntüleme • 4 ay önce

कधी कधी मोठ्या बदलाची सुरुवात मोठ्या यंत्रणेतून नाही, तर एका छोट्याशा कल्पनेतून होते… कोपरगाव येथील संजिवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२वीत शिकणाऱ्या साईश्रद्धा अरविंद साळमुठे हिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी प्रवाशांना बसच्या वेळा व रिअल-टाइम बस अपडेट्स सहज उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संपूर्ण प्रणालीचा वापर QR Code च्या माध्यमातून करता येतो. प्रवाशांनी QR Code स्कॅन केल्यानंतर कोणतेही साइन-अप किंवा लॉगिन न करता थेट वेबसाइटवर जाऊन आपल्या बसच्या वेळा व उपलब्ध माहिती पाहता येते. या प्रकल्पासाठी तिला भारत सरकारकडून Utility Patent देखील प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रवासी या सुविधेचा उपयोग करत आहेत. सध्या हे सॉफ्टवेअर अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. विशेष म्हणजे, एवढे उपयुक्त सॉफ्टवेअर विकसित करूनही तिने त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची मागणी केली नाही. तिच्या या कार्याची दखल घेत, तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. एका १२वीच्या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी केला, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. एका बाजूला स्वतःच्या ज्ञानातून समाजाला काहीतरी देण्याची तिची भावना आणि दुसऱ्या बाजूला तिच्या शिक्षणाला आधार देण्याची ही संधी… हा क्षण निश्चितच मनाला भावणारा आहे. आज तिच्या हातातील कौशल्याला प्रोत्साहन मिळाले आहे, उद्या हेच कौशल्य समाजाच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास आहे. #PratapSarnaik #TransportMinister #MaharashtraST #YouthPower #Innovation Maharashtra State Road Transport Corporation

Pratap Baburao Sarnaik

51,723 görüntüleme • 1 ay önce

Every journey tells a story. Every commuter has a reason. From saving time and travelling comfortably to feeling safe and connected, these are the voices that define the Maha Mumbai Metro experience. Mumbai has spoken. Now it's your turn. ❤️ What's your Maha Mumbai Metro Moment? Share it in the comments. ____________ प्रत्येक प्रवास एक कथा सांगतो. प्रत्येक प्रवासामागे एक खास कारण असतं. वेळेची बचत, आरामदायी प्रवास, सुरक्षिततेची भावना आणि सहज जोडलेली प्रवास व्यवस्था... हेच आहेत महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाचे गोड अनुभव.. मुंबईने आपलं मत व्यक्त केलं आहे. आता तुमची पाळी! ❤️ तुमचे महा मुंबई मेट्रो सोबतचे गोड क्षण कोणते? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroMoments #MumbaiMetro #RealVoicesRealJourneys #PublicTransport #Mumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,905 görüntüleme • 3 ay önce

पुणे ते मंत्रालय निघालेल्या मातंग दलित महिलांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. पाणी नाकारल्याचा त्यांनी आरोप केला आहे. जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप केलेला आहे. अनेक महिने पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही म्हणून नॅशनल हायवेनि हे कुटुंब चालत पार पनवेल पर्यंत पोहोचलं आहे. सर्वात आधी ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दखल घेतली, समजून घेतलं, उपाशीपोटी निघालेल्या कुटुंबाची जेवण मुक्कामाची व्यवस्था केली आणि हा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकार, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग यांनी दखल घेऊन या मातंग दलित कुटुंबाला न्याय द्यावा. तात्काळ त्यांना पोलिसांनी सन्मानाने गाडीत बसवून त्यांची तक्रार घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, सुरक्षा दिली पाहिजे. पुणेहुन मुंबई जाण्याची वेळ का आली? संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rupali Chakankar ABP माझा TV9 Marathi @News18lokmat #AllindiaPantherSena

Deepak Kedar

17,061 görüntüleme • 1 yıl önce

आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनानुसार मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाला शासकीय सेवेतील इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचे पालन करीत वाहनांचा कमीत कमी वापर व्हावा या दृष्टीने आज शासकीय निवासस्थान ते मंत्रालय असा पायी प्रवास करून कॅबिनेट बैठकीसाठी उपस्थित राहिलो. In keeping with the appeal made by Prime Minister Narendra Modi, Chief Minister Devendra Fadnavis has directed every department in the state to minimize the use of fuel-powered vehicles in government service. Following these directives and with the objective of reducing vehicle usage, I travelled on foot today from the official residence to the Mantralaya to attend the Cabinet meeting. Narendra Modi Devendra Fadnavis CMO Maharashtra BJP भाजपा महाराष्ट्र #NarendraModiji #FuelSaving #ElectricVehicles #AusterityMeasures #GreenEnergy

Nitesh Rane

15,427 görüntüleme • 5 ay önce

मा. नितीन गडकरी साहेब (केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार ) Nitin Gadkari , एक नम्र विनंती…सर मला एकदा तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये बसवा. तिकीटाचे जे काही पैसे असतील ते मी आनंदाने देईन. फक्त मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाची तुमच्यासोबत हेलिकॉप्टरमधून पाहणी करू द्या. कारण मी पूर्ण रस्ता पायी चालत गेलोय या महामार्गावरील प्रत्येक छोटा -मोठा खड्डा मला इतका तोंडपाठ झाला आहे की, हेलिकॉप्टरमध्ये बसूनही मी तुम्हाला खाली बोट दाखवत सांगू शकतो—“साहेब, इथे खड्डा आहे… पुढे अजून एक आहे… आणि थोड्याच अंतरावर पुन्हा एक मोठा खड्डा आहे.” ही अतिशयोक्ती नाही, तर या महामार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची वेदना आहे. कोणी बोलो वा ना बोलो आम्हाला कोकणकरांचे जीव वाचवायचे आहेत जीव . President of India CMO Maharashtra Sunil Tatkare Shivendrasinh A Bhonsle Pratap Baburao Sarnaik Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rajdeep Sardesai ravish kumar Piyush Tewari 🇮🇳 Chirag Paswan Cockroaches of India 🚨Indian Gems Hindustan Times Governor of Maharashtra The Times Of India २ जुलै २०२६. सर धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना) 📞8766797529 पेण- रायगड #latepost #mumbaigoahighway #accident #preventionisbetterthancure #tollcollection #citizen #india

Er. Chaitanya Usha Laxman Patil

104,024 görüntüleme • 3 ay önce

The response to Metro Line 9 has been truly encouraging, and we're committed to making every journey even more convenient. To improve station access and passenger movement, new entry and exit points are now open at Kashigaon Metro Station. Designed to make your commute smoother from the moment you arrive to the moment you leave, these enhancements are another step towards delivering a seamless, comfortable and commuter-first travel experience. मेट्रो मार्गिका ९ ला प्रवाशांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा पद्धतीने प्रत्येक प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रवाशांचा स्थानकापर्यंतचा प्रवेश आणि ये-जा अधिक सुलभ करण्यासाठी काशीगाव मेट्रो स्थानकावर नवीन प्रवेशद्वार आणि निर्गमनद्वार सुरू करण्यात आले आहेत. स्थानकात येण्यापासून ते बाहेर पडण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास अधिक सहज, आरामदायी आणि अखंड अनुभव देण्यासाठी करण्यात आलेली ही सुधारणा, प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून उभारल्या जाणाऱ्या प्रवास व्यवस्थेकडे टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #RebootingMumbai #MetroLine9 #CommuterFirst #UrbanMobility CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,628 görüntüleme • 3 ay önce

एक चूक आणि तिचे आयुष्य उद्धवसत.. मी हादरुन गेलो... #सातारा पाटण, सोनवडे : सौ. गौतमी शशिकांत पाटील यांची कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया चुकीची झाली. तिला त्रास होतोय हे ओरडून सांगत असताना डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयी पणे अनेक तास ऑपरेशन केले. ऑपेरेशन झाल्यावर ती शुद्धीवर आल्यावर पुन्हा जोरात पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी सलाईन मधून पेनकिलर दिले आणि दोन दिवसाने तिला डिस्चार्ज सुद्धा दिला, पुन्हा दुखायला लागलं पुन्हा आणलं पुन्हा तेच सलाईन दिले. हे सगळं घडलं सोनवडे सरकारी रुग्णालय येते, डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या हलगर्जीपणामुळे जे घडलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. आता त्यांच्या लक्ष्यात आलं कि काही खरं नाही तेव्हा सरकारी ऍम्ब्युलन्स मधून पाटण ला सोनोग्राफी साठी आणलं. तेथील डॉक्टरने पोट फुगलेले पाहून कराड गाटायला लावले. त्याच गाडीतून पेशन्ट नर्स सोबत सहित कराड येथील कॉटेज कुटीर हास्पिटल ला घेऊन गेले तिथेही केवळ पेनकिलर दिले. आता फरक कशाचाच पडत नव्हता, असाहाय वेदना वाढतच गेल्या, ज्यामुळे त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झालं आता गरज पडली व्हेंटिलेटरची तेव्हा सातारा सिव्हिल ला भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सोनवडे सरकारी रुग्णालय ते सातारा सिव्हिल रुग्णालय इथपर्यँतचा प्रवास झाल्यावर कुटुंब समजून गेले कि हे कुणीच सोनोग्राफी करत नाहीत तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्याचा सहारा घेतला सह्याद्री हॉस्पिटल कराड येते नेलं. त्या हॉस्पिटलने परिस्तिथी पाहून पेशन्ट सिरीयस आहे म्हणत त्यांना कृष्णा हॉस्पिटल ला नेण्याचा सल्ला दिला. आता तेथेही पेशन्टची गंभीर स्तिथी पाहता सांगलीला भारती हॉस्पिटल ला नेले. तिथे पेशन्ट ऍडमिट केल आणि इलाज करणायास सुरवात झाली. यात दोन तिला जाणवत होतं कि माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय. तिला पोटात पुन्हा वेदना सुरु झाल्या आणि आता तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरु झाला. यात दोन दिवसाचा कालावधी गेला. या हॉस्पिटलला पेशन्टचे तपासणी केले. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली. पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेकशन झालं आणि त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेकशन झालं आहे. त्यामुळं या डाक्टरांनी ऑपेरेशन करण्याचा निर्णय घेऊन ऑपरेशन केले. डॉक्टरांनी स्पष्टपने सांगितले कि कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा त्रास थांबलेला नाही. ही घटना चिमूटपणे 20 मे ते आजपर्यँत कुटुंबं सहन करत आहे. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करन्याचा सल्ला दिला आहे. हा अन्याय माझ्या कानावर आला मी तात्काळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांना हे प्रकरण समजून सांगितलं. या जिगरबाज वाघाने तात्काळ पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि आंदोलन सुरु केले. गेली पाच दिवस आंदोलन सुरु होते, पाऊस येत होता पण हे वाघ पाण्या पावसात बसून राहिले. उपोषण सुरूच ठेवले,हि घटना खूप गंभीर होती म्हणून अतिशय मोठा संघर्ष केला. आदित्य गायकवाड यांनी अखेर आज एक जणांच्या निलंबनाची लढाई जिंकली आणि दोन जणांचे निलंबनसाठी चौकशी लावली. गौतमी शशिकांत पाटिल अखेरच्या घटका मोजत आहे. इन्फेकशन एवढं वाढलं कि तिला मी जगणार नाहि अशी खात्री झाली. लेकरं, नवरा ती रडत असतात. आणि इकडे तिचे आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणारे आरोपी मोकाट आहेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. तात्काळ आरोपी निलंबीत करावे, राज्यसरकारने आरोग्य मंत्र्यांनी दखल घेऊन या मुलीला मोठ्या दवाखान्यात इलाज करून वाचवणयाचे प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबंला शासकीय 25लाख रुपये शासकी य मदत द्यावी. पावसात लढून एक जणांचे निलंबन करायला भाग लढणाऱ्या वाघाना जयभिम! ताई तू खचू नको, तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे... फक्त तू खचू नको CMO Maharashtra Devendra Fadnavis Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Rupali Chakankar #JusticeForGautami

Deepak Kedar

109,441 görüntüleme • 2 yıl önce