Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पुरुष होणं सोप्पं नाही... पुरुष होणं खूप कठीण आहे. पुरुष सर्व संघर्षातून जातो. तो सतत एका तरी दबावा खाली असतो. संवेदनशीलही आहे, पण दगडही आहे... तो रडू शकत नाही आणि अशक्तपणा दाखवू शकत नाही...आपल्या चिल्यापिल्यांच्या तोंडात चार घास घालण्यासाठी खूप काही करावं लागतं त्याला, ज्याची कुटुंबाला जाणीव ही नसते...!!!

27,490 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

12 Kommentare

Profilbild von प्रिया🍁🌻
प्रिया🍁🌻vor 3 Jahren

बाबा बॉडी बिल्डर होते माझे..😌✌️ क्विंटल ची अमाप पोती उचलून नेताना बघितलंय मी त्यांना.. ते दिवस आठवले..🥺

Profilbild von American Stories Network
American Stories Networkvor 1 Jahr

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Profilbild von MANOJ SHANKAR RANE🇮🇳
MANOJ SHANKAR RANE🇮🇳vor 3 Jahren

सुप्रभात

Profilbild von महाकाळ
महाकाळvor 3 Jahren

सुप्रभात☺️🙏☺️

Profilbild von namu
namuvor 3 Jahren

👌😊

Profilbild von महाकाळ
महाकाळvor 3 Jahren

😔😥😔

Profilbild von नितीन शिंदे (Ni3😘)
नितीन शिंदे (Ni3😘)vor 3 Jahren

😔

Profilbild von महाकाळ
महाकाळvor 3 Jahren

😔😔😔

Profilbild von ʀᴜꜱʜɪᴋᴇꜱʜ ᴋʜᴏʀᴇᴘᴀᴛɪʟ 
ʀᴜꜱʜɪᴋᴇꜱʜ ᴋʜᴏʀᴇᴘᴀᴛɪʟ vor 3 Jahren

💯✔️

Profilbild von महाकाळ
महाकाळvor 3 Jahren

😔😔😔

Profilbild von ALI ASGAR
ALI ASGARvor 3 Jahren

✌️

Profilbild von महाकाळ
महाकाळvor 3 Jahren

😔😔😔

Ähnliche Videos

अजित दादांच्या अंत्यसंस्काराला आलेली लोक ही बघ्यांची गर्दी नव्हती.ती आपल्या घरातला जबाबदार पुरुष गमावल्यावर जशी माणसं जमतात, तशी जमलेली माणसं होती. लोक तिथे चेहरा पाहायला आले नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या एका आधाराला निरोप द्यायला आले होते. कारण अजित दादा फक्त नेता नव्हते. गावगाड्यातला एक ओळखीचा चेहरा होते. अडचणीत नाव घ्यावं असं एक नाव होते. संकटात आपला माणूस म्हणून आठवणारा एक पत्ता होते. एखाद्या घरात कर्ता पुरुष जातो, तेव्हा रडणं कमी असतं, गोंधळ कमी असतो, पण माणसं जास्त असतात.कारण सगळ्यांना कळलेलं असतं.इथं माणूस नाही, एक आधार गेला आहे. अजित दादांच्या बाबतीत तेच झालं. लोक आपल्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून निघाले.ते औपचारिकतेसाठी नाही, तर आपल्या गावगाड्यातलं काहीतरी तुटलंय ही जाणीव त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली. त्या रांगेत उभा असलेला प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता.आपल्या मधला कुणीतरी गेला आहे. ती गर्दी गावगाड्याच्या एका आधारस्तंभासाठी होती.

Pratik S Patil

75,568 Aufrufe • vor 7 Monaten

"बहुतेक पुरुषांना त्यांचं पहिलं फूल शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाच मिळतं"... आणि, जर का त्यांना त्याआधी कोणाकडून फुल दिलं गेलं, तर ते अक्षरशः रडकुंडीस येतात... ते म्हणतात ना, "तो शांतपणे ओझी वाहत राहिला, कौतुकाची अपेक्षा न करता. आणि जेव्हा तो निःशब्द झाला, तेव्हा त्याच्यावर फुलांचा वर्षाव झाला —आणि जे तो कधी पाहू शकला नाही"... समाज अनेकदा पुरूष जिवंत असताना त्याच्याबद्दल कौतुक, प्रेम किंवा मान्यता देण्यास टाळाटाळ करतो. कारण आपण कधीच त्याला वेळेवर बोलत नाही— ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू खूप काही केलंस आमच्यासाठी’, ‘आम्ही तुझे आभारी आहोत.’ अनेक पुरुष स्वतःसाठी आपुलकी किंवा मान्यता मिळवण्याची इच्छाच दडपून टाकतात किंबहुना त्यांना ते जबरदस्तीने करावं लागतं. महिलांना वाढदिवस, वर्धापनदिन किंवा कामगिरीवर फुलं मिळू शकतात, परंतु पुरूषांसाठी कोणतेही उत्सव साजरे केले जात नाही. पुरुषांमधील भावनिक दुर्लक्ष किंवा उदासीनतेच्या अपेक्षेमुळे त्यांच्यात एक प्रकारचा शांत-एकटेपणा येतो. परिणामी, त्यांना दैनंदिन जीवनात प्रेम किंवा प्रशंसा मिळू शकत नाही. अहो, फुलं तेव्हाच द्या, जेव्हा समोरचा त्याचा सुगंध घेऊ शकतो. शब्द तेव्हाच बोला, जेव्हा तो ऐकू शकतो. शांततेची वाट पाहू नका, प्रेम आजच व्यक्त करा. म्हणजे, लोक जिवंत असताना त्यांचं भरभरून कौतुक करा. पुरुषत्व आणि भावनिक अभिव्यक्तीभोवतीच्या रूढीवादी कल्पनांना तोडून टाका. तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा, दयाळू शब्द बोला आणि त्यांच्या प्रयत्नांची ओळख पटवा - विशेषतः जे कधीही ते मागत नाहीत. बहुतेक पुरुष जातात नजरेआड, हातात श्रम, मनात वाद... ना गुलाब-ना एक मिठी, शेवटच्या फुलांनीच होतात भेटी. श्वास असतानाच द्या की फुलं, नाही तर नंतर राहील फक्त एक खंत ...!!!

महाकाळ

34,240 Aufrufe • vor 1 Jahr

आज भाजपच्या प्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे. माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल. आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही. मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्या ….धक्कादायक. महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.” ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येणार नाही. आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत. खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .

Mrs Anjali Damania

89,352 Aufrufe • vor 2 Monaten

मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो. बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे. तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही. आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते.

Sujat Ambedkar

71,482 Aufrufe • vor 26 Tagen

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर मध्ये अंजनवेल तालुक्यात गोपाळगड नावाचा किल्ला आहे या किल्ल्याचा इतिहास फार मोठा असून महत्त्वाचा आहे पण इथे एका लांड्या ने कब्जा केला आहे आणि तो म्हणतो की ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे गोष्ट अशी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात या किल्ल्यावर इंग्रजांच्या ताबा होता इंग्रज या किल्यावरील गवत व साफसफाई कंत्राट काढायची बरेच वर्ष वेगळ्या लोकांना कंत्राट मिळायची नंतर कंत्राट एक मणियार नावाच्या लांड्या ला जवळपास सलग ४०वर्ष हे कंत्राट मिळालं नंतर या व्यक्तीने कागदोपत्री नाव लावण्याचा प्रयत्न केला पण दोन वेळा पुरातत्व विभागाने यावर कारवाई करून परत घेतलं पण या व्यक्तीने अधिकृत पद्धतीने परत ताब्यात घेतली आणि अजून ही ती व्यक्ती तिथे आंब्याचा व्यवसाय करत आहे या व्यक्तीने किल्ल्यातील महत्त्वाचे वास्तू, चौथारा पाडुन आंब्याची झाडे लावली हा महाराष्ट्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच आहे आणि इथला प्रत्येक किल्ला राज्याचा एक दागिना आहे असे कोणतेही लांडे अशे आपल्या हक्क गाजवू शकत नाही जास्तीत जास्त शेअर करा

दिग्विजय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

31,151 Aufrufe • vor 3 Monaten

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

Rohit Pawar

23,218 Aufrufe • vor 1 Jahr

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 Aufrufe • vor 3 Jahren

मुंबई,चर्चगेट येथे एका कामानिमित्त गेलो असता आलेला अनुभव संतापजनक होता. एका अनधिकृत Pay & Park चालवणाऱ्याशी किरकोळ वाद झाला, पण त्या वादादरम्यान त्या हुज्जत घालणाऱ्या परप्रांतीयाने टोळीला मारहाण करण्यास बोलावलं. ते सर्व अनधिकृत पणे शहरात वास्तव्यास असणारे मंडळी होती.त्या परप्रांतीय टोळीला जो दणका द्यायचा तो मी त्याक्षणीच दिलाच, पुढे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि कारवाईही झाली. पण मी नडतो तसा प्रत्येक सामान्य मुंबईकर मराठी माणूस नडू शकत नाही पण त्यांच्यावरही ह्या टोळ्या अशीच दादागिरी करत असल्याच्या तक्रारी अनेकांनी सांगितल्या. भाजपाची सत्ता आल्यापासून परप्रांतियांची मुजोरी पुन्हा वाढू लागली आहे, एकंच सांगतो आमच्या मराठी माणसांवर पुन्हा दादागिरी केली गेली तरी गाठ शिवसेनेशी आहे हे याद राखा !

Akhil Chitre अखिल चित्रे

62,083 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 Aufrufe • vor 4 Monaten

कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय... * वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे. * २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. * प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार? आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!

Dr.Jitendra Awhad

101,418 Aufrufe • vor 1 Jahr

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,369 Aufrufe • vor 6 Monaten

आमच्यातलाच "तो" एक... मी जरी भाजपा महायुती समर्थक असलो तरी हे लिहितो... बरोबर दीड एक वर्षांपूर्वी काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्य ने पुण्यात एक महिना उपोषण केले होते... थकलेल्या पैश्यासाठी. त्याच्याकडे तेव्हा कुणाच लक्ष नाही गेले...शेवटी तो फिट येऊन पडला...दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून ही झालं होतं अस त्याचा बायकोच म्हणणं आहे...व्हिडिओ पाहा. कालच्या गोष्टी मधे त्याची मेथड नक्कीच चुकली...पण त्याच्यावर ही वेळ का आली? म्हणजे दीड वर्षे त्याने कसे सहन केले असेल?? काल देखील त्याला डायरेक्ट यमसदनी पाठवण्याची गरज का पडली?? पायांवर गोळी मारून देखील त्याला जेरबंद केलं जाऊ शकलं असतं.. असो.. एवढच सांगेन.. खूप काही गोष्टी तो त्याच्यासोबत घेऊन गेला... इथून पुढे तरी सर्वसामान्यांवर ही वेळ येऊ नये याची काळजी सरकार ने घ्यावी🙏...आणि घटनेची सखोल चौकशी करावी.

यदुनाथ जवळकर🔥

66,456 Aufrufe • vor 10 Monaten

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. १) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे. २) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे. ३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे. ४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे ५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही. ६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं. ७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

54,506 Aufrufe • vor 1 Jahr

काही वेळातच असं काय घडून जातं की एक हसणारी, स्वप्न पाहणारी व्यक्ती आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेते? हा प्रश्न आज संचिता उगाले आत्महत्या प्रकरणानंतर असंख्य मनांना अस्वस्थ करत आहे. आत्महत्या हा कधीच एका क्षणाचा निर्णय नसतो. त्यामागे अनेक दिवस, अनेक रात्री, न बोललेलं दुःख, आतल्या आत चाललेला संघर्ष, तुटलेला आत्मविश्वास आणि कदाचित मदतीसाठी केलेली एखादी निःशब्द हाक दडलेली असते. आपण अनेकदा माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहतो, पण त्याच्या मनात सुरू असलेलं वादळ पाहू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती काही ना काही लढाई लढत असते. काही जण ती लढाई जिंकतात, तर काही जण थकून जातात. संचिताच्या निधनाने पुन्हा एकदा आपल्यासमोर प्रश्न उभा केला आहे — आपण आपल्या आसपासच्या लोकांना खरंच ऐकून घेतो का? त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? की फक्त यश, अपयश आणि अपेक्षांच्या मोजपट्टीवर त्यांना मोजत राहतो? जीवन कितीही कठीण वाटलं तरी प्रत्येक अंधारानंतर पहाट असते. प्रत्येक समस्येला उपाय असतो. पण त्यासाठी माणसाला एक आधाराचा हात, विश्वासाचे दोन शब्द आणि आपुलकीची साथ हवी असते. आज संचिता उगाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐 आणि एक विनंती… तुमच्या आजूबाजूच्या माणसांना वेळ द्या. त्यांना ऐका. त्यांची विचारपूस करा. कारण कधी कधी एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त “तू ठीक आहेस ना?” हा प्रश्नही पुरेसा ठरू शकतो. जीवन अमूल्य आहे. कोणतीही अडचण आयुष्यापेक्षा मोठी नसते. 🕯️💔 भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

Shekhar

15,770 Aufrufe • vor 2 Monaten

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 Aufrufe • vor 1 Jahr

सध्या देशात देशभक्त व देशद्रोही,हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत , परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे याची पुर्णतः जाणीव या अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला सामाजिक सौहार्द संपवून अजून एक पाकिस्तानी विचार या देशात आपण निर्माण करत आहोत का ? यावरही आपण विचार करणे आवश्यक आहे.ज्याअर्थी ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात, कारण सध्याच्या राजकारणाने धर्माच्या नावाची अफूची गोळी ‘सर्वांनाच’ दिली आहे. व यामुळेच जातीय दंगे भडकतील व हजारो निष्पाप जीव जातील अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे हे शत्रू जाणून आहे, आणि म्हणूनच ते हरामखोर हे सर्व करत आहेत. आता आपण विचार करायचे आहे की ही परिस्थिती का आली ? आता आपण ठरवायचे आहे की जे त्या नराधमांना पाहिजे ते करायचे की आपापल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून या फुटीरतावाद्यांचे मनसुबे मोडून काढायचे ? येणारा काळ कठीण असेल व अशावेळी देशात सर्व समाजात देशभक्तीची भावना व सलोखा कसा राहील हे पाहणे सरकारचे व सर्वच राजकीय पक्षांचे काम आहे. जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

13,155 Aufrufe • vor 1 Jahr

आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... १) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. २) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे. ३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. ४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की. ५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे. ६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे. ७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. ८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात. ९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे. १०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का? ११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे? १२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत. १३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत . १४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार...

Raj Thackeray

49,024 Aufrufe • vor 2 Jahren

परभणी ....... एक होतकरू आणि तरुण मुलगा परिस्थितीशी झगडत कायदयाचे शिक्षण घेत पीडितांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असतो ..... त्याला अन्याय सहन होत नसतो त्याविरोधात उद्रेकात तो शामिल होतो .... पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात....... न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याच दिवशी त्याच्या तुरुंगात मृत्यू होतो.... तो तरुण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी .... सरकार छाती ठोकपणे म्हणते मृत्यू मलटीपल शॉक मुळे झाला...... मला आधीपासून ह्यात संशय होता हे जवळपास अशक्य होते... पोस्ट मार्टम मध्ये सर्व क्लिअर होते तरीहीसरकार ऐकत नव्हते कुणालातरी वाचवत होते..... आज दंडाधिकारी अहवालात हे स्पष्ट झाले कि हा मृत्यू नव्हता तर हत्या होती क्रूर हत्या.. त्यांनी तैनात पोलिसांना दोष दिला आहे.... एक इन्स्टिट्यूशनल मर्डर..... मी मनापासून सलाम करतो सोमनाथ च्या आईला........जिने स्वाभिमानाने तुटपुंजी मदत नाकारली तिने स्पष्टपणे सांगितले मला माझा सोमनाथ हवा....... मी दुःखद अंतकरणाने सांगतोय सोमनाथ तर मी आणू शकत नाही, ती ताकद भगवंताने मला दिली नाही पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल हा जितेंद्र आव्हाडचा आईला शब्द आहे.........

Dr.Jitendra Awhad

13,632 Aufrufe • vor 1 Jahr