Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

"मी सुनेत्रा अजितदादा पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते..!" महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे हार्दिक अभिनंदन..!💐 अजितदादा अमर रहे! एकच वादा अजितदादा!❤️

10,462 просмотров • 7 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

🔸 महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जनसेवा, नेतृत्व आणि समर्पणाने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी एक अमूल्य वारसा आहे. त्यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील आणि त्यांच्या स्मृती आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 🔸 महाराष्ट्र के जनप्रिय नेता, मेरे मित्र और सहयोगी, उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार इनके पार्थिव शरीर का आज बारामती में राजकीय सम्मान के साथ अंतिम संस्कार किया गया। इस दौरान उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। जनसेवा, नेतृत्व और समर्पण से भरा उनका जीवन महाराष्ट्र की राजनीति और समाज के लिए एक अमूल्य विरासत है। उनका योगदान सदैव स्मरणीय रहेगा और उनकी स्मृतियां हमेशा हमारे हृदय में जीवित रहेंगी। ॐ शांति 🙏

Devendra Fadnavis

76,145 просмотров • 7 месяцев назад

मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या महसूल विभागामार्फत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन महसूलविषयक सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वतः मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. PMO India CMO Maharashtra Revenue Department, Government of Maharashtra MAHARASHTRA DGIPR IGR Maharashtra #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #RevenueMinister #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

25,362 просмотров • 2 месяцев назад

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारांना जागत, येवला-लासलगावच्या जनतेच्या आणि समस्त ओबीसींच्या विश्वासाच्या, आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची शपथ घेतली. महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप दाखवणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा व सर्वसमावेशक कामाचा आणि माझे बंधू लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षमय व झुंजार वाटचालीचा आदर्श सदैव माझ्यासमोर राहील. तसेच भारतीय संविधानाची तत्वे, विचार व आदर्शांवर चालत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व झोकून देऊन काम करण्याचा निश्चय मी पुन्हा एकदा या निमित्ताने केला आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेतच, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे मी मनापासून आभार मानतो. #maharashtracabinet #cabinetoath #publicservicecommitment #jaimaharashtra

Chhagan Bhujbal

22,304 просмотров • 1 год назад

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार

Girish Mahajan

11,605 просмотров • 7 месяцев назад

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी सर्वपरिचित आहेत. नियमाच्या बाहेर जाणारं कोणतंही काम असेल तर आदरणीय दादा अशा कामाला कायम विरोध करतात. दादांचा हा स्वभाव महाराष्ट्रातील प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक नागरिकाला परिचित आहे. परिविक्षाधीन कालावधीत कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या संदर्भात वायरल झालेला व्हिडिओ हा अर्धवट व दिशाभूल करणारा आहे. आदरणीय दादांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्रातील एकही नागरिक, एकही अधिकारी यावर विश्वास ठेवणार नाही. Ajit Pawar Sunil Tatkare Aditi S Tatkare MahaNCPspeaks

Office of Aditi Tatkare

17,118 просмотров • 1 год назад

धन्यवाद लोकमत परिवार ! लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर अवॉर्ड्स" सोहळ्यात "प्रॉमिसींग फेस" श्रेणीत मला पुरस्कार मिळाला याचा खरोखर आनंद वाटतो. महामहीम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन ( VP Office ) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde - एकनाथ शिंदे ), लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री. विजय दर्डा ( Vijay Darda ) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. मला सेवेची संधी देणाऱ्या तमाम लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील जनतेला, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मी हा पुरस्कार समर्पित करते. तसेच, मला जनसेवेची संधी देणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. Governor of Maharashtra Lokmat MahaNCPspeaks #Maharashtra #LOMTY2025 #Lokmat

Aditi S Tatkare

36,855 просмотров • 1 год назад

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या मार्फत प्रदान केला जाणारा "बेस्ट टेक्निकल टीम" पुरस्कार आपल्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, कारंदवाडी युनिट क्र. ३ ला प्राप्त झाला, तसेच श्री.प्रशांत पाटील यांना सर्वोत्त्कृष्ट शेती अधिकारी व श्री.संताजी चव्हाण यांना सर्वोत्त्कृष्ट चिफ इंजिनिअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुम्हा सर्वांचे प्रतिनिधित्व करत हा सन्मान मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारला. संपूर्ण तांत्रिक टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांच्या अथक मेहनतीने आपण आपल्या कारखान्यास सर्वार्थाने नंबर एकचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करू. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष मा. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आ. जयंत पाटील साहेब,सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #rajarambapu_cooperative_sugar_factory #vsi #awards #vasantdada_sugar_institute #annual_general_meeting

Prateek Patil

12,894 просмотров • 1 год назад

आज नागपूर येथे राजभवनातील शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सेवेची पुन्हा संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे पी नड्डा जी, मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेंजी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानते, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. #Maharashtra #Nagpur #PankajaMunde #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Pankaja Gopinath Munde

70,756 просмотров • 1 год назад

आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय श्री.सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना.श्री. अजितदादा पवार साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.प्रफुल्ल पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांसह महायुतीतील सर्वच पक्षश्रेष्ठींचे व मान्यवर नेत्यांचे मनःपूर्वक आभार. इथपर्यंतचा प्रवास करण्यात माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद उभे करणाऱ्या माझ्या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील माय-बाप जनतेचे व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! VP Office Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Praful Patel Sunil Tatkare #मंत्रिमंडळ_विस्तार

Dhananjay Munde

50,510 просмотров • 1 год назад

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 просмотров • 5 месяцев назад

राजकीय जीवनात मी अनेक चढ-उतार आणि स्थित्यंतरे पाहिली, पण आजचा क्षण माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला स्पर्श करणारा आहे..! आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय स्व. अजितदादांच्या अचानक जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला, अशा काळात स्वतःचे दुःख बाजूला सारून सुनेत्रावहिनी पवार यांनी महाराष्ट्राला आज आधार दिला, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतली. हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे असे मी मानतो. स्व. अजितदादांच्या जीवनात सुनेत्रावहिनींचे योगदान आम्ही पहिले आहे. शांत स्वभाव पण तितकाच कणखर व निश्चयी बाणा ही त्यांची खरी ओळख. ज्या पवार कुटुंबाने राज्याला प्रदीर्घ काळ नेतृत्व दिले, त्याच घरातील कर्तृत्ववान स्त्री आज राज्याची सूत्रे हाती घेत आहे, ही खरोखर अभिमानाची बाब आहे. एक ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासाचा साक्षीदार होताना आज माझा ऊर भरून येतोय. सुनेत्रा वहिनी, स्व. अजितदादांची ही धुरा तुम्ही सार्थपणे निभावणार, असा मला ठाम विश्वास आहे. जे प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राने दादांना दिला, तोच आशीर्वाद राज्याची जनता तुम्हालाही देईल याची मला खात्री आहे. #sunetraajitpawar

Chhagan Bhujbal

12,010 просмотров • 7 месяцев назад

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, अशी भावना आता राज्यातील सामान्य जनतेची झाली असल्याचे काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना नमूद केले. राज्याचा गृह विभाग किंवा राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही या संदर्भाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे, मात्र राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत बारामती विमानतळाचे संचालन होते त्या #MIDC आणि #MADC हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे अशी मागणी यावेळी केली. #मुंबई #महाराष्ट्रविधिमंडळ #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession #MahaBudgetSession2026 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Rohit Pawar Congress Maharashtra Congress Harshwardhan Sapkal Mumbai Congress Indian Youth Congress Indian Youth CongressMaha TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi

Amit V. Deshmukh

12,796 просмотров • 6 месяцев назад

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत e-KYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे. ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #ladkibhainyojna #mukhyamantrimajiladkibhainyojna #adititatkare #maharashtra #wcd #ekyc

Aditi S Tatkare

10,551 просмотров • 3 месяцев назад

लोकसभेत आज शून्य प्रहरात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व माझे ज्येष्ठ बंधू स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या भावाला जाऊन दोन महिने झाले. याच वर्षी २८ जानेवारीला माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. या घटनेला केवळ दोन महिने झाले आहेत. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो, त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही पण हे सोसलं आहे. या घटनेला दोन महिने झाले पण माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला का ? माझा मोठा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला कसा मिळणार? माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहितला एक एफआयआर करायला जंग-जंग पछाडावे लागले. आमच्या राज्याने तर 'एफआयआर' नोंदवून घेतलाच नाही. त्यासाठी रोहित सर्वपक्षीय नेत्यांना भेटला. इतर राज्यांमध्ये गेला, अनेकांना विनवण्या केल्या की एफआयआर करा आणि त्याच्या काकाला म्हणजे अजितदादांना न्याय मिळू द्या, असे नमूद केले. एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशातील एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो, त्याचा एफआयआर होत नसेल तर सामान्य माणसाने जायचं कुठे? तो माझा भाऊ होता, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. तर एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी नम्रपणे हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की अजितदादांसह सगळ्यांच्या अपघातांची पारदर्शक चौकशी करा. मग तो अहमदाबादचा असुदे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस बिपिन रावत गेले तो असुदे, अगर एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा झारखंडला झालेला अपघात असुदे, न्याय हा समानच असला पाहिजे. प्रत्येक कुटुंब मग तो पायलट असेल, माझा दादा असेल, अंगरक्षक असेल किंवा त्या विमानात असलेल्या महिला असतील, त्या विद्यार्थिनी होत्या, त्या तरुण मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे. आधी आम्हाला सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं जातंय की तो खराब झालाय, हे काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला. रोहित पवारांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं. पण माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही जी काही चौकशी अगर तपास करणार आहात तो कालबद्ध चौकटीत करा. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. स्व अजितदादा पवारांच्या विमान अपघातातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी ठाम भूमिका मांडली.

Supriya Sule

19,560 просмотров • 5 месяцев назад

अल्पसंख्यक समुदाय को लेकर नितेश राणे का इंटरव्यू अब वायरल हो रहा है. इस वीडियो में उन्होंने पाकिस्तान में अल्पसंख्यक नीति और भारत में अल्पसंख्यक समुदाय की नीति पर टिप्पणी की है. अगर उन्हें पाकिस्तान की अल्पसंख्यक नीति की इतनी चिंता हैं तो उन्हें पाकिस्तान में ही रहना चाहिए. नितेश राणे मूर्खों की तरह बड़बड़ा रहे हैं उनकी पार्टी में कोई भी उन्हें गंभीरता से नहीं लेता. Nitesh Rane सिर्फ दो धर्मों के बीच विवाद पैदा करने का काम कर रहे हैं| हमारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) पहले ही कह चुके हैं कि मुस्लिम समुदाय को जो भी उनका हक है वह मिलेगा और हम सभी धर्मों के साथ चलेंगे। हाईकोर्ट ने मुस्लिम समुदाय को शिक्षा में ५ फीसदी आरक्षण देने का फैसला सुनाया है. इसके क्रियान्वयन के लिए हम ११ तारीख को अधिवेशन के दौरान नागपूर में धरना देने जा रहे हैं| #Maharashtra #Muslim #Reservation

Saleem Sarang

52,616 просмотров • 2 лет назад