Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

फोन राजे निंबाळकरांचा असा पोरांनी बाजार उठविणे चुकीचे आहे 🥹🤣

38,986 просмотров • 9 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля चम्पक चाचा
चम्पक चाचा9 дней назад

Par ijjat kadun ghetlis laka omya 🥲🥲

Фото профиля Br.M.M. Soomeya Geeta Suresh Gawade
Br.M.M. Soomeya Geeta Suresh Gawade9 дней назад

PRraje साठी हपापलेले म्हणा

Фото профиля Ritu
Ritu8 дней назад

जे त्या पक्षाचं झाल नाही तर विद्यार्थ्यांच काय होणार #फितूर

Фото профиля Akshay Bhave
Akshay Bhave9 дней назад

पुर्वी तिकडची लोक 'phone राजे ' म्हणायची आज इकडची त्याला विरोध करायची आता इकडचीच म्हणतात😂😂😂

Фото профиля Hamsan2319🎯
Hamsan2319🎯7 дней назад

खाजराजे निंबाळकर निंबाळकर घराण्याला नमकहरामी गद्दारी करण्याचा नाद थोरल्या महाराजांच्या काळापासून आहे. 🙏

Фото профиля Akshay bobade
Akshay bobade8 дней назад

हे विध्यार्थी असं वागणे बर नाही आधी सरकार असं हवं आहे जी कोणतं राजकीय आंदोलन नाही म्हणून सगळे स्वागत आहे विध्यार्थी आधी हाक आहे कोणी येऊ शकते

Фото профиля Son of a Farmer
Son of a Farmer8 дней назад

राजे म्हणुन नाव लावल्याने कोणी राजा होत नाही अणि तशी तुमची लायकी पण नाही. जा गपगुमान अणि खोके पचवा.पोरांच्या नादाला लागू नका. पोर तुम्हाला विकून येतील.

Фото профиля Arjun Deshmukh
Arjun Deshmukh9 дней назад

Lachar

Фото профиля Sharad Gawali
Sharad Gawali7 дней назад

हे काय बरोबर नाही अध्यक्ष महोदय 😂😂

Фото профиля Sumit_Che
Sumit_Che8 дней назад

हा एवढा घाबरला आहे कि सोशल मीडियावर ह्या भेटीची पोस्ट पण टाकली नाही.

Похожие видео

चाटूगीरी करण्याचा नादात कालीचरण महाराजांनी चुकीच्या ठिकाणी हात टाकला 😡 आता माराठे या महाराज चा बाजार उठवणार 💪🏻💪🏻💪🏻 सोबत महायुती च्या सोबात आसलेल्या पक्षाचा देखील #सुपडासाफच करनार 💯💯 खोटे वाटत असेल तर कोठेही जा Facebook Instagram youtub सगळीकडे मराठ्यांनी याचा बाजार उठवायचा कार्यक्रम सुरू केला आहे 🤣🤣😂😂 #संघर्ष_जारी_रहेगा 💪🏻 #मराठा_आरक्षण Mission #सुपडासाफ सुरू आहे एक मराठा कोटी मराठा🚩🚩 जरांगे फॅक्टर 2.O💪🏻💪🏻 #मतदान_करताना_हे_विसरू_नका #विधानसभा_निवडणूक_२०२४ #मनोज_जरांगे_पाटील #Maratha #मराठायोद्धा #मराठा_विरोधी_महायुतीसरकार #मराठा #MarathaVirodhiMVA #विधानसभा_निवडणूक_२०२४ #निवडणूक२०२४ #MarathaReservation #DevaBhau #Team_Devendra

मराठा Empire🚩

52,906 просмотров • 1 год назад

कालच्या माझ्या पोस्टने महाराष्ट्रात पुणे vs उर्वरित महाराष्ट्र असा वाद सगळा सोशल मिडीयावर आता टोकाला पोहोचला पन माझ्यावर टिकास्र सोडायच्या आधी ह्या सरांना भेटा..! हे आहेत पुण्याचे जहागीरदार शशिकांतशेठ गरडकर हे सर रोज पुणे मुंबई आपल्या swift गाडीतून (पिवळी नंबर प्लेट) भाडे मारतात व सुत्रांच्या हवाल्याने सांगतो सरांनी यंदा vivo v50 हा आय फोनपेक्षा महागडा फोन हप्त्यावर घेतलेला आहे…! सरांनी परवा पोस्टर फडकावत नॅानपुणेकरांना विनवणी केली आहे की परत पुण्यात येवु नका…! असो… आसे झालेच तर सरांची swift गाडी व हप्त्यावर घेतलेला Vivo फोन लवकरच बॅंकेच्या लिलावात येवु शकतो..! व्हिडिओत शेवट तीन व्हिडिओ सरांचे देत आहेत ते नक्की पहा सरांनी Vivo फोन घेतलेला दुसरा गरडकर सर रविवारी पन सुट्टी घेत नाही व तिसरा पुण्याचे जहागिरदार गरडकर सरांना तुम्हाला भेटायचे आसेल तर पुणे एअरपोर्टच्या पाकिंग मध्ये जा सर तासानतास पार्किंग मध्ये भाडे मिळेल ह्या आशेने उभे असतात…! 🤣🤣 पुणेकर काय रोज मुंबईला जात नाही वर्ष दोन वर्षातून कधी जायचे झालेच तर लोकल रेल्वे टमध्ये टिकीट न काढता गाडीत बसतात व टिकीट चेकर आलाच तर नाकात बोलून दहा वीस रूपये टेकवून बरोबर चुना लावतात…! तेव्हा गरडकर सरांची हप्त्याची वांधी होण्याची दाट शक्यता आहे त्यात घर सोडले तर जमीन आसेल आसे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही तरी पुण्याचे जहागीर गरडकरांना व घरं PG ला भाड्याने देवुन भाडं खावुन जगणाऱ्या कोर पुणेकरांना पन दिवाळी शुभेच्छा 💫✨👍💐 #Diwali2025

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

71,649 просмотров • 11 месяцев назад

शहापूरमध्ये दामानीया इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापदायक घटना घडली आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे. मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही… पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणं म्हणजे लज्जास्पद बाब आहे. हि घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे. शाळा म्हणजे विश्वासाचं, संरक्षणाचं ठिकाण असायला हवं… पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचं अड्डा बनला… या घटनेबाबत संबंधित मुख्यध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे असे समजते. याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रूजवला गेला पाहिजे… तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. #दामानिया_इंग्लिश_स्कूल #शहापूर #स्त्रीशिक्षण #POSCO #WomenHealth Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Chitra Kishor Wagh

12,873 просмотров • 1 год назад

खडकवासला विधानसभेचे उमेदवार श्री. मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे जाहीर सभा घेतली, त्यातील महत्वाचे मुद्दे १) माझा मित्र, सहकारी रमेश वांजळेंचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं ते कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल. २) खरंच मनापासून सांगतो की पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. ३) एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून जग कुठे गेलं आहे ते... आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही हे वाईट आहे. ४) शिवरायांचं निधन झाल्यावर रायगडावर समाधी बांधली गेली आहे. पुढे कोणीतरी समाधीच्या खाली काहीतरी मिळेल या आशेने तिथे उकरून ठेवलं. पुढे महात्मा ज्योतिबा फुले तिकडे गेले, त्यांनी समाधी पुन्हा उभारायचं ठरवलं, त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले आणि त्यांनी ही समाधी चांगली करण्यासाठी पैसे उभे केले. यासाठी अठरापगड जातीतील लोकांनी समाधी उभी करायला पैसे गोळा केले. असा महाराष्ट्र होता आमचा. ५) आम्ही कसं खितपत जगतोय याचं आम्हाला घेणंदेणं नाही, आम्हाला जातीपातीत जास्त स्वारस्य आहे. आज पुण्यात आयसिस, सिमीसारख्या संघटनांचे अतिरेकी सापडत आहेत. पण याकडे कोणाचंच लक्ष नाही. आमदार खासदारांना फक्त टेंडर काढायची आहेत, आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, त्यांना इतर गोष्टींशी घेणंदेणं नाही, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये म्हणून ते तुम्हाला जातीत गुंतवतात. ६) तुम्ही इतकी वर्ष ज्यांना मतदान केलं त्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मुलं हा देश सोडून निघालेत. शिक्षण, नोकऱ्या त्यांना इथे पण मिळू शकतात, पण ते का चाललेत, कारण आजूबाजूचं वातावरण घाणेरडं आहे. मला या सांगा या असल्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले ? ७) ज्या हिंद प्रांतावर महाराष्ट्राने राज्य केलं, त्या महाराष्ट्राला मला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. ८) इतर पक्षातील जी लोकं निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राबद्दलची कोणीतीही स्वप्न नाहीत. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा येत आहे. त्यात आपण महाराष्ट्रापुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत. ९) शरद पवारांनी बारामतीत अनेक उद्योग आणले पण त्याच पवार साहेबांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे का नाही आणले ? मग तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणायचं ? स्वतःच्या तालुक्याचा विकास करणाऱ्याला तालुक्याचा नेता का नाही म्हणायचं ? १०) मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मयुरेश वांजळे, आणि माझे पुरंदरचे उमेदवार उमेश जगताप आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

99,842 просмотров • 1 год назад

आदरणीय फडणवीस साहेब, #पावसाळी_अधिवेशन सुरू असताना #पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती. आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परिक्षेत या टोळ्या पेपर फोडायला लागल्या. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच मंत्रालयातून त्यांना सोडण्यासाठी फोन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची हिंमत इतकी वाढलीय की ते #MPSC चे पेपर फोडायला लागले आहेत आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांना जबाबदार धरायचे की त्यांना अभय देणाऱ्या सरकारला? शासनाने थोडा #serious पणे विचार करावा, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की, #राजस्थान #उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा, जेणेकरुन पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही! Devendra Fadnavis

Rohit Pawar

77,460 просмотров • 3 лет назад

फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? – फडणवीसा बद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे. अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच. पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणी वरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा करत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? "मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल" असंही देवेंद्रजी म्हणाले. खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकलने, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले? काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का? असेलही कदाचित. आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये. @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #आरक्षणलढा

SushmaTai Andhare

23,870 просмотров • 1 год назад

आदू बाळ Aaditya Thackeray म्हणतंय भाजपचे लोक दिशा सालियन प्रकणारत मला बदनाम करताय. बरं हे किती लबाड बोलतंय बघुयात! जर याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, तर मग या या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज का दाखल केला? दिशा सालियनच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे जाऊ नये, असा आक्षेप का घेतला? आणि सीबीआयने या प्रकरणाचा आधीच तपास करून तुम्हाला क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे उच्च न्यायालय आता हे प्रकरण ऐकू शकत नाही, असे खोटे प्रतिज्ञापत्र का दाखल केले? जेव्हा उच्च न्यायालयाने याची पडताळणी केली आणि तुमचा खोटेपणा उघड झाला, तेव्हा याला माफी मागावी लागली. त्यानंतर ८ जूनला म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो, माझे नानाजी वारले होते आणि मी डोंबिवलीत होतो, अशी खोटी कहाणी सांगण्याची गरज काय होती? तेही खोटे ठरले. तुझा नानाजी ८ जूनला नव्हे, तर १४ जूनला वारले होते. त्यानंतर रिया चक्रवर्तीशी माझा कोणताही संबंध नाही, असे खोटे सांगण्याची गरज काय होती? नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीचे फोन जप्त करून त्यातील डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर केले. त्यातून रिया आणि आदित्य यांचे अनेक वर्षांपासून संबंध असल्याचे समोर आले. दिशाच्या मृत्यूच्या दिवशीच रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला सोडून निघून गेली आणि तिने त्याचे फोन ब्लॉक केले. हा सीबीआयच्या तपासाचा अहवाल आहे. या सर्व गोष्टी आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही हस्तक्षेप अर्ज दाखल केला. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या वकिलाला प्रतिज्ञापत्राद्वारे नोटीस दिली. तुमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे तु म्हणतोय; पण तुमच्याविरोधात भरपूर पुरावे आहेत.. नारकोटिक्स ब्युरोने तुमचा आणि डिनो मोरियाचा फोन सर्व्हिलन्सवर ठेवला होता. त्या फोन सर्व्हिलन्समधून आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया मुंबईत ड्रग्जचा व्यवसाय करतात, असे आढळून आले. तसेच, त्यांच्या तपासात आदित्य ठाकरे ‘हायड्रोपोनिक वीड’ या प्रतिबंधित अमली पदार्थाचे सेवन करतात, असेही आढळून आले. ते स्वतःच एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा ठरते. हे सर्व रेकॉर्डवर असताना आम्ही विचारले यावर तुमचे काय म्हणणे आहे? उत्तर द्या. पण १२ महिने झाले तरी उत्तर आलेले नाही! त्यानंतर आमच्यावर आरोप करण्यात आला की, तुम्ही भाजपच्या इशाऱ्यावरून हे सर्व करत आहात. त्यावर जनहित याचिकाकर्ते रशीद खान पठाण यांच्या वतीने ‘सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट लिटिगंट असोसिएशन’कडून १९,७५० कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली. आजपर्यंत त्याचेही उत्तर आलेले नाही! जो माणूस आरोपांना उत्तर देत नाही, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, काही परिस्थितींमध्ये ते ‘इम्प्लाइड अॅडमिशन’ म्हणजेच अप्रत्यक्ष कबुली मानली जाऊ शकते. हो, जर त्यांनी म्हटले असते की ‘मी आरोपी आहे आणि माझा बचाव मी उघड करणार नाही,’ तर ती वेगळी गोष्ट होती. पण ते म्हणतात की, ‘माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.’ मग दिशा सालियनचे प्रकरण सीबीआयकडे देऊ नका, असा विरोध करण्यासाठी तुम्ही आलातच का? तुमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता आणि तुम्ही निष्पाप होता, तर तुम्ही म्हणायला हवे होते—‘सीबीआयलाच काय, कोणालाही तपास द्या. तातडीने चौकशी करा; दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या.’ सीबीआयने एफआयआर नोंदवला म्हणून लगेच तुम्हाला अटक करायला ते येणार नव्हते! तुम्हाला भीती होती ती याचीच की एफआयआर नोंदवला गेला तर या सगळ्या गोष्टी बाहेर येतील... आणि आमच्याकडे तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही आहेत! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Narendra Aher

10,972 просмотров • 1 месяц назад

'9 किलोमीटर उंच ढग' तसे '4 किलोमीटर वर मंदिर'! जन्मतःच ढिल्लाच असलेला 'स्क्रू' आर्थर रोड वारीत पडल्यानंतर ठार वेडे झालेले Sanjay Raut म्हणत आहेत की अयोध्येतील राम मंदिर हे बाबरी जमीनदोस्त केली गेली त्या रामजन्मभूमी पासून 4 किलोमीटर लांब बनवलं जात आहे..🤣 यावर एवढंच म्हणेन : संजय राऊत सर्व हिंदूंना प्रबोधनजीवी शिउबाठा सैनिकांसारखे मूर्ख समजून धडधडीत खोटं बोलत आहेत. आणि, लाचार मराठी मीडिया त्यांचं खोटं शंभर वेळा दाखवून संभ्रम पसरवण्याची सुपारी बजावत आहेत. दोघांनाही माझा सविनय आक थु! आता फॅक्ट काय आहे बघा : भाजपकडून बाबरी जमीनदोस्त केली गेली, बरोबर 'त्याच' ठिकाणी राम मंदिर उभारले जात आहे! 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' म्हणजे काय हे तरी माहीत आहे का यांना? 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' म्हणजे तीच 2.77 एकर जमीन ज्यावरून सुप्रीम कोर्टात लढा सुरू होता आणि जी जमीन सुप्रीम कोर्टाने 5-0 निकाल देत हिंदूंना परत द्यायचा ऐतिहासिक निकाल दिला होता. आता 67 एकर : काँग्रेस ने बाबरीचे रक्षण करण्यासाठी या 2.77 एकर जमिनीसहित (मशिदीसहित) एकूण 67 एकर जमीन अधिग्रहण केली होती, त्यातील ही 2.77 एकर ज्याला 'रामजन्मभूमी' मानले जाते. निकालानंतर : सुप्रीम कोर्टाने या 2.77 एकर जमिनीचा निकाल दिल्यानंतर काँग्रेसने अधिग्रहण केल्यामुळे केंद्राच्या मालकीची असलेली एकूण 67 एकर जमीन मोदी सरकारने राम मंदिर ट्रस्ट ला दिली. गेल्या 2 वर्षात राम मंदिर ट्रस्ट ने अजून साधारण 150 एकर जमीन विकत घेतली आहे. भाजपने बाबरी पाडली तेंव्हा : सोपं करून सांगतो. भाजपने बाबरी पाडली त्यावेळी त्याठिकाणी तात्काळ, त्याच 2.27 एकर मधील बाबरी 'समतल' करण्यात आलेल्या जागेवर, अर्थात रामजन्मभूमीवर एक रामाची मूर्ती स्थापन करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर 'त्याच' ठिकाणी गर्भगृह आलं पाहिजे म्हणून ती मूर्ती योगी आदित्यनाथ यांनी स्वतः हातात घेऊन ती मूर्ती केवळ 100-125 मीटर अंतरावर पुनर्स्थापना केली व मूळ ठिकाणी मंदिराचे काम सुरू झाले (विडिओ जोडला आहे). आजही अयोध्येत गेलेले भाविक 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' जागेवर अर्थात रामजन्मभूमी वर निर्माणाधिन असलेल्या मंदिराच्या फक्त 100-125 मीटर अंतरावर योगींनी मूर्ती ठेवली, त्या रामाच्या मूर्तीचे दर्शन घेत आहेत. मस्जिद कुठं बनत आहे? : त्याकाळी फैजाबाद जिल्हा होता आणि अयोध्या त्यातील एक गाव. सुप्रीम कोर्ट अयोध्येतच मशिदीसाठी जागा द्यायला भाग पाडू शकते याचा अंदाज आल्याने मोदी-योगी जोडगोळीने फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण करून अयोध्या जिल्हा बनवला (नोव्हेंबर 2018). 'मशिदी साठी अयोध्येतच वेगळी जागा द्या' आदेश आल्यावर राममंदिराच्या बाजूला जागा द्यावी लागली असती कारण अयोध्या नगरी फार मोठी नव्हती. मोदी-योगी जोडगोळी यांच्याकडील दूरदृष्टी चा परिणाम असा झाला की आता SC च्या आदेशानुसार 'अयोध्या जिल्ह्यात' जागा देण्यात आली आहे. ही जागा दिली आहे त्या जागेचे नाव आहे धन्नीपूर! धन्नीपूर हे गाव अयोध्या जिल्ह्यातच आहे पण ते रामजन्मभूमी पासून 24.6 किलोमीटर दूर आहे. अयोध्येत मंदिर-मशीद वादाला स्कोपच नाही ठेवलाय आता.. तात्पर्य.. 'आम्ही बाबरी पाडली' म्हणणाऱ्या लोकांना अयोध्येचा 'अ' पण नाही माहीत. मला तर वाटतंय की यांचे गुडघ्यात मेंदू असलेले यांचे फट्टू शिलेदार तेंव्हा अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी पासून 4 किलोमीटर लांब कुठं तरी काही तरी भलतंच बाबरी समजून पाडून, तसेच कलकत्त्याला पिकनिकला निघून गेले असावे. म्हणून संजय राऊत यांना वाटतंय की मंदिर त्या ठिकाणाहून चार किलोमीटर लांब बांधलं जात आहे. असो! यांची चुतीयागिरी हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. त्यावर पुन्हा कधी तरी.. जय श्रीराम!🚩

राईट विंग ऑफ महाराष्ट्र

27,707 просмотров • 2 лет назад

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५

Raj Thackeray

140,281 просмотров • 1 год назад

निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही बूथ पातळीवरील अधिकाऱ्याने (BLO) कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून मतदार यादीचे काम करणे किंवा तिथे नागरिकांना बोलावणे ही अत्यंत गंभीर चूक मानली जाते. याचे कारण आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: १. निवडणूक आयोगाची तटस्थता (Neutrality of ECI) निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र असणे आवश्यक आहे. BLO हा निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. त्याने कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून काम केल्यास निवडणूक प्रक्रियेच्या तटस्थतेवर (Neutrality) प्रश्नचिन्हनिर्माण होते. २. पक्षपातीपणाची शक्यता (Bias and Influence) राजकीय पक्षाच्या कार्यालयात काम केल्याने ठराविक पक्षाच्या मतदारांची नावे वाढवणे किंवा विरोधी पक्षाच्या मतदारांची नावे हेतुपरस्पर वगळणे (Deletion) असे प्रकार घडू शकतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर किंवा मतदारांवर राजकीय दबाव येऊ शकतो. ३. प्रत्यक्ष घरटी सर्वेक्षणाचा भंग आधी स्पष्ट केल्याप्रमाणे, SIR अंतर्गत BLO ने प्रत्यक्ष मतदाराच्या घरी (House-to-House) जाणे बंधनकारक आहे. पक्ष कार्यालयात बसून कागदपत्रांची गोळाबेरीज करणे हा नियमांचा सरळ सरळ भंग आहे. अशी परिस्थिती आढळल्यास काय करावे? (How to Report) जर तुमच्या भागात असा प्रकार घडत असेल, तर तुम्ही नागरिक म्हणून खालील ठिकाणी तातडीने तक्रार नोंदवू शकता: निवडणूक आयोगाचे पोर्टल (National Voters' Service Portal): तुम्ही वर किंवा Voter Helpline App वर थेट तक्रार (Grievance) नोंदवू शकता. टोल-फ्री क्रमांक: निवडणूक आयोगाच्या 1950 या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून या प्रकाराची तक्रार करा. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) / तहसीलदार: तुमच्या तालुक्याचे तहसीलदार किंवा मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer - ERO) यांच्याकडे लेखी किंवा तोंडी तक्रार दाखल करा. जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO): जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) हेच जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. त्यांच्या कार्यालयातील निवडणूक शाखेत जाऊन तुम्ही थेट पुराव्यासह (शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ) तक्रार करू शकता. निवडणूक आयोग अशा प्रकरणांमध्ये संबंधित BLO वर तातडीने निलंबनाची (Suspension) किंवा शिस्तभंगाची कारवाई करतो. Election Commission of India

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

18,056 просмотров • 2 месяцев назад

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,497 просмотров • 1 год назад