正在加载视频...

视频加载失败

मी शब्दाचा पक्का आहे - माझं प्रत्येक पाऊल नेहमी लोकहिताच्या दिशेनेच!

10,459 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

नेहमीप्रमाणेच, शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार पार पडला… संकटातून मार्ग काढण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठीच हा जनता दरबार असतो आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे, प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहिलं. संबंधित विभागांशी त्वरित संपर्क साधत अनेक समस्यांवर जागेवरच तोडगा काढला. जनतेचे प्रश्न म्हणजे माझी वैयक्तिक जबाबदारी! आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच सज्ज आहे… आणि असेच पुढेही राहणार! आपल्या प्रेमाला, विश्वासाला आणि पाठिंब्याला मी खंबीरपणे न्याय देईन हेच माझं वचन! #Dharashiv #जनता_दरबार #लोकसेवा #धाराशिवच्या_सेवेत #OmrajeNimbalkar

Omprakash Rajenimbalkar

10,814 次观看 • 2 个月前

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपुर्वक आभार. आपण माझ्यावर मतांच्या रुपात प्रेम आणि विश्वास दाखवला. याबद्दल मी नेहमी आपल्या ऋणात राहिल. काहीश्या फरकाने विजय हातून निसटला, हा पराभवही माझा लोकसेवेवरचा विश्वास अधिक वाढवणाराच आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात,अडचणीत आणि आनंदात मी सोबत आहे. या बरोबरच ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी मा.नरेंद्र मोदीजी साहेब आणि मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. पराभवाने खचू नये विजयाचा उन्माद करु नये, ही शिकवण आम्हाला प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. येत्या शनिवारपासून मी पुन्हा जनसेवेत रुजु होतो आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता मुलुंडमध्ये 'जनता दरबार' भरवत आहे. ईशान्य मुंबईतील इतर भागातील जनता दरबार नियोजनाची माहिती आपणास लवकरच देण्यात येईल. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यासाठी उपस्थित रहावं, हीच विनंती. कळावे, आपला सेवक मिहिर कोटेचा

Mihir Kotecha (Modi Ka Parivar)

12,709 次观看 • 2 年前

काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मा.खा. मल्लिकार्जूनजी खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा मा.खा. सोनियाजी गांधी, देशाचे आशास्थान मा.खा. राहुलजी गांधी आणि पक्षाचे महासचिव मा.खा. के.सी. वेणुगोपालजी यांचा मनःपूर्वक आभारी आहे. युवक काँग्रेसपासून पक्षाच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मला मिळाल्या आहेत आणि प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कार्यसमितीचा सदस्य म्हणून देखील मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविण्यास वचनबद्ध आहे. काँग्रेस कार्यसमितीत महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते मुकूलजी वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, यशोमतीताई ठाकूर, प्रणितीताई शिंदे यांनाही कार्यसमितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यासह समितीतील सर्वांचंच मी अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.

Ashok Chavan

67,937 次观看 • 3 年前

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास घराघरात पोहोचवणारे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आता आणखी एक थोर प्रयत्न होत आहे तो म्हणजे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका. ही मालिका केवळ कथानक नसून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या असामान्य कार्याचा, समाजजागृतीच्या ज्वालामुखीचा आणि परिवर्तनशील विचारांचा गौरव करणारा भव्य प्रयत्न आहे. फुले दांपत्यांनी दिलेला पुरोगामी विचार प्रत्येक घरात पोहोचेल, याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अमोल कोल्हे जी, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा! ही मालिका पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. Dr.Amol Kolhe #MiSavitribaiJotiraoPhule

Jayant Patil- जयंत पाटील

32,475 次观看 • 10 个月前

भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलं. खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो. असो, आज आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला त्यावेळेस रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपस्थित होते. आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढयांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे. आपल्याकडे गुरूंचा उचित सन्मान करण्याची परंपरा कमी होत चालली आहे. मला बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दरवर्षी अनेक मुलं भेटायला येतात, मी त्या प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ? इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट अशी साच्यातील उत्तरं येतात, पण कोणीही मला शिक्षक व्हायचं आहे असं मला सांगितल्याचं आठवत नाही. चांगले शिक्षक नसतील तर चांगले विद्यार्थी कसे घडणार असा मला नेहमी प्रश्न पडतो. असो, पण हे स्मारक येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल अशी मला आशा आहे. या कार्यक्रमातल्या मी मांडलेल्या मनोगताची ही चित्रफीत...

Raj Thackeray

135,547 次观看 • 1 年前