Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मुख्यामंत्र्यांनी आता २५-५० हजार देऊन आपलीच मागणी पुढे घेऊन जा ज्याचे समर्थन आहे त्यांनी शेअर करा

20,404 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे दृश्य म्हणजे आताच्या अपयशी सरकारचा आरसा आहे. शिक्षक भरतीची TAIT परीक्षा घेऊन महिने उलटले तरी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करून शिक्षक भरती करण्यात येत नाहीये, त्याविरोधात या तरुणाने आवाज उठविला आहे. शिक्षणमंत्री गेल्या काही महिन्यांपासून म्हणताय ५०-५५ हजार शिक्षकांची भरती करू पण त्याचा मुहूर्त काही केल्या त्यांना सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यात शाळा दत्तक देऊन बेरोजगार शिक्षकांना कायमचे बेरोजगार करण्याचे निर्णय शासनाकडून आखल्या जात आहेत. कंत्राटी भरती करून कायमच्या नोकऱ्यांना संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारने शिक्षक भरतीच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या, अन्यथा पुढली निवडणूक जवळच आहे. #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनेचा_निषेध Deepak Kesarkar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar @surmayu

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

30,028 Aufrufe • vor 3 Jahren

केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारमण यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. शेतकरी, महिला, युवक, गरिब आणि मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. यामध्ये शिक्षणाच्या सुविधा, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि एमएसएमईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद आहे. तेलबियांच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी धोरण या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होते. भाजीपाल्याला मागणी असलेल्या बाजार क्षेत्रानजिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांवर सुमारे ३ लाख कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. एकूण श्रमशक्तीमध्ये महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहे. सोने-चांदीवरील सीमाशुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के केल्याने दागिने स्वस्त होणार आहेत. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी सुमारे १.५ लाख कोटींची तरतूद केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. सुमारे २ लाख कोटी रुपये खर्चाच्या ५ योजनांतर्गत पुढील ५ वर्षांमध्ये ४ कोटींहून अधिक रोजगार निर्मिती केली जाणार आहे. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज आणि मुद्रा कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये करण्याच्या घोषणेमुळे तरुणांना लाभ होणार आहे. एक कोटी तरुणांना दरमहा ५ हजार रुपये भत्ता आणि एक वेळची मदत म्हणून ६ हजार रुपयांसह टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. देशाचा महागाई दर नियंत्रणात आणि स्थिर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सांगितले. नागरिकांच्या बचतीत वाढ होईल, असेही अनेक निर्णय त्यांनी प्रस्तावित केले आहेत. आयकराच्या रचनेतील बदलांमुळे सर्वसामान्य करदात्यांची मोठी बचत होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी वजावट मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजार तर कौटुंबिक पेन्शनर्ससाठी १५ हजारांवरून २५ हजार रुपये केल्याने त्यांच्याकडे अधिक पैसा उपलब्ध होऊ शकेल. पायाभूत सुविधांना दिलेले भक्कम पाठबळ, गृहनिर्माण व ग्रामीण रस्त्यांसाठीचे निर्णय, विदेशी कंपन्यांच्या कर रचनेत पूरक बदल करून विदेशी गुंतवणुकीला अधिक चालना देण्याचा प्रयत्न, सर्व समाजघटकांच्या अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावर दिलेला जोर, पुढील काळातील आव्हाने ओळखून संशोधन कार्याला चालना आदींमुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. #BudgetForViksitBharat #Budget2024

Ashok Chavan

12,167 Aufrufe • vor 2 Jahren

लोकसभेत आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने बॅंकेचे खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी सरकारची पावले खासगीकरणाकडेच वळत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आयडीबीआय बँकेत सद्यस्थितीत वीस हजार कर्मचारी काम करत आहेत. तत्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या मंत्रिमंडळात स्व. जसवंत सिंह जी अर्थमंत्री असताना त्यांनी आयडीबीआय बँकेचे खासगीकरण होणार नाही. सदर बँकेचे ५१ टक्के समभाग सरकारकडे राहतील असे आश्वासन दिले होते. पण आज असे ऎकण्यात येत आहे की एलआयसीने बँकेचे शेअर घेतले असून ते विकले जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर ६१ टक्के शेअर बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेचे खासगीकरण होऊ शकते. आयडीबीआय बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मागणी आहे की बँकेचे खासगीकरण करु नये असे सभागृहात सांगितले. दरम्यान, अलिकडच्या काळात बँकेची कामगिरी चांगली होत आहे. बुडीत कर्जाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे बँकेचे खासगीकरण करु नये, अशी शासनाला विनंती केली. Urged the government to uphold former Finance Minister Shri Jaswant Singh's assurance to the Parliament and refrain from handing over the majority stake in IDBI Bank to private entities during Zero Hour in the Lok Sabha today.

Supriya Sule

17,114 Aufrufe • vor 1 Jahr

बारसू सोलगाव पंचक्रोशीतील 100 टक्के नागरिकांनी त्या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरीला विरोध केला आहे. तेथील गावकऱ्यांनी 3 महिन्यापूर्वी माझी भेट घेतली होती. त्या गावामधील जवळ जवळ 500-700 स्वतःच्या बोटी घेऊन मासेमारीला जाणारी लोक आहे. गावामधील 100 टक्के लोकांनी या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. याच प्रकरणातून विरोधातील लोकांचे समर्थन करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. गावामधील 100 टक्के लोकांचा जर विरोध असेल आणि ग्रामपंचायतीने देखिल विरोधात ठराव केला असेल तर तो प्रकल्प तिथे होऊ देऊ नका असे कायद्यात म्हटले आहे. तरी देखिल जोरजबरदस्ती करून तो प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी आहेत ही जी माहिती बाहेर आली हे ती मोठी धक्कादायक आहे. स्थानिकांचाच हा प्रकल्प राबवायला विरोध आहे. त्यांची मागणी आहे की, त्या ठिकाणी उत्कृष्ट आयटी पार्कची निर्मिती करा. स्थानिकांना जे पाहिजे ते तिथे द्यायला हवं. त्यांच्या व्यथांचा सरकारने विचार करावा. 5000 लोक माळराणावर बसले आहेत हे कोकणचे आंदोलन आहे. कोकणी माणूस किती चिवट आहे ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे मोडीन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे . आंदोलन हलक्यात घेऊ नका.

Dr.Jitendra Awhad

89,507 Aufrufe • vor 3 Jahren

मराठ्यांनो उद्या मुंबईला निघताना आयोजकांनी सांगितलेले सर्व नियमांचे व्यवस्थित काटेकोरपणे पालन करा व निघताना गरजेच्या वस्तू बरोबर ठेवा..! सर्वांना विनंती गाड्या काळजीपूर्वक चालवा कोणाची गाडी बंद पडली किंवा काही अडचण आली तर लगेच थांबून एकमेकांना मदत करा…! सर्वांनी शक्यतो रात्रीचा प्रवास व दुचाकीवरून प्रवास टाळायचा आहे नीट लक्षात ठेवा रस्त्यात हिमंत तर कोण करणार नाहीच तरी कोणी समाजकंटक दगडफेक व बाकी काही गोष्टी करायचा प्रयत्न करतील तरी तुम्ही आता दुर्लक्ष करायचे व पुढे जायचे आहे…! मागे सांगितल्या प्रमाणे जरांगे पाटीलांचा ताफा सत्कारासाठी जास्त कोणी थांबवायचा नाहीये कमीत कमी वेळात मुंबई जवळ करायची आहे…! ज्यांना मुंबईचा मार्ग जवळ आसेल त्यांनी थेट मुंबईत जायचे पाटलांच्या ताफासोबत यायचे नाही जेणेकरून रोडवर जास्त गर्दी होणार नाही…! आपल्याला पोलीस व प्रशासन यांना संपूर्ण सहकार्य करायचे आहे व आपले आंदोलन शांततेत यशस्वी करायचे आहेत…! व अतिशय महत्वाचे आपल्या जरांगे पाटलांचे उपोषण का आंदोलन हे आपण सर्वांनी नंतर मिळून ठरवू पन उपोषण नकोच हे माझं मत आहे…! आम्ही सोबत नसलो तरी तुमच्यासोबत सोशल मीडियाद्वारे चोवीस तास असणार आहेत…! जय शिवराय 🙏🙏 #चलो_मुंबई #चला_मुंबई #मराठा_आरक्षण

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

37,151 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांची निवड ही 20 ऑक्टोबर 2021 साली म्हणजे जवळपास चार वर्षांवरून जास्त काळ झाला आहे तरी… चार वर्षात वैष्णवी हगवणे सारख्या राज्यात किमान पन्नास तरी केस झाल्या असतील तरी फक्त पाचच केस दाखवा ज्यात ह्यांनी चार वर्षात त्या पाच पिडीत मुलींना आयोगामार्फत न्याय मिळवून दिला आहे…! आता महाराष्ट्र महिला आयोग फक्त किरकोळ घरगुती भांडण मिटवण्यापुरताच मर्यादित झाला आहे का ? चाकणकर ताईंची चार वर्षाची कारकीर्द पाहता कोणाला न्याय मिळो न मिळो त्यांनी मात्र पदाचा चांगला वापर केलेला दिसतोय कारण त्यांना राज्यमंत्री दर्जा असल्याने पुढे मागे पोलीस संरक्षण आहे त्यामुळे ताई राज्यात ज्या भागात दौऱ्यावर जातात त्या भागातील प्रसिद्ध मंदिरात VVIP दर्शन मात्र नक्कीच करून येतात…! तरी मी आज परत एकदा मागणी करतो की राज्य महिला आयोग अध्यक्षपदी ही महिला IAS किंवा IPS महिलाच असावी कारण कोणतीच राजकीय महिला ही निरपेक्षपणे न्याय देवुच शकत नाही…! बाकी चाकणकर ताईंचा सोशल मीडिया टिम मात्र जोरात आहे एखाद्या प्रोफेशनल रिलस्टार ला लाजवेल आसे चार पाच ॲंगलने फोटो व्हिडिओ काढत रिल बनवत असतात..! #नावाचा_राज्य_महिला_आयोग

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

27,255 Aufrufe • vor 11 Monaten

सन्माननीय देवेंद्रजी, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते. आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला.. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती.. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Kailas Patil

17,930 Aufrufe • vor 1 Jahr

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा! राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. सह्याद्रीच्या कडे-कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरतीच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीच्या दिशेनं एकत्रित वाटचाल सुरु आहे, ही वाटचाल यापुढेही वेगवान पद्धतीनं सुरू राहील. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातील घराघरात साजरा करतानाच, जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करा असं आवाहन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राच्या मातीत महाराजांसारखा युगपुरुष जन्मला हे आपलं भाग्य आहे. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. राज्यातील महायुतीचं सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत राहील. #Shivjayanti #शिवजयंती

Ajit Pawar

54,328 Aufrufe • vor 2 Jahren

एका चायनीज कंपनीचा रोबोट कुत्रा,भारताने आयोजित केलेल्या जागतिक Ai समीट मध्ये गलगोटीया या नोएडा स्थित युनिव्हर्सिटीने "आपला" म्हणून शोकेस केला.त्याची ब्रिफिंग देणारी ही बाई तोंडाने सांगते आहे की,"it was developed by our Centre of Excellence.”पुढे ती असेही सांगते की,"350 कोटी रुपये आम्ही Ai तंत्रज्ञानावर खर्च करत आहोत." गंमत अशींय की हा रोबोट कुत्रा निव्वळ 2अडीच लाख रुपयांचा आहे.युनिट्री या चायनीज कंपनीने तो बनवला आहे. आता काही वेळापूर्वी गलगोटीया ने स्पष्टीकरण दिल आहे की, "Its globally available tools for student learning.” असो.एकंदरीत ही आहे आपल्या Ai मधील उडी.याने काय शेठच नाव खराब होत नसत.नाव खराब होत ते आपल्या देशाच. बाकी या गलगोटीया वाल्यांचा बाजार त्यांच्याच जुन्या विद्यार्थ्यांनी उठवला आहे.कारण काय तर,डिग्री पूर केल्यानंतर जेंव्हा हे विद्यार्थी त्यांचं डिग्री सर्टिफिकेट घ्यायला गेले तेंव्हा अनेकांना सांगण्यात आलं की,"तुमचं फर्स्ट इयर चे बॅकलॉग आहेत.ते काढा आणि मग डिग्री घेऊन जा..!'मुळात अस काही नव्हतंच. पण यामुळे अनेक मुलांच भवितव्य टांगणीला लागलं आहे.त्यांनी शिस्तीत घोडे लावले मग युनिव्हर्सिटीला..!

Mohasin

23,005 Aufrufe • vor 7 Monaten

एनर्जी ड्रिंक हा प्रकार सध्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात बराच प्रसिद्ध झाला आहे. शाळा कॉलेजेस च्या आसपास हे कॅफेनचे धोकादायक प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक सर्रासपणे उपलब्ध असल्याने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे एनर्जी ड्रिंक घेण्याचा प्रमाण खूप जास्त आहे, हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदयांनी हे एनर्जी ड्रिंक शाळा, कॉलेजच्या परिसरात उपलब्ध नाही असं सांगितलं. हे उत्तर देण्यापूर्वी शासनाने कोणत्या प्रकारची तपासणी केली, किती ठिकाणी छापे टाकले ? असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री महोदयांची तयारी असेल तर मी स्वतः त्यांना शाळा, कॉलेजच्या परिसरात हे एनर्जी ड्रिंक दाखवू शकतो असं ठामपणे सांगितलं. ५० रुपयांत नशेच्या गोळ्या बाजारात सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. या नशेला आपली भावी पिढी बळी पडत आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात "नॉन अल्कोहोलिक" पेयांचे १६२ नमुने तपासले व त्यातील एकच नमुना अयोग्य आढळला अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली. एका वर्षात झालेली ती किरकोळ कारवाई संशयास्पद आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्रातील भावी पिढ्यांच्या भाविष्यासोबत खेळत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधापैकी २५% दूध भेसळयुक्त आहे. लोकांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना नाही. या बाबी गांभीर्याने घेऊन मागील एका वर्षात किती ठिकाणी कारवाई केली, काय कारवाई केली याची माहिती द्यावी. तसेच, माननीय सभापती महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे पुढील १५ दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घ्यावी अशी विनंती सभागृहात केली. यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी लवकरच प्रशासनाला सूचना देऊन शाळा, कॉलेजच्या ५०० मीटर अंतरात एनर्जी ड्रिंक विक्रीस प्रतिबंध करू, तसेच लवकरच बैठक आयोजित करून यावर शाश्वत उपाय करू असे आश्वासन दिले. एनर्जी ड्रिंक्सच्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंदी आणावी अशीही मागणी मी सभागृहात केली. यावर सक्षम अधिकारी नेमून आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करावी अशा सूचना सभापती महोदयांनी दिल्या. #MonsoonSession2024 #BudgetSession2024 #Maharashtra #DrugsFreeMaharashtra #Sting #EnergyDrink #Youth #FutureGenerations CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Sanjay Rathod Dr Neelam Latika Diwakar Gorhe

Satyajeet Tambe

11,461 Aufrufe • vor 2 Jahren

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 Aufrufe • vor 1 Jahr

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,369 Aufrufe • vor 2 Jahren

जर्मनीतील वीजनिर्मिती- अणुऊर्जा आणि जगाची भविष्यातील वाटचाल. जर्मनीत १९६२ ते २०२४ पर्यंत तीन अणुऊर्जा प्रकल्प जवळपास ६.३ % इतकी प्रचंड मोठी वीजनिर्मिती करायचे. ते सर्व अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यांनी बंद केलेत. त्यातलाच हा एक कुलिंग टॅावर नियंत्रित स्फोटात आता पाडला गेलाय. हा जो व्हिडीओ आहे त्याकडे आपण प्रतिकात्मक दृष्टीने पहायला हवे. एका बाजूला न्यूक्लियर एनर्जी चांगली तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विनाशकारी दिसते. जगभरात यावर सतत चर्चा होत असते. भारतात यावर आपल्या राज्याइतकी चर्चा इतर कुठेच झाली नसेल. महाराष्ट्र गेली दीड- दोन दशके याने ढवळून निघालेला. जगभरात आता न्यूक्लियर एनर्जी आधारित प्लांट कमीच होत आहेत. तरीही येणाऱ्या काळात हा निर्णय योग्य कि अयोग्य हे कळेल. जर्मनीत गेल्या वर्षभरापासूनच अणुऊर्जा आधारित उर्जा निर्मिती शून्यावरच होती. त्यांनी ही ६.३ % टक्क्यांची तूट नवे सोलार प्लांट टाकून सहज भरून काढलीये. त्याशिवाय त्यांनी बॅटरीज आणि उर्जा साठवणूक करण्याच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केलीये. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि नव्या पॅावर ग्रीड साठी खास तंत्रज्ञांची नेमणूक केलीये. सरकार आणि खाजगी कंपन्या यात चांगला सहभाग नोंदवितात. याकामात जर्मनीने जगात आघाडी घेतलीये हे मात्र नक्की. जर्मनी हा एक असा देश आहे जो अपारंपारिक उर्जा क्षेत्रात फार प्रचंड वेगाने पुढे गेलाय. सोलार आणि विंड एनर्जी सारख्या अपारंपारिक उर्जेतून देशाला लागणारी जवळपास ५७% उर्जा हे लोक तयार करतात. (जगाची सरासरी ४१ % आहे.) आणि उरलेली ४३% उर्जा ते कोळसा, नॅचरल गॅस, बायोमास व इतर जीवाश्म इंधनांपासून तयार करतात. २०३० म्हणजे पुढील फक्त ४ वर्षात ७५ % उर्जानिर्मिती ही सोलार आणि विंड आधारित घेऊन जायचे मोठे टार्गेट त्यांनी सेट केलेय आणि सरकार तसेच खाजगी क्षेत्रातील त्यांची एकंदर घोडदौड पाहता हे सहज शक्यही वाटतेय. ग्रीन हायड्रोजन/अमोनिया संदर्भात गेली तीन वर्षे मी जर्मनीत जात आहे आणि त्यांचे इलेक्ट्रोलायझर्स, इंडस्ट्रीयल बर्नर्स, ग्रीन हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठीचे प्रयत्न, त्यावरील प्रयोग हे नक्कीच वाखाणण्याजोगे, जगाला दिशादर्शक आहेत. एका तर घरात त्यांच्या रूम हिटिंग /स्पेस हिंटिंग साठी सोलार आधारित ग्रीन हायड्रोजन सिस्टिम तीन वर्षांपूर्वी बसवली आहे. रूफ टॅाप सोलार हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मोठ्या प्रमाणावर विंड एनर्जी हे ही त्यांचे वैशिष्ट्य आहे. अपारंपारिक उर्जा हे फक्त जर्मनीतच नाही तर संपुर्ण जगासाठीच भविष्य आहे हे मान्य केले तरी यात काही गंमतीजमतीही आहेत. सोलार आणि विंड एनर्जी ही खूप स्वस्त आहे, स्वच्छ आहे वगैरे वगैरे आपण नेहमीच म्हणतो परंतू सोलार पॅनल्स बनविणासाठी आणि विंड मिल तयार करून बसविण्यासाठी जेवढं जीवाश्म इंधनं लागतं आणि मोठ्या प्रमाणावर रेअर अर्थ मिनरल्स लागतात त्याचे गुणोत्तर काही आजही फारसा मेळ खात नाही. दुसरं ज्या जर्मनीत आज ही मोठ्या प्रमाणावर, स्वच्छ, पर्यावरणपुरक, अक्षय उर्जा तयार होतीये ते पाहता तिथे विजेचे दर जगात सर्वात स्वस्त असायला हवेत. परंतू वास्तव मात्र अगदी उलटे आहे. जर्मनी, असो की युरोप, अमेरिका किंवा इतर अनेक देश जिथे जिथे सोलार आणि विंड पॅावर आहे तिथे विजेचे दर प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ भारतात विजेचा दर प्रती किलोवॅट $ ०.०८ आहे तर जर्मनीत तोच $०.३७ आहे. नेदरलॅंड, सिंगापूर, बेल्जियम, स्वीडन, जपान यातही तो तुलनेने $०.२२ ते ०.३२ पर्यंतच आहे. येणाऱ्या दशकभरात सोलार आणि विंड प्लांटच्या किंमती कमी होणार आणि हे रेट कमी होणार असं म्हणणं म्हणजे सोन्याचे दर पुन्हा “दहा - वीस हजार तोळ्यावर” किंवा “डिझेल, पेट्रोल खरचं ५० - ६० रूपये लिटरने मिळेल” अशी अपेक्षा बाळगणं…. असो. सहसा एवढे मोठे करेक्शन्स होत नाहीत हे इथे सुचवायचेय, इतकेच. आपल्यालाही या उर्जेशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायलाच हवी पण त्यापूर्वी - आपल्या जुन्या ग्रीड सिस्टिम मधून जे ट्रांन्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनचे जे १८ ते २० % लॅासेस होताहेत ते कमी करावे लागतील. घरातही आपण किमान २० ते ३० % उगीचच उर्जेचा वापर, चूकीच्या विजेच्या वस्तू, चूकीच्या पद्धतीचे इंस्टॅालेशन्स करतो, ते कमी करावं लागेल. नवे, इफिशियंट पॅावर प्लांट नव्याने लावावे लागतील आणि सर्वात महत्वाचे - आपल्या इथल्या सरकारला, तंत्रज्ञांना, खाजगी कंपन्यांनाही रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी पैसे ओतावे लागतील. पॅरासाईट राहून फक्त दलाली आणि कमिशन खाऊन परदेशी वस्तू इकडे चिकटवायची पद्धत बंद व्हायला हवी. मोठमोठ्या कॅार्पोरेट्स वर जशी CSR फंड वापराची बंधने आहेत तशीच R&D निधी योग्य ठिकाणी वापरला जावा अशी नवी नियमावली यायला हवी. #उर्जासाक्षरता

Prafulla Wankhede 🇮🇳

35,015 Aufrufe • vor 11 Monaten

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार. मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत... • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा. • या भाषेत प्राचीन साहित्य हवं. • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. •'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील... •मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. •भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. •प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. •महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील. •मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल. * प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. * अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन... राज ठाकरे ।

Raj Thackeray

147,886 Aufrufe • vor 2 Jahren

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 Aufrufe • vor 1 Jahr

६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. १) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन. २) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही. ३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ? ४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं. ५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ? ६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ? ७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे. ८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता. ९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?

Raj Thackeray

66,290 Aufrufe • vor 2 Monaten

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५

Raj Thackeray

140,202 Aufrufe • vor 1 Jahr

मायबाप सरकार, किमान थट्टा तरी करू नका... तलाठी, वन रक्षक सारख्या परीक्षेसाठी आकारले जाणारे शुल्क हजार रुपयांवर आणले गेले आहे. आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण - तरुणींनी इतकी रक्कम आणायची कोठून? इथं शेतकरी वर्षभर रक्ताचे पाणी करूनही त्याच्या पदरी कुटुंबाचा गाडा चालेल इतकाही दमडा पडत नाही. त्या शेतकऱ्यांच्या लेकरानी बापाकडे कोणत्या तोंडाने एखाद्या परीक्षेसाठी इतकी रक्कम मागायची? ५० हजारांची फिस क्लासला भरतात, असे तुम्ही म्हणता. त्याचे रिपोर्ट तुमच्याकडे आहेत म्हणता. तसे रिपोर्ट आमच्या ग्रामीण भागाचेही करा महोदय. इथलेही वास्तव येवू द्या समोर. किती तरुण इतके पैसे भरून क्लास करीत आहेत, हेही महाराष्ट्राला कळू द्या. शेतकऱ्यांचे सरकार म्हणवून घेताना नापिकी, दर शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्याकडे सोयीस्कर डोळेझाक करता. अगदी तसेच निव्वळ परीक्षा शुल्क नसल्याने स्पर्धेबाहेर फेकली जात असलेल्या शेतकऱ्यांच्या लेकराकडेही असे थातुर मातुर उत्तरं देऊन दुर्लक्ष करणे किती योग्य वाटते? आज हिशोब सांगताय, उद्या तरुण हिशोब करतील.... Devendra Fadnavis Aaditya Thackeray Ambadas Danve Omprakash Rajenimbalkar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Kailas Patil

28,264 Aufrufe • vor 3 Jahren

एक चूक आणि तिचे आयुष्य उद्धवसत.. मी हादरुन गेलो... #सातारा पाटण, सोनवडे : सौ. गौतमी शशिकांत पाटील यांची कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया चुकीची झाली. तिला त्रास होतोय हे ओरडून सांगत असताना डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयी पणे अनेक तास ऑपरेशन केले. ऑपेरेशन झाल्यावर ती शुद्धीवर आल्यावर पुन्हा जोरात पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी सलाईन मधून पेनकिलर दिले आणि दोन दिवसाने तिला डिस्चार्ज सुद्धा दिला, पुन्हा दुखायला लागलं पुन्हा आणलं पुन्हा तेच सलाईन दिले. हे सगळं घडलं सोनवडे सरकारी रुग्णालय येते, डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या हलगर्जीपणामुळे जे घडलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. आता त्यांच्या लक्ष्यात आलं कि काही खरं नाही तेव्हा सरकारी ऍम्ब्युलन्स मधून पाटण ला सोनोग्राफी साठी आणलं. तेथील डॉक्टरने पोट फुगलेले पाहून कराड गाटायला लावले. त्याच गाडीतून पेशन्ट नर्स सोबत सहित कराड येथील कॉटेज कुटीर हास्पिटल ला घेऊन गेले तिथेही केवळ पेनकिलर दिले. आता फरक कशाचाच पडत नव्हता, असाहाय वेदना वाढतच गेल्या, ज्यामुळे त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झालं आता गरज पडली व्हेंटिलेटरची तेव्हा सातारा सिव्हिल ला भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सोनवडे सरकारी रुग्णालय ते सातारा सिव्हिल रुग्णालय इथपर्यँतचा प्रवास झाल्यावर कुटुंब समजून गेले कि हे कुणीच सोनोग्राफी करत नाहीत तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्याचा सहारा घेतला सह्याद्री हॉस्पिटल कराड येते नेलं. त्या हॉस्पिटलने परिस्तिथी पाहून पेशन्ट सिरीयस आहे म्हणत त्यांना कृष्णा हॉस्पिटल ला नेण्याचा सल्ला दिला. आता तेथेही पेशन्टची गंभीर स्तिथी पाहता सांगलीला भारती हॉस्पिटल ला नेले. तिथे पेशन्ट ऍडमिट केल आणि इलाज करणायास सुरवात झाली. यात दोन तिला जाणवत होतं कि माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय. तिला पोटात पुन्हा वेदना सुरु झाल्या आणि आता तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरु झाला. यात दोन दिवसाचा कालावधी गेला. या हॉस्पिटलला पेशन्टचे तपासणी केले. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली. पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेकशन झालं आणि त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेकशन झालं आहे. त्यामुळं या डाक्टरांनी ऑपेरेशन करण्याचा निर्णय घेऊन ऑपरेशन केले. डॉक्टरांनी स्पष्टपने सांगितले कि कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा त्रास थांबलेला नाही. ही घटना चिमूटपणे 20 मे ते आजपर्यँत कुटुंबं सहन करत आहे. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करन्याचा सल्ला दिला आहे. हा अन्याय माझ्या कानावर आला मी तात्काळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांना हे प्रकरण समजून सांगितलं. या जिगरबाज वाघाने तात्काळ पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि आंदोलन सुरु केले. गेली पाच दिवस आंदोलन सुरु होते, पाऊस येत होता पण हे वाघ पाण्या पावसात बसून राहिले. उपोषण सुरूच ठेवले,हि घटना खूप गंभीर होती म्हणून अतिशय मोठा संघर्ष केला. आदित्य गायकवाड यांनी अखेर आज एक जणांच्या निलंबनाची लढाई जिंकली आणि दोन जणांचे निलंबनसाठी चौकशी लावली. गौतमी शशिकांत पाटिल अखेरच्या घटका मोजत आहे. इन्फेकशन एवढं वाढलं कि तिला मी जगणार नाहि अशी खात्री झाली. लेकरं, नवरा ती रडत असतात. आणि इकडे तिचे आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणारे आरोपी मोकाट आहेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. तात्काळ आरोपी निलंबीत करावे, राज्यसरकारने आरोग्य मंत्र्यांनी दखल घेऊन या मुलीला मोठ्या दवाखान्यात इलाज करून वाचवणयाचे प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबंला शासकीय 25लाख रुपये शासकी य मदत द्यावी. पावसात लढून एक जणांचे निलंबन करायला भाग लढणाऱ्या वाघाना जयभिम! ताई तू खचू नको, तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे... फक्त तू खचू नको CMO Maharashtra Devendra Fadnavis Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Rupali Chakankar #JusticeForGautami

Deepak Kedar

109,441 Aufrufe • vor 2 Jahren