Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

पैसे नसले की दर्शन असे होते श्री शेत्र तुळजाभवानी ५००-१००० दिले की खाली कमेंट मधे फोटो !

32,912 просмотров • 4 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

मुंबई येथील नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी व मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधला जावा, तसेच राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत व जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून स्पष्ट निर्देश दिले की, “तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा. मंदिराची परंपरा, पावित्र्य आणि धार्मिक भावना अबाधित ठेवत भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या.” यामुळे मंदिर प्रशासन, पुजारी आणि शासन यांच्यात समन्वय वाढून भाविकांना अधिक सुलभ व व्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे. #Tuljapur #dharashiv #omrajenimbalkar #eknathshindesaheb #tuljabhavani Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना

Omprakash Rajenimbalkar

25,070 просмотров • 1 месяц назад

लोकसभेत आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने बॅंकेचे खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी सरकारची पावले खासगीकरणाकडेच वळत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आयडीबीआय बँकेत सद्यस्थितीत वीस हजार कर्मचारी काम करत आहेत. तत्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या मंत्रिमंडळात स्व. जसवंत सिंह जी अर्थमंत्री असताना त्यांनी आयडीबीआय बँकेचे खासगीकरण होणार नाही. सदर बँकेचे ५१ टक्के समभाग सरकारकडे राहतील असे आश्वासन दिले होते. पण आज असे ऎकण्यात येत आहे की एलआयसीने बँकेचे शेअर घेतले असून ते विकले जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर ६१ टक्के शेअर बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेचे खासगीकरण होऊ शकते. आयडीबीआय बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मागणी आहे की बँकेचे खासगीकरण करु नये असे सभागृहात सांगितले. दरम्यान, अलिकडच्या काळात बँकेची कामगिरी चांगली होत आहे. बुडीत कर्जाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे बँकेचे खासगीकरण करु नये, अशी शासनाला विनंती केली. Urged the government to uphold former Finance Minister Shri Jaswant Singh's assurance to the Parliament and refrain from handing over the majority stake in IDBI Bank to private entities during Zero Hour in the Lok Sabha today.

Supriya Sule

17,109 просмотров • 1 год назад

अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला! ANIL DESHMUKH सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी. निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पहातोय Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar #SachinVazeonAnilDeshmukh #AnilDeshmukh #Corruption #महाभकासआघडी #उद्धवठाकरे #SachinVaze #Sharadpawar

Chitra Kishor Wagh

41,383 просмотров • 2 лет назад

बिल्डर मित्रासाठी Devendra Fadnavis आणि महापालिका आयुक्तांचा यू-टर्न महापालिका प्रश्नावर दबाव इतका मोठा होता की अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्याच खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर विरुद्ध भूमिका घेतली होती. याच महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाने २४ जून २०२२ रोजी आदेश जारी केले होते, ज्यात २००९ मध्ये दर्शन डेव्हलपर्सला दिलेली तीच एनओसी रद्द करण्याची मंजुरी दिली होती. तेव्हा जोरदार युक्तिवाद केला होता की ती एनओसी डीसी तरतुदींच्या विरोधात होती आणि सार्वजनिक हिताची नव्हती. त्यानंतर २७ जून २०२२ रोजी बीएमसीने एसआरएला एनओसी रद्द करण्याचे कळवले होते. बीएमसीनेच हे देखील निदर्शनास आणले होते की, या प्रकरणात, सुधार समितीची संमती आणि ठरावाशिवाय भूखंडाची विल्हेवाट लावण्यात आली होती, जे बेकायदेशीर आहे. बीएमसीच्या अंतर्गत दक्षता अहवालातही असे म्हटले होते की एसआरए प्रस्ताव ना बीएमसीच्या हिताचा आहे, ना व्यापक सार्वजनिक हिताचा. या प्रस्तावाबाबत केवळ आयुक्तांनीच नाही तर संबंधित प्रत्येक विभाग आणि अधिकाऱ्यांनी या भूखंडावर झोपडपट्टी योजनेला विरोध केला होता आणि एनओसी रद्द करण्याची मागणी केली होती. आयुक्त गगराणी किंवा उपायुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने, आपली भूमिका १८० डिग्री मध्ये का बदलली याचे फाईलवर कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रश्न असा आहे की, यापूर्वी बीएमसी आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग, ज्याच्या मालकीची ही जमीन आहे, त्यांना जो प्रस्ताव अस्वीकार्य होता, तो रातोरात स्वीकारार्ह कसा झाला? 👉 काय खेळ झाला? 👉 बिल्डरच्या प्रस्तावासाठी कोणी दबाव आणला? 👉 आयुक्तांवर कोणी दबाव आणला? 👉 यामागे कोण आहे? मुख्यमंत्र्याच्या यू-टर्न महापालिकेच्या नोंदींवरून असे दिसून येते की खुद्द Devendra Fadnavis जी यांनी जानेवारी २०१३ मध्ये, म्हणजेच जेव्हा ते विरोधी पक्षातील आमदार होते तेव्हा त्यांनी बीएमसीकडे तक्रार केली होती, ज्यात हा एसआरए प्रकल्प रद्द करून भूखंडाचा विकास बीएमसीने स्वतःच करावा अशी मागणी केली होती. म्हणून, मी Devendra Fadnavis जी यांना थेट प्रश्न विचारते... २०१३ पासून आता काय बदलले आहे? तुमचे हृदयपरिवर्तन का झाले?माझी Mumbai, आपली BMC चा मोक्याचा भूखंड एका खाजगी बिल्डरच्या हातात का सोपवला जात आहे? यामध्ये असे ही दिसते की ४ डिसेंबर २०१४ रोजी, तत्कालीन सुधारणा समितीच्या अध्यक्षा, भाजपच्या उज्ज्वला मोडक ताई, यांनी Ashrafazmi यांच्या तक्रारीवर कारवाई करत, २००९ ची एनओसी रद्द करण्याच्या बाजूने निर्णय दिला होता. मग आता निर्णय का बदलला? #JuhuLandScam #MitrjiviSarkar #MumbaiLootExposed #MukhyamantriLadkaMitraYojana #LandScam

Prof. Varsha Eknath Gaikwad

28,044 просмотров • 11 месяцев назад

आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं. ३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं. रत्नाशील नी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रय नी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला. १२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ? ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे. गृह मंत्री Devendra Fadnavis ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.

Mrs Anjali Damania

30,784 просмотров • 1 год назад

जय भीम, भारत देशातील शोषणाविरोधातील लढ्याचा आवाज म्हणून जर कोणाकडे पाहिले जात असेल तर ते फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच ! जेव्हा एका ठराविक समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते... जेव्हा शूद्रांना पाण्याजवळही जाऊ दिले जात नव्हते. तेव्हा त्यांनी अख्खा तलावच संघर्ष करून उघडा करून दिला. ज्या मनुस्मृतीचा पगडा अनेक शतके या देशाच्या मानगुटीवर होता.ती मनुस्मृतीच त्यांनी जाळून टाकली. रूपयाचे महत्व काय आणि त्यासमोरील समस्या काय, हे त्यांनी पुस्तकात वर्णन करून इथल्या रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी शिक्षणातील जेवढ्या पदव्या घेतल्या; तेवढ्या पदव्या या देशात आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेले नाही. त्याही साध्यासुध्या विद्यापीठातील नाही तर कोलंबिया, हार्वर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातील नंबर एकवर असलेल्या विद्यापीठातून घेतल्या. हे यासाठी महत्वाचे आहे की आहे की, जेव्हा ते व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोक्यात होते की, "मला स्वतःला वर्गात न बसताच शिक्षण घ्यावे लागले." कदाचित अनेकांना हे माहित नसेल की त्याकाळातील जातीव्यवस्थेमुळे त्यांना वर्गातही बसू दिले नव्हते. वर्गाबाहेर बसून त्यांना अभ्यास करावा लागला होता. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले. ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले अन् भारताचे संपूर्ण संविधान त्यांनी हाताने लिहिले; ते लिहित असताना त्यांनी जगातील सर्व देशांची संविधाने अभ्यासली, जगातील सर्व धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि भारताला अनेक युगे कामाला येईल, भारताला एकसंघ ठेवेल, असे संविधान त्यांनी तयार केले. पण, हे लिहिताना त्यांनी सर्वांना सांगितले की, "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा !" आधी शिका... शिक्षणाला अभूतपूर्व महत्व आहे, हे त्यांनी आधीच ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या ताकदीवर पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सिद्धार्थ महाविद्यालय आणि छत्रपती संभाजी नगरचे मिलींद काॅलेज ही त्यांचीच अपत्ये ! म्हणून जेव्हा कुठल्याही व्यवस्थेविरुद्ध, कुठल्याही अन्याय - अत्याचाराविरूद्ध घोषणा द्यायची असते तेव्हा मनातूनच एक घोषणा येते, ती असते ... जय भीम !!

Dr.Jitendra Awhad

19,711 просмотров • 1 месяц назад

23 जुलै महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला डावे पक्षांनीनी पाठिंबा जाहीर केला आहे. काही छोटे पक्ष, सामाजिक संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शिक्षण क्षेत्रातील काही संघटनांशी आमचं बोलणं झालं आहे, तेही यात सक्रिय भाग घेणार आहेत. काही ठिकाणी शिक्षक-पालक संघटनांना आम्ही विनंती केली आहे की, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. यात त्यांचे मोठे नुकसान आहे. ही आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. ट्रान्सपोर्ट, टॅक्सी युनियन, व्यापारी संघटनांशी बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमचे आवाहन आहे की, केंद्र सरकारने प्रादेशिक सेना स्टँड बाय ठेवली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व पोलिस फोर्स आहे, त्याला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला. त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला. या अत्याचाराचा निषेध आहे. सरकारच्या विरोधात उद्या जनतेने महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे. तसेच भाजप विरोधी राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन यात सहभागी व्हावे. #23_जुलै #महाराष्ट्र_बंद #DelhiProtest #JantarMantar

Prakash Ambedkar

11,702 просмотров • 1 месяц назад

लवासा प्रोजेक्ट बंद पडून १४ वर्षे झाली. आज तिथे फक्त पहिल्या फेज मधील काही बांधकामे पूर्ण दिसत असली तरी एकंदरीत वापर फारच मर्यादित आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विकसन, बांधकामे हे सगळे अर्धवट सोडून दिलेले असून केवळ कच्चे रस्ते, इमारतींचे गंजून काळवंडलेले सांगाडे असे भेसूर दृश्य आहे. जुलै २०२३ मध्ये ज्या डार्विन रिऍलिटीने हा प्रकल्प NCLT च्या रिसोल्युशन प्लॅन नुसार विकत घेतला त्यांना पूर्तता करता आलेली नाही. डार्विनला हा प्रकल्प १८१४ कोटी रुपयांना मिळाला होता. हे पैसे पुढील आठ वर्षात भरायचे होते. तसेच सदनिका आणि बंगलेधारकांना वाढीव दराने पैसे घेऊन बांधकाम करून द्यायचे होते. सुरुवातीला भरायचे काही कोट रुपये देखील भरण्यात आले नाहीत. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये NCLT ने त्या व्यवहाराला स्थगिती दिली असून अनेक नवीन बिडर लिलावात आले आहेत. वालोर इस्टेट ची सर्वात मोठी बोली (केवळ) ७७१ कोटीची आहे. बोली मागवण्यासाठी बँकांनी मुदतवाढ घेतली आहे. लवासा दिवाळखोरीत गेल्यामुळे बँकांचे तब्बल ५,७१३ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. म्हणजेच भारतीय नागरिकांचे एवढे पैसे हजामतीमध्ये गायब झालेले आहेत (haircut). हे जे नुकसान झाले ते कोणाचे? अजित गुलाबचंद यांचे? पर्यावरणवाद्यांचे की जनतेचे? एक जागतिक दर्जाची लेक सिटी वेळेत होऊ शकले नाही, हे नुकसान कोणाचे? ते असो .. पण लवासा बंद पाडण्यामागे तेथील आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या जनआंदोलनाचा आणि पर्यावरणवाद्यांचा मोठाच सहभाग आहे. लवासा कंपनीने हम करे सो कायदा या न्यायाने महसूल, नगर नियोजन, कमाल जमीन धारण कायदा आणि पर्यावरण विषयक कायद्यांचे उघड उघड उल्लंघन केले. लवासासाठी चार पदरी रस्ता बांधून त्याचा भुर्दंड सामान्य प्रवासी नागरिकांना पडू लागला. या सगळ्या प्रकारांमुळे या प्रकल्पाविरुद्ध तीव्र जनमानस तयार झालं. तसेच विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायालयाने हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. कालांतराने कंपनी नुकसानीत आणि नंतर दिवाळखोरीत गेली. नादारी आणि दिवाळखोरी IBC कायदा तर सरळ सरळ कर्जबुडव्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच बनवलेला आहे. कंपनी कायदा न्यायाधीकरण NCLT, प्रकल्पाची मालमत्ता लिलावाने विकून, येतील तेवढे पैसे घेऊन नवीन कंपनीला प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठीच काम करते. बँका त्यांच्याकडची थकीत कर्ज तिसऱ्याच कंपनीकडे हस्तांतरित करून स्वतःचे ताळेबंद स्वच्छ करतात. यामध्ये कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्त संस्थांचे करोडो रुपयांचे नुकसान होते ज्याला हेअर कट असा चकचकीत शब्द वापरला जातो. हे नुकसान देशातल्या जनतेचे आणि सामान्य नागरिकांचे असते कारण त्यांचा कष्टाचा पैसा सर्वांच्या संगनमतने बुडालेला असतो. प्रकल्प आला की त्याला विरोध. जनआंदोलन हा लोकशाही हक्क आहेच पण ज्याप्रमाणे पर्यावरणवादी कोणत्याही प्रकल्पाला विरोध करताना सोशल अँड इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट ची मागणी करतात तसे इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेसमेंट त्यांनी स्वतःच्या आंदोलनाचेही केले पाहिजे. आंदोलन केल्यानंतर नक्की काय होईल, त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, काय फायदा होईल याचा विचार करून विरोध केला पाहिजे. केवळ हे बंद पाडा, ते बंद पाडा यामुळे काहीच साध्य होणार नाही. चळवळींनी आणि पर्यावरणवाद्यांनी पर्यायी विकास नीती काय याची सुद्धा मांडणी केली पाहिजे. त्याशिवाय आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. #लवासा #LAVASA #पर्यायी_विकास_नीती ॲड. संदीप ताम्हनकर. पुणे.

Saurabh Koratkar

31,702 просмотров • 10 месяцев назад

स्मशानातले जोगी तारांकित हॉटेलात आले! उद्योगपतीच्या वाढदिवसाचे सोने झाले!! -विश्वास पाटील संभाजीनगरच्या मेलोर नावाच्या थ्री स्टार हॉटेलमध्ये डॉ. डी. एस. काटे या उद्योगपतींच्या एकसष्टीच्या सोहळ्याला स्मशानातील 49 पाहुणे हजर होते. त्या तारांकित हॉटेलमध्ये 500 प्रतिष्ठित पाहुण्यांच्या गर्दीत स्मशानातील आपले पारंपारिक पेहराव परिधान करून आलेली ही मसणजोगी मंडळी उठून दिसत होती. त्यांची उपस्थिती ही श्री. काटे यांच्या 21 जून रोजी झालेल्या वाढदिवस सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली होती. स्मशानातील मसणजोगी मसणवाट सोडून कधीही फारसे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांना नागरी जीवनातील किमान आनंद मिळणे जिथे दुरापास्त असते, तिथे तारांकित हॉटेलातील सत्कार आणि प्रतिष्ठा या गोष्टी स्वप्नातसुद्धा शक्य नसतात. पण काटे साहेबांनी संभाजीनगर आणि आजूबाजूच्या अनेक खेड्यातील स्मशानभूमींमध्ये चक्क आपले प्रतिनिधी व मित्र पाठवले. अहोरात्र प्रेताला अग्नी देणे, त्याच दुर्गंधीत राहणे हा स्मशानजोगी मंडळींचा दिनक्रम असतो. तेथील महिला तर त्या तिथल्या धुरकट व अंधाऱ्या वातावरणातून कधीही बाहेर पडत नाहीत. उपस्थितांपैकी सहा महिलांचे कुंकू कोरोनामध्ये हरवले होते. त्यांच्या रूढीपरंपरेप्रमाणे स्मशानाची हद्द त्यांना सोडताच येत नाही. पण काटे साहेबांच्या प्रचंड आग्रहामुळे त्यांना या सोहळ्यास यावेच लागले. या भगिनींच्या डोळ्यांतून आपला सत्कार होताना अश्रू वाहत होते. मग त्यांनी स्पष्टपणे सर्वांना सांगितले की, “आम्हाला आमचं कुंकू पुसलं गेल्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच या काटे नावाच्या बांधवामुळे बाहेरची हवा म्हणजे काय आणि ऊन, सूर्य अशा गोष्टी पाहायला मिळाल्या.” या सर्व मंडळींना साडी-चोळी, पॅन्ट-शर्ट असा संपूर्ण पोशाख करून श्री. काटे यांनी त्यांचा सन्मान केला. आपल्या देशात अनंत उद्योग करणारे आणि डोंगरासारखा पैसा मिळवणारे उद्योगपती थोडे आहेत का? पण आपल्या 61 व्या समारंभामध्ये समाजाच्या एकदम खालच्या थरातील, स्मशानातील गरीब बांधवांची आठवण काढणारे देशातील डॉक्टर काटे हे पहिले उद्योगपती असावेत. आमचे मित्र श्री. डॉक्टर डी. एस. काटे हे संभाजीनगरातील एक अभ्यासू आणि प्रतिष्ठित असे उद्योगपती आहेत. अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये लिहिलेले अर्थदिशा, अर्थसंपदा, अर्थनीती असे अनेक ग्रंथ लोकप्रिय आहेत. विविध वृत्तपत्रांतून काटे यांचा परिचय वाचकांना आहे. त्यांनी “संत तुकोबा ते संत चोखोबा—एक वारी समतेची” या नावाचा उपक्रम राबवून मंगळवेढा ते देहू असे नेटके संयोजन केल्याचे अनेकांना माहिती आहे. नानाविध सामाजिक उपक्रम व चळवळींमध्ये श्री. काटे भाग घेत असतात. त्यांना किंगडम ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून सन्मानाची पीएच.डी.सुद्धा प्राप्त झालेली आहे. या रसिक व समाजप्रेमी मित्राचे मी जाहीर अभिनंदन करतो. यानिमित्ताने आम्ही इतकेच म्हणू, “काटे साहेब, तुम्ही जगा हजारो साल, तुमच्या करणीने गरिबांचे कमी व्हावेत हाल! जनसामान्यांचे आशीर्वाद हीच तुमच्या जीवनसंघर्षाची ढाल!” – विश्वास पाटील #VishwasPatil #DrDSKate #Masanjogi #NomadicTribes #SocialJustice #ChhatrapatiSambhajinagar #Leadership #author

Vishwas patil

16,450 просмотров • 2 месяцев назад

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 просмотров • 3 лет назад