Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

बापाचा अपमान एक वेळ बाप विसरेल पण पोरगं नाही. गद्दाराला त्याची जागा दाखवली... ✊👊 Aaditya Thackeray 🔥👊

170,029 Aufrufe • vor 7 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

आदित्यजींसोबत माझे जुनेच संबंध आहेत, पण कधीही मी माध्यमांसमोर याबाबत चर्चा केली नाही. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यजींनी स्पष्ट सांगितले की, मी जी निवडणूक लढवतोय, ती त्यांनी पूर्ण पाहिली आहे. तसेच माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांबाबत नव्हे, तर सर्व भावना आणि मेहनतीची त्यांनी प्रशंसा केली आहे. लवकरच महाराष्ट्रभर नवीन जनादेश मिळवण्यासाठी वेगळ्या उपक्रमांच्या आयोजनाचा कार्यक्रम ठरलेला आहे, फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे. बाळासाहेबांचा जो आक्रमकपणा होता, तो मला नेहमीच प्रेरणा देतो. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाचा ठसा पाहता, त्यांच्या काही गुणांना माझ्या कामातही स्थान दिले आहे. आदित्यजींच्या धडाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल, असा मला विश्वास आहे. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Bunty Shelke

62,669 Aufrufe • vor 1 Jahr

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

100,502 Aufrufe • vor 1 Jahr

.Devendra Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही. Office of Uddhav Thackeray साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली. फडणवीस साहेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार. महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटोळे कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू. CMO Maharashtra Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dr.Jitendra Awhad Rohit Pawar MAHARASHTRA DGIPR ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Nana Patole Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Mohasin @Dhananjay_AAP LoksattaLive ABP माझा TV9 Marathi SakalMedia Sanjay Raut Satyajeet Tambe Devesh Gondane Lokmat

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

59,176 Aufrufe • vor 2 Jahren

या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात Tata Consultancy Services चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी. 2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही. Tata Consultancy Services ला काळ्या यादीत टाका Devendra Fadnavis @OfficeOfDevendra CMO Maharashtra Vijay Wadettiwar Rohit Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police लातूर पोलीस-Latur police AAP महाराष्ट्र ABP माझा @Dhananjay_AAP Ambadas Danve Kunal Raut LoksattaLive Nana Patole Kailas Patil ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivaani Wadettiwar 🇮🇳 TV9 Marathi Aaditya Thackeray Conquer

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

26,839 Aufrufe • vor 2 Jahren

आमच्यातलाच "तो" एक... मी जरी भाजपा महायुती समर्थक असलो तरी हे लिहितो... बरोबर दीड एक वर्षांपूर्वी काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्य ने पुण्यात एक महिना उपोषण केले होते... थकलेल्या पैश्यासाठी. त्याच्याकडे तेव्हा कुणाच लक्ष नाही गेले...शेवटी तो फिट येऊन पडला...दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून ही झालं होतं अस त्याचा बायकोच म्हणणं आहे...व्हिडिओ पाहा. कालच्या गोष्टी मधे त्याची मेथड नक्कीच चुकली...पण त्याच्यावर ही वेळ का आली? म्हणजे दीड वर्षे त्याने कसे सहन केले असेल?? काल देखील त्याला डायरेक्ट यमसदनी पाठवण्याची गरज का पडली?? पायांवर गोळी मारून देखील त्याला जेरबंद केलं जाऊ शकलं असतं.. असो.. एवढच सांगेन.. खूप काही गोष्टी तो त्याच्यासोबत घेऊन गेला... इथून पुढे तरी सर्वसामान्यांवर ही वेळ येऊ नये याची काळजी सरकार ने घ्यावी🙏...आणि घटनेची सखोल चौकशी करावी.

यदुनाथ जवळकर🔥

66,466 Aufrufe • vor 11 Monaten

कालचा दिवस दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा होता…! आज वेळ काढून त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले. एकही मिनिट भाषण पुढे सरकवावे असे वाटले नाही. काळाच्या गरजेनुसार अशी अभ्यासू, संवेदनशील आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं नेतृत्वाच्या स्थानावर येणे अत्यंत गरजेचे आहे. संजय राऊत साहेबांच्या शब्दाला मान देत या पुरोगामी दलित युवकाने महाराष्ट्राचा हुंदका शब्दात व्यक्त केला. काल महाराष्ट्र आपल्या भावना मोकळ्या करत पुन्हा एकदा या राक्षसी प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र अजून जिवंत आहे, त्याची संवेदना अजून जिवंत आहे, आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची ताकदही अजून जिवंत आहे. यात शंका असण्याचे कारण नाही. ✊🔥 Sanjay Raut जीं सार्थ माणूस काल निवडलात आपण 💝

Anilkumar Gitte-INC

22,138 Aufrufe • vor 3 Monaten

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 Aufrufe • vor 3 Jahren

इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो 🔥 ~ मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. ज्याला शिव्या दिल्या, कपटी कारस्थानी म्हंटलं, अनाजी पंत म्हंटलं, जातीवरून, शरीरावरून हिणवलं त्याच बामनानी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठ्यांना समजून घेतलं.. इतके मराठा मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राच्या इतिहासात पण एकानेही नोंद घेतली नाही. शिंदेंनी दिलं कारण फडणवीस होते त्यांच्या पाठीशी. अभ्यास त्यांचा होता आणि पाहिलं दिलेलं आरक्षणही त्यांचंच होतं. सही मात्र शिंदे साहेबांची होती त्यावेळी मुख्यमंत्री असल्या कारणाने. इतकी षडयंत्र रचली गेली पण फडणवीस मात्र खचले नाहीत. आतल्यांनी रचलेल्या कटाचं दुःख आहे पण हेच तर खरं राजकारण आहे. इतकं घाण बोलल्यानंतरही एकदा सुद्धा Devendra Fadnavis यांनी आपला संयम सोडला नाही. शांतपणे सगळं सहन केलं.. यानंतरही घाण बोलले तर देव आहे आणि तुम्ही आहात. उत्तर तर देवाला द्यायचंय. आता तरी त्यांच्या आई, बायको आणि मुलीला घाण बोलू नका 🙏 श्रेयाची लढाई कालही नव्हती आजही नाही आणि पुढे कधी असणारही नाही.. कुठल्याही समाजाकरता केलेलं कार्य म्हणजे उपकार नसतात ती जवाबदारी असते. पण जेंव्हा समाजाला केलेल्या कार्याचा विसर पडतो तेंव्हा त्याची आवर्जून आठवण करून द्यावी लागते. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन.. त्यांनी विषय लावून धरला कसाही का असेना.. राज्यात कुणाचं कल्याण होतंय हे महत्वाचं 🚩 शिका, मोठे व्हा 🚩 Sharad Pawar Office of Uddhav Thackeray Prithviraj Chavan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar Supriya Sule

Sunaina Holey

26,834 Aufrufe • vor 1 Jahr

सोशल मिडियात व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या सत्यतेबाबत शहानिशा झाली पाहिजे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहिण असलेल्या आपल्याच पक्षाच्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी आहे. आपल्याच मित्र पक्षांच्या बाबतीत कटकारस्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर आहे, पण स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबतही कसं कटकारस्थान रचलं जातं, याचाही हा एक उत्तम नमुना आहे. याशिवाय संबंधित महिला मा. खासदाराच्या घरात पैसे ठेवायलाही जागा नाही आणि अगदी पिंपातही पैसे भरून ठेवल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकायला मिळतं. एका माजी खासदाराच्या घरात इतके पैसे असतील तर मंत्र्यांच्या घरात किती घबाड असेल, याचा विचारही करु शकत नाही. आता ED च्या अधिकाऱ्यांनी भाजप विरोधकांवरील कारवायांतून थोडा वेळ काढून इकडंही लक्ष द्यायला हरकत नाही. (सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याकडं आलेल्या या ऑडिओ क्लिप जशाच्या तशा शेअर करत असून केवळ यावरील नावे ब्लर करत आहे. यामध्ये एक नाव हे खान्देशातील भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याचं तर दुसरं नाव हे भाजप संघटनेच्या महामंत्र्याचं आहे.)

Rohit Pawar

29,669 Aufrufe • vor 2 Monaten

आज मुद्रांक शुल्क विभागाचा पेपर होता, 11.30 वेळ होती पण 1 वाजले तरी विद्यार्थी आत घेतले नव्हते त्यांना असा बाहेर बसवला होता. फडणवीस साहेब आमच्याकडून 1000 रुपये घेतात आणि असले बोगस सेंटर आम्हाला देतात. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. त्यात हे खाजगी सेंटर वाले मॅनेज होतात आणि आमच्या भविष्याची पार वाट लागते. तुम्ही म्हंटले होते सर्व परीक्षा ह्या Maharashtra Public Service Commission कडे देण्यात येतील पण कधी देणार आहात. तुमचा इलेक्शन च फंड जमा झाल्यावरच देणार आहात का अशी शंका आता विद्यार्थ्यांना येत आहे. परीक्षा ह्या अधिकृत Tata Consultancy Services च्या सेंटर वरच घ्या ही नम्र विनंती. Devendra Fadnavis CMO Maharashtra @OfficeOfDevendra Ajit Pawar Rohit Pawar Aaditya Thackeray Dr.Jitendra Awhad Harshwardhan Sapkal Meghna Sakore Bordikar EXAM सेंटर - Center Code: 18009 Examination Venue: R R Info, 2nd Floor, L N College, near Borivali Station Platform No. 1. Address: Plot No. 89, near General Karripada Bridge, Rajendranagar, Borivali East, Mumbai 400066.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

15,858 Aufrufe • vor 1 Jahr

प्रश्न हा मान्य करायचाच नाही, मग त्याचे उत्तर द्यावा लागत नाही. असच सध्या Devendra Fadnavis साहेब यांच आहे. पेपरफुटी मान्यच करायची नाही मग तपास कसला करायचा ना. ते म्हणताय पेपरफुटी झालीच नाही मग आम्हाला सांगा मुंबई पोलीस भरतीचा फुटलेला पेपर आमच्याकडे कसा. पेपर सुरू असतानाच पेपर बाहेर गेला आणि हजारो मुलांना त्याची उत्तरे मिळाली. तपासात सापडली फक्त 100, 150 बाकी बोगस मुले जॉईन झाली. फडणवीस साहेब यांच्या गृह विभागाचा मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होताच तसेच त्यांच्या mahagenco विभागाचा सुद्धा पेपर फुटला होता तरी हे मान्य करत नाही म्हंटल्यावर अजून काय बोलावे. असले गृहमंत्री असल्यावर पेपर तर मग फुटणारच ना. फडणवीस साहेब तुम्हाला वाटते ना पेपर फुटले नाही मग मला सांगा लातूर मधील गुरू ऑनलाईन सेंटर हे तलाठी भरती नंतर रद्द का केले गेले. पूर्ण सेंटरच मॅनेज केले गेले होते. मग यांना पेपर फोडायची गरजच काय. पेपर घेणारेच घोटाळे करत आहेत. Tcs चे कित्येक कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हीच का तुमची पारदर्शकता. एका एका बोगस सेंटर वरून किती बोगस विद्यार्थी लावले हे लातूरच्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून समजते. तिथे 100 प्लस बोगस तलाठी निवडले गेले. सेंटर वर काम करणारी सेंटर मालकाच्या गावची जवळपास 10 एक मूल तसेच त्याची सख्खी बहीण, तसेच कित्येक नातेवाईक त्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून लावली गेली तरी तुम्ही म्हणताय परीक्षा पारदर्शक झाली. लाज वाटते आम्हाला असले गृहमंत्री भेटले आहेत महाराष्ट्राला. तुम्हाला काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा कारण तुम्ही ज्यांनी पेपर फोडले त्यांचावर गुन्हे दाखल करू शकत नाहीत कमीत कमी आमच्यावर तर करा. CMO Maharashtra Nana Patole Vijay Wadettiwar Rohit Pawar Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Abhimanyu Pawar @News18lokmat LoksattaLive nikhil wagle @Dhananjay_AAP Devesh Gondane SakalMedia Radhakrishna Vikhe Patil महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

11,117 Aufrufe • vor 2 Jahren

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 Aufrufe • vor 1 Jahr

वरळीतलं प्रकरण हिट अँड रन नाही तर हत्याच... वरळीत नवरा बायको प्रवास करत असताना मागून एक बीएमडब्ल्यु कार बाईकला धडक देते.. नवरा बायको गाडीच्या बोनेटवर पडतात. नवरा लगेच स्वतःला बाजुला होतो आणि बायकोलाही आपल्याकडे खेचणार तेवढ्यात बीएमडब्ल्यु वाला निर्दयीपण अपघातानंतरही जिवंत असलेल्या महिलेच्या अंगावरुन गाडी नेतो. महिलेची साडी गाडीच्या टायरमध्ये अडकते. या महिलेचा नवरा आरोपीला रडवेल्या चेहऱ्याने थांब थांब म्हणतो तरी आरोपी गाडी पुढे नेत २ ते अडीच किलोमीटरपर्यंत त्या महिलेला रस्त्यावरुन फरफटत नेतो. गाडी पुढे नेत असताना गाडीसोबत फरफटत जाणाऱ्या महिलेला किती वेदना होत असतील याचा विचार सुद्धा आरोपी मिहीर शहाच्या डोक्यात येत नाही. इतक्या क्रुरपण तो गाडी पुढे नेत राहतो. आपल्या अब्रुची सर्वाधिक पर्वा करणाऱ्या या पत्नीच्या, दोन मुलांच्या आईचा जीव जातो आणि बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेल्यामुळे अंगावरचा कपडा सुद्धा शिल्लक राहत नाही. पण सगळे कपडे निघुन गेल्यावर सुद्धा आरोपी फरफट सुरुच ठेवतो. आणि हे सगळं हतबलपणे तिचा नवरा बघतो त्याची बायको मरेपर्यंत.. पुण्यातल्या पोर्शे अपघाताप्रमाणेच मुंबई अपघातातला आरोपी मिहीर शहा सुद्धा या अपघातापुर्वी बारमध्ये गेला होता. जवळपास १८ हजारांचं बिल दिल्यानंतर तो निघाला. गाडी बदलली. आणि त्यानंतर कावेरी नाखवांचा जीव घेऊन एक कुटुंब उध्वस्त केलं. आरोपी थांबला असता तर ही महिला आपल्या कुटुंबासोबत आज सुखरूप असती. पण मिहिरने फरफटत नेऊन तिचा जीव घेतला. मग हा अपघात कसा? ही तर हत्या झाली. पण मुंबई पोलिसाना तपासाबद्दल विचारल्यावर या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे का नाहीयेत. ? १. या अपघातातला पीडित आणि ज्याने डोळ्यासमोर आपली बायको गमावली तो माणूस स्वतः सांगतोय की मिहीर शाहाच गाडी चालवत होता तरी पोलिस यावर काही का बोलत नाहीयेत. २. पोलिसांनी त्यावेळी गाड़ीत उपस्थित असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. पण ड्रायव्हरने गाडी कोण चालवत होतं याबाबत काय जबाब दिला याबद्दल पोलिस का सांगत नाहीयेत. ? 3. पुणे पॉर्शे प्रकरणासारखं इथे सुद्धा प्रकरणत ड्रायव्हरवर ढकलण्याचा प्रयत्न होतोय का? 4. बारमधून आरोपी मिहीर शाह बाहेर पडताना, आणि ड्रायव्हर ड्रायव्हींग सीटवर बसनाचंच फुटेज पोलिसांनी कसं बाहेर येऊ दिलं. ते आरोपीच्या सोयीसाठी का? 5. ज्या भागात अपघात झाला तिथलं सीसीटीव्ही फुटेज जर बाहेर आलं तर त्यात स्पष्टपणे कळेल की गाडी कोण चालवत होतं. म्हणून हे फुटेज बाहेर येऊ दिलं जात नाहीये का ? 6. अपघातानंतर कावेरी नाखवांना आरोपीच्या गाडीने फरफटत नेलं, त्यामुळे मृत महिलेच्या अंगावर एक कपडा सुद्धा राहीला नाही. पण पोलिस फरफटत नेण्यासंदर्भात कुठलीही ठोस माहीती देत नाहीये. ७. गाडीने फरफटत नेतानाच्या मार्गावर अनेक सीसीटीव्ही आहेत. मग पोलिसांना याची शहानिशा करण्यासाठी ईतका वेळ का लागतोय? 8. पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली, गाडी मिळाली. मग आरोपी मिहीर शहा नेमका कसा फरार झाला.? 9. यावेळी जर गाडी ड्रायव्हर चालवत होता तर ड्रायव्हर फरार झाला असता. पण इथे नेमकं उलटं होतंय. ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि मिहीर गाडी चालवतच नसेल तर तो का फरार झाला. या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे नाहीयेत कारण मरणारी व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी सामान्य होती. आरोपीच्या गाडीपेक्षाही कमी किंमत तुमच्या आमच्या जगण्याची जिवाची आहे. आता बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, पॉर्शे अश्या महागड्या कार विकतानाच मालकांना एक खुन माफ करावा तसं एक दोघांना चिरडलं तरी खून माफ करावे. किंवा लोकांचे जीव घेण्याचं परमिट द्याव. - Saurabh Koratkar

Saurabh Koratkar

61,106 Aufrufe • vor 2 Jahren

आमचा रॉकी... भलताच अतरंगी, घरातल्यांसाठी प्रचंड लाडका आणि प्रेमाचा सागर, पण शत्रू किंवा संकटासाठी साक्षात काळ ! हा पठ्ठा स्वभावानं जितका इमानदार, तितकाच भयंकर धाडसी आहे. यापूर्वी त्याने अनेकदा विषारी साप गरागरा फिरवून मारले आहेत. एकदा तर एका विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, तो मरणाच्या दारापर्यंत पोहोचला होता. पण त्याही संकटावर मात करून तो चमत्कारिक रित्या सुखरूप बाहेर पडला !🧿 अशा या आमच्या 'रॉक स्टार' रॉकीने काल संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास मुरबाड येथील आमच्या फार्म हाऊसवर स्वतःचाच एक नवा रेकॉर्ड केला. बेसावध असताना कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारून काल एका बिबट्याने रॉकीवर पाठीमागून हल्ला केला ! पण समोर बिबट्या असला तरी त्याची गाठ आमच्या पठ्ठ्यासोबत होती. रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचा डावा गाल आणि हनुवटीवर असा काही मजबूत चावा घेतला की बिबट्या स्वतःची सुटका करण्यासाठी धडपडू लागला. अखेर रॉकीने पकड सैल करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या थरारक झटापटीत रॉकीला बिबट्याची नखे लागून जखमा झाल्या, पण तरीही हा पठ्ठा त्याचा शत्रू कुठे गेला हेच छाती ठोकून पाहत उभा होता. त्याने दाखवून दिले की लढायला वाघाचं कातडं नाही तर वाघाच काळीज हवं ! नंतर आम्ही CCTV फुटेज पाहिले तेव्हा अंगावर काटाच आला. रात्रीच तिथे जाऊन डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार केले आणि आता तो सुरक्षित आहे. मुरबाड वनविभागालाही तातडीने याची माहिती देण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यात दोष नक्की कोणाचा ? मुरबाड आणि आसपासच्या परिसरात तसेच राज्यात इतरत्रही मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने समोर येत आहे. हा प्रश्न केवळ आमच्या रॉकीच्या कौतुकाचा नाही, तर एका गंभीर समस्येचा आहे. विकासाच्या नावाखाली आपण माणसांनी जंगले नष्ट केली, प्राण्यांचे हक्काचे घर हिरावून घेतले. जेव्हा त्यांचा अधिवास संपतो, तेव्हा अन्नाच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळणारच ! काल आमचा रॉकी होता ज्याने शौर्याने बिबट्याला पळवून लावले, पण उद्या तिथे एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूलही असू शकते, याला जबाबदार कोण ? वन्यजीवांवर रागवण्यापेक्षा आपण निसर्गाचा समतोल राखायला हवा, अन्यथा हे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही ! हा धोका मानव व अर्थातच सरकारच्या विकासाच्या नावावर उद्योगपती धार्जिण्या चुकीच्या योजनांना पाठबळ देण्यामुळे निर्माण झाला आहे हे मान्य करावेच लागेल. #RockyTheHero #SaveForests #RealHero #NatureBalance #Wildlife

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

72,779 Aufrufe • vor 20 Tagen