正在加载视频...

视频加载失败

बाप तो बापच असतो,एका वाघाला भाजपा च्या लाखो लांडग्यांनी घेरला पण तो सर्वाचा बाप निघाला 🙏🚩✌जय महाराष्ट्र

20,665 次观看 • 8 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

मी आणि मनोज प्रधानांनी ९३-९४ साली दहीहंडीचा उत्सव सुरू केला, तेव्हा हा उत्सव एक दिवस एवढा मोठा आणि भव्य सांस्कृतिक सोहळा बनेल, याची कल्पनाही नव्हती. वर्षानुवर्षे सवंगडी जोडत गेले… गोविंदा पथकं जोडत गेली… आणि दहीहंडी केवळ उत्सव न राहता, हजारो माणसांना एका भावनेने जोडणारा सोहळा बनत गेला. हा प्रवास २०१५ पर्यंत सुरू राहिला. या संपूर्ण प्रवासातील माझ्या मनाजवळचा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे — ‘जय जय महाराष्ट्र माझा!’ २००५ साली पहिल्यांदा दहीहंडीच्या व्यासपीठावर हे गीत सादर केलं. सगळ्या सवंगड्यांना आणि गोविंदा पथकांना सोबत घेत, हजारो आवाज एकत्र आले आणि महाराष्ट्रगीताचा जयघोष झाला. तो सोशल मीडिया आणि रिल्सपूर्वीचा काळ होता. त्यामुळे तो क्षण फार दूरवर पोहोचला नाही. पण त्या दिवशी मनात निर्माण झालेला महाराष्ट्राभिमान आजही तितकाच जिवंत आहे. आज सोशल मीडियामुळे दहीहंडीतील असे क्षण लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अनेकांना हे कदाचित नवीन वाटत असेल; पण माझ्यासाठी हा क्षण केवळ आजचा नाही. ही माझ्या आयुष्याची आठवण आहे. ही माझ्या दहीहंडीच्या प्रवासाची आठवण आहे. आणि ही महाराष्ट्राविषयीच्या अभिमानाची अविभाज्य भावना आहे. दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडणं नाही. एक पडला, तर दुसऱ्याने त्याला सावरायचं… एकाची ताकद कमी पडली, तर दुसऱ्याने खांदा द्यायचा… आणि एकमेकांवर विश्वास ठेवून आकाशाला गवसणी घालायची… हीच मराठी मातीची शिकवण. हीच दहीहंडीची खरी ताकद. जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा! कारण हे केवळ एक गीत नाही… हा प्रत्येक मराठी मनाच्या अभिमानाचा आवाज आहे! 🚩 जय महाराष्ट्र! 🚩

Dr.Jitendra Awhad

59,525 次观看 • 26 天前

कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय... * वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे. * २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. * प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार? आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!

Dr.Jitendra Awhad

101,429 次观看 • 1 年前

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. १) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे. २) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे. ३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे. ४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे ५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही. ६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं. ७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

54,506 次观看 • 1 年前

महामार्गाचे यश उद्घाटनाने ठरत नाही; ते गुणवत्तेने, सुरक्षिततेने आणि नागरिकांच्या विश्वासाने ठरते. MORTHINDIA NHAI “मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ३१ जून,३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,” असे वारंवार सांगितले जाते. पण एक प्रश्न आहे—नेमके कोणत्या वर्षी? Nitin Gadkari MORTHRoadSafety Indian Road Safety Council NHRC India सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- झाराप झिरो पॉईंट, सावंतवाडी येथे नव्याने बांधलेल्या पुलावरील Reinforced Earth (RE) Wall च्या पॅनेलची डागडुजी सुरुवातीलाच करावी लागत आहे. काही ठिकाणी सिमेंट लावून दुरुस्ती सुरू असल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर पुढील भागात भिंतीमध्येही विकृती दिसत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. प्रश्न असा आहे की, नव्याने उभारलेल्या संरचनांवर इतक्या लवकर दुरुस्तीची वेळ का यावी? कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची? सर्वसामान्य नागरिकांना या त्रुटी सहज दिसतात; मग संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयाच्या नजरेत या बाबी का येत नाहीत? Shivendrasinh A Bhonsle CMO Maharashtra Pratap Baburao Sarnaik मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही; तो कोकणच्या विकासाचा, पर्यटनाचा, व्यापाराचा आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा जीवनदुवा आहे. त्यामुळे या महामार्गावरील प्रत्येक पूल, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक किलोमीटरची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे महामार्गावरील अनेक कामे अद्याप सुरू आहेत, तर दुसरीकडे टोल वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात स्वाभाविकच प्रश्न निर्माण होतो—पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार महामार्ग मिळण्यापूर्वी टोल आकारणी कितपत योग्य आहे? आश्वासने नव्हे, दर्जेदार आणि सुरक्षित मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हवा! व्हिडिओ चित्रीकरण : सर्वेश पेडणेकर धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक

Er. Chaitanya Usha Laxman Patil

11,760 次观看 • 2 个月前

या व्हिडिओ मध्ये जे वर्णन आहे त्यात केवळ एक किंवा दोन नाही तर विविध वयोगटातील अनेक स्त्रिया या वर्णनात फिट बसतात. महागडे कपडे व भडक मेकअप (शक्यतो लग्न, सणवार यावेळी करतात तसा), श्रीमंती थाट, आकर्षक लोकेशन (अनेकवेळा परदेशात), थोडक्यात तुम्हाला यांची समृद्धी बघून जळजळ होईल असाच तोरा ठेवत ही पात्र आपल्या नजरेसमोर सोशल मीडिया च्या माध्यमातून नाचत असतात. महत्वाच्या पदावर असलेल्या विवाहित स्त्रीला मूल, नवरा व घरच्या इतर जबाबदार्‍या सांभाळत रोज मॉडेल प्रमाणे वावरण कस जमत? कारण कौटुंबिक जबाबदारी शिवाय ज्या पदावर या महिला काम करतात त्यांचे वर्क लोड प्रचंड असत, त्यामुळे नक्कीच ताण येतो. महिला म्हणून वावरताना जी आव्हान असतात ती आणखी वेगळी. हे सर्व करत असताना सतत आनंदी आणि फ्रेश राहणे कसे शक्य आहे? फेमस रीलस्टार सरपंच आठवतात का ज्या सरपंच कमी मॉडेल जास्त वाटायच्या. रीलस्टार होणे हे सरपंच किंवा कोणत्याही संवैधानिक पदाची गरज असावी इतके ही लोक इंस्टाग्रामवर आपली प्रतिमा जपतात. यांच्या नावावर कोणतेही ठोस काम नसत व भ्रष्टाचार करण्यात नंबर पुढे.. माझा मेकअप आणि ड्रेसिंगवर अजिबात आक्षेप नाही, रोजच्या कामाला अनुकूल राहायला हव. गबाळ राहणं योग्य नाही पण स्त्रीचे मूल्य हे केवळ कॉस्मेटिक आहे का? सोशल मीडियाच्या जगात जिथे कॅमेरा तुमच्यावर रोखलेला असतो तिथे दिसण्यात थोड सावध राहावे लागत पण काहीही काम न करता केवळ दिसण्यावर भर दिल्या जात आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. सातत्याने आकर्षक दिसत, अनेक फिल्टर वापरुन पुरूषांना आकर्षित करेल अशीच प्रतिमा तयार करणे यावर भर दिसतो. स्त्रियांनी प्रश्न विचारू नये व स्वत:ची बुद्धी चालवू नये या मताच्या पुरूषांनी तयार केलेली ही व्यवस्था सध्या चलनात आहे. अश्या सतत आनंदी राहणार्‍या स्त्रिया त्यांची भावनिक आंदोलन कशी हाताळतात हे मोठे गूढ आहे. मध्यंतरी एका पॉडकास्ट पुरुष सूत्रसंचालकाने मला विचारले की आजकाल सगळ्याच स्त्रिया कायम नटून थटून असतात, कसे काय शक्य आहे? अश्या नटलेल्या स्त्रियांना बघून साधारण राहणार्‍या स्त्रियांना नक्कीच कमीपणाची भावना येते, अनेक महिला-तरुणी तसे बोलून दाखवितात. या ट्रेंड मुळे कॉस्मेटिक प्रसाधने व ब्युटिपार्लर चा धंदा तेजीत आहेच पण "सुंदर" दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेणे हे सर्रास चालत. यात मानसिक व शारीरिक आरोग्याला कुठेही स्थान नाही. इंस्टाग्राम व व्हाट्स अप वर स्वत:च्या शरीराचे प्रदर्शन मांडणार्‍या फिज़िक्स मध्ये नोबल मिळावे यासाठी हे नक्कीच करत नाहीत. या सर्व लिपस्टिक गॅंगच्या चुकीच्या प्रभावामुळे विविध क्षेत्रात करियर करू पाहणार्‍या तरुणींची संख्या कमी होत आहे. OnlyFan सारख्या साइट्स तर तरुणींना प्रॉडक्ट म्हणून पेश करतात व यावरील तरुणी त्याच्यातून पैसे कमवितात. इंटरनेटवर नग्नता सगळ्यात जास्त विकल्या जाते. अर्थात हे सर्व नट्टा पट्टा करणे यांची आवड नसते तर एक तो एक डावपेचाचा भाग असतो. पुरूषांना आकर्षित करून हव काम करवून घेणे व फिमेल कार्ड व्यवस्थित वापरत आपली पावर वाढविणे, चैन व मौज मजा करत आयुष्य घालविणे हे यांचे ध्येय असते. इतर लोकांची पर्वा कशाला करायची ? काम झाली काय किंवा नाही, कोणाला काय फरक पडतोय? यातील अनेक स्त्रिया अतिशय क्रूर आणि कपटी असतात ( ऐपस्टीन कांडातील घिसलेन मॅक्सवेल आठवा, अतिशय आकर्षक रित्या स्वत:ला प्रेझेंट करायची) थोडक्यात विषकन्या, ज्यांना लहानपणापासून "स्त्री हे पुरुषाचे मनोरंजन करणारे खेळणे आहे" छान पद्धतीने शिकविले असते. ही मोहिनीविद्या वापरुन पुरूषांना वश करायचे व आयुष्य आरामात काढायचे. यांचा एकंदरीत वावर हा मोहीत करणारा असतो. अश्या स्त्रिया भावनिक नसून अतिशय कॅलकुलटेड व आत्ममुग्ध असतात. या स्त्रियांना हे कळत नाही की त्यांची किंमत ही त्यांच्या शरीरपूर्ती केली जाते. एकदा शरीर थकल की बाजूला फेकल्या जाऊन नवीन मनोरंजनाचे खेळणे आणले जाते. अश्या स्त्रियांना अनेक मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात. शारीरिक आरोग्याचे हाल तर विचारू नका. पण एवढा विचार करण्याइतपत यांची बुद्धी असती तर त्यांनी हा मार्ग पत्करला नसता किंवा लज्जा,अपराधीपणा जाणविल्यानंतर वेगळी वाट धरली असती. पूर्वी सती जाणे, केशवपन, स्त्रियांना अशिक्षित ठेवणे या स्त्रीविरोधी परंपरेचे मॉडर्न रूप स्त्रिचे अस्तित्व तिच्या शरीरापुरते मर्यादित ठेवणे हा ट्रेंड आहे. दुर्दैवाने स्त्रियांना हे शोषण आहे हेच उमजत नाही. #मराठी #महाराष्ट्र #मानसिक #खरात_फाईल्स #अशोकखरात #Marathi #Maharashtara

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

16,432 次观看 • 6 个月前

आज, १२ जानेवारी २०२६ रोजी ठाणे येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - भाजपचे लोकं पैसे वाटतायेत आणि शिंदेंचे लोकं पकडतायेत. काय चालुये सरकारमध्ये तेच कळत नाहीये. - आज घराघरामध्ये पाच-पाच हजार रुपये वाटतायेत. एका बाजूला म्हणतायेत आम्ही विकास केला आणि मग पैसे वाटतायेत. नक्की काय सुरू आहे? - कल्याण-डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडलाय. महाराष्ट्रात ६६ ठिकाणी पैसे वाटून फॉर्म मागे घ्यायला लावले. - सोलापूरात फॉर्म मागे घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहरअध्यक्षाचा खून करण्यात आला. इथपर्यंत सरकार चाललंय? - डोंबिवलीत शैलेश धात्रक, पूजा धात्रक आणि मनिषा धात्रक या एका कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर देण्यात आली. पण ती ऑफर नाकारून ते तिघेही निवडणूक लढवत आहेत. - सौ. राजश्री नाईक यांना ५ कोटी रुपयांची ऑफर दिली. ती ऑफर नाकारून त्या निवडणूक लढवत आहेत. आणि तुम्ही ५ हजारांमध्ये मतं विकताय? - सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली अशी अनेक लोकं आहेत. कुठून येतो हा पैसा? - बदलापूरात एका लहान मुलीवर अत्याचार झाला त्यातील आरोपीला एन्काऊंटरमध्ये ठार मारला. आणि त्यातल्या सहआरोपीला स्विकृत नगरसेवक केला. हिंमत कशी होते यांची? - रसमलाई (के. अण्णामलाई) सांगतोय मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. आणि फडणवीस म्हणतायेत तो असं बोललाच नाही. मला वाटलं होतं फडणवीसांना कळतं. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा? कोणासाठी करताय हे सगळं? - माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी? - ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही - आमचं आणि गुजराती समाजाचं भांडण नाहीये. खरंतर जो डाव सुरू आहे त्याच्याविरोधात इथल्याही गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. - एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय. - इंडिगोच्या मालकाकडे या देशाची ६५ टक्के हवाई वाहतूक दिली आहे. त्यानंतर एक दिवस त्या मालकाने वाहतूक बंद केल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. मग जर, एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते तर अदाणी काय करू शकतो? - या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत पण सगळे व्हावेत एकच नाही. - मी उद्योगपतींच्या विरोधातला माणूस नाहीये. पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का? हे विचारणारा माणूस आहे. - प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही नख लावताय? - गौतम अदाणीने मुंबई विमानतळ ताब्यात घेतलं त्यानंतर विमानतळावर गरबा खेळवण्यात आला. यातून तुम्हाला काय सांगायचं होतं? वाजवायचे असतील तर फक्त ढोल -लेझिमचं वाजलं पाहिजे मुंबई विमानतळावर बाकी काहीच नाही. - घोडबंदरची नॅशनल पार्कची जमीन एका उद्योगपतीला विकत आहेत. त्याला गणेश नाईकांनी विरोध केला त्यांचं अभिनंदन. - ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे. ठाण्याचे अनेक प्रश्न आहेत जशी इथं लोकसंख्या वाढत आहे तसेच प्रश्न सुद्धा वाढतायेत. - हे संकट सध्या तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे. कोणत्याही क्षणी दरवाजा ठोठावेल. त्यामुळे आज जर चुकाल तर फसाल. - हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखला आहे तो उध्वस्त करणं तुमच्या हातात आहे. - तुमचे जे मित्रपरिवारातील लोकं असतील, नातेवाईक असतील त्या सगळ्यांना सांगा शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन जोरात धावलं पाहिजे. - आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटतं डोळ्यादेखत ही शहरं जाऊ नये. डोळ्यादेखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत एवढ्यासाठीचं हे युद्ध सुरू आहे. - येत्या १५ तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. जर दुबार मतदार मतदान करायला कोणी आले तर तिथेच कानफडवायचे.

Raj Thackeray

40,675 次观看 • 8 个月前